The secrets of learning a new language | Lýdia Machová | TED

9,544,833 views ・ 2019-01-24

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Vibhavari Deshpande Reviewer: Arvind Patil
00:13
I love learning foreign languages.
0
13760
2896
मला परदेशी भाषा शिकायला आवडतं .
00:16
In fact, I love it so much that I like to learn a new language every two years,
1
16680
4056
मला हे इतकं मनापासून आवडतं कि; मी दर दोन वर्षांनी एक नवी भाषा शिकते.
00:20
currently working on my eighth one.
2
20760
2096
सध्या मी माझी आठवी भाषा शिकत आहे.
00:22
When people find that out about me, they always ask me,
3
22880
2616
जेंव्हा लोकांना हे कळतं, तेंव्हा ते विचारतात;
00:25
"How do you do that? What's your secret?"
4
25520
2096
तुम्ही हे कसं करता ? यामागचं रहस्य काय ?
00:27
And to be honest, for many years, my answer would be,
5
27640
3016
आणि खरंतर, बरीच वर्षे माझं उत्तर होत,
00:30
"I don't know. I simply love learning languages."
6
30680
2320
"मला माहित नाही. मला भाषा शिकायला आवडतात इतकंच."
00:33
But people were never happy with that answer.
7
33720
2256
पण हे उत्तर लोकांना पटायचच नाही.
00:36
They wanted to know why they are spending years trying to learn even one language,
8
36000
3976
त्यांना जाणून घ्यायचं असायचं कि, त्यांनी इतकी वर्षे एकच भाषा शिकायचा प्रयत्न करूनही
00:40
never achieving fluency,
9
40000
1536
प्रभुत्व का मिळवता येत नाही?
00:41
and here I come, learning one language after another.
10
41560
3056
आणि इथे मी मात्र, भाषांवर भाषा शिकते आहे.
00:44
They wanted to know the secret of polyglots,
11
44640
2216
बहुभाषिक होण्याचं रहस्य त्यांना हवं असायचं.
00:46
people who speak a lot of languages.
12
46880
1720
अनेक भाषा बोलू शकतात असे लोक.
00:49
And that made me wonder, too,
13
49400
1416
मग मी ही विचारात पडले कि,
00:50
how do actually other polyglots do it?
14
50840
2296
इतर बहुभाषिक हे कसं साध्य करतात?
00:53
What do we have in common?
15
53160
1496
आमच्यात सारखं असं काय आहे?
00:54
And what is it that enables us
16
54680
1936
असं काय आहे ज्यामुळे
00:56
to learn languages so much faster than other people?
17
56640
2440
आम्हाला इतरांपेक्षा अधिक वेगाने भाषा शिकता येतात?
00:59
I decided to meet other people like me and find that out.
18
59880
2840
माझ्यासारख्याच इतरांना भेटून, मी हे जाणून घ्यायचं ठरवलं.
01:03
The best place to meet a lot of polyglots
19
63760
2056
बहुभाषिकांना भेटण्याची मस्त जागा म्हणजे
01:05
is an event where hundreds of language lovers
20
65840
2296
जिथे अनेक भाषा प्रेमी लोक भेटून
01:08
meet in one place to practice their languages.
21
68160
2856
आपल्या भाषिक ज्ञानाचा वापर करतात असा एखादा कार्यक्रम.
01:11
There are several such polyglot events organized all around the world,
22
71040
3296
जगभर बहुभाषिकांसाठी असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
01:14
and so I decided to go there
23
74360
1376
मी तिथे जाऊन,
01:15
and ask polyglots about the methods that they use.
24
75760
2440
या लोकांकडून त्यांच्या पद्धती जाणून घ्यायचं ठरवलं.
01:19
And so I met Benny from Ireland,
25
79200
1936
तिथेच मी आयर्लंडच्या बेनीला भेटले.
01:21
who told me that his method is to start speaking from day one.
26
81160
4160
'अगदी पहिल्या दिवसापासून त्या भाषेत बोलायला सुरुवात करायची' हि त्याची पद्धत.
01:26
He learns a few phrases from a travel phrasebook
27
86240
2896
प्रवाश्यांसाठीच्या पुस्तकातील काही वाक्य तो शिकून घेतो
01:29
and goes to meet native speakers
28
89160
1576
आणि स्थानिक लोकांना भेटतो.
01:30
and starts having conversations with them right away.
29
90760
2816
मग लगेचच त्यांच्याशी संभाषण साधण्याचा प्रयत्न करतो.
01:33
He doesn't mind making even 200 mistakes a day,
30
93600
2776
दिवसागणिक २०० चुका झाल्या तरी त्याला वावगं वाटत नाही.
01:36
because that's how he learns, based on the feedback.
31
96400
2440
कारण मिळणाऱ्या अभिप्रायाच्या मदतीनेच तर तो शिकतो.
01:39
And the best thing is, he doesn't even need to travel a lot today,
32
99480
3136
आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे; आजकाल खूप प्रवास करायचीही गरज नाही.
01:42
because you can easily have conversations with native speakers
33
102640
2936
कारण आजकाल तुम्ही स्थानिक लोकांशी सहज संवाद साधू शकता,
01:45
from the comfort of your living room, using websites.
34
105600
2696
वेबसाईट चा वापर करत, अगदी घरबसल्या !
01:48
I also met Lucas from Brazil
35
108320
1776
मी ब्राझीलच्या ल्युकासला देखील भेटले.
01:50
who had a really interesting method to learn Russian.
36
110120
2480
रशियन शिकायची त्याची एक गमतीशीर पद्धत होती.
01:53
He simply added a hundred random Russian speakers on Skype as friends,
37
113200
5656
त्याने चक्क Skype वर शेकडो रशियन बोलणाऱ्या लोकांना ऍड केलं.
01:58
and then he opened a chat window with one of them
38
118880
3896
आणि त्यातल्या एकाशी बोलायला चॅट विंडो उघडली.
02:02
and wrote "Hi" in Russian.
39
122800
1440
आणि रशियन मध्ये 'हाय' लिहिले.
02:05
And the person replied, "Hi, how are you?"
40
125000
2576
तिकडूनही "कसा आहेस?" असे प्रत्युत्तर आले.
02:07
Lucas copied this and put it into a text window with another person,
41
127600
4456
ल्युकासनेही तेच कॉपी केले आणि दुसऱ्याला पाठवले.
02:12
and the person replied, "I'm fine, thank you, and how are you?"
42
132080
3576
दुसऱ्याने प्रत्त्युत्तर दिले, "मी मजेत. धन्यवाद. तू कसा आहेस?"
02:15
Lucas copied this back to the first person,
43
135680
2976
ल्युकासने हेच कॉपी करून पहिल्याला पाठवले.
02:18
and in this way, he had two strangers have a conversation with each other
44
138680
3456
अशा गमतीशीर प्रकारे तो दोन अनोळखी लोकांचा संवाद घडवून आणत होता,
02:22
without knowing about it.
45
142160
1416
तेही त्यांच्या नकळत.
02:23
(Laughter)
46
143600
1256
(हश्या)
02:24
And soon he would start typing himself,
47
144880
1896
काही काळातच तो भाषा शिकला.
02:26
because he had so many of these conversations
48
146800
2136
कारण त्याने असे अनेक संवाद साधले होते.
02:28
that he figured out how the Russian conversation usually starts.
49
148960
3016
ज्यातून रशियन संभाषणाची सुरुवात कशी होते याचा अंदाज आला.
02:32
What an ingenious method, right?
50
152000
2336
किती कल्पक पद्धत आहे ना ?
02:34
And then I met polyglots who always start by imitating sounds of the language,
51
154360
4496
भाषेतल्या आवाजांचे अनुकरण करत शिकणाऱ्या बहुभाषिकांनाही मी भेटले.
02:38
and others who always learn the 500 most frequent words of the language,
52
158880
4416
आणि एखाद्या भाषेतील ५०० उपयुक्त शब्द शिकणाऱ्या अनेकांनाही.
02:43
and yet others who always start by reading about the grammar.
53
163320
3400
काही तर व्याकरणाचे नियम वाचूनही सुरुवात करतात.
02:47
If I asked a hundred different polyglots,
54
167600
2296
मी अंदाजे १०० लोकांना विचारलं असेल आणि
02:49
I heard a hundred different approaches to learning languages.
55
169920
3616
त्यांच्याकडून मी भाषा शिकण्याच्या १०० वेगवेगळ्या पद्धती ऐकल्या.
02:53
Everybody seems to have a unique way they learn a language,
56
173560
3616
भाषा शिकण्याची प्रत्येकाची आपली खास पद्धत असते.
02:57
and yet we all come to the same result of speaking several languages fluently.
57
177200
3880
पद्धती वेगळ्या मात्र अंतिम परिणाम एकच - भाषा उत्तम बोलता येणे.
03:02
And as I was listening to these polyglots telling me about their methods,
58
182120
4296
हे सगळे बहुभाषिक लोक त्यांच्या पद्धतींबद्दल सांगत असतांना,
03:06
it suddenly dawned on me:
59
186440
2296
मला अचानक जाणवलं ते म्हणजे
03:08
the one thing we all have in common
60
188760
3136
आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे;
03:11
is that we simply found ways to enjoy the language-learning process.
61
191920
5536
भाषा शिक्षणाची प्रक्रिया मनोरंजक बनवण्याच्या पद्धती आम्ही शोधल्या आहेत.
03:17
All of these polyglots were talking about language learning
62
197480
2776
हे सगळेच लोक भाषा शिकणे किती आनंददायी आहे
03:20
as if it was great fun.
63
200280
1256
याबद्दल सांगत होते.
03:21
You should have seen their faces
64
201560
1576
त्यांचे चेहरे पाहायला हवे होते
03:23
when they were showing me their colorful grammar charts
65
203160
2616
जेंव्हा ते त्यांचे व्याकरणाचे रंगीत तक्ते दाखवत होते.
03:25
and their carefully handmade flash cards,
66
205800
2496
आणि त्यांनी काळजीपूर्वक बनवलेले 'फ्लॅश कार्ड्स'.
03:28
and their statistics about learning vocabulary using apps,
67
208320
3016
ऍप च्या मदतीने शब्दसंग्रह शिकण्याची आकडेवारी वगैरे
03:31
or even how they love to cook based on recipes in a foreign language.
68
211360
4200
किंवा परकीय भाषेतील एखादी पाककृती बनवायला त्यांना कशी मजा येते हे सांगतांना.
03:36
All of them use different methods,
69
216680
1736
प्रत्येकाने वेगवेगळी पद्धत वापरली,
03:38
but they always make sure it's something that they personally enjoy.
70
218440
3776
पण त्यातून आपल्याला आनंद मिळतोय का याची खात्री करत.
03:42
I realized that this is actually how I learn languages myself.
71
222240
3896
मला जाणवलं कि मी सुद्धा अशाच प्रकारे भाषा शिकते.
03:46
When I was learning Spanish, I was bored with the text in the textbook.
72
226160
3576
मी स्पॅनिश शिकत असतांना मला पुस्तकातले धडे वाचून कंटाळा आला होता.
03:49
I mean, who wants to read about Jose
73
229760
1736
म्हणजे खरंच, 'होझे' बद्दल कोण वाचेल?
03:51
asking about the directions to the train station. Right?
74
231520
3136
रेल्वे स्टेशन ला जायचा रस्ता वगैरे.
03:54
I wanted to read "Harry Potter" instead,
75
234680
2336
त्यापेक्षा मला 'हॅरी पॉटर' वाचायचं होत.
03:57
because that was my favorite book as a child,
76
237040
2136
कारण लहानपणी ते माझं आवडतं पुस्तक होत.
03:59
and I have read it many times.
77
239200
1656
आणि मी ते अनेकदा वाचलं आहे.
04:00
So I got the Spanish translation of "Harry Potter" and started reading,
78
240880
3616
मी 'हॅरी पॉटर' चा स्पॅनिश अनुवाद मिळवला आणि वाचायला सुरुवात केली.
04:04
and sure enough, I didn't understand almost anything at the beginning,
79
244520
3336
सुरुवातीला मला अगदी काहीही कळलं नाही.
04:07
but I kept on reading because I loved the book,
80
247880
2216
तरीही मी वाचत राहिले कारण मला पुस्तक आवडायचं.
04:10
and by the end of the book, I was able to follow it almost without any problems.
81
250120
4136
पुस्तक संपेपर्यंत मला हळूहळू कळू लागलं होत.
04:14
And the same thing happened when I was learning German.
82
254280
2616
मी जर्मन शिकू लागले तेंव्हाही काहीसं असंच घडलं.
04:16
I decided to watch "Friends," my favorite sitcom, in German,
83
256920
3296
माझ्या आवडीची 'फ्रेंड्स' मालिका मी जर्मन मधून पाहायचं ठरवलं.
04:20
and again, at the beginning it was all just gibberish.
84
260240
3096
आणि सुरुवातीला मला अक्षरशः काहीही झेपलं नाही.
04:23
I didn't know where one word finished and another one started,
85
263360
3176
एक शब्द संपून दुसरा कधी सुरु झाला हेही कळायचं नाही.
04:26
but I kept on watching every day because it's "Friends."
86
266560
2656
पण मी दररोज पाहत राहिले कारण ते 'फ्रेंड्स' होत.
04:29
I can watch it in any language. I love it so much.
87
269240
2376
मला ते इतकं आवडतं कि मी कोणत्याही भाषेत पाहू शकते.
04:31
And after the second or third season,
88
271640
2016
आणि मग दुसऱ्या कि तिसऱ्या सिझन नंतर
04:33
seriously, the dialogue started to make sense.
89
273680
2360
मला डायलॉग्ज चे अर्थ समजू लागले.
04:37
I only realized this after meeting other polyglots.
90
277080
3056
इतर बहुभाषिक लोकांना भेटल्या नंतर माझ्या हे लक्षात आलं.
04:40
We are no geniuses
91
280160
1576
आम्ही खूप बुद्धिमान नाही.
04:41
and we have no shortcut to learning languages.
92
281760
2416
भाषा शिकण्याचा कोणताही 'शॉर्टकट' आमच्याकडे नाही.
04:44
We simply found ways how to enjoy the process,
93
284200
3816
आम्ही फक्त शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनवण्याचे मार्ग शोधले.
04:48
how to turn language learning from a boring school subject
94
288040
3376
असे मार्ग ज्यामुळे भाषा हा कंटाळवाणा शैक्षणिक विषय न राहता
04:51
into a pleasant activity which you don't mind doing every day.
95
291440
3200
तुम्हाला रोज करायला आवडेल अशी गोष्ट बनेल.
04:55
If you don't like writing words down on paper,
96
295520
2176
शब्द कागदावर लिहणे कंटाळवाणे वाटत असेल तर,
04:57
you can always type them in an app.
97
297720
1696
तुम्ही ते ऍप मध्ये टाईप करू शकता.
04:59
If you don't like listening to boring textbook material,
98
299440
2816
तुम्हाला कंटाळवाणे पुस्तकी विषय ऐकायला आवडत नसेल तर
05:02
find interesting content on YouTube or in podcasts for any language.
99
302280
4296
हव्यात्या भाषेतील रोचक गोष्टी Youtube किंवा पॉडकास्ट वर शोधून काढा.
05:06
If you're a more introverted person
100
306600
1696
तुम्ही खूपच अंतर्मुख असाल तर,
05:08
and you can't imagine speaking to native speakers right away,
101
308320
3016
आणि पटकन स्थानिक लोकांशी संवाद साधने तुम्हाला शक्य नसेल तर,
05:11
you can apply the method of self-talk.
102
311360
2336
तुम्ही स्वतःशी बोलण्याची पद्धत अवलंबू शकता.
05:13
You can talk to yourself in the comfort of your room,
103
313720
2576
तुम्ही तुमच्या खोलीत आरामात स्वतःशी बोलू शकता.
05:16
describing your plans for the weekend, how your day has been,
104
316320
2896
तुमचा दिवस कसा होता, सुट्टीत काय करायचा विचार आहे हे सांगा.
05:19
or even take a random picture from your phone
105
319240
2136
किंवा फोन मधला एखादा फोटो / चित्र घेऊन
05:21
and describe the picture to your imaginary friend.
106
321400
3736
तुमच्या काल्पनिक मित्राला त्याबद्दल सांगा.
05:25
This is how polyglots learn languages,
107
325160
2496
बहुभाषिक लोक अश्या प्रकारेच भाषा शिकतात.
05:27
and the best news is, it's available to anyone
108
327680
2856
सर्वात छान गोष्ट म्हणजे या पद्धती कोणालाही सहज उपलब्ध आहेत.
05:30
who is willing to take the learning into their own hands.
109
330560
2680
जे स्वतःचे स्वतः भाषा शिकू इच्छितात अश्या सगळ्यांसाठी.
05:34
So meeting other polyglots helped me realize
110
334520
2096
इतर बहुभाषिकांना भेटल्यामुळे मला जाणवलं कि,
05:36
that it is really crucial to find enjoyment
111
336640
3016
यासगळ्यात आनंद शोधणं खूप महत्वाचं आहे.
05:39
in the process of learning languages,
112
339680
2096
भाषा शिकण्याच्या या प्रक्रियेत
05:41
but also that joy in itself is not enough.
113
341800
3040
मात्र फक्त आनंद शोधून चालणार नाही.
05:45
If you want to achieve fluency in a foreign language,
114
345680
2736
जर परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर
05:48
you'll also need to apply three more principles.
115
348440
2480
तुम्हाला तीन महत्वाची तत्व अंगीकारावी लागतील.
05:51
First of all, you'll need effective methods.
116
351760
2600
सर्वप्रथम तुमच्याकडे हवी प्रभावी पद्धत.
05:55
If you try to memorize a list of words for a test tomorrow,
117
355160
3416
जर उद्याच्या परीक्षेसाठी तुम्ही शब्दांची यादी पाठ करायचं ठरवलं
05:58
the words will be stored in your short-term memory
118
358600
2376
तर ते 'शॉर्ट टर्म मेमरी' मध्ये साठवले जातील.
06:01
and you'll forget them after a few days.
119
361000
1905
आणि काही दिवसांतच तुम्ही विसरूनही जाल.
06:03
If you, however, want to keep words long term,
120
363400
2936
तुम्हाला हे शब्द दीर्घकाळ लक्षात ठेवायचे असतील तर,
06:06
you need to revise them in the course of a few days repeatedly
121
366360
2936
काही दिवस नियमित त्याची उजळणी करणं गरजेचं आहे.
06:09
using the so-called space repetition.
122
369320
2216
ह्याला 'स्पेस्ड रिपीटिशन' पद्धत ही म्हणतात.
06:11
You can use apps which are based on this system such as Anki or Memrise,
123
371560
4256
अशी पद्धत अनुसरणारे 'Anki', 'Memrise' सारखे ऍप तुम्ही यासाठी वापरू शकता.
06:15
or you can write lists of word in a notebook using the Goldlist method,
124
375840
3336
किंवा 'गोल्ड लिस्ट' पद्धतीचा वापरून वहीत शब्दांच्या याद्या बनवू शकता.
06:19
which is also very popular with many polyglots.
125
379200
2696
बरेचसे बहुभाषिक हि पद्धत वापरतात.
06:21
If you're not sure which methods are effective and what is available out there,
126
381920
3736
जर या पद्धतींचा प्रभावीपणा आणि उपलबध्दता याबद्दल फारशी माहिती नसेल तर,
06:25
just check out polyglots' YouTube channels and websites
127
385680
3016
बहुभाषिक लोकांचे युट्युब चॅनेल किंवा वेबसाइट पहा.
06:28
and get inspiration from them.
128
388720
1776
आणि त्यापासून प्रेरित व्हा.
06:30
If it works for them, it will most probably work for you too.
129
390520
2920
त्यांना याचा उपयोग झाला असेल तर तो तुम्हालाही नक्कीच होईल.
06:34
The third principle to follow
130
394840
1976
तिसरं महत्वाचं तत्व म्हणजे
06:36
is to create a system in your learning.
131
396840
2160
शिकण्याच्या पद्धतीत सुसूत्रता आणायला हवी.
06:39
We're all very busy and no one really has time to learn a language today.
132
399720
4216
आपण सगळेच खूप व्यस्त असतो आणि आजकाल भाषा शिकण्याइतका वेळ कोणाकडेच नसतो.
06:43
But we can create that time if we just plan a bit ahead.
133
403960
3776
मात्र थोडं पूर्वनियोजन केलं तर आपण वेळ नक्की काढू शकतो.
06:47
Can you wake up 15 minutes earlier than you normally do?
134
407760
3416
तुम्ही नेहमीपेक्षा फक्त १५ मिनिटे लवकर उठू शकाल का?
06:51
That would be the perfect time to revise some vocabulary.
135
411200
3296
शब्दांची उजळणी करण्यास तितका वेळ अगदी पुरेसा आहे.
06:54
Can you listen to a podcast on your way to work while driving?
136
414520
3736
कामावर जातांना प्रवासात प्रक्षेपित कथा म्हणजे पॉडकास्ट ऐकू शकता ?
06:58
Well, that would be great to get some listening experience.
137
418280
3456
ऐकण्याचा सराव करण्यासाठी तो एक उत्तम उपाय आहे.
07:01
There are so many things we can do without even planning that extra time,
138
421760
3456
जास्तीचा वेळ न काढताही आपण खूप गोष्टी करू शकतो.
07:05
such as listening to podcasts on our way to work
139
425240
2656
जसं कि कामाच्या ठिकाणी जाताजाता पॉडकास्ट ऐकणं.
07:07
or doing our household chores.
140
427920
1656
किंवा घरकाम करता करता ऐकणं.
07:09
The important thing is to create a plan in the learning.
141
429600
3296
शिकण्यासाठीची योजना आखणे सर्वात महत्वाचे.
07:12
"I will practice speaking every Tuesday and Thursday
142
432920
2496
"मी दर मंगळवार आणि गुरुवार
07:15
with a friend for 20 minutes.
143
435440
2056
मित्रांसोबत २०मिनिट बोलण्याचा सराव करेन.
07:17
I will listen to a YouTube video while having breakfast."
144
437520
4416
नाश्ता करता करता युट्युब व्हिडिओ ऐकेन."
07:21
If you create a system in your learning,
145
441960
2136
शिकण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणल्यास
07:24
you don't need to find that extra time,
146
444120
1896
जास्तीचा वेळ काढण्याचीही गरज नाही.
07:26
because it will become a part of your everyday life.
147
446040
2440
कारण अभ्यास तुमच्या रोजच्या जगण्याचाच भाग बनेल.
07:29
And finally, if you want to learn a language fluently,
148
449880
3216
आणि कोणत्याही भाषेत पारंगत व्हायचं असेल तर,
07:33
you need also a bit of patience.
149
453120
2720
थोडासा सय्यम हा हवाच.
07:36
It's not possible to learn a language within two months,
150
456600
2736
दोनच महिन्यात नवी भाषा शिकता येणे अशक्य आहे.
07:39
but it's definitely possible to make a visible improvement in two months,
151
459360
3896
मात्र दोन महिन्यात चांगली प्रगती करणे नक्कीच शक्य आहे.
07:43
if you learn in small chunks every day in a way that you enjoy.
152
463280
3736
तुम्हाला आवडेल अश्या पद्धतीने रोज थोडं जरी शिकलात तर हे शक्य आहे.
07:47
And there is nothing that motivates us more
153
467040
2136
आणि आपल्याला सर्वाधिक प्रेरणा
07:49
than our own success.
154
469200
1240
स्वतःच्या यशातूनच मिळते.
07:51
I vividly remember the moment
155
471120
1896
मला स्पष्ट आठवतंय..
07:53
when I understood the first joke in German when watching "Friends."
156
473040
3680
फ्रेंड्स' मालिका जर्मन मधून पाहात असतांना मला जेंव्हा पहिला विनोद समजला होता,
07:57
I was so happy and motivated
157
477280
1856
मी खूप आनंदित आणि प्रेरित झाले होते.
07:59
that I just kept on watching that day two more episodes,
158
479160
3016
इतकी कि त्या दिवशी मी सलग दोन भाग बघितले.
08:02
and as I kept watching,
159
482200
1736
मी जसजसं बघत गेले,
08:03
I had more and more of those moments of understanding, these little victories,
160
483960
4216
तसतसं मला जास्त समजत गेलं. माझ्यासाठी यशच होत.
08:08
and step by step, I got to a level where I could use the language
161
488200
3456
आणि मग हळूहळू मला ती भाषा वापरता येऊ लागली.
08:11
freely and fluently to express anything.
162
491680
2856
मोकळेपणाने आणि व्यवस्थित म्हणणं मांडता येऊ लागलं.
08:14
This is a wonderful feeling.
163
494560
1520
अशावेळी खूप छान वाटतं.
08:16
I can't get enough of that feeling,
164
496800
1696
मला हे खूप आवडतं.
08:18
and that's why I learn a language every two years.
165
498520
2816
आणि म्हणूनच मी दर दोन वर्षांनी नवी भाषा शिकते.
08:21
So this is the whole polyglot secret.
166
501360
2056
तर असं आहे बहुभाषिक होण्याचं रहस्य.
08:23
Find effective methods which you can use systematically
167
503440
2856
व्ययस्थित वापरता येतील अश्या प्रभावी पद्धती शोधा,
08:26
over the period of some time in a way which you enjoy,
168
506320
3296
ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल.
08:29
and this is how polyglots learn languages within months, not years.
169
509640
3880
अश्याच प्रकारे काही महिन्यातच बहुभाषिक लोक नवनव्या भाषा शिकतात.
08:35
Now, some of you may be thinking,
170
515160
1616
तुमच्यापैकी काहींना वाटत असेल,
08:36
"That's all very nice to enjoy language learning,
171
516800
2336
"भाषा शिकण्याचा आनंद घेणे वगैरे ठीक आहे,
08:39
but isn't the real secret that you polyglots
172
519160
2536
पण खरं रहस्य तुम्ही बहुभाषिक लोक
08:41
are just super talented and most of us aren't?"
173
521720
2600
इतरांपेक्षा प्रचंड हुशार असता, हे तर नव्हे?"
08:45
Well, there's one thing I haven't told you about Benny and Lucas.
174
525320
3080
खरंतर बेनी आणि ल्युकास बद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच नाही.
08:49
Benny had 11 years of Irish Gaelic and five years of German at school.
175
529159
5817
बेनी शाळेत ११वर्ष आयरिश गेलिक आणि ५वर्ष जर्मन शिकलाय.
08:55
He couldn't speak them at all when graduating.
176
535000
3216
मात्र शाळा सोडतांना त्याला या भाषा जराही बोलता येत नव्हत्या.
08:58
Up to the age of 21, he thought he didn't have the language gene
177
538240
4176
२१व्या वर्षांपर्यंत भाषा शिकण्यासाठीचे गुण आपल्यात नाहीत असं त्याला वाटत होत.
09:02
and he could not speak another language.
178
542440
2416
इतर कोणती भाषा बोलणंही त्याला जमत नव्हतं.
09:04
Then he started to look for his way of learning languages,
179
544880
2936
मग त्याने भाषा शिकण्यासाठी स्वतःची अशी पद्धत शोधायचं ठरवलं.
09:07
which was speaking to native speakers and getting feedback from them,
180
547840
3856
स्थानिक लोकांशी बोलून त्यांचा अभिप्राय घेणं हि त्याची पद्धत.
09:11
and today Benny can easily have a conversation in 10 languages.
181
551720
3960
आणि आज बेनी १० वेगवेगळ्या भाषांमध्ये सहज बोलू शकतो.
09:17
Lucas tried to learn English at school for 10 years.
182
557120
3296
ल्युकासने शाळेत १०वर्ष इंग्रजी शिकायचा प्रयत्न केला.
09:20
He was one of the worst students in class.
183
560440
2616
तो वर्गातला सगळ्यात 'ढ' मुलगा होता.
09:23
His friends even made fun of him
184
563080
1616
त्याचे मित्र त्याची टर उडवायचे.
09:24
and gave him a Russian textbook as a joke
185
564720
2616
एकदा मजा म्हणून त्यांनी ह्याला रशियन पाठयपुस्तक दिले.
09:27
because they thought he would never learn that language, or any language.
186
567360
3736
कारण त्यांना वाटलं हा रशियनच काय कोणतीच भाषा शिकू शकणार नाही.
09:31
And then Lucas started to experiment with methods,
187
571120
2376
ल्युकासने विविध पद्धती आजमावायला सुरुवात केली.
09:33
looking for his own way to learn,
188
573520
1800
स्वतःची पद्धत त्याला शोधायची होती.
09:36
for example, by having Skype chat conversations with strangers.
189
576520
4176
जसं कि Skype च्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत भाषा शिकणे.
09:40
And after just 10 years,
190
580720
1816
आणि फक्त १०वर्षांनंतर,
09:42
Lucas is able to speak 11 languages fluently.
191
582560
3320
ल्युकास ११ विविध भाषा उत्तम बोलू शकतो.
09:47
Does that sound like a miracle?
192
587000
1560
एखादा चमत्कार वाटतोय ना ?
09:49
Well, I see such miracles every single day.
193
589440
2600
मी अशे चमत्कार रोज पहाते.
09:52
As a language mentor,
194
592760
1336
एक भाषा मार्गदर्शक म्हणून,
09:54
I help people learn languages by themselves,
195
594120
2416
मी लोकांना स्वतःच्यास्वतः भाषा शिकायला मदत करते.
09:56
and I see this every day.
196
596560
1296
म्हणून मी हे रोज पहाते.
09:57
People struggle with language learning for five, 10, even 20 years,
197
597880
4176
५,१०,इतकंच काय २० वर्ष प्रयत्न करूनही लोकांना भाषा शिकता येत नाही.
10:02
and then they suddenly take their learning into their own hands,
198
602080
3856
आणि मग अचानक एक दिवस ते स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न करू लागतात.
10:05
start using materials which they enjoy, more effective methods,
199
605960
3296
अधिक प्रभावी पद्धती, साहित्य जे त्यांना आवडतं.
10:09
or they start tracking their learning
200
609280
1816
ते आपण काय शिकलो याचा मागोवा घेऊ लागतात
10:11
so that they can appreciate their own progress,
201
611120
2936
जेणेकरून झालेली प्रगती त्यांना जाणवेल.
10:14
and that's when suddenly
202
614080
1936
आणि मग अचानक
10:16
they magically find the language talent that they were missing all their lives.
203
616040
4200
आजवर न जमलेलं, भाषा शिकण्याचं कैशल्य त्यांना प्राप्त होत.
10:21
So if you've also tried to learn a language
204
621480
2176
तुम्हीही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला असेल,
10:23
and you gave up, thinking it's too difficult
205
623680
2416
आणि खूप अवघड वाटून अर्ध्यावर सोडला असेल,
10:26
or you don't have the language talent,
206
626120
2256
भाषा शिकण्यासाठीचं कैशल्य तुमच्यात नसेल तर,
10:28
give it another try.
207
628400
1536
एकदा प्रयत्न नक्की करून पाहा.
10:29
Maybe you're also just one enjoyable method away
208
629960
2856
कदाचित तुम्हीही केवळ एक मजेदार पाऊल दूर असाल,
10:32
from learning that language fluently.
209
632840
1762
त्या भाषेत पारंगत होण्यापासून.
10:34
Maybe you're just one method away from becoming a polyglot.
210
634960
3936
कदाचित बहुभाषिक होण्यापासून तुम्ही केवळ एक पद्धत दूर असाल.
10:38
Thank you.
211
638920
1216
धन्यवाद.
10:40
(Applause)
212
640160
4200
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7