What really happens to the plastic you throw away - Emma Bryce

4,987,878 views ・ 2015-04-21

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:06
This is the story of three plastic bottles,
0
6794
3009
ही कथा आहे प्लास्टिकच्या तीन बाटल्यांची.
00:09
empty and discarded.
1
9803
1937
रिकाम्या, फेकून दिलेल्या बाटल्यांची.
00:11
Their journeys are about to diverge
2
11740
2209
यापुढचा प्रवास तिघी वेगवेगळ्या मार्गाने करतील.
00:13
with outcomes that impact nothing less than the fate of the planet.
3
13949
4597
त्यांच्या प्रवासाचे परिणाम चक्क आपल्या पृथ्वीचं भविष्य ठरवतील.
00:18
But they weren't always this way.
4
18546
2185
कसं शक्य आहे हे?
00:20
To understand where these bottles end up, we must first explore their origins.
5
20731
5207
त्यांचा अंत कसा होतो ते पाहण्यापूर्वी त्या निर्माण कशा झाल्या, ते पाहू.
00:25
The heroes of our story were conceived in this oil refinery.
6
25938
3750
आपल्या कथेच्या नायिकांचा जन्म या खनिज तेलाच्या रिफायनरीत झाला.
00:29
The plastic in their bodies
7
29688
1670
या बाटल्या तयार होण्यापूर्वी
00:31
was formed by chemically bonding oil and gas molecules together
8
31358
4334
तेल आणि वायूच्या रेणूंच्या संयुगातून रासायनिक प्रक्रियेद्वारे
00:35
to make monomers.
9
35692
1803
एकलक निर्माण झाले.
00:37
In turn, these monomers were bonded into long polymer chains to make plastic
10
37495
5617
मग या एकलकांच्या संयुगातून बहुलकांच्या लांबलचक साखळ्या निर्माण झाल्या,
00:43
in the form of millions of pellets.
11
43112
3498
तेच करोडो छोट्या गोळ्यांच्या स्वरूपातलं प्लास्टिक.
00:46
Those were melted at manufacturing plants and reformed in molds
12
46610
4082
ते वितळवून, साच्यात घालून, त्या लवचिक प्लास्टिकमधून
00:50
to create the resilient material that makes up the triplets' bodies.
13
50692
4536
आपल्या तिळ्या नायिका निर्माण झाल्या.
00:55
Machines filled the bottles with sweet bubbily liquid
14
55228
2977
यंत्रांद्वारे त्यांच्यात गोड फेसाळतं पेय भरण्यात आलं.
00:58
and they were then wrapped, shipped, bought, opened, consumed
15
58205
4083
मग रंगीत वेष्टन लावून त्यांची विक्री झाली. त्या उघडल्या गेल्या,
01:02
and unceremoniously discarded.
16
62288
3213
आणि पेय संपल्यावर बिनबोभाट टाकून दिल्या गेल्या.
01:05
And now here they lie,
17
65501
1469
आता त्या इथे पडल्या आहेत.
01:06
poised at the edge of the unknown.
18
66970
3313
पुढच्या अज्ञात प्रवासाची वाट बघत.
01:10
Bottle one, like hundreds of millions of tons of his plastic brethren,
19
70283
4267
पहिली बाटली तिच्या करोडो भाईबंदांप्रमाणेच
01:14
ends up in a landfill.
20
74550
2211
जमिनीच्या भरावात टाकली गेली आहे.
01:16
This huge dump expands each day
21
76761
2474
हा कचऱ्याचा ढीग रोज वाढत चालला आहे.
01:19
as more trash comes in and continues to take up space.
22
79235
4398
रोज आणखी कचरा येत राहतो, जास्त जागा व्यापत राहतो.
01:23
As plastics sit there being compressed amongst layers of other junk,
23
83633
4298
कचऱ्याच्या थरांमध्ये प्लास्टिक दबलं जातं.
01:27
rainwater flows through the waste
24
87931
2150
त्यातून पावसाचं पाणी वाहतं.
01:30
and absorbs the water-soluble compounds it contains,
25
90081
3993
त्या पाण्यात विरघळणारी रासायनिक संयुगं त्याच्याबरोबर वाहून जातात.
01:34
and some of those are highly toxic.
26
94074
2852
त्यापैकी काही अत्यंत विषारी असतात.
01:36
Together, they create a harmful stew called leachate,
27
96926
4080
त्यापासून एक घातक मिश्रण तयार होतं. त्याला म्हणतात लीचेट.
01:41
which can move into groundwater, soil and streams,
28
101006
3465
हे मिश्रण जमिनीखालच्या पाण्यात झिरपतं. मातीत आणि झऱ्यांत मिसळतं.
01:44
poisoning ecosystems and harming wildlife.
29
104471
3631
पर्यावरण दूषित करतं. वन्य प्राणिजगताची हानी करतं.
01:48
It can take bottle one an agonizing 1,000 years to decompose.
30
108102
5912
एका बाटलीचं संपूर्ण विघटन होण्यासाठी १००० वर्षं लागतात.
01:54
Bottle two's journey is stranger but, unfortunately, no happier.
31
114014
4495
दुसऱ्या बाटलीचा प्रवास निराळा आहे, पण त्यातही चांगलं काही नाही.
01:58
He floats on a trickle that reaches a stream,
32
118509
3051
ती एका नाल्यातून वाहत गेली आहे.
02:01
a stream that flows into a river,
33
121560
1998
नाला पुढे एका नदीला जाऊन मिळतो,
02:03
and a river that reaches the ocean.
34
123558
3116
आणि नदी समुद्राला.
02:06
After months lost at sea,
35
126674
1791
अनेक महिने समुद्रात काढल्यानंतर
02:08
he's slowly drawn into a massive vortex, where trash accumulates,
36
128465
4952
ती एका प्रचंड भोवऱ्यात खेचली गेली आहे. तिथे सगळीकडचा कचरा गोळा होतो आहे.
02:13
a place known as the Great Pacific Garbage Patch.
37
133417
4305
या जागेचं नाव आहे, "द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच."
02:17
Here the ocean's currents have trapped millions of pieces of plastic debris.
38
137722
4582
इथे समुद्रातल्या प्रवाहांनी प्लास्टिकचे करोडो तुकडे आणून गोळा केले आहेत.
02:22
This is one of five plastic-filled gyres in the world's seas.
39
142304
5038
कचऱ्याने भरलेले असे पाच भोवरे जगात आहेत.
02:27
Places where the pollutants turn the water into a cloudy plastic soup.
40
147342
4826
प्रदूषक रसायनांमुळे तिथलं पाणी म्हणजे प्लास्टिकचं गढूळ सरबत झालं आहे.
02:32
Some animals, like seabirds, get entangled in the mess.
41
152168
3816
समुद्रातले जलचर या जंजाळात अडकतात.
02:35
They, and others, mistake the brightly colored plastic bits for food.
42
155984
5337
किंवा, चकाकतं, रंगीत प्लास्टिक अन्न समजून गिळतात.
02:41
Plastic makes them feel full when they're not,
43
161321
3339
प्लास्टिक त्यांच्या पोटातली जागा व्यापतं, पण पोषण देऊ शकत नाही.
02:44
so they starve to death
44
164660
1921
त्यामुळे ते भुकेपोटी मरतात.
02:46
and pass the toxins from the plastic up the food chain.
45
166581
3762
आता प्लास्टिकमधलं विष अन्नसाखळीत पुढे ढकललं जातं.
02:50
For example, it's eaten by lanternfish,
46
170343
2595
उदाहरणार्थ, लँटर्नफिश नावाचा मासा प्लास्टिक खातो.
02:52
the lanternfish are eaten by squid,
47
172938
2188
स्क्विड मासा त्याला खातो.
02:55
the squid are eaten by tuna,
48
175126
1988
मग त्या स्क्विडला ट्यूना मासा खातो.
02:57
and the tuna are eaten by us.
49
177114
3019
शेवटी माणसं ट्यूना मासा खातात.
03:00
And most plastics don't biodegrade,
50
180133
2371
प्लास्टिकचं जैविक विघटन होत नाही.
03:02
which means they're destined to break down into smaller and smaller pieces
51
182504
4017
म्हणजे त्यांचे फक्त बारीक बारीक तुकडे होत राहतात.
03:06
called micro plastics,
52
186521
2089
त्याला सूक्ष्म प्लास्टिक म्हणतात.
03:08
which might rotate in the sea eternally.
53
188610
4140
ते अनंत काळ समुद्रात असेच फिरत राहणार.
03:12
But bottle three is spared the cruel purgatories of his brothers.
54
192750
4629
तिसऱ्या बाटलीच्या नशिबी हे भोग आले नाहीत.
03:17
A truck brings him to a plant
55
197379
1798
ट्रकमधून ती प्रक्रिया केंद्रात आली.
03:19
where he and his companions are squeezed flat
56
199177
2891
तिथे तिच्या अनेक भाईबंदांबरोबर तिला चेपून सपाट करण्यात आलं.
03:22
and compressed into a block.
57
202068
2636
मग त्यांच्यावर दाब देऊन एक ठोकळा तयार झाला.
03:24
Okay, this sounds pretty bad, too, but hang in there.
58
204704
3240
हेही काही फारसं चांगलं वाटत नाही ना? पण थांबा...
03:27
It gets better.
59
207944
1451
यापुढे चांगलं काही घडणार आहे.
03:29
The blocks are shredded into tiny pieces,
60
209395
2788
या ठोकळ्यांचे बारीक तुकडे करण्यात येतात.
03:32
which are washed and melted,
61
212183
1676
ते धुवून घेऊन, मग वितळवले जातात.
03:33
so they become the raw materials that can be used again.
62
213859
4037
आता हा कच्चा माल तयार होतो, पुन्हा वापरण्यासाठी.
03:37
As if by magic, bottle three is now ready to be reborn
63
217896
4142
म्हणजे या जादूमुळे, तिसऱ्या बाटलीचा
03:42
as something completely new.
64
222038
2448
दुसऱ्याच एखाद्या स्वरूपात पुनर्जन्म होणार आहे.
03:44
For this bit of plastic with such humble origins,
65
224486
3422
अक्षरशः कचऱ्यातून पुनर्जन्म मिळालेल्या या नव्या प्लास्टिकला
03:47
suddenly the sky is the limit.
66
227908
2994
आता एकाएकी आभाळ तोकडं झालं आहे.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7