Inside the Mind of a Master Procrastinator | Tim Urban | TED

57,930,736 views ・ 2016-04-06

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:12
So in college,
0
12645
1370
तर कॉलेजमध्ये असताना,
00:15
I was a government major,
1
15349
1564
प्रशासन हा माझा मुख्य विषय होता.
00:16
which means I had to write a lot of papers.
2
16937
2462
त्यामुळे मला खूप पेपर्स लिहावे लागले.
00:19
Now, when a normal student writes a paper,
3
19423
2048
जेव्हा एखादा साधारण विद्यार्थी पेपर लिहितो,
00:21
they might spread the work out a little like this.
4
21495
2373
तेव्हा त्याचं काम काहीसं अशा पद्धतीने होत असेल.
00:23
So, you know --
5
23892
1151
तर,
00:25
(Laughter)
6
25067
1657
(हशा)
00:26
you get started maybe a little slowly,
7
26748
1827
सुरुवात थोडी संथ होते.
00:28
but you get enough done in the first week
8
28599
1968
पण पहिल्या आठवड्यात पुरेसं काम होतं.
00:30
that, with some heavier days later on,
9
30591
1831
त्यानंतरचे काही दिवस भरपूर काम होतं.
00:32
everything gets done, things stay civil.
10
32446
2157
असं एकंदरीत काम पार पडतं सारं आटोक्यात राहतं.
00:34
(Laughter)
11
34627
1202
(हशा)
00:35
And I would want to do that like that.
12
35853
2271
आणि मला हे असंच घडावं असं वाटायचं.
00:38
That would be the plan.
13
38148
1194
बेत तर तसाच असायचा.
00:39
I would have it all ready to go,
14
39366
2490
मी अगदी तयार असायचो.
00:41
but then, actually, the paper would come along,
15
41880
2494
पण मग, खरोखरच पेपर लिहायची वेळ यायची.
00:44
and then I would kind of do this.
16
44398
1941
आणि मी असं काहीसं करायचो.
00:46
(Laughter)
17
46363
2370
(हशा)
00:48
And that would happen every single paper.
18
48757
2143
आणि हे प्रत्येक पेपरच्या वेळी घडत असे.
00:51
But then came my 90-page senior thesis,
19
51638
3882
पण मग आला सिनियर वर्षातला ९० पानी थिसिस.
00:55
a paper you're supposed to spend a year on.
20
55544
2287
या पेपरवर एक वर्षभर काम करायचं असतं.
00:57
And I knew for a paper like that, my normal work flow was not an option.
21
57855
3619
अशा पेपरसाठी माझी नेहमीची पध्दत चालली नसती हे मला ठाऊक होतं.
01:01
It was way too big a project.
22
61498
1401
हा पुष्कळच मोठा प्रकल्प होता.
01:02
So I planned things out,
23
62923
1153
म्हणून मी योजना आखली.
01:04
and I decided I kind of had to go something like this.
24
64100
3205
आणि असं काहीसं करायचं ठरवलं.
01:07
This is how the year would go.
25
67781
1452
तर हे वर्ष असं जायला हवं.
01:09
So I'd start off light,
26
69257
1967
मी सुरुवात हलकीशी करेन.
01:11
and I'd bump it up in the middle months,
27
71248
2318
मधल्या महिन्यांत काम वाढवेन.
01:13
and then at the end, I would kick it up into high gear
28
73590
2626
मग शेवटी, अगदी जोरदार काम करेन.
01:16
just like a little staircase.
29
76240
1439
एखाद्या छोट्या जिन्याप्रमाणे.
01:17
How hard could it be to walk up the stairs?
30
77703
2062
जिने चढणं असं कितीसं कठीण असणार?
01:20
No big deal, right?
31
80233
1319
त्यात काय मोठंसं?
01:23
But then, the funniest thing happened.
32
83090
1810
पण मग, अत्यंत मजेशीर गोष्ट घडली.
01:24
Those first few months?
33
84924
1311
ते पहिले काही महिने?
01:26
They came and went,
34
86791
1167
ते आले आणि गेले.
01:27
and I couldn't quite do stuff.
35
87982
1585
पण मी फार काही करू शकलो नाही.
01:29
So we had an awesome new revised plan.
36
89591
1849
मग मी एक मस्त नवी सुधारित योजना आखली
01:31
(Laughter)
37
91464
1167
(हशा)
01:32
And then --
38
92655
1159
आणि मग --
01:33
(Laughter)
39
93838
1882
(हशा)
01:35
But then those middle months actually went by,
40
95744
2784
मग ते मधले महिने खरोखरच निघून गेले.
01:38
and I didn't really write words,
41
98552
2182
पण मी एक शब्दही लिहिला नव्हता.
01:40
and so we were here.
42
100758
1835
तर, आपण इथे होतो.
01:43
And then two months turned into one month,
43
103500
2576
मग दोन महिन्यांचा एक महिना झाला.
01:46
which turned into two weeks.
44
106100
1625
त्याचेही दोन आठवडे झाले.
01:47
And one day I woke up
45
107749
1309
आणि एके दिवशी मी जागा झालो,
01:49
with three days until the deadline,
46
109724
2619
तेव्हा अंतिम मुदतीला तीन दिवस बाकी होते.
01:53
still not having written a word,
47
113502
1931
आणि अजून एक शब्दही लिहून झाला नव्हता.
01:55
and so I did the only thing I could:
48
115457
2059
मग मी शक्य असणारी एकमेव गोष्ट केली.
01:57
I wrote 90 pages over 72 hours,
49
117540
2607
७२ तासांमध्ये ९० पानं लिहिली.
02:00
pulling not one but two all-nighters --
50
120171
2276
एकच नव्हे, तर दोन रात्री जागरण केलं --
02:02
humans are not supposed to pull two all-nighters --
51
122471
2569
मनुष्यप्राण्यांनी दोन रात्री जागरण करायचं नसतं --
02:06
sprinted across campus,
52
126373
1993
विद्यापीठाच्या आवारात पळत सुटलो
02:08
dove in slow motion,
53
128390
1486
जणुकाही उडतच गेलो, आणि अगदी
02:09
and got it in just at the deadline.
54
129900
2056
शेवटच्या क्षणी पेपर पूर्ण करून दिला.
02:11
I thought that was the end of everything.
55
131980
2024
मला वाटलं, चला, झालं काम.
02:14
But a week later I get a call,
56
134028
1559
पण एका आठवड्यानंतर एक फोन आला.
02:15
and it's the school.
57
135611
1486
विद्यापीठाकडून.
02:17
And they say, "Is this Tim Urban?"
58
137757
1639
ते म्हणाले, "आपण टिम अर्बन का?"
02:19
And I say, "Yeah."
59
139420
1468
मी म्हणालो, "होय"
02:20
And they say, "We need to talk about your thesis."
60
140912
2340
ते म्हणाले, "आपल्या थिसिसबद्दल बोलायचं आहे. "
02:23
And I say, "OK."
61
143276
1255
मी म्हणालो, "बरं."
02:25
And they say,
62
145468
1222
आणि ते म्हणाले,
02:27
"It's the best one we've ever seen."
63
147230
1896
"इतका उत्तम थिसिस पाहिला नव्हता"
02:29
(Laughter)
64
149150
1705
(हशा)
02:32
(Applause)
65
152014
2690
(टाळ्या)
02:36
That did not happen.
66
156945
1302
हे असं घडलं नव्हतं.
02:38
(Laughter)
67
158271
2138
(हशा)
02:40
It was a very, very bad thesis.
68
160433
2623
तो एक खूप खूप वाईट थिसिस होता.
02:43
(Laughter)
69
163080
2274
(हशा)
02:45
I just wanted to enjoy that one moment when all of you thought,
70
165378
4100
मला त्या एकाच क्षणाची मजा लुटायची होती, जेव्हा तुम्हाला सर्वांना वाटलं होतं,
02:49
"This guy is amazing!"
71
169502
1905
"काय अफलातून माणूस आहे हा!"
02:51
(Laughter)
72
171431
1348
(हशा)
02:52
No, no, it was very, very bad.
73
172803
1667
नाही, नाही. तो खूपच वाईट होता.
02:55
Anyway, today I'm a writer-blogger guy.
74
175343
3408
असो. तर आज मी एक लेखक आणि ब्लॉगर आहे.
02:58
I write the blog Wait But Why.
75
178775
1743
"वेट बट व्हाय" हा ब्लॉग मी लिहितो.
03:00
And a couple of years ago, I decided to write about procrastination.
76
180542
3736
आणि दोन वर्षांपूर्वी, मी आळशीपणाबद्दल लिहायचं ठरवलं.
03:04
My behavior has always perplexed the non-procrastinators around me,
77
184302
3284
उत्साही लोकांना माझं वागणं नेहमीच गोंधळात पाडतं.
03:07
and I wanted to explain to the non-procrastinators of the world
78
187610
3688
आळशी लोकांच्या डोक्यात काय चाललेलं असतं, ते
03:11
what goes on in the heads of procrastinators,
79
191322
2107
मला जगभरातल्या उत्साही लोकांना सांगायचं होतं.
03:13
and why we are the way we are.
80
193453
1440
आम्ही जसे असतो, तसे का असतो?
03:14
Now, I had a hypothesis
81
194917
1156
माझं एक गृहीतक होतं.
03:16
that the brains of procrastinators were actually different
82
196097
2855
आळशी लोकांचे मेंदू, प्रत्यक्षात,
03:18
than the brains of other people.
83
198976
1957
इतर लोकांच्या मेंदूंपेक्षा वेगळे असतात.
03:21
And to test this, I found an MRI lab
84
201698
2191
याची चाचणी घेण्यासाठी मी एक एमआरआय लॅब शोधली.
03:23
that actually let me scan both my brain
85
203913
2432
त्यांनी मला माझा मेंदू आणि
03:26
and the brain of a proven non-procrastinator,
86
206369
2655
एका उत्साही माणसाचा मेंदू, दोन्हींचे स्कॅन काढू दिले.
03:29
so I could compare them.
87
209048
1435
तुलना करण्यासाठी.
03:30
I actually brought them here to show you today.
88
210507
2201
ते मी आज इथे आणले आहेत, तुम्हाला दाखवण्यासाठी.
03:32
I want you to take a look carefully to see if you can notice a difference.
89
212732
3537
नीट लक्षपूर्वक बघा, काही फरक दिसतो का.
03:36
I know that if you're not a trained brain expert,
90
216293
2314
जर तुम्ही प्रशिक्षित मेंदूतज्ज्ञ नसाल,
03:38
it's not that obvious, but just take a look, OK?
91
218631
2263
तर ते सहज समजणार नाही. तरी पण एकदा पहाच.
03:40
So here's the brain of a non-procrastinator.
92
220918
2128
तर हा आहे उत्साही माणसाचा मेंदू.
03:43
(Laughter)
93
223835
2274
(हशा)
03:46
Now ...
94
226133
1151
आता..
03:48
here's my brain.
95
228325
1314
हा माझा मेंदू.
03:50
(Laughter)
96
230280
2726
(हशा)
03:55
There is a difference.
97
235713
1564
दोघांत फरक आहे.
03:57
Both brains have a Rational Decision-Maker in them,
98
237904
2388
दोन्हींत एक "विचारपूर्वक निर्णय घेणारा" आहे.
04:00
but the procrastinator's brain
99
240316
1652
पण आळशाच्या मेंदूत एक
04:01
also has an Instant Gratification Monkey.
100
241992
2986
"झटपट समाधानाचं माकड" सुद्धा आहे.
04:05
Now, what does this mean for the procrastinator?
101
245002
2302
तर याचा आळशावर काय परिणाम होतो?
04:07
Well, it means everything's fine until this happens.
102
247328
2441
याचा अर्थ, सगळं आलबेल आहे. हे असं काही घडेपर्यंत..
04:09
[This is a perfect time to get some work done.] [Nope!]
103
249793
2622
[काम पूर्ण करायला ही वेळ उत्तम आहे.] [नाही!]
04:12
So the Rational Decision-Maker will make the rational decision
104
252439
2933
तर, "विचारपूर्वक निर्णय घेणारा",
04:15
to do something productive,
105
255396
1896
काहीतरी भरीव काम करण्याचा निर्णय घेतो.
04:17
but the Monkey doesn't like that plan,
106
257316
1950
पण माकडाला हा बेत आवडत नाही.
04:19
so he actually takes the wheel,
107
259290
1508
म्हणून माकड, चक्र ताब्यात घेतं
04:20
and he says, "Actually, let's read the entire Wikipedia page
108
260822
2881
आणि म्हणतं, "आपण विकिपीडियातलं ते पूर्ण पान वाचूया,
04:23
of the Nancy Kerrigan/ Tonya Harding scandal,
109
263727
2136
नॅन्सी केरिगन/ टोन्या हार्डिंग भानगडीचं.
04:25
because I just remembered that that happened.
110
265887
2131
कारण ती भानगड झाली होती, हे मला आत्ता आठवलं.
04:28
(Laughter)
111
268042
1016
(हशा)
04:29
Then --
112
269082
1158
मग..
04:30
(Laughter)
113
270264
1263
(हशा)
04:31
Then we're going to go over to the fridge,
114
271551
2038
मग आपण फ्रीजजवळ जाऊ.
04:33
to see if there's anything new in there since 10 minutes ago.
115
273613
2866
गेल्या १० मिनिटांत त्यात काही नवं आलं आहे का, ते पाहू.
04:36
After that, we're going to go on a YouTube spiral
116
276503
2638
मग आपण यूट्यूब ची सफर करू.
04:39
that starts with videos of Richard Feynman talking about magnets
117
279165
3250
रिचर्ड फाईनमन यांच्या, लोहचुंबकाबद्दलच्या व्हिडियोपासून सुरुवात करून
04:42
and ends much, much later with us watching interviews
118
282439
2716
बऱ्याच वेळानंतर, आपली सफर संपेल,
04:45
with Justin Bieber's mom.
119
285179
1880
ती जस्टिन बीबरच्या आईच्या मुलाखतीने.
04:47
(Laughter)
120
287083
2188
(हशा)
04:49
"All of that's going to take a while,
121
289295
1763
"हे सर्व करायला खूप वेळ लागणार,
04:51
so we're not going to really have room on the schedule for any work today.
122
291082
3502
त्यामुळे आपल्या वेळापत्रकात कामासाठी जागाच उरणार नाही.
04:54
Sorry!"
123
294608
1163
सॉरी!"
04:55
(Sigh)
124
295795
1165
(हं )
04:58
Now, what is going on here?
125
298325
3369
आता, इथे काय चाललं आहे?
05:03
The Instant Gratification Monkey does not seem like a guy
126
303481
2691
"झटपट समाधानाचं माकड" हा प्राणी चक्र धरू देण्याच्या
05:06
you want behind the wheel.
127
306196
1254
लायकीचा दिसत नाही.
05:07
He lives entirely in the present moment.
128
307474
1945
हा केवळ आत्ताच्या क्षणापुरता जगतो.
05:09
He has no memory of the past, no knowledge of the future,
129
309443
2828
याला भूतकाळाचं स्मरण नाही, भविष्याचं ज्ञान नाही.
05:12
and he only cares about two things:
130
312295
1697
याला फक्त फिकीर आहे,
05:14
easy and fun.
131
314016
1683
सोप्या आणि गमतीच्या गोष्टींची.
05:16
Now, in the animal world, that works fine.
132
316338
3092
प्राण्यांच्या जगात हे चालतं.
05:19
If you're a dog
133
319454
1208
तुम्ही जर कुत्रा असाल,
05:20
and you spend your whole life doing nothing other than easy and fun things,
134
320686
3571
आणि तुमचं सगळं आयुष्य तुम्ही सोप्या आणि गमतीच्या गोष्टी करण्यात घालवत असाल,
05:24
you're a huge success!
135
324281
1165
तर तुम्ही यशस्वी ठराल.
05:25
(Laughter)
136
325470
1911
(हशा)
05:27
And to the Monkey,
137
327405
1286
त्या माकडाच्या दृष्टीने,
05:29
humans are just another animal species.
138
329969
2094
माणसं म्हणजे प्राण्यांतलीच एक जात.
05:32
You have to keep well-slept, well-fed and propagating into the next generation,
139
332087
4506
अन्न, झोप आणि पुनरुत्पादन इतकं त्यांना पुरतं.
05:36
which in tribal times might have worked OK.
140
336617
2286
आदिवासींच्या काळात हे चाललं असतं.
05:38
But, if you haven't noticed, now we're not in tribal times.
141
338927
2850
पण, लक्षात आलं का, हा आदिवासींचा काळ नव्हे.
05:41
We're in an advanced civilization, and the Monkey does not know what that is.
142
341801
4133
आपण एका प्रगत संस्कृतीत राहतो, आणि या माकडाला त्याविषयी काही माहीत नाही.
05:45
Which is why we have another guy in our brain,
143
345958
2281
म्हणून आपल्या मेंदूत दुसरा प्राणी असतो.
05:48
the Rational Decision-Maker,
144
348263
2365
विचारपूर्वक निर्णय घेणारा.
05:50
who gives us the ability to do things no other animal can do.
145
350652
3027
इतर प्राण्यांना अशक्य अशा गोष्टी आपण त्याच्यामुळे करू शकतो.
05:53
We can visualize the future.
146
353703
1921
आपण भविष्याची कल्पना करू शकतो.
05:55
We can see the big picture.
147
355648
1752
परिस्थितीचं पूर्ण चित्र बघू शकतो.
05:57
We can make long-term plans.
148
357424
1350
दीर्घ मुदतीचे बेत आखू शकतो.
05:58
And he wants to take all of that into account.
149
358798
2483
हे सगळं तो लक्षात घेतो.
06:02
And he wants to just have us do
150
362138
1691
आणि योग्य त्याच गोष्टी
06:03
whatever makes sense to be doing right now.
151
363853
2948
आपल्याला करू देतो.
06:06
Now, sometimes it makes sense
152
366825
1389
कधीतरी सोप्या आणि मजेदार
06:08
to be doing things that are easy and fun,
153
368238
2029
गोष्टी करणंही योग्य असतं.
06:10
like when you're having dinner or going to bed
154
370291
2151
जसं की जेवताना किंवा झोपण्यापूर्वी. किंवा
06:12
or enjoying well-earned leisure time.
155
372466
1828
कष्टाने कमावलेले फुरसतीचे क्षण भोगताना
06:14
That's why there's an overlap.
156
374318
1450
इथे दोघे एकत्र येतात.
06:15
Sometimes they agree.
157
375792
1744
काही वेळा, त्यांची मतं जुळतात.
06:17
But other times, it makes much more sense
158
377560
2822
पण इतर वेळी, पूर्ण परिस्थिती पाहता,
06:20
to be doing things that are harder and less pleasant,
159
380406
3602
कठीण आणि कमी मजेच्या गोष्टी करणंच
06:24
for the sake of the big picture.
160
384032
1540
जास्त योग्य ठरतं.
06:25
And that's when we have a conflict.
161
385596
1889
आणि इथेच झगडा होतो.
06:28
And for the procrastinator,
162
388017
1315
आळशी माणसाचा झगडा
06:29
that conflict tends to end a certain way every time,
163
389356
2509
नेहमी एका विशिष्ट प्रकाराने संपतो.
06:31
leaving him spending a lot of time in this orange zone,
164
391889
3720
त्याचा बराचसा वेळ या केशरी भागात घालवून.
06:35
an easy and fun place that's entirely out of the Makes Sense circle.
165
395633
4327
या सोप्या आणि मजेच्या जागेत, जी पूर्णपणे योग्य गोष्टींच्या वर्तुळाबाहेर आहे.
06:39
I call it the Dark Playground.
166
399984
2279
मी त्या जागेला गडद मैदान म्हणतो.
06:42
(Laughter)
167
402287
1624
(हशा)
06:43
Now, the Dark Playground is a place
168
403935
3128
गडद मैदान ही जागा,
06:47
that all of you procrastinators out there know very well.
169
407087
3192
तुम्हा सगळ्या आळशी लोकांना चांगलीच ठाऊक आहे.
06:50
It's where leisure activities happen
170
410892
1804
तिथे रिकामटेकडे उद्योग केले जातात.
06:52
at times when leisure activities are not supposed to be happening.
171
412720
3310
ज्या वेळी ते करायला नकोत, त्या वेळी.
06:56
The fun you have in the Dark Playground
172
416418
1890
काळ्या मैदानात केलेली गंमत ही
06:58
isn't actually fun, because it's completely unearned,
173
418332
2483
खरोखरची गंमत नसते. कारण ती कमावलेली अजिबात नसते.
07:00
and the air is filled with guilt, dread, anxiety, self-hatred --
174
420839
3215
तिथल्या हवेत असतो अपराधीपणा, भीती, चिंता, स्व-तिरस्कार
07:04
all of those good procrastinator feelings.
175
424078
2118
या सगळ्या पक्क्या आळशाच्या भावना.
07:06
And the question is, in this situation, with the Monkey behind the wheel,
176
426703
3476
आता प्रश्न असा, की माकडाच्या हातात चक्र असताना,
07:10
how does the procrastinator ever get himself over here to this blue zone,
177
430203
3593
आळशी या निळ्या भागात येऊच कसा शकेल?
07:13
a less pleasant place, but where really important things happen?
178
433820
3281
जिथे मजा कमी, पण महत्त्वाची कामं होतात, तिथे?
07:17
Well, turns out the procrastinator has a guardian angel,
179
437125
5037
तर, आळशाचा पाठीराखा एक देवदूत असतो.
07:22
someone who's always looking down on him and watching over him
180
442186
3208
जो सतत त्याच्यावर नजर ठेवून , त्याची काळजी वाहत असतो.
07:25
in his darkest moments --
181
445418
1430
त्याच्या कठीण समयी.
07:26
someone called the Panic Monster.
182
446872
2095
त्याचं नाव घबराट राक्षस.
07:28
(Laughter)
183
448991
3078
(हशा)
07:34
Now, the Panic Monster is dormant most of the time,
184
454386
4860
हा घबराट राक्षस एरवी सुप्तावस्थेत असतो.
07:39
but he suddenly wakes up anytime a deadline gets too close
185
459270
3902
पण जेव्हा एखादी मुदत संपत येते, किंवा चारचौघात लाज जाईल असा धोका निर्माण होतो,
07:43
or there's danger of public embarrassment,
186
463196
2045
व्यवसाय धोक्यात येतो, किंवा असाच काही
07:45
a career disaster or some other scary consequence.
187
465265
2511
भयंकर परिणाम होतो, तेव्हा तो अचानक जागा होतो.
07:47
And importantly, he's the only thing the Monkey is terrified of.
188
467800
4172
आणि महत्त्वाचं म्हणजे, माकड फक्त त्याला एकट्यालाच घाबरतं.
07:51
Now, he became very relevant in my life pretty recently,
189
471996
4578
नुकताच त्याचा माझ्या आयुष्याशी जवळचा संबंध आला.
07:56
because the people of TED reached out to me about six months ago
190
476598
3246
सहा महिन्यांपूर्वी टेड च्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला
07:59
and invited me to do a TED Talk.
191
479868
2021
आणि मला टेड भाषण करण्याचं आमंत्रण दिलं.
08:01
(Laughter)
192
481913
2428
(हशा)
08:07
Now, of course, I said yes.
193
487058
1907
अर्थातच, मी हो म्हटलं.
08:08
It's always been a dream of mine to have done a TED Talk in the past.
194
488989
3805
मी मागे कधीतरी टेड भाषण केलेलं असावं, असं स्वप्न मी नेहमीच पाहायचो.
08:12
(Laughter)
195
492818
3972
(हशा)
08:16
(Applause)
196
496814
3697
(टाळ्या)
08:24
But in the middle of all this excitement,
197
504203
1969
पण या सगळ्या गडबडीमध्ये
08:26
the Rational Decision-Maker seemed to have something else on his mind.
198
506196
3301
"विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या"च्या मनात काही वेगळाच विचार होता.
08:29
He was saying, "Are we clear on what we just accepted?
199
509521
2548
तो म्हणत होता, "आपण काय कबूल केलं, कळलं का?"
08:32
Do we get what's going to be now happening one day in the future?
200
512093
3249
भविष्यात एके दिवशी काय घडणार आहे, ते नीट समजलं आहे का?
08:35
We need to sit down and work on this right now."
201
515366
2267
आपल्याला आत्ताच बसून यावर काम केलं पाहिजे.
08:37
And the Monkey said, "Totally agree, but let's just open Google Earth
202
517657
3265
पण माकड म्हणालं, "एकदम कबूल. पण आधी आपण गूगल अर्थ उघडूया.
08:40
and zoom in to the bottom of India, like 200 feet above the ground,
203
520946
3160
आणि भारताचं दक्षिण टोक जवळून पाहूया. अगदी जमिनीपासून २०० फुटांवर.
08:44
and scroll up for two and a half hours til we get to the top of the country,
204
524130
3621
मग अडीच तास वर सरकत जाऊ, अगदी उत्तर टोक दिसेपर्यंत.
08:47
so we can get a better feel for India."
205
527775
1978
म्हणजे भारताचं नीट दर्शन घडेल.
08:49
(Laughter)
206
529777
4435
(हशा)
08:55
So that's what we did that day.
207
535149
1485
तर त्या दिवशी आम्ही तेच केलं.
08:56
(Laughter)
208
536658
2670
(हशा)
09:00
As six months turned into four and then two and then one,
209
540604
3896
सहा महिन्यांचे चार झाले, मग दोन आणि मग एक.
09:04
the people of TED decided to release the speakers.
210
544524
3095
टेड च्या लोकांनी वक्त्यांची नावं प्रसिद्ध केली.
09:07
And I opened up the website, and there was my face
211
547643
2612
मी वेबसाईट उघडली. तिथे माझाच चेहरा
09:10
staring right back at me.
212
550279
1356
माझ्याकडे पाहत होता.
09:11
And guess who woke up?
213
551659
1600
ओळखा पाहू, कोण जागा झाला असेल?
09:13
(Laughter)
214
553283
3115
(हशा)
09:17
So the Panic Monster starts losing his mind,
215
557430
2450
तर घबराट राक्षसाचं डोकंच फिरतं.
09:19
and a few seconds later, the whole system's in mayhem.
216
559904
2746
काही सेकंदांतच सर्वत्र कल्लोळ माजतो.
09:22
(Laughter)
217
562674
2446
(हशा)
09:27
And the Monkey -- remember, he's terrified of the Panic Monster --
218
567511
3101
आणि माकड - ते घबराट राक्षसाला घाबरतं, आठवतंय?
09:30
boom, he's up the tree!
219
570636
1158
धूम.. ते चढतं झाडावर.
09:31
And finally,
220
571818
1151
आणि शेवटी,
09:32
finally, the Rational Decision-Maker can take the wheel
221
572993
2596
"विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या"च्या हातात चक्र येतं.
09:35
and I can start working on the talk.
222
575613
1718
आणि मला माझ्या भाषणावर काम करता येतं.
09:37
Now, the Panic Monster explains
223
577355
2288
घबराट राक्षस हा
09:39
all kinds of pretty insane procrastinator behavior,
224
579667
3481
आळशांचा सर्व मूर्खपणा उलगडू शकतो.
09:43
like how someone like me could spend two weeks
225
583172
2334
उदाहरणार्थ, माझ्यासारखा कोणी दोन आठवडे घालवून
09:45
unable to start the opening sentence of a paper,
226
585530
3844
पेपरची सुरुवातही करू शकत नाही.
09:49
and then miraculously find the unbelievable work ethic
227
589398
2771
पण नंतर अचानक गवसलेल्या विलक्षण उत्साहाने
09:52
to stay up all night and write eight pages.
228
592193
3096
रात्रभर जागून आठ पानं लिहितो.
09:56
And this entire situation, with the three characters --
229
596385
2982
आणि ही संपूर्ण परिस्थिती, त्यातल्या तीन पात्रांसहित,
09:59
this is the procrastinator's system.
230
599391
2020
ही आळशाची रीत.
10:02
It's not pretty, but in the end, it works.
231
602096
3425
ती नेटकी दिसत नाही, पण सरतेशेवटी काम पार पाडते.
10:05
This is what I decided to write about on the blog a couple of years ago.
232
605545
4062
तर दोन वर्षांपूर्वी मी माझ्या ब्लॉगवर हेच लिहायचं ठरवलं.
10:09
When I did, I was amazed by the response.
233
609631
2971
आणि ते लिहिल्यावर आलेल्या प्रतिसादांनी मी थक्क झालो.
10:12
Literally thousands of emails came in,
234
612626
2153
अक्षरशः हजारो ईमेल्स आल्या.
10:14
from all different kinds of people from all over the world,
235
614803
2777
जगभरातल्या अनेक ठिकाणांहून, अनेक प्रकारच्या लोकांकडून.
10:17
doing all different kinds of things.
236
617604
1738
अनेक प्रकारच्या गोष्टी करणाऱ्यांकडून
10:19
These are people who were nurses, bankers, painters, engineers
237
619366
2966
यात होत्या नर्सेस, बॅँकर्स, रंगारी, अभियंते,
10:22
and lots and lots of PhD students.
238
622356
2322
आणि पी. एच डी चे अनेकानेक विद्यार्थी.
10:24
(Laughter)
239
624702
2001
(हशा)
10:26
And they were all writing, saying the same thing:
240
626727
2288
आणि त्या सगळ्यांनी एकच गोष्ट लिहिली होती.
10:29
"I have this problem too."
241
629039
1952
"माझीसुद्धा हीच समस्या आहे."
10:31
But what struck me was the contrast between the light tone of the post
242
631015
3829
पण मला जाणवलं, की माझं लिखाण जरी हलकंफुलकं असलं,
10:34
and the heaviness of these emails.
243
634868
2095
तरी या ईमेल्स मात्र गंभीर होत्या.
10:36
These people were writing with intense frustration
244
636987
3083
हे लोक तीव्र निराशेने लिहित होते.
10:40
about what procrastination had done to their lives,
245
640094
2762
आळशीपणामुळे त्यांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामांबद्दल.
10:42
about what this Monkey had done to them.
246
642880
2030
या माकडाने काय केलं त्याबद्दल.
10:46
And I thought about this, and I said,
247
646902
2966
मी विचार केला,
10:49
well, if the procrastinator's system works, then what's going on?
248
649892
3112
आळशाच्या रीतीनेही कामं होतात, तर मग इथे काय चुकलं?
10:53
Why are all of these people in such a dark place?
249
653028
2486
हे सगळे लोक असे गर्तेत का?
10:55
Well, it turns out that there's two kinds of procrastination.
250
655538
3298
तर, आळस दोन प्रकारचा असतो असं दिसतं.
10:59
Everything I've talked about today, the examples I've given,
251
659987
2834
आज मी ज्या गोष्टींबद्दल बोललो, जी उदाहरणं दिली,
11:02
they all have deadlines.
252
662845
1151
त्यांना मुदत होती.
11:04
And when there's deadlines,
253
664020
1298
आणि जेव्हा मुदत असते,
11:05
the effects of procrastination are contained to the short term
254
665342
2925
तेव्हा आळसाचे परिणाम थोडावेळ टिकतात.
11:08
because the Panic Monster gets involved.
255
668291
1913
कारण तिथे घबराट राक्षस अवतरतो.
11:10
But there's a second kind of procrastination
256
670228
2054
पण दुसऱ्या प्रकारचाही एक आळस असतो.
11:12
that happens in situations when there is no deadline.
257
672306
2487
ज्या परिस्थितीला मुदत नसते, तिथे हा आळस दिसतो.
11:14
So if you wanted a career where you're a self-starter --
258
674817
2690
जर तुम्हाला स्वबळावर व्यवसाय घडवायचा असेल,
11:17
something in the arts, something entrepreneurial --
259
677531
2413
काही कलाविषयक, किंवा उद्योगधंदा
11:19
there's no deadlines on those things at first, because nothing's happening,
260
679968
3525
तर, आरंभ करताना मुदत नसते, कारण काम सुरूच झालेलं नसतं.
11:23
not until you've gone out and done the hard work
261
683517
2244
जोपर्यंत तुम्ही खूप कष्ट करून
11:25
to get momentum, get things going.
262
685785
1626
कामाची गती वाढवत नाही, तोपर्यंत.
11:27
There's also all kinds of important things outside of your career
263
687435
3078
व्यवसायाव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टींना
11:30
that don't involve any deadlines,
264
690537
1605
मुदत नसते.
11:32
like seeing your family or exercising and taking care of your health,
265
692166
3265
जसं की, नातेवाईकांना भेटणं, व्यायाम करणं, आरोग्याची काळजी घेणं.
11:35
working on your relationship
266
695455
1404
जोडीदाराशी चांगलं नातं जुळवणं
11:36
or getting out of a relationship that isn't working.
267
696883
2681
किंवा संबंध असह्य झाला असल्यास तो तोडणं.
11:39
Now if the procrastinator's only mechanism of doing these hard things
268
699588
5148
आता या कामांत केवळ घबराट राक्षसाची भीती हीच जर आळशाची रीत असेल,
11:44
is the Panic Monster, that's a problem,
269
704760
1885
तर हा मोठा प्रश्न आहे.
11:46
because in all of these non-deadline situations,
270
706669
2800
कारण या मुदत नसलेल्या कामांत,
11:49
the Panic Monster doesn't show up.
271
709493
1628
घबराट राक्षस पुढे येतच नाही.
11:51
He has nothing to wake up for,
272
711145
1452
त्याला जागं व्हायला कारण नसतं
11:52
so the effects of procrastination, they're not contained;
273
712621
2698
त्यामुळे आळसाचे परिणाम रोखले जात नाहीत.
11:55
they just extend outward forever.
274
715343
1740
ते सतत पुढे पसरत जातात.
11:57
And it's this long-term kind of procrastination
275
717953
2740
हा दीर्घ मुदतीचा आळस
12:00
that's much less visible and much less talked about
276
720717
3081
फार दिसून येत नाही. त्याबद्दल फार बोललं जात नाही.
12:03
than the funnier, short-term deadline-based kind.
277
723822
2901
छोटी मुदत असणाऱ्या, धमाल उडवणाऱ्या आळसाइतकं.
12:06
It's usually suffered quietly and privately.
278
726747
3103
याचे परिणाम गपचूप सहन केले जातात.
12:10
And it can be the source
279
730816
1154
या आळसामधून
12:11
of a huge amount of long-term unhappiness, and regrets.
280
731994
3735
दीर्घकाळचं दुःख आणि हळहळ निर्माण होऊ शकते.
12:16
And I thought, that's why those people are emailing,
281
736576
2872
मग मला वाटलं, म्हणूनच हे सगळे लोक ईमेल्स करताहेत.
12:19
and that's why they're in such a bad place.
282
739472
2502
म्हणूनच ते गर्तेत आहेत.
12:21
It's not that they're cramming for some project.
283
741998
2744
ते एखाद्या कामाशीच अडलेले नाहीत.
12:24
It's that long-term procrastination has made them feel like a spectator,
284
744766
3421
तर, आळसात खूप काळ घालवल्यामुळे ते आपल्याच आयुष्याचे
12:28
at times, in their own lives.
285
748211
2039
जणु प्रेक्षक बनले आहेत.
12:30
The frustration is not that they couldn't achieve their dreams;
286
750594
2982
स्वप्नं साकार झाली नाहीत, म्हणून ते निराश झालेले नाहीत.
12:33
it's that they weren't even able to start chasing them.
287
753600
3089
तर ते स्वप्नांचा पाठलाग सुरूच करू शकले नाहीत, म्हणून.
12:36
So I read these emails and I had a little bit of an epiphany --
288
756713
4183
या ईमेल्स वाचून मला एक साक्षात्कार झाला..
12:42
that I don't think non-procrastinators exist.
289
762182
3400
मला वाटतं, अजिबात आळस नसणारी माणसं अस्तित्वातच नाहीत.
12:45
That's right -- I think all of you are procrastinators.
290
765979
3236
हो, बरोबर. मला वाटतं, तुम्ही सगळे आळशी आहात.
12:49
Now, you might not all be a mess,
291
769898
1914
आता, तुम्ही अगदी रद्दड नसाल,
12:51
like some of us,
292
771836
1350
आपल्यापैकी काही आहेत तसे.
12:53
(Laughter)
293
773210
1529
(हशा)
12:54
and some of you may have a healthy relationship with deadlines,
294
774763
3316
तुमच्यापैकी काही मुदतीच्या तारखांशी सख्य राखून असतील.
12:58
but remember: the Monkey's sneakiest trick
295
778103
2524
पण लक्षात ठेवा: जेव्हा मुदतीची तारीखच नसते
13:00
is when the deadlines aren't there.
296
780651
1840
तेव्हाच माकड सर्वात छुपी चाल खेळतं.
13:03
Now, I want to show you one last thing.
297
783249
2032
आता, एक शेवटची गोष्ट दाखवतो.
13:05
I call this a Life Calendar.
298
785305
2373
याला मी आयुष्याचं कॅलेंडर म्हणतो.
13:08
That's one box for every week of a 90-year life.
299
788352
4279
यात नव्वद वर्षांच्या आयुष्यातल्या प्रत्येक आठवड्यासाठी एक चौकोन आहे.
13:13
That's not that many boxes,
300
793345
1589
म्हणजे काही फार चौकोन नव्हेत.
13:14
especially since we've already used a bunch of those.
301
794958
2974
आजपर्यंत आपण त्यातले बरेच चौकोन वापरले आहेत.
13:18
So I think we need to all take a long, hard look at that calendar.
302
798607
5132
मला वाटतं, आपण सर्वांनी या कॅलेंडरकडे नीट पहावं.
13:24
We need to think about what we're really procrastinating on,
303
804977
3013
आपण नक्की कसला आळस करीत आहोत, त्याचा विचार करावा.
13:28
because everyone is procrastinating on something in life.
304
808014
3365
कारण प्रत्येकजणच कसला ना कसला आळस करीत असतो.
13:32
We need to stay aware of the Instant Gratification Monkey.
305
812782
3030
आपण त्या झटपट समाधानाच्या माकडापासून सावध राहायला हवं.
13:37
That's a job for all of us.
306
817455
2492
हे काम आपण सर्वांनीच करायला हवं.
13:40
And because there's not that many boxes on there,
307
820669
2300
तिथे काही फार चौकोन शिल्लक उरलेले नाहीत.
13:42
it's a job that should probably start today.
308
822993
2290
म्हणून आजच हे काम सुरू करायला हवं.
13:45
Well, maybe not today, but ...
309
825307
3000
हं.. म्हणजे अगदी आजच नव्हे काही,
13:48
(Laughter)
310
828331
1641
(हशा)
13:49
You know.
311
829996
1150
कळलं ना,
13:51
Sometime soon.
312
831576
1150
लवकरच कधीतरी.
13:53
Thank you.
313
833393
1209
धन्यवाद.
13:54
(Applause)
314
834626
7998
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7