The paradox of choice | Barry Schwartz | TED

6,013,282 views ・ 2007-01-16

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chaitanya Shivade Reviewer: Gayatri Natu
00:25
I'm going to talk to you about some stuff that's in this book of mine
0
25000
3404
मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे, त्याचा उल्लेख माझ्या पुस्तकात आहे.
00:28
that I hope will resonate with other things you've already heard,
1
28428
3118
मी अशी आशा करतो की हे ऐकून तुम्ही इतर गोष्टींशी याचा संबंध लावाल
00:31
and I'll try to make some connections myself,
2
31570
2214
आणि तसं झालं नाही तर मी स्वतः ते तुम्हाला दाखवून द्यायचा प्रयत्न करेन.
00:33
in case you miss them.
3
33808
1646
00:35
But I want to start with what I call the "official dogma."
4
35478
4085
मी सुरुवात करणार आहे ती "अधिकृत तत्त्वप्रणाली" पासून
00:39
The official dogma of what?
5
39983
1464
पण, कशाची अधिकृत तत्त्वप्रणाली?
00:41
The official dogma of all Western industrial societies.
6
41471
3348
सगळ्या पाश्चात्य औद्योगिक समाजांची अधिकृत तत्त्वप्रणाली.
00:44
And the official dogma runs like this:
7
44843
2279
आणि ही अधिकृत तत्त्वप्रणाली अशी आहे:
00:47
if we are interested in maximizing the welfare of our citizens,
8
47146
4669
जर आपल्याला नागरिकांचे जास्तीत जास्त कल्याण करण्यात रस असेल,
00:51
the way to do that is to maximize individual freedom.
9
51839
4975
तर वैयक्तिक स्वातंत्र्य वाढवले पाहिजे.
00:57
The reason for this is both that freedom is, in and of itself, good,
10
57965
4170
कारण स्वातंत्र्य हे तत्त्वत: माणसासाठी चांगले, महत्वाचे,
01:02
valuable, worthwhile, essential to being human,
11
62159
3414
अत्यावश्यक आणि मौल्यवान आहे.
01:05
and because if people have freedom,
12
65597
2379
आणि जर प्रत्येकाला स्वातंत्र्य असेल,
01:08
then each of us can act on our own
13
68000
2363
तर प्रत्येक व्यक्ती असे कार्य करत राहील,
01:10
to do the things that will maximize our welfare,
14
70387
2294
ज्यामुळे तिचे सर्वाधिक कल्याण होईल,
01:12
and no one has to decide on our behalf.
15
72705
2098
आणि आपले निर्णय कधीच इतर कोणाला घ्यावे लागणार नाहीत.
01:15
The way to maximize freedom is to maximize choice.
16
75771
4088
स्वातंत्र्य वाढवायचं असेल तर निवडीचे पर्याय वाढवले पाहिजेत.
01:20
The more choice people have, the more freedom they have,
17
80738
3856
लोकांकडे जितके जास्त पर्याय असतील, तितकं जास्त स्वातंत्र्य असेल,
01:24
and the more freedom they have,
18
84618
1603
आणि जितकं जास्त स्वातंत्र्य,
01:26
the more welfare they have.
19
86245
1541
तितकं जास्त कल्याण.
01:29
This, I think, is so deeply embedded in the water supply
20
89000
5507
हे विचार आपल्याकडच्या पाण्यातच असे बेमालूम मिसळले गेलेत
01:34
that it wouldn't occur to anyone to question it.
21
94531
3015
की त्यांच्यावर आक्षेप घ्यावा असा विचारही कोणाला शिवणार नाही.
आणि या विचारांनी आपल्या आयुष्यात देखील खोलवर स्थान निर्माण केले आहे.
01:38
And it's also deeply embedded in our lives.
22
98379
3903
01:42
I'll give you some examples
23
102711
1698
आधुनिक विकासानं आपल्यासाठी काय शक्य केले आहे याची उदाहरणं मी तुम्हाला देतो.
01:44
of what modern progress has made possible for us.
24
104433
3543
01:48
This is my supermarket.
25
108000
1353
हे माझं सुपरमार्केट आहे. फार मोठं नाही आहे.
01:49
Not such a big one.
26
109854
1267
01:51
I want to say just a word about salad dressing.
27
111840
2399
मला सॅलड ड्रेसिंग विषयी काही बोलायचं आहे.
01:54
A hundred seventy-five salad dressings in my supermarket,
28
114263
2713
माझ्या सुपरमार्केट मध्ये १७५ प्रकारचे सॅलड ड्रेसिंग आहेत,
01:57
if you don't count the 10 extra-virgin olive oils
29
117000
3087
जर तुम्ही १० वेगळे एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव ऑईल
02:00
and 12 balsamic vinegars you could buy
30
120111
2982
आणि १२ वेगळे बल्सामिक व्हिनेगर
02:03
to make a very large number of your own salad dressings,
31
123117
2859
वापरून बनवता येऊ शकणारे सॅलड मोजले नाहीत तर,
02:06
in the off-chance that none of the 175 the store has on offer suit you.
32
126000
4971
ते ही अशा दुर्मिळ प्रसंगी, जेव्हा त्या १७५ पैकी कुठलेच ड्रेसिंग तुम्हाला आवडत नाही तेव्हा.
02:11
So this is what the supermarket is like.
33
131511
1959
तर, सुपरमार्केट हे असं असतं.
02:13
And then you go to the consumer electronics store
34
133494
2371
आणि मग तुम्ही एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात जाता,एक स्टिरीओ सिस्टिम बनवून घ्यायला.
02:15
to set up a stereo system --
35
135889
1384
02:17
speakers, CD player, tape player, tuner, amplifier --
36
137297
3679
स्पीकर्स, सीडी प्लेयर, टेप प्लेयर, ट्यूनर, ऍम्प्लीफायर.
02:21
and in this one single consumer electronics store,
37
141000
3976
आणि या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात,
02:25
there are that many stereo systems.
38
145000
3418
अनेक स्टिरीओ सिस्टिम असतात.
02:28
We can construct six and a half million different stereo systems
39
148920
5049
या एका दुकानात विक्रीसाठी असलेल्या गोष्टी वापरून
02:33
out of the components that are on offer in one store.
40
153993
2586
आपण पासष्ठ लाख वेगळ्या स्टिरीओ सिस्टिम घडवू शकतो.
02:36
You've got to admit that's a lot of choice.
41
156603
2014
पर्याय अनेक असतात, हे तुम्ही मान्य केलच पाहिजे.
02:39
In other domains -- the world of communications.
42
159294
3730
इतर कार्यक्षेत्रात -- दळणवळणाच्या जगतात.
02:43
There was a time, when I was a boy,
43
163389
1842
एक काळ असा होता, माझ्या लहानपणी,
02:45
when you could get any kind of telephone service you wanted,
44
165255
2817
दूरध्वनीची सेवा पण उपलब्ध नसे,
02:48
as long as it came from Ma Bell.
45
168096
1818
जी नंतर "मा बेल" तर्फे सुरु करण्यात आली.
02:49
You rented your phone, you didn't buy it.
46
169938
2174
फोन भाडयाने घ्यावा लागत असे. तो विकत घेतला जात नसे.
02:52
One consequence of that, by the way, is that the phone never broke.
47
172136
3453
त्याचा एक परिणाम असा होता की, फोन तुटत नसे.
02:55
And those days are gone.
48
175613
2363
आणि आता ते दिवस गेले.
02:58
We now have an almost unlimited variety of phones,
49
178000
2976
आता अगणित प्रकारचे फोन उपलब्ध आहेत,
03:01
especially in the world of cell phones.
50
181000
2277
खास करून सेलफोन - मोबाइल्स.
03:03
These are cell phones of the future.
51
183301
2043
हे भविष्यातले सेल फोन आहेत.
03:06
My favorite is the middle one --
52
186000
2153
माझा सर्वात आवडता, त्या मनाने साधा --
03:08
the MP3 player, nose hair trimmer, and crème brûlée torch.
53
188177
3632
एमपीथ्री प्लेयर, नोज ट्रीमर आणि क्रेम बृली टॉर्च.
03:11
And if --
54
191833
1150
आणि जर तुम्ही असा फोन बाजारात बघितला नसेल,
03:13
(Laughter)
55
193007
1689
03:14
if by some chance you haven't seen that in your store yet,
56
194720
3104
03:17
you can rest assured that one day soon, you will.
57
197848
3099
तर काळजी करू नका, एके दिवशी लवकरच नक्की बघाल.
03:20
And what this does is it leads people to walk into their stores,
58
200971
3053
आणि यामुळे होते काय,
लोक दुकानात जाऊन असा फोन मिळेल का, हे विचारतात.
03:24
asking this question.
59
204048
1246
03:25
And do you know what the answer to this question now is?
60
205785
2668
आणि आत्ता या प्रश्नाचे उत्तर काय आहे, ठाऊक आहे?
03:28
The answer is "no."
61
208477
1577
उत्तर आहे "नाही".
03:30
It is not possible to buy a cell phone that doesn't do too much.
62
210483
3147
सध्या असा फोन मिळत नाही ज्यात इतक्या गोष्टी करू शकण्याची क्षमता आहे .
03:33
So, in other aspects of life that are much more significant than buying things,
63
213654
5512
आता, आयुष्याच्या काही अशा गोष्टी, ज्या वस्तू विकत घेण्यापेक्षा जास्ती महत्वाच्या आहेत,
03:39
the same explosion of choice is true.
64
219190
3303
पर्यायांचा उद्रेक हा तिथे सुद्धा आहे.
03:42
Health care.
65
222517
1602
हेल्थ केअर.आता अमेरिकेत तो काळ मुळीच राहिला नाही
03:44
It is no longer the case in the United States
66
224143
2437
03:46
that you go to the doctor, and the doctor tells you what to do.
67
226604
3852
की तुम्ही डॉक्टरकडे जाता, आणि तो तुम्हाला काय केलं पाहिजे ते सांगतो.
03:50
Instead, you go to the doctor,
68
230480
1523
या उलट, तुम्ही डॉक्टरकडे जाता,
03:52
and the doctor tells you, "Well, we could do A, or we could do B.
69
232027
3286
आणि डॉक्टर तुम्हाला सांगतो, आपण 'अ' करू शकतो किंवा आपण 'ब' करू शकतो.
03:55
A has these benefits and these risks.
70
235337
2382
'अ' चे हे फायदे आहेत, आणि हे धोके आहेत.
03:57
B has these benefits and these risks.
71
237743
2323
'ब' चे हे फायदे आहेत, आणि हे धोके आहेत. तुम्हाला काय करायचे आहे?
04:00
What do you want to do?"
72
240454
1326
04:02
And you say, "Doc, what should I do?"
73
242138
2214
आणि तुम्ही म्हणता "डॉक्टर, मी काय करू?"
04:04
And the doc says, "A has these benefits and risks,
74
244967
2990
त्यावर डॉक्टर म्हणतो, 'अ' चे हे फायदे आहेत, हे धोके आहेत, 'ब' हे फायदे आहेत,हे धोके आहेत.
04:07
and B has these benefits and risks.
75
247981
1836
04:09
What do you want to do?"
76
249841
1539
तुम्हाला काय करायचे आहे?
04:11
And you say, "If you were me, Doc, what would you do?"
77
251777
3567
मग तुम्ही म्हणता, "जर तुम्ही माझ्या जागी असता, तर तुम्ही काय केले असते?"
04:15
And the doc says, "But I'm not you."
78
255793
2164
आणि डॉक्टर म्हणतो, "पण मी म्हणजे तुम्ही नव्हे"
04:18
And the result is -- we call it "patient autonomy,"
79
258999
2675
आणि याचा परिणाम म्हणजेच -- ज्याला आम्ही "पेशंट ऑटोनॉमी " (रुग्णाची स्वायत्तता) म्हणतो,
04:21
which makes it sound like a good thing,
80
261698
1985
ज्यामुळे ते ऐकायला पण एक चांगली गोष्ट असल्याचा भास होतो.
04:23
but what it really is is a shifting of the burden and the responsibility
81
263707
3402
पण वास्तविकत:, हे निर्णय घेण्याच्या जबाबदारीचे ओझे दुसरीकडे ढकलणेच आहे,
एका अशा व्यक्तीकडून, ज्याला काहीतरी समज आहे --
04:27
for decision-making
82
267133
1161
04:28
from somebody who knows something -- namely, the doctor --
83
268318
2742
म्हणजेच डॉक्टर --
ते अशा व्यक्तीकडे ज्याला काहीच कळत नाही आणि जिला खात्री आहे की ती आजारी आहे
04:31
to somebody who knows nothing and is almost certainly sick
84
271084
2778
04:33
and thus, not in the best shape to be making decisions --
85
273886
2748
आणि निर्णय घेण्यास समर्थ नाही आहे --
04:36
namely, the patient.
86
276658
1214
म्हणजेच रुग्ण.
04:37
There's enormous marketing of prescription drugs
87
277896
2826
केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच मिळू शकणार्‍या औषधांसाठीदेखील विक्रीशास्त्राचा प्रचंड वापर
04:40
to people like you and me,
88
280746
1403
केला जातो, तुमच्या-माझ्यासारख्यांवरती.
04:42
which, if you think about it, makes no sense at all,
89
282173
2453
आणि याचा विचार केल्यास असं लक्षात येतं की त्याचा काहीच उपयोग नाही,
04:44
since we can't buy them.
90
284650
1176
कारण आपण प्रिस्क्रिप्शनशिवाय ती औषधं खरेदी करू शकत नाही.
04:45
Why do they market to us if we can't buy them?
91
285850
2341
आपण जर ती औषधं स्वत: विकत घेऊ शकत नाही तर आपल्याला विकायचा ते प्रयत्न का करतात?
04:48
The answer is that they expect us to call our doctors the next morning
92
288215
3998
याचं उत्तर असं आहे, की त्यांची अशी अपेक्षा असते की उद्या आपण डॉक्टरांना
04:52
and ask for our prescriptions to be changed.
93
292237
2119
प्रिस्क्रिप्शन बदलायला सांगावं.
04:55
Something as dramatic as our identity
94
295532
3977
आपल्या व्यक्तित्वासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट,
04:59
has now become a matter of choice,
95
299533
2862
आता पसंतीची, निवडीची बाब बनली आहे,
05:02
as this slide is meant to indicate.
96
302419
3351
असंच हे चित्र दर्शवत आहे.
05:05
We don't inherit an identity; we get to invent it.
97
305794
2925
व्यक्तित्व हे जन्मजात मिळत नाही, ते शोधायचं, कमवायचं असतं.
05:08
And we get to reinvent ourselves as often as we like.
98
308743
3295
आणि ते आपण हवं तितक्या वेळा शोधू शकतो, बदलू शकतो.
05:12
And that means that every day, when you wake up in the morning,
99
312062
3041
आणि याचाच अर्थ असा की रोज सकाळी उठल्यावर,
तुम्ही ठरवायचं असतं, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे.
05:15
you have to decide what kind of person you want to be.
100
315127
2935
05:18
With respect to marriage and family:
101
318770
2941
लग्न आणि संसाराचा विचार केला,
05:22
there was a time when the default assumption that almost everyone had
102
322497
4958
तर एके काळी सगळ्यांचाच असा समज होता की
05:27
is that you got married as soon as you could,
103
327479
2146
प्रत्यकाने लवकरात लवकर लग्न करावं
05:29
and then you started having kids as soon as you could.
104
329649
2823
आणि लवकरात लवकर मुलांना जन्म द्यावा.
निर्णय घ्यावा लागायचा तो फक्त एकच - कुणाशी लग्न करायचं हा;
05:32
The only real choice was who,
105
332496
2408
05:34
not when, and not what you did after.
106
334928
2613
कधी करायचं हा नाही, त्यनंतर काय हासुद्धा नाही.
05:38
Nowadays, everything is very much up for grabs.
107
338159
2817
आजकाल सगळंच मिळवण्यासाठी चढाओढ आहे.
05:41
I teach wonderfully intelligent students,
108
341000
2721
मी अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना शिकवतो,
05:43
and I assign 20 percent less work than I used to.
109
343745
3920
आणि पूर्वीपेक्षा २० टक्के कमी काम देतो.
05:47
And it's not because they're less smart,
110
347689
2448
आणि याचं कारण ती मुलं कमी हुशार आहेत,
05:50
and it's not because they're less diligent.
111
350161
2305
किंवा कमी कष्टाळू आहेत असं मुळीच नाही.
05:52
It's because they are preoccupied, asking themselves,
112
352490
3380
याचं कारण म्हणजे त्यांची व्यापलेली मने, सतत विचार करणे,
05:55
"Should I get married or not? Should I get married now?
113
355894
2707
"मी लग्न करू का नको? आत्ता लग्न करू
05:58
Should I get married later?
114
358625
1316
का नंतर करू? आधी मुलं का आधी करिअर?"
05:59
Should I have kids first or a career first?"
115
359965
2354
06:02
All of these are consuming questions.
116
362343
2729
हे सगळे व्यापून टाकणारे , डोकंखाऊ प्रश्न आहेत.
06:05
And they're going to answer these questions,
117
365096
2118
आणि त्यांना या प्रश्नांना सामोरं जावं लागणारच आहे,
06:07
whether or not it means not doing all the work I assign
118
367238
2592
मी दिलेलं काम केलं तरी किंवा नाही केलं तरी
06:09
and not getting a good grade in my courses.
119
369854
2026
आणि माझ्या विषयात खराब गुण मिळवले तरी.
06:11
And indeed they should.
120
371904
1153
आणि त्यांनी हा विचार केलाच पाहिजे. या प्रश्नांची उत्तरं महत्त्वाची आहेत.
06:13
These are important questions to answer.
121
373081
2468
06:16
Work.
122
376887
1432
काम -- आपण नशीबवान आहोत, जसं कार्ल ने सांगितलं,
06:18
We are blessed, as Carl was pointing out,
123
378343
2238
06:20
with the technology that enables us to work every minute of every day
124
380605
5822
की तंत्रज्ञान वापरून
आपण प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक क्षणाला काम करू शकतो, तेही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून
06:26
from any place on the planet --
125
386451
2040
06:28
except the Randolph Hotel.
126
388515
1900
रॅनडॉल्फ हॉटेल सोडून.
06:30
(Laughter)
127
390777
3040
(हशा)
06:33
(Applause)
128
393841
1888
06:35
There is one corner, by the way,
129
395753
2223
असा एक कोपरा आहे ,बरका,
06:38
that I'm not going to tell anybody about, where the WiFi actually works.
130
398000
4606
ज्याबद्दल मी कुणालाच सांगणार नाही आहे, जिथे वाय-फाय चालतं.
06:42
I'm not telling you about it, because I want to use it.
131
402630
2874
मी तुम्हाला त्या बद्दल सांगणार नाही कारण मला तो वापरायचा आहे.
06:45
So what this means,
132
405528
1156
कामाबद्दलच्या या प्रचंड निवड-स्वातंत्र्याचा अर्थ असा,
06:46
this incredible freedom of choice we have with respect to work,
133
406708
3094
की आपल्याला एक निर्णय घ्यायचा असतो,
06:49
is that we have to make a decision,
134
409826
1847
06:51
again and again and again,
135
411697
1859
पुन्हा पुन्हा, आणि पुन्हा -
06:53
about whether we should or shouldn't be working.
136
413580
2613
आपल्याला आत्ता काम करायला हवंय की नाही.
06:56
We can go to watch our kid play soccer,
137
416217
2388
आपण मुलांना सॉकर (फुटबॉल) खेळताना बघायला जाऊ शकतो,
06:58
and we have our cell phone on one hip and our Blackberry on our other hip,
138
418629
3930
सेल फोन कमरेच्या एका बाजूला लावून,
ब्लॅकबेरी दुसऱ्या बाजूला लावून
07:02
and our laptop, presumably, on our laps.
139
422583
2895
आणि लॅपटॉप मांडीवर ठेवून.
07:05
And even if they're all shut off,
140
425502
2045
आणि या सर्व गोष्टी बंद असल्या तरी
07:07
every minute that we're watching our kid mutilate a soccer game,
141
427571
3242
तो प्रत्येक क्षण जेव्हा आपण मुलाला सॉकर खेळताना बघतो,
07:10
we are also asking ourselves,
142
430837
1611
आपण स्वतःला विचारतही असतो,
07:12
"Should I answer this cell phone call?
143
432472
2234
"हा कॉल घेऊ का?
07:14
Should I respond to this email? Should I draft this letter?"
144
434730
2837
या ई-मेल ला उत्तर देऊ का? या पत्राचा ड्राफ्ट लिहू का?"
07:17
And even if the answer to the question is "no,"
145
437591
2576
आणि जरी या प्रश्नाचं उत्तर "नाही" असलं,
07:20
it's certainly going to make the experience of your kid's soccer game
146
440191
3292
तरी त्यामुळे नक्कीच आपल्या मुलाचा सॉकर खेळ बघायचा तुमचा अनुभव
07:23
very different than it would've been.
147
443507
2135
(ही साधनं घेऊन न जाण्याच्या वेळेपेक्षा) खूपच वेगळा असणार आहे.
07:25
So everywhere we look,
148
445666
2041
त्यामुळे आपण कुठेही बघितलं,
07:27
big things and small things, material things and lifestyle things,
149
447731
3758
लहान-मोठ्या गोष्टींकडे, भौतिक गोष्टींकडे किंवा राहाणीसाहाणीच्या गोष्टींकडे,
07:31
life is a matter of choice.
150
451513
2228
तर दिसतं की आयुष्य ही निवडीची बाब आहे.
07:34
And the world we used to live in looked like this.
151
454503
3559
आपण ज्या काळात मोठे झालो तो असा होता.
07:38
[Well, actually, they are written in stone.]
152
458086
2125
07:40
That is to say, there were some choices,
153
460235
1942
म्हणजे काही पर्याय होते,
07:42
but not everything was a matter of choice.
154
462201
2062
पण प्रत्येक बाबतीत पर्याय नव्हते.
07:44
The world we now live in looks like this.
155
464287
2080
आणि आत्ताचा काळ हा असा आहे.
07:46
[The Ten Commandments Do-It-Yourself Kit]
156
466391
2043
आणि प्रश्न असा आहे की ही चांगली गोष्ट आहे का वाईट?
07:48
And the question is: Is this good news or bad news?
157
468458
3425
07:53
And the answer is "yes."
158
473047
2362
आणि उत्तर आहे हो.
07:56
(Laughter)
159
476000
1611
(हशा)
07:58
We all know what's good about it,
160
478357
2262
यात चांगलं काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे,
08:00
so I'm going to talk about what's bad about it.
161
480643
2635
म्हणून मी आज ह्यात वाईट काय आहे याबद्दल बोलणार आहे.
08:03
All of this choice has two effects,
162
483302
3145
या पर्यायांचे दोन परिणाम आहेत,
08:06
two negative effects on people.
163
486471
1949
लोकांवर होणारे दोन वाईट परिणाम.
08:09
One effect, paradoxically,
164
489160
2555
पहिला, विरोधाभास
08:11
is that it produces paralysis rather than liberation.
165
491739
3503
म्हणजे यामुळे दुर्बलता वाढते, उद्धार होत नाही, मोकळीक मिळत नाही.
08:15
With so many options to choose from,
166
495698
2386
निवडीसाठी इतके पर्याय असल्यामुळे,
08:18
people find it very difficult to choose at all.
167
498108
3628
लोकांना निवड करणं खूप अवघड जातं.
08:22
I'll give you one very dramatic example of this,
168
502293
2683
मी तुम्हाला याचं एक नाट्यमय उदाहरण देतो.
08:25
a study that was done of investments in voluntary retirement plans.
169
505000
5682
ऐच्छिक निवृत्ती (व्ही.आर. एस.) मधल्या गुंतवणुकीचा एक अभ्यास केला गेला.
08:31
A colleague of mine got access to investment records from Vanguard,
170
511109
5431
माझ्या एका सहकारी व्यक्तीला काही गुंतवणुकीच्या नोंदी मिळाल्या, व्हॅनगार्डच्या
08:36
the gigantic mutual fund company,
171
516564
1724
जी एक अजस्त्र म्युच्युअल फंड कंपनी आहे
08:38
of about a million employees and about 2,000 different workplaces.
172
518312
3664
ज्यात दहा लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत आणि २००० स्वतंत्र शाखा आहेत.
08:42
What she found is that for every 10 mutual funds the employer offered,
173
522000
5755
आणि तिला असे दिसून आले की
देऊ केलेल्या प्रत्येक १० म्युच्युअल फंड मागे,
08:47
rate of participation went down two percent.
174
527779
3758
सहभागाचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होत गेले.
08:52
You offer 50 funds -- 10 percent fewer employees participate
175
532270
4386
तुम्ही जर ५० म्युच्युअल फंड देऊ केले तर १० टक्के कमी कामगार सहभागी होतील,
08:56
than if you only offer five.
176
536680
1657
तुम्ही पाच म्युच्युअल फंड दिले असते तेव्हाच्या संख्येहून. असं का ?
08:59
Why?
177
539014
1159
09:00
Because with 50 funds to choose from,
178
540197
1984
कारण ५० म्युच्युअल फंड निवडीसाठी असले की
09:02
it's so damn hard to decide which fund to choose,
179
542205
3771
कशात सहभागी व्हायचं हे ठरवणं खूप कठीण जातं,
09:06
that you'll just put it off till tomorrow,
180
546000
2048
आणि तुम्ही हा निर्णय उद्यावर ढकलता.
09:08
and then tomorrow
181
548072
1199
आणि उद्या, आणि मग उद्या,
09:09
and then tomorrow and tomorrow,
182
549295
2479
आणि उद्या आणि उद्या,
09:11
and, of course, tomorrow never comes.
183
551798
1830
आणि साहजिकच उद्याचा दिवस कधीच उगवत नाही.
09:13
Understand that not only does this mean
184
553652
2012
हे समजावून घ्या की यामुळे
09:15
that people are going to have to eat dog food when they retire
185
555688
2959
लोकांवर निवृत्तीनंतर दात कोरत बसायची वेळ येणारच आहे
09:18
because they don't have enough money put away,
186
558671
2173
पुरेसे पैसे बाजूला न ठेवल्याने; एवढंच नाही तर,
09:20
it also means that making the decision is so hard
187
560868
2510
हा निर्णय घेणं इतकं कठीण असतं की
09:23
that they pass up significant matching money from the employer.
188
563402
3656
लोक तेवढ्याच किमतीची गुंतवणूक मालकाकडून मिळवायची संधीही सोडून देतात.
09:27
By not participating, they are passing up as much as 5,000 dollars a year
189
567082
4238
हा सहभाग न घेतल्यामुळे प्रत्येक वर्षी ते ५००० डॉलर एकढी रक्कम गमावून बसतात
09:31
from the employer,
190
571344
1159
जी त्यांच्या मालकाने स्वतःचा भाग म्हणून आनंदाने भरली असती.
09:32
who would happily match their contribution.
191
572527
2132
09:35
So paralysis is a consequence of having too many choices.
192
575087
3687
म्हणजेच दुबळेपणा हा खूप जास्त पर्यायांचा परिणाम आहे.
09:38
And I think it makes the world look like this.
193
578798
2673
आणि मला वाटतं की यामुळे जग हे असं दिसतं.
09:41
[And lastly, for all eternity, French, bleu cheese or ranch?]
194
581871
3825
(हशा)
09:45
(Laughter)
195
585720
2256
09:48
You really want to get the decision right if it's for all eternity, right?
196
588000
4012
तुम्हांला आपला निर्णय योग्य असलाच पाहिजे असं वाटेल, जर त्याचा परिणाम अनंतकाळ राहणार असेल तर, नाही का?
09:52
You don't want to pick the wrong mutual fund or wrong salad dressing.
197
592036
3404
तुम्हाला चुकीचा म्युच्युअल फंड निवडायचा नाहीये किंवा चुकीचे सॅलड ड्रेसिंग सुद्धा.
09:55
So that's one effect.
198
595464
1152
हा एक परिणाम झाला. दुसरा परिणाम असा आहे की
09:56
The second effect is that, even if we manage to overcome the paralysis
199
596640
4661
जर या दुबळेपणावर मात करून आपण निर्णय घेतला तरी,
10:01
and make a choice,
200
601325
2031
10:03
we end up less satisfied with the result of the choice
201
603380
3968
आपण तेवढे संतुष्ट नसतो
10:07
than we would be if we had fewer options to choose from.
202
607372
2800
जेवढे आपण इतके पर्याय नसताना असलो असतो.
10:10
And there are several reasons for this.
203
610769
1878
आणि याची अनेक कारणं आहेत.
10:13
One of them is, with a lot of different salad dressings to choose from,
204
613359
3749
एक म्हणजे, निवडीसाठी असलेल्या अनेक सॅलड ड्रेसिंगपैकी
10:17
if you buy one and it's not perfect -- and what salad dressing is? --
205
617132
3534
जर आपण एक विकत घेतले, आणि ते सर्वोत्कृष्ट नसेल -- आणि, तुम्हाला माहिती आहे, सॅलड ड्रेसिंग म्हणजे काय?
10:20
it's easy to imagine that you could've made a different choice
206
620690
3121
कल्पना करायला सोपं आहे की तुमची निवड वेगळी असू शकली असती.
10:23
that would've been better.
207
623835
1496
अजून चांगली होऊ शकली असती. आणि यामुळे होतं काय
10:25
And what happens is,
208
625864
1273
10:27
this imagined alternative induces you to regret the decision you made,
209
627161
4978
या काल्पनिक पर्यायामुळे तुम्ही केलेल्या निवडीबद्दल खेद व्यक्त करू लागता,
10:32
and this regret subtracts from the satisfaction you get
210
632163
2889
आणि ही भावना तुम्ही घेतलेल्या निर्णयातून मिळणाऱ्या समाधानाला वजा करू लागते,
10:35
out of the decision you made,
211
635076
1405
10:36
even if it was a good decision.
212
636505
1647
जरी तो एक चांगला निर्णय असला तरी सुद्धा.
10:38
The more options there are, the easier it is to regret anything at all
213
638626
3708
जितके पर्याय जास्त, तितका खेद जास्त - तुम्ही निवडलेल्या पर्यायात
10:42
that is disappointing about the option that you chose.
214
642358
2524
ज्या काही असमाधानकारक गोष्टी तुम्हांला दिसतात त्याबद्दल.
10:45
Second, what economists call "opportunity costs."
215
645342
3009
दुसरं म्हणजे ज्याला अर्थतज्ञ "ऑपॉरच्युनिटी कॉस्ट" (संधीची किंमत) म्हणतात.
10:48
Dan Gilbert made a big point this morning
216
648375
2009
डॅन गिलबर्टने आज सकाळी हाच मुद्दा मांडला
10:50
of talking about how much the way in which we value things
217
650408
4663
जेव्हा ते म्हणाले की आपण गोष्टींना दिलेली किंमत ही
10:55
depends on what we compare them to.
218
655095
2272
आपण त्या गोष्टींची तुलना कशाबरोबर करतो यावर अवलंबून असते.
10:57
Well, when there are lots of alternatives to consider,
219
657391
3585
जेव्हा खूप जास्ती पर्याय असतात
11:01
it's easy to imagine the attractive features of alternatives that you reject
220
661000
5976
तेव्हा आपण नाकारलेल्या पर्यायाच्या आकर्षक वैशिष्ट्यांची
कल्पना करणं सोपं असतं,
11:07
that make you less satisfied with the alternative that you've chosen.
221
667000
4668
जे तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल अजून असंतुष्ट बनवतं.
11:11
Here's an example.
222
671692
1151
11:12
[I can't stop thinking about those other available parking spaces on W 85th Street]
223
672867
3974
हेच उदाहरण बघा. जे न्यूयॉर्कवासी नाही आहेत त्यांची मी क्षमा मागतो.
11:16
If you're not a New Yorker, I apologize.
224
676865
1916
(हशा)
पण तुम्ही असा विचार करायला पाहिजे असतो.
11:18
Here's what you're supposed to be thinking.
225
678805
2030
हे जोडपं ’हॅम्प्टन्स’ या न्यूयॉर्कबाहेरच्या आलीशान ठिकाणी आलंय.
11:20
Here's this couple on the Hamptons. Very expensive real estate.
226
680859
2998
प्रचंड महाग रियल इस्टेट.
11:23
Gorgeous beach. Beautiful day. They have it all to themselves.
227
683881
2956
भव्य समुद्र किनारा. सुंदर दिवस. त्यांच्याकडे हे सगळं काही आहे.
11:26
What could be better?
228
686861
1192
याहून जास्त भारी काय असू शकतं ? "च्यामारी"
11:28
"Damn it," this guy is thinking,
229
688077
1578
हा माणूस विचार करतोय, "ऑगस्ट महिना आहे.
11:29
"It's August. Everybody in my Manhattan neighborhood is away.
230
689679
3991
मॅनहॅटन मधले सगळे बाहेर गेले आहेत.
11:33
I could be parking right in front of my building."
231
693694
3030
मी माझ्या तिथल्या बिल्डिंगच्या बरोबर समोर पार्किंग करू शकलो असतो."
11:37
And he spends two weeks nagged by the idea
232
697851
3664
आणि तो सुट्टीचे दोन आठवडे या गोष्टीचा विचार करत घालवतो
11:41
that he is missing the opportunity, day after day,
233
701539
3081
की आपण ती संधी गमावतोय, दिवसेंदिवस, पार्किंगसाठी चांगली जागा मिळवायची.
11:44
to have a great parking space.
234
704644
1718
11:46
(Laughter)
235
706386
1713
11:48
Opportunity costs subtract from the satisfaction
236
708123
2986
ऑपॉरच्युनिटी कॉस्ट घेतलेल्या निर्णयातून मिळणाऱ्या समाधानाला वजा करू लागते,
11:51
that we get out of what we choose,
237
711133
1641
11:52
even when what we choose is terrific.
238
712798
1833
तो सर्वोत्कृष्ट निर्णय असला तरीही.
11:55
And the more options there are to consider,
239
715178
2351
आणि जितके जास्ती पर्याय,
11:57
the more attractive features of these options
240
717553
2146
तितक्या जास्ती पर्यायांची आकर्षक वैशिष्ट्ये.
11:59
are going to be reflected by us as opportunity costs.
241
719723
3014
ज्याचं ऑपॉरच्युनिटी कॉस्ट मध्ये रुपांतर होतं.
12:03
Here's another example.
242
723260
1239
अजून एक उदाहरण घ्या.
12:05
(Laughter)
243
725721
3144
12:08
Now, this cartoon makes a lot of points.
244
728889
2685
हे कार्टून अनेक गोष्टींबद्दल भाष्य करतंय.
12:11
It makes points about living in the moment as well,
245
731598
3133
आत्ताचा क्षण पुरेपूर उपभोगण्याबद्दल,
12:14
and probably about doing things slowly.
246
734755
2052
आणि कदाचित निवांत काम करण्याबद्दल.
12:16
But one point it makes is that whenever you're choosing one thing,
247
736831
3111
पण एक मुद्दा ज्यावर हे भाष्य करतं ती म्हणजे जेव्हा तुम्ही एक गोष्ट निवडता
12:19
you're choosing not to do other things,
248
739966
1873
तेव्हा तुम्ही इतर गोष्टी नाकारता.
12:21
and those other things may have lots of attractive features,
249
741863
2833
आणि त्या इतर गोष्टींची अनेक आकर्षक वैशिष्ट्यं असतात,
12:24
and it's going to make what you're doing
250
744720
1926
आणि त्यामुळे तुम्ही जे करताय ते कमी आकर्षक होतं.
12:26
less attractive.
251
746670
1151
12:27
Third: escalation of expectations.
252
747845
1758
तिसरा: अपेक्षांची वाढ.
12:29
This hit me when I went to replace my jeans.
253
749627
2753
मी नवी जीन्स पॅन्ट घ्यायला गेलो तेव्हा मला याची जाणीव झाली.
12:32
I wear jeans almost all the time.
254
752404
2103
मी नेहमी जीन्स घालतो.
12:34
There was a time when jeans came in one flavor,
255
754531
2490
आणि एक काळ असा होता की जीन्सचा एकच प्रकार असायचा,
12:37
and you bought them, and they fit like crap.
256
757045
2069
आणि तुम्ही ती विकत घ्यायचा, आणि तिचं फिटिंग भयंकर असायचं,
12:39
They were incredibly uncomfortable,
257
759138
1678
आणि ती घातल्यावर प्रचंड अस्वस्थ वाटायचं.
12:40
and if you wore them long enough and washed them enough times,
258
760840
2929
अनेकदा घातल्यानंतर आणि अनेकदा धुतल्यावर
12:43
they started to feel OK.
259
763793
1315
कुठे ती घालून बरी वाटत असे.
12:45
I went to replace my jeans after years of wearing these old ones.
260
765132
3090
तर मी जीन्स बदली करून घ्यायला गेलो, वर्षानुवर्ष घातलेली ती जुनी जीन्स,
12:48
I said, "I want a pair of jeans. Here's my size."
261
768246
3198
आणि म्हणालो "मला नवीन जीन्स हवी आहे, हे माझं माप."
12:51
And the shopkeeper said,
262
771468
1237
आणि दुकानदार म्हणाला,
12:52
"Do you want slim fit, easy fit, relaxed fit?
263
772729
2397
"तुम्हाला स्लीम-फिट हवी आहे, इझी-फिट हवी आहे का रिलॅक्स-फिट ?
12:55
You want button fly or zipper fly? You want stonewashed or acid-washed?
264
775150
3362
बटण का चेन? स्टोन वॉश का अॅसिड वॉश ?
12:58
Do you want them distressed?
265
778536
1383
तुम्हाला ती डिस्ट्रेस करून हवी आहे का ?
12:59
Do you want boot cut, tapered?" Blah, blah, blah on and on he went.
266
779943
3235
तुम्हाला बूट कट हवी आहे, का टेपर्ड, ब्लाह ब्लाह ब्लाह ..." त्याचं चालूच होतं.
13:03
My jaw dropped.
267
783202
1502
मी अवाक्‌ झालो आणि भानावर आल्यावर म्हणालो,
13:04
And after I recovered, I said,
268
784728
1527
13:06
"I want the kind that used to be the only kind."
269
786279
3126
"मला अशी जीन्स हवी आहे जी एकाच प्रकारात पूर्वी मिळायची."
13:09
(Laughter)
270
789429
4692
(हशा)
13:14
He had no idea what that was.
271
794145
1832
त्याला कळालंच नाही ती काय असते,
13:16
(Laughter)
272
796001
1157
आणि मी त्याला समजावण्यात एक तास घालवला,
13:17
So I spent an hour trying on all these damn jeans,
273
797182
2824
13:20
and I walked out of the store -- truth --
274
800030
2095
आणि त्या दुकानातून बाहेर पडलो -- खरं सांगतो -- मला आजवर सर्वात चांगली बसलेली जीन्स घेऊन.
13:22
with the best-fitting jeans I had ever had.
275
802149
2708
13:24
I did better.
276
804881
1175
मी अजून चांगलं केलं. हे सगळे पर्याय बघून मी अजून चांगलं करू शकलो.
13:26
All this choice made it possible for me to do better.
277
806080
3359
13:29
But --
278
809909
1151
पण मला अधिक वाईट वाटलं.
13:31
I felt worse.
279
811084
1420
13:33
Why? I wrote a whole book to try to explain this to myself.
280
813544
3773
का? मी एक अखंड पुस्तक लिहिलं आणि स्वतःला हे समजावण्याचा प्रयत्न केला.
13:37
The reason is --
281
817341
1159
मला वाईट वाटायचं कारण म्हणजे,
13:38
(Laughter)
282
818524
4197
13:42
The reason I felt worse is that with all of these options available,
283
822745
5014
हे सगळे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे,
13:47
my expectations about how good a pair of jeans should be went up.
284
827783
5388
कुठली जीन्स हवी आहे, याबद्दल वाढलेल्या माझ्या अपेक्षा.
13:54
I had very low, no particular expectations when they only came in one flavor.
285
834092
4454
माझ्या खूप थोड्या अपेक्षा असायच्या.
माझ्या काही खास अपेक्षाच नसायच्या जेव्हा जीन्स त्या एकाच प्रकारात मिळत असे.
13:58
When they came in 100 flavors, damn it, one of them should've been perfect.
286
838570
3598
जेव्हा त्या १०० प्रकारात मिळू लागल्या, तेव्हा च्यामारी,
एक तरी परिपूर्ण असली पाहिजे.
14:02
And what I got was good, but it wasn't perfect.
287
842192
2210
आणि मला जे मिळालं ते चांगलं होतं पण परिपूर्ण नव्हतं.
14:04
And so I compared what I got to what I expected,
288
844426
3289
आणि म्हणून मी काय मिळालं याची तुलना माझ्या अपेक्षांशी करू लागलो,
14:07
and what I got was disappointing in comparison to what I expected.
289
847739
3435
आणि मिळालेलं अपेक्षांच्या तुलनेत निराशाजनक होतं.
पर्याय वाढवले की लोकांच्या
14:11
Adding options to people's lives
290
851198
2040
14:13
can't help but increase the expectations people have
291
853262
3604
ते पर्याय किती चांगले असू शकतील
14:16
about how good those options will be.
292
856890
2197
याबद्दलच्या अपेक्षा वाढणारच
14:19
And what that's going to produce is less satisfaction with results,
293
859111
3452
आणि त्यामुळे मिळणारे समाधान हे कमी होणारच,
14:22
even when they're good results.
294
862587
1637
मिळालेलं चांगलं असून सुद्धा.
14:24
[It all looks so great. I can't wait to be disappointed.]
295
864248
2685
विक्रीशास्त्राच्या जगात हे कुणालाच माहीत नाही आहे.
14:26
Nobody in the world of marketing knows this.
296
866957
2162
कारण जर त्यांना माहिती असतं, तर तुम्हाला सगळ्यांना हे कळालं नसतं.
14:29
Because if they did, you wouldn't all know what this was about.
297
869143
4184
14:33
The truth is more like this.
298
873959
1904
सत्य हे जरा असं आहे.
14:36
[Everything was better back when everything was worse.]
299
876521
3069
(हशा)
14:39
The reason that everything was better back when everything was worse
300
879614
4012
पूर्वी सगळं वाईट असून सुद्धा सगळं चांगलं असल्याचं कारण म्हणजे,
14:43
is that when everything was worse,
301
883650
2142
जेव्हा सगळं वाईट होतं,
14:45
it was actually possible for people
302
885816
1771
तेव्हा लोकांना निखळ आश्चर्य अनुभवता येत असे.
14:47
to have experiences that were a pleasant surprise.
303
887611
2554
14:50
Nowadays, the world we live in -- we affluent, industrialized citizens,
304
890999
4512
आजकालच्या जगात -- आपल्यासारखे श्रीमंत, औद्योगिक व्यावसायिक नागरिक,
14:55
with perfection the expectation --
305
895535
1977
ज्यांची ’परिपूर्णता’ हीच अपेक्षा असते,
14:57
the best you can ever hope for
306
897536
1505
हे एखादी गोष्ट किती चांगली असावी याची आशा करताना त्यांच्या अपेक्षांएवढाच विचार करू शकतात.
14:59
is that stuff is as good as you expect it to be.
307
899065
2665
15:01
You will never be pleasantly surprised,
308
901754
1920
निखळ आश्चर्य तुम्हाला कधीच अनुभवता येणार नाही,
15:03
because your expectations, my expectations,
309
903698
2047
कारण तुमच्या अपेक्षा, माझ्या अपेक्षा या गगनाला भिडलेल्या आहेत.
15:05
have gone through the roof.
310
905769
1334
15:07
The secret to happiness -- this is what you all came for --
311
907127
3357
सुखाचे रहस्य -- ज्यासाठी तुम्ही सगळे आला आहात --
15:10
the secret to happiness is:
312
910508
2549
सुखाचे रहस्य म्हणजे कमी अपेक्षा.
15:13
low expectations.
313
913081
2062
15:15
(Laughter)
314
915167
3245
(हशा)
15:18
[You'll do]
315
918436
1390
(टाळ्या)
15:19
(Applause)
316
919850
1476
15:21
(Laughter)
317
921350
1482
15:24
I want to say --
318
924483
1190
मला काहीतरी सांगायचं आहे स्वानुभवावरून,
15:25
just a little autobiographical moment --
319
925697
2587
15:28
that I actually am married to a wife,
320
928308
2990
मी माझ्या पत्नीशी लग्न केलं,
15:31
and she's really quite wonderful.
321
931322
1951
आणि ती खरच एक चांगली व्यक्ती आहे.
15:33
I couldn't have done better.
322
933297
1343
या पेक्षा काही चांगलं मी करूच शकलो नसतो. मी नुस्ताच आहे त्याचा स्वीकार केला नाही.
15:34
I didn't settle.
323
934664
1565
15:36
But settling isn't always such a bad thing.
324
936253
2475
पण आहे त्याचा स्वीकार हीदेखील काही वाईट गोष्ट नाहीये.
15:39
Finally,
325
939158
1150
शेवटी, एक वाईट बसणारी जीन्स घेण्याचा एक परिणाम असा आहे:
15:41
one consequence of buying a bad-fitting pair of jeans
326
941080
3317
15:44
when there is only one kind to buy
327
944421
2186
तो जर जीन्सचा मिळणारा एकमेव प्रकार असेल,
15:46
is that when you are dissatisfied and you ask why, who's responsible,
328
946631
3721
ज्याने तुम्ही समाधानी नसाल आणि तुम्ही विचारलं का,
याची जबाबदारी कोणाची, तर उत्तर उघड आहे.
15:50
the answer is clear: the world is responsible.
329
950376
2393
आपल्या भोवतालचे जग यासाठी जबाबदार आहे. तुम्ही काय करू शकला असता?
15:52
What could you do?
330
952793
1719
15:54
When there are hundreds of different styles of jeans available
331
954536
2998
जेव्हा जीन्स चे शंभर प्रकार उपलब्ध असतात
15:57
and you buy one that is disappointing
332
957558
2216
आणि तुम्ही एक विकत घेऊन निराश होता,
15:59
and you ask why, who's responsible,
333
959798
2513
आणि विचारता, ह्याला कोण जबाबदार?
16:02
it is equally clear that the answer to the question is "you."
334
962335
4246
तेव्हा उत्तर तेवढच स्पष्ट असतं, तुम्ही.
16:07
You could have done better.
335
967264
1502
तुम्ही अजून चांगली पसंती करू शकला असता.
16:08
With a hundred different kinds of jeans on display,
336
968790
3186
शंभर जीन्सचे प्रकार दाखवले असल्यामुळे,
16:12
there is no excuse for failure.
337
972000
2177
अपयशाची गय केली जात नाही.
16:14
And so when people make decisions,
338
974201
2452
आणि म्हणूनच जेव्हा लोक निर्णय घेतात,
16:16
and even though the results of the decisions are good,
339
976677
2627
तेव्हा त्यांचा परिणाम चांगला असला तरी,
16:19
they feel disappointed about them;
340
979328
2398
त्यांना त्याबद्दल निराशा वाटते,
16:21
they blame themselves.
341
981750
1977
ते दोष स्वतःला देतात.
16:23
Clinical depression has exploded in the industrial world
342
983751
3045
औद्योगिक जगतात वैद्यकीय औदासिन्याची गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली आहे.
16:26
in the last generation.
343
986820
1397
16:28
I believe a significant -- not the only, but a significant -- contributor
344
988241
3735
माझं असं मत आहे की याचं मोठं कारण -- एकमेव नव्हे,
16:32
to this explosion of depression and also suicide,
345
992000
3440
पण या औदासिन्यामागचं मोठं कारण, आणि या आत्महत्यांमागचं म्हणजे,
16:35
is that people have experiences that are disappointing
346
995464
2577
लोकांना त्यांनी स्वत:च वाढवलेल्या राहणीमानामुळे
16:38
because their standards are so high,
347
998065
1738
येणारे निराशाजनक अनुभव.
16:39
and then when they have to explain these experiences to themselves,
348
999827
3189
आणि जेव्हा ते स्वतःला हे अनुभव समजावून सांगतात,
16:43
they think they're at fault.
349
1003040
1400
तेव्हा ते स्वतःला दोष देतात.
16:45
So the net result is that we do better in general, objectively,
350
1005000
4626
परिणाम म्हणजे वास्तविक पहाता, आपण चांगला निर्णय घेऊन सुद्धा
16:49
and we feel worse.
351
1009650
1658
त्या बद्दल अजून वाईट वाट्णे.
16:51
So let me remind you:
352
1011935
2767
म्हणून मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे.
16:54
this is the official dogma, the one that we all take to be true,
353
1014726
4614
हे अधिकृत मत आहे, ज्याच्याशी आपण सगळे सहमत असतो,
16:59
and it's all false.
354
1019364
1965
आणि हे साफ खोटं आहे.अजिबात खरं नाहीये.
17:01
It is not true.
355
1021680
1239
17:03
There's no question that some choice is better than none.
356
1023292
3679
यात काहीच वाद नाही की एक पर्याय दुसऱ्यापेक्षा चांगला असतो,
17:07
But it doesn't follow from that
357
1027567
2047
पण याचा अर्थ असा होत नाही की अनेक पर्याय एखाद्या पर्यायापेक्षा चांगले असतात.
17:09
that more choice is better than some choice.
358
1029638
2447
17:12
There's some magical amount. I don't know what it is.
359
1032109
2538
एक मंतरलेली संख्या आहे. मला नाही माहीत ती काय आहे.
17:14
I'm pretty confident that we have long since passed the point
360
1034671
3027
मला खात्री आहे की तो काळ आता लांब गेला आहे
17:17
where options improve our welfare.
361
1037722
2365
जेव्हा अनेक पर्यायांचा अर्थ अधिक सुख असे
17:20
Now, as a policy matter -- I'm almost done --
362
1040452
2957
आता, नियमाप्रमाणे -- मी थांबलं पाहिजे--
17:23
as a policy matter, the thing to think about is this:
363
1043433
3384
पण नियमाप्रमाणे एका गोष्टीचा विचार झाला पाहिजे.
17:26
what enables all of this choice in industrial societies
364
1046841
4949
या औद्योगिक समाजात पर्यायांचं सामर्थ्य वाढायचं कारण म्हणजे भौतिक संपत्ती.
17:31
is material affluence.
365
1051814
2094
17:34
There are lots of places in the world,
366
1054460
1826
जगात अशा अनेक जागा आहेत,
17:36
and we have heard about several of them,
367
1056310
1975
अनेकांबद्दल आपण ऐकतो,
17:38
where their problem is not that they have too much choice.
368
1058309
2733
जिथे अनेक पर्याय नसणे ही अडचण नसून खूप थोडे पर्याय ही आहे.
त्यांची समस्या म्हणजे खूप थोड्या गोष्टी उपलब्ध असणे.
17:41
Their problem is they have too little.
369
1061066
1889
17:42
So the stuff I'm talking about is the peculiar problem
370
1062979
3580
त्यामुळे मी जे बोलतो आहे, ही आधुनिक,
17:46
of modern, affluent, Western societies.
371
1066583
3065
संपन्न, पाश्चात्य समजातील विशिष्ट समस्या आहे.
17:49
And what is so frustrating and infuriating is this:
372
1069672
3225
आणि याबद्दल एवढा राग का येतो, तिडीक का बसते:
17:52
Steve Levitt talked to you yesterday
373
1072921
1797
स्टीव लेव्हीटने काल तुम्हाला सांगितले की
17:54
about how these expensive and difficult-to-install child seats
374
1074742
6894
बसवायला अवघड आणि तरी महागड्या असलेल्या, मुलांसाठीच्या खुर्च्या कशा निरुपयोगी असतात. हे पैसे वाया घालवणं आहे.
18:01
don't help.
375
1081660
1698
18:04
It's a waste of money.
376
1084056
1605
18:05
What I'm telling you is that these expensive, complicated choices --
377
1085685
4816
मी तुम्हाला काय सांगतोय, की हे महागडे, गुंतागुंतीचे पर्याय --
18:10
it's not simply that they don't help.
378
1090525
1858
यांचा उपयोग नसतो एवढंच नाही.
18:12
They actually hurt.
379
1092407
1569
तर ते अपायकारक असतात.
18:14
They actually make us worse off.
380
1094000
2557
त्यांचा खरोखर त्रास होतो.
18:16
If some of what enables people in our societies
381
1096928
3751
ज्या गोष्टींमुळे आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध होतात,
18:20
to make all of the choices we make
382
1100703
1999
18:22
were shifted to societies in which people have too few options,
383
1102726
4704
त्यांपैकी काही गोष्टी जर अशा लोकांपर्यंत पोहोचल्या ज्यांच्याकडे खूप थोडे पर्याय आहेत
18:27
not only would those people's lives be improved,
384
1107454
2331
तर फक्त त्याचंच आयुष्य सुखकर होईल असं नाही,
18:29
but ours would be improved also.
385
1109809
2125
आपलं पण होईल.
18:31
This is what economists call a "Pareto-improving move."
386
1111958
3319
ह्यालाच अर्थतज्ञ "पॅरिटो - इम्प्रूव्हिंग मूव्ह" म्हणतात.
18:35
Income redistribution will make everyone better off,
387
1115301
3412
मिळकतीची पुन्हा वाटणी केली तर सगळेच आनंदी होतील -- फक्त गरीबच नाही --
18:38
not just poor people,
388
1118737
1412
18:40
because of how all this excess choice plagues us.
389
1120173
2907
कारण या अतिरिक्त पर्यायांमुळे आपल्याला त्रास होतो.
18:43
So to conclude.
390
1123722
1157
18:44
[You can be anything you want to be -- no limits.]
391
1124903
2364
तर ह्यातला निष्कर्ष. तुम्ही हे कार्टून बघायचं,
18:47
You're supposed to read this cartoon and, being a sophisticated person, say,
392
1127291
3655
आणि एक सभ्य व्यक्ती बनून म्हणायचं,
18:50
"Ah! What does this fish know? Nothing is possible in this fishbowl."
393
1130970
4389
"छे ! या माशाला काय कळतंय?
एका फिशबोल मध्ये काहीच शक्य नाही हे तर उघडच आहे."
18:55
Impoverished imagination, a myopic view of the world --
394
1135753
2854
मर्यादित कल्पनाशक्ती, जगाबद्दलचा संकुचित दृष्टीकोन --
18:58
that's the way I read it at first.
395
1138631
1680
आणि मी ही पहिल्यांदा असाच विचार केला होता.
19:00
The more I thought about it, however,
396
1140335
1818
नंतर मी याबद्दल जितका जास्ती विचार केला,
19:02
the more I came to the view that this fish knows something.
397
1142177
3799
तितकं मला वाटू लागलं की या माशाला काहीतरी कळतंय.
19:06
Because the truth of the matter is,
398
1146000
2212
कारण सत्य हेच आहे की
19:08
if you shatter the fishbowl so that everything is possible,
399
1148236
4233
जर तुम्ही सगळं करता यावं म्हणून फिशबोल फोडला,
19:12
you don't have freedom.
400
1152493
1413
19:13
You have paralysis.
401
1153930
1776
तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही. तुम्ही दुबळे बनता.
19:16
If you shatter this fishbowl so that everything is possible,
402
1156373
3532
जर तुम्ही सगळं करता यावं म्हणून फिशबोल फोडला,
19:19
you decrease satisfaction.
403
1159929
2772
तर तुम्ही समाधान कमी करता.
19:23
You increase paralysis, and you decrease satisfaction.
404
1163184
3620
तुम्ही दुबळेपणा वाढवता आणि समाधान कमी करता.
19:26
Everybody needs a fishbowl.
405
1166828
1665
प्रत्येकाला एका फिशबोलची गरज असते.
19:29
This one is almost certainly too limited --
406
1169000
2344
हा नक्कीच खूपच मर्यादित आहे --
19:31
perhaps even for the fish, certainly for us.
407
1171368
3005
या माशासाठी सुद्धा, आपल्यासाठी तर नक्कीच.
19:34
But the absence of some metaphorical fishbowl is a recipe for misery
408
1174397
4468
पण या फिशबोलचा अभाव म्हणजे दुःखाला जवळ करण्यासारखे आहे,
19:38
and, I suspect, disaster.
409
1178889
1785
आणि ह्यातून अनर्थ संभावतो.
19:41
Thank you very much.
410
1181000
1270
धन्यवाद.
19:42
(Applause)
411
1182294
1642
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7