The politics of fiction | Elif Shafak

419,765 views ・ 2010-07-19

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Sneha Kulkarni Reviewer: Gayatri Natu
00:15
I'm a storyteller.
0
15260
2000
मी एक कथाकार आहे.
00:17
That's what I do in life -- telling stories,
1
17260
2000
तेच करते मी आयुष्यात - गोष्टी सांगते,
00:19
writing novels --
2
19260
2000
कादंबर्‍या लिहिते.
00:21
and today I would like to tell you a few stories
3
21260
2000
आणि आज मला काही गोष्टी सांगायच्या आहेत,
00:23
about the art of storytelling
4
23260
2000
कथाकथनाच्या कलेविषयी,
00:25
and also some supernatural creatures
5
25260
2000
आणि जिनी नावाच्या
00:27
called the djinni.
6
27260
2000
मायावी राक्षसांविषयी.
00:29
But before I go there, please allow me to share with you
7
29260
3000
पण तिकडे वळण्यापूर्वी
00:32
glimpses of my personal story.
8
32260
2000
माझ्या स्वतःच्याच गोष्टीची एक झलक मला दाखवायची आहे
00:34
I will do so with the help of words, of course,
9
34260
3000
हे मी अर्थातच शब्दांतून व्यक्त करेन,
00:37
but also a geometrical shape, the circle,
10
37260
3000
आणि एका आकारातूनही, तो म्हणजे वर्तुळ.
00:40
so throughout my talk,
11
40260
2000
त्यामुळे माझ्या संपूर्ण भाषणात
00:42
you will come across several circles.
12
42260
3000
तुम्हाला बरीच वर्तुळं सापडतील.
00:45
I was born in Strasbourg, France
13
45260
3000
फ्रान्समधल्या स्ट्रॉसबर्गमध्ये
00:48
to Turkish parents.
14
48260
2000
तुर्की आई-वडिलांपोटी माझा जन्म झाला.
00:50
Shortly after, my parents got separated,
15
50260
2000
त्यानंतर थोड्याच कालावधीत माझे आई-वडील वेगळे झाले
00:52
and I came to Turkey with my mom.
16
52260
2000
आणि मी माझ्या आईबरोबर तुर्कस्तानला आले.
00:54
From then on, I was raised
17
54260
2000
तेव्हापासून एकट्या आईने
00:56
as a single child by a single mother.
18
56260
2000
एकुलत्या मला वाढवलं.
00:58
Now in the early 1970s, in Ankara,
19
58260
2000
आता १९७० च्या काळातल्या अंकारामध्ये
01:00
that was a bit unusual.
20
60260
2000
ते थोडं जगावेगळं होतं.
01:02
Our neighborhood was full of large families,
21
62260
2000
आमच्या शेजारी बरीच मोठी कुटंबं राहायची,
01:04
where fathers were the heads of households,
22
64260
3000
ज्यांच्यामध्ये वडील हेच प्रमुख असायचे.
01:07
so I grew up seeing my mother as a divorcee
23
67260
3000
त्यामुळे मी मोठं होताना माझ्या आईला
01:10
in a patriarchal environment.
24
70260
2000
पितृसत्ताक वातावरणात एक घटस्फोटिता म्हणून पाहिलेलं आहे.
01:12
In fact, I grew up observing
25
72260
2000
खरंतर मी मोठं होताना
01:14
two different kinds of womanhood.
26
74260
2000
दोन वेगळ्या प्रकारच्या स्त्रिया पाहिल्या.
01:16
On the one hand was my mother,
27
76260
2000
एका बाजूला होती माझी आई,
01:18
a well-educated, secular, modern, westernized, Turkish woman.
28
78260
3000
सुशिक्षित, धर्मनिरपेक्ष, आधुनिक, पाश्चात्य विचारसरणीची तुर्की स्त्री
01:21
On the other hand was my grandmother,
29
81260
2000
दुसर्‍या बाजूला होती माझी आजी,
01:23
who also took care of me
30
83260
2000
माझं हवं-नको बघणारी,
01:25
and was more spiritual, less educated
31
85260
3000
थोडी जास्त धार्मिक, कमी शिकलेली
01:28
and definitely less rational.
32
88260
2000
आणि नक्कीच कमी बुध्दिवादी असणारी.
01:30
This was a woman who read coffee grounds to see the future
33
90260
3000
ती कॉफीपूड पाहून भविष्यं सांगायची
01:33
and melted lead into mysterious shapes
34
93260
2000
आणि वाईट नजरेवर उतारा म्हणून
01:35
to fend off the evil eye.
35
95260
3000
शिसं गूढ आकारात वितळवून द्यायची.
01:38
Many people visited my grandmother,
36
98260
2000
माझ्या आजीकडे लोकांचा राबता असायचा,
01:40
people with severe acne on their faces
37
100260
2000
चेहर्‍यावरच्या मुरुमांनी त्रासलेल्या
01:42
or warts on their hands.
38
102260
3000
किंवा हातावर चामखीळ असणार्‍या लोकांचा.
01:45
Each time, my grandmother would utter some words in Arabic,
39
105260
3000
दरवेळेला माझी आजी अरबीमध्ये काही मंत्र म्हणायची,
01:48
take a red apple and stab it
40
108260
2000
एक लाल सफरचंद घ्यायची
01:50
with as many rose thorns
41
110260
2000
आणि जितके चामखीळ काढायचे असतील
01:52
as the number of warts she wanted to remove.
42
112260
3000
तितके गुलाबाचे काटे त्याला टोचायची.
01:55
Then one by one, she would
43
115260
2000
त्यानंतर एकेका काट्याभोवती
01:57
encircle these thorns with dark ink.
44
117260
3000
गडद शाईने ती वर्तुळ काढायची.
02:00
A week later, the patient would come back
45
120260
2000
एका आठवड्याने रोगी
02:02
for a follow-up examination.
46
122260
2000
परत तपासणीला येई.
02:04
Now, I'm aware that I should not be saying such things
47
124260
3000
आता मला माहीत आहे की
02:07
in front of an audience of scholars and scientists,
48
127260
3000
मी विद्वानांच्या आणि शास्त्रज्ञांच्या समोर असं बोलू नये,
02:10
but the truth is, of all the people
49
130260
2000
पण खरं सांगायचं तर
02:12
who visited my grandmother for their skin conditions,
50
132260
3000
माझ्या आजीला जे लोक त्वचाविकारांसाठी भेटायला यायचे
02:15
I did not see anyone go back
51
135260
2000
त्यातल्या कुणालाही मी
02:17
unhappy or unhealed.
52
137260
3000
दु:खी किंवा गुण न येताच परत जाताना असं पाहिलेलं नाही.
02:20
I asked her how she did this. Was it the power of praying?
53
140260
3000
मी विचारलं तिला, की ती कसं काय करते हे. ही प्रार्थनेची शक्ती म्हणायची का?
02:23
In response she said, "Yes, praying is effective,
54
143260
3000
उत्तरादाखल तिनं सांगितलं, '' हो, प्रार्थनेचा गुण तर आहेच,
02:26
but also beware of the power of circles."
55
146260
3000
पण वर्तुळांमध्ये देखील शक्ती असते बरं."
02:29
From her, I learned, amongst many other things,
56
149260
3000
बाकीच्या बर्‍याच गोष्टींबरोबरच
02:32
one very precious lesson --
57
152260
2000
एक मोलाचा धडा शिकले मी तिच्याकडून.
02:34
that if you want to destroy something in this life,
58
154260
2000
तुम्हाला जर आयुष्यात एखादी गोष्ट नष्ट करायची असेल ना,
02:36
be it an acne, a blemish
59
156260
2000
मग ते मुरूम असो, एखादा डाग असो,
02:38
or the human soul,
60
158260
2000
किंवा मानवी आत्मा असो,
02:40
all you need to do is to surround it with thick walls.
61
160260
3000
तर त्याच्या भोवती एक भक्कम तटबंदी उभारायची.
02:43
It will dry up inside.
62
163260
2000
वठून जाईल तो आतल्याआत.
02:45
Now we all live in some kind of a social and cultural circle.
63
165260
3000
आता आपण सगळे कुठल्या ना कुठल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात राहतो.
02:48
We all do.
64
168260
2000
आपण सगळेच.
02:50
We're born into a certain family, nation, class.
65
170260
3000
आपला जन्म एखाद्या विशिष्ट कुटुंबात, देशात, सामाजिक वर्गात होतो.
02:53
But if we have no connection whatsoever
66
173260
3000
पण जर आपण हे आपलं सवयीचं जग सोडून
02:56
with the worlds beyond the one we take for granted,
67
176260
2000
बाहेरच्या जगाशी संबंध ठेवले नाहीत
02:58
then we too run the risk
68
178260
2000
तर धोका हा आहे की
03:00
of drying up inside.
69
180260
2000
आपणही आतल्याआत वठून जाऊ.
03:02
Our imagination might shrink;
70
182260
2000
आपली कल्पनाशक्ती खुरटत जाईल.
03:04
our hearts might dwindle,
71
184260
2000
आपली मनं आकसत जातील.
03:06
and our humanness might wither
72
186260
2000
आणि आपण असेच
03:08
if we stay for too long
73
188260
2000
आपल्या सांस्कृतिक कोशात खूप जास्त काळ राहिलो ना
03:10
inside our cultural cocoons.
74
190260
2000
तर आपली माणुसकीदेखील आटून जाईल.
03:12
Our friends, neighbors, colleagues, family --
75
192260
3000
जर आपले मित्र, शेजारी, सहकारी, कुटुंब
03:15
if all the people in our inner circle resemble us,
76
195260
2000
अशी सगळी जवळची माणसं आपल्याच सारखी असतील,
03:17
it means we are surrounded
77
197260
2000
तर त्याचा अर्थ आपल्याभोवती
03:19
with our mirror image.
78
199260
2000
आपल्या प्रतिबिंबांचीच गर्दी झालेली आहे.
03:21
Now one other thing women like my grandma do in Turkey
79
201260
3000
आता माझ्या आजीसारख्या तुर्कस्तानातल्या बायका
03:24
is to cover mirrors with velvet
80
204260
2000
अजून एक गोष्ट करतात, त्या आरसे मखमलीने झाकून तरी टाकतात
03:26
or to hang them on the walls with their backs facing out.
81
206260
3000
किंवा भिंतीवर पाठमोरे तरी टांगतात.
03:29
It's an old Eastern tradition
82
209260
2000
पद्धत आहे ही एक पूर्वेकडची,
03:31
based on the knowledge that it's not healthy
83
211260
2000
तिच्या मागचा समज असा की
03:33
for a human being to spend too much time
84
213260
3000
माणसाने फार वेळ
03:36
staring at his own reflection.
85
216260
2000
स्वतःचं प्रतिबिंब बघत राहणं बरं नव्हे.
03:38
Ironically, [living in] communities of the like-minded
86
218260
3000
विसंगती खरी, पण आजच्या जागतिकीकरणाच्या काळाचा
03:41
is one of the greatest dangers
87
221260
2000
एक मोठा धोका हा आहे की
03:43
of today's globalized world.
88
223260
2000
एकसारखाच विचार करण्यार्‍या लोकांनी आपापली कोंडाळी करून राहणं.
03:45
And it's happening everywhere,
89
225260
2000
आणि हे सगळीकडे होतं आहे,
03:47
among liberals and conservatives,
90
227260
2000
उदारमतवादी आणि सनातनी यांच्यात,
03:49
agnostics and believers, the rich and the poor,
91
229260
2000
अज्ञेयवादी आणि आस्तिकांच्यात,श्रीमंत आणि गरीबांच्यात,
03:51
East and West alike.
92
231260
2000
तसंच पूर्व आणि पश्चिमेतही.
03:53
We tend to form clusters
93
233260
2000
आपला कल असतो
03:55
based on similarity,
94
235260
2000
काही सारखेपणा दिसला की गट बनवण्याकडे,
03:57
and then we produce stereotypes
95
237260
2000
आणि नंतर दुसर्‍या गटातल्या लोकांबद्द्ल
03:59
about other clusters of people.
96
239260
2000
सरसकट पूर्वग्रह बनत जातात.
04:01
In my opinion, one way of transcending
97
241260
2000
माझ्या मते हा सांस्कृतिक विळखा
04:03
these cultural ghettos
98
243260
2000
पार करण्याचा एक मार्ग
04:05
is through the art of storytelling.
99
245260
2000
म्हणजे कथाकथन, साहित्यकला.
04:07
Stories cannot demolish frontiers,
100
247260
3000
कथाकहाण्या काही तट धुळीला मिळवू शकत नाहीत,
04:10
but they can punch holes in our mental walls.
101
250260
3000
पण त्या आपल्या मानसिक भिंतींत भगदाडं पाडू शकतात.
04:13
And through those holes, we can get a glimpse of the other,
102
253260
3000
आणि याच भगदाडांतून आपण बाहेरची झलक पाहू शकतो,
04:16
and sometimes even like what we see.
103
256260
3000
आणि कधीकधी तो देखावा आपल्याला आवडतोसुध्दा.
04:19
I started writing fiction at the age of eight.
104
259260
3000
मी आठ वर्षांची होते तेंव्हा लिहायला सुरुवात केली.
04:22
My mother came home one day with a turquoise notebook
105
262260
3000
एके दिवशी माझी आई एक मोरचुदी [रंगाची] वही घेऊन घरी आली
04:25
and asked me if I'd be interested in keeping a personal journal.
106
265260
3000
आणि म्हणाली की मला माझ्या वैयक्तिक नोंदी ठेवायला आवडतील का?
04:28
In retrospect, I think she was slightly worried
107
268260
2000
मागे वळून पहाताना, मला असं वाटतंय की तिला जराशी काळजी वाटत असावी
04:30
about my sanity.
108
270260
2000
माझं डोकं ताळ्यावर असण्याची.
04:32
I was constantly telling stories at home, which was good,
109
272260
3000
चांगली गोष्ट अशी की मी कायम घरी गोष्टी सांगत असायचे.
04:35
except I told this to imaginary friends around me,
110
275260
2000
फक्त विचित्र इतकंच होतं की मी माझ्या आसपास असणार्‍या
04:37
which was not so good.
111
277260
2000
काल्पनिक मित्रांना गोष्टी सांगायचे.
04:39
I was an introverted child,
112
279260
2000
मी इतकी एकलकोंडी होते
04:41
to the point of communicating with colored crayons
113
281260
3000
की रंगीत खडूंशी बोलायचे
04:44
and apologizing to objects
114
284260
2000
आणि वस्तूंना धडकल्यावर
04:46
when I bumped into them,
115
286260
2000
त्यांची माफी मागायचे.
04:48
so my mother thought it might do me good
116
288260
2000
त्यामुळे आईला असं वाटलं की
04:50
to write down my day-to-day experiences
117
290260
2000
माझ्या रोजच्या अनुभवांना, भावनांना वहीत उतरवले
04:52
and emotions.
118
292260
2000
तर बरं होईल.
04:54
What she didn't know was that I thought my life was terribly boring,
119
294260
3000
पण तिला काय कल्पना की मला माझं आयुष्य प्रचंड कंटाळवाणं वाटायचं
04:57
and the last thing I wanted to do
120
297260
2000
आणि स्वतःबद्द्ल लिहायला तर
04:59
was to write about myself.
121
299260
2000
मला अजिबातच आवडत नव्हतं.
05:01
Instead, I began to write about people other than me
122
301260
3000
त्याऐवजी मी लिहायला सुरूवात केली ती बाकीच्या लोकांविषयी
05:04
and things that never really happened.
123
304260
2000
आणि अशा घटनांबद्द्ल ज्या मुळात कधी घडल्याच नव्हत्या.
05:06
And thus began my life-long passion
124
306260
2000
गोष्टी लिहिणं हे जे माझा आयुष्यभर जीव-की-प्राण बनलंय,
05:08
for writing fiction.
125
308260
2000
त्याची सुरूवात ही अशी झाली.
05:10
So from the very beginning, fiction for me
126
310260
3000
त्यामुळे अगदी सुरवातीपासूनच साहित्य हे माझ्यासाठी
05:13
was less of an autobiographical manifestation
127
313260
3000
आत्मप्रकटीकरण नसून
05:16
than a transcendental journey
128
316260
2000
दुसर्‍यांच्या आयुष्यात डोकावायची,
05:18
into other lives, other possibilities.
129
318260
2000
बाकीच्या शक्यता चाचपून पहाण्याची गोष्ट होती.
05:20
And please bear with me:
130
320260
2000
आता थोडा धीर धरा,
05:22
I'll draw a circle and come back to this point.
131
322260
3000
मी इथे एक वर्तुळ रेखाटतेय आणि नंतर या मुद्याकडे परत येईन मी.
05:25
Now one other thing happened around this same time.
132
325260
2000
आता त्याच वेळी अजून एक झालं.
05:27
My mother became a diplomat.
133
327260
2000
माझ्या आईला राजनैतिक अधिकारी म्हणून काम मिळालं.
05:29
So from this small, superstitious,
134
329260
2000
त्यामुळे माझ्या आजीच्या छोट्याशा, अंधश्रध्दाळू,
05:31
middle-class neighborhood of my grandmother,
135
331260
3000
मध्यमवर्गीय वातावरणातून
05:34
I was zoomed into this
136
334260
2000
माझी रवानगी थेट
05:36
posh, international school [in Madrid],
137
336260
2000
[माद्रिदमधल्या] एका चकाचक आंतरराष्ट्रीय शाळेत झाली,
05:38
where I was the only Turk.
138
338260
2000
जिथे तुर्की मी एकटीच होते.
05:40
It was here that I had my first encounter
139
340260
2000
ज्या प्रकाराला मी "प्रातिनिधिक परदेशी" म्हणते,
05:42
with what I call the "representative foreigner."
140
342260
3000
त्याचा मला आलेला हा पहिला अनुभव.
05:45
In our classroom, there were children from all nationalities,
141
345260
3000
आमच्या वर्गात सगळ्याच देशांची मुलं होती.
05:48
yet this diversity did not necessarily lead
142
348260
3000
पण या विविधतेतून वर्गात
05:51
to a cosmopolitan, egalitarian
143
351260
3000
बहुरंगी, समताधिष्ठित लोकशाही
05:54
classroom democracy.
144
354260
2000
वगैरे काही आली नाही.
05:56
Instead, it generated an atmosphere
145
356260
2000
त्याऐवजी असं वातावरण तयार झालं की
05:58
in which each child was seen --
146
358260
2000
ज्यात प्रत्येक मूल
06:00
not as an individual on his own,
147
360260
2000
हे फक्त मूल न राहता
06:02
but as the representative of something larger.
148
362260
3000
त्यापेक्षा काहीतरी मोठ्या गोष्टींचं प्रतीक बनलं.
06:05
We were like a miniature United Nations, which was fun,
149
365260
3000
आम्ही म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचीच छोटी आवृत्ती होतो, यात मजा यायची.
06:08
except whenever something negative,
150
368260
2000
पण जोपर्यंत एखाद्या देशाच्या
06:10
with regards to a nation
151
370260
2000
किंवा धर्माच्या बाबत
06:12
or a religion, took place.
152
372260
2000
काही वाईट घडत नसे तोपर्यंतच.
06:14
The child who represented it was mocked,
153
374260
3000
असं काही झालं तर मग ते मूल ज्या देशाचं किंवा धर्माचं असायचं, त्याची चेष्टा करून,
06:17
ridiculed and bullied endlessly.
154
377260
3000
टिंगल करून त्याला जीव नकोसा करून टाकायचे.
06:20
And I should know, because during the time I attended that school,
155
380260
3000
मला याचा चांगलाच अनुभव आहे, कारण मी शाळेत असताना
06:23
a military takeover happened in my country,
156
383260
3000
माझ्या देशात सैन्यानं सत्ता बळकावली,
06:26
a gunman of my nationality nearly killed the Pope,
157
386260
3000
माझ्या एका देशबांधवानं पोपवर प्राणघातक हल्ला केला,
06:29
and Turkey got zero points in [the] Eurovision Song Contest.
158
389260
3000
आणि तुर्कस्थानला गाण्याच्या युरोव्हिजन स्पर्धेत भोपळा मिळाला.
06:32
(Laughter)
159
392260
2000
(हशा)
06:34
I skipped school often and dreamed of becoming a sailor
160
394260
2000
त्या दिवसांत मी शाळा चुकवायचे बर्‍याचदा आणि स्वप्नं बघायचे,
06:36
during those days.
161
396260
2000
खलाशी व्हायची.
06:38
I also had my first taste
162
398260
2000
मला सांस्कृतिक पूर्वग्रहांची ओळखसुध्दा
06:40
of cultural stereotypes there.
163
400260
2000
पहिल्यांदा तिथेच झाली.
06:42
The other children asked me about the movie
164
402260
2000
बाकीची मुलं मला "मिडनाईट एक्स्प्रेस" चित्रपटाबद्दल विचारायची,
06:44
"Midnight Express," which I had not seen;
165
404260
2000
जो मी पाहिलेलाच नव्हता.
06:46
they inquired how many cigarettes a day I smoked,
166
406260
3000
मी किती सिगारेट ओढते याची ते चौकशी करायचे
06:49
because they thought all Turks were heavy smokers,
167
409260
3000
कारण सगळे तुर्की लोक प्रचंड धूम्रपान करतात असंच त्यांना वाटायचं
06:52
and they wondered at what age
168
412260
2000
आणि माझे केस मी केंव्हापासून झाकायला सुरवात करेन
06:54
I would start covering my hair.
169
414260
2000
या बाबत त्यांचे तर्कवितर्क चालायचे.
06:56
I came to learn that these were
170
416260
2000
मला माझ्या देशाबद्दल असलेले
06:58
the three main stereotypes about my country:
171
418260
2000
हे तीन मोठे पूर्वग्रह हळूहळू उमगत गेले:
07:00
politics, cigarettes
172
420260
2000
राजकारण, सिगारेट
07:02
and the veil.
173
422260
2000
आणि बुरखा.
07:04
After Spain, we went to Jordan, Germany
174
424260
2000
स्पेननंतर आम्ही गेलो जॉर्डनला, जर्मनीला
07:06
and Ankara again.
175
426260
2000
आणि पुन्हा अंकाराला.
07:08
Everywhere I went, I felt like
176
428260
2000
प्रत्येक ठिकाणी मी गेले तेव्हा मला जाणवलं की
07:10
my imagination was the only suitcase
177
430260
2000
असं कुठंही जाताना फक्त माझ्या कल्पनाशक्तीचं गाठोडंच
07:12
I could take with me.
178
432260
2000
मी बरोबर नेऊ शकते.
07:14
Stories gave me a sense of center,
179
434260
2000
कथांनीच माझ्या विचारांना स्थिर संदर्भ पुरवले,
07:16
continuity and coherence,
180
436260
2000
सातत्य दिले आणि सुसंघटितपणा आणला,
07:18
the three big Cs that I otherwise lacked.
181
438260
3000
नाहीतर हे तीन 'स'कार मला नसते मिळाले.
07:21
In my mid-twenties, I moved to Istanbul,
182
441260
2000
मी साधारण विशीच्या मध्यात होते जेंव्हा मी इस्तंबूलला गेले,
07:23
the city I adore.
183
443260
2000
माझ्या लाडक्या शहरात.
07:25
I lived in a very vibrant, diverse neighborhood
184
445260
3000
मी रहायचे तो भाग अगदी सळसळता, रंगीबेरंगी होता.
07:28
where I wrote several of my novels.
185
448260
2000
तिथं मी माझ्या बर्‍याचशा कादंबर्‍या लिहिल्या.
07:30
I was in Istanbul when the earthquake hit
186
450260
2000
१९९९ मधल्या भूकंपात मी
07:32
in 1999.
187
452260
2000
इस्तंबूलमध्येच होते.
07:34
When I ran out of the building at three in the morning,
188
454260
3000
रात्रीच्या ३ वाजता मी इमारतीमधून पळत बाहेर आले
07:37
I saw something that stopped me in my tracks.
189
457260
3000
आणि दिसलेल्या एका दृष्याने तिथेच थबकले.
07:40
There was the local grocer there --
190
460260
2000
तिथे एक गावातला खडूस म्हातारा दुकानदार होता -
07:42
a grumpy, old man who didn't sell alcohol
191
462260
2000
हा दारू विकायचा नाही
07:44
and didn't speak to marginals.
192
464260
2000
आणि धड कुठल्याच नसलेल्या उपर्‍यांशी बोलायचाही नाही.
07:46
He was sitting next to a transvestite
193
466260
3000
तो एका तृतीयपंथी "बाई" शेजारी बसला होता
07:49
with a long black wig
194
469260
2000
तिने एक लांब काळा केसांचा टोप घातला होता
07:51
and mascara running down her cheeks.
195
471260
2000
आणि तिच्या गालांवरून मस्कारा ओघळत होता.
07:53
I watched the man open a pack of cigarettes
196
473260
2000
मी पाहिलं की त्या माणसानं सिगारेटचं पाकीट उघडून
07:55
with trembling hands
197
475260
2000
थरथरत्या हाताने सिगारेट काढली
07:57
and offer one to her,
198
477260
2000
आणि त्या व्यक्तीला दिली.
07:59
and that is the image of the night of the earthquake
199
479260
2000
आणि माझ्या मनात आजही
08:01
in my mind today --
200
481260
2000
भूकंपाच्या रात्रीचं तेच चित्र आहे --
08:03
a conservative grocer and a crying transvestite
201
483260
3000
रस्त्याच्या बाजूला एकत्र सिगारेटी ओढत बसलेले दोघं,
08:06
smoking together on the sidewalk.
202
486260
2000
एक जुन्या वळणाचा दुकानदार आणि एक रडणारी तृतीयपंथी.
08:08
In the face of death and destruction,
203
488260
3000
मृत्यूच्या आणि विनाशाच्या सावटाखाली असताना
08:11
our mundane differences evaporated,
204
491260
2000
काही तासांसाठी का होईना पण आपले क्षुल्लक मतभेद विरून जातात
08:13
and we all became one
205
493260
2000
आणि आपण
08:15
even if for a few hours.
206
495260
2000
एकत्र येतो.
08:17
But I've always believed that stories, too, have a similar effect on us.
207
497260
3000
पण माझी अशी श्रद्धा आहे की कथांचाही असाच परिणाम होतो.
08:20
I'm not saying that fiction has the magnitude of an earthquake,
208
500260
3000
मी असं नाही म्हणत की साहित्य भूकंपाच्या तोडीचा परिणाम घडवतं.
08:23
but when we are reading a good novel,
209
503260
2000
पण जेंव्हा एखादी चांगली कादंबरी वाचत असताना
08:25
we leave our small, cozy apartments behind,
210
505260
3000
आपण आपलं छोटंसं, सुखासीन आयुष्य मागे टाकून
08:28
go out into the night alone
211
508260
2000
एकटेच रात्री बाहेर पडतो
08:30
and start getting to know people we had never met before
212
510260
3000
तेंव्हा ज्या लोकांना आपण कधीही भेटलेले नसतो
08:33
and perhaps had even been biased against.
213
513260
3000
किंवा कदाचित ज्यांच्याबद्द्ल पूर्वग्रह आहे अशा लोकांना भेटत जातो.
08:36
Shortly after, I went
214
516260
2000
त्यानंतर थोड्या दिवसांनी,
08:38
to a women's college in Boston, then Michigan.
215
518260
3000
मी आधी बॉस्टन आणि नंतर मिशिगनमधल्या मुलींच्या महाविद्यालयात जाऊ लागले.
08:41
I experienced this, not so much as a geographical shift,
216
521260
3000
हा बदल मला भौगोलिक बदल असा म्हणून फारसा न जाणवता
08:44
as a linguistic one.
217
524260
2000
भाषिक बदल म्हणून जाणवला.
08:46
I started writing fiction in English.
218
526260
2000
मी इंग्रजीमध्ये लिहायला सुरवात केली.
08:48
I'm not an immigrant, refugee or exile --
219
528260
2000
मी स्थलांतरित, निर्वासित नव्हते किंवा देशोधडीलाही लागलेले नव्हते.
08:50
they ask me why I do this --
220
530260
2000
मला विचारलं जायचं की मग मी असं का म्हणून करतेय.
08:52
but the commute between languages
221
532260
2000
पण माझ्यासाठी, ही भाषांमधली भटकंती
08:54
gives me the chance to recreate myself.
222
534260
3000
म्हणजे स्वतःला परत घडवायची संधी असते.
08:57
I love writing in Turkish,
223
537260
2000
मला लिहायला आवडतं
08:59
which to me is very poetic and very emotional,
224
539260
3000
ते अतिशय काव्यात्म आणि भावनिक असणार्‍या तुर्कीमधून.
09:02
and I love writing in English, which to me
225
542260
2000
आणि अतिशय गणिती
09:04
is very mathematical and cerebral.
226
544260
2000
व बौध्दिक असणार्‍या इंग्लिशमधूनही.
09:06
So I feel connected to each language in a different way.
227
546260
3000
प्रत्येक भाषेशी माझी नाळ वेगळ्या प्रकारे जोडली गेलेली आहे.
09:09
For me, like millions of other people
228
549260
2000
जगातल्या लाखो लोकांप्रमाणे माझ्यासाठीही
09:11
around the world today,
229
551260
2000
इंग्लिश ही प्रयत्नपूर्वक
09:13
English is an acquired language.
230
553260
2000
आत्मसात केलेली भाषा आहे.
09:15
When you're a latecomer to a language,
231
555260
2000
जेव्हा तुम्ही एखादी भाषा उशीरा शिकायला सुरवात करता,
09:17
what happens is you live there
232
557260
3000
तेव्हा होतं काय की
09:20
with a continuous
233
560260
2000
तुम्ही कायम,
09:22
and perpetual frustration.
234
562260
2000
सतत एक खंत बाळगून असता.
09:24
As latecomers, we always want to say more, you know,
235
564260
2000
एखादी भाषा उशीरा शिकणार्‍या लोकांना कायमच काही अधिक सांगायचं असतं,
09:26
crack better jokes, say better things,
236
566260
3000
उत्तम विनोद, अधिक चांगल्या गोष्टी.
09:29
but we end up saying less
237
569260
2000
पण आपण सरतेशेवटी कमीच बोलतो
09:31
because there's a gap between the mind and the tongue.
238
571260
2000
कारण मन आणि वाचा यात सततच एक अंतर पडलेलं असतं.
09:33
And that gap is very intimidating.
239
573260
3000
,आणि या अंतराची प्रचंड धास्ती वाटत राहते.
09:36
But if we manage not to be frightened by it,
240
576260
2000
पण जर, आपण त्याला जर जुमानायचंच नाही असं ठरवलं,
09:38
it's also stimulating.
241
578260
2000
तर तेच अंतर उमेद देतं.
09:40
And this is what I discovered in Boston --
242
580260
2000
आणि मला बॉस्टनमध्ये कळालं ते हेच --
09:42
that frustration was very stimulating.
243
582260
3000
ही निराशा, तगमग उमेद वाढवणारीच होती.
09:45
At this stage, my grandmother,
244
585260
1000
आता वेळ अशी आली, की माझ्या आजीने
09:46
who had been watching the course of my life
245
586260
2000
- माझ्या आयुष्याची तर्‍हा पाहून
09:48
with increasing anxiety,
246
588260
2000
तिचा जीव खालीवर होत चाललेला होता -
09:50
started to include in her daily prayers
247
590260
2000
रोज प्रार्थना करताना देवाला साकडं घालायला सुरूवात केली की
09:52
that I urgently get married
248
592260
2000
माझं ताबडतोब लग्न होऊन जाऊ दे,
09:54
so that I could settle down once and for all.
249
594260
3000
म्हणजे माझं बस्तान बसेल एकदाचं.
09:57
And because God loves her, I did get married.
250
597260
3000
आणि ती देवाची लाडकी असल्याने माझं लग्न झालंही.
10:00
(Laughter)
251
600260
2000
(हशा)
10:02
But instead of settling down,
252
602260
2000
पण बस्तान बसण्याऐवजी
10:04
I went to Arizona.
253
604260
2000
मी गेले अरीझोनाला.
10:06
And since my husband is in Istanbul,
254
606260
2000
आणि माझा नवरा इस्तंबूलमध्येच असल्यामुळे
10:08
I started commuting between Arizona and Istanbul --
255
608260
3000
माझ्या अरीझोना ते इस्तंबूल अशा फेर्‍या सुरू झाल्या.
10:11
the two places on the surface of earth
256
611260
2000
जगाच्या पाठीवरच्या
10:13
that couldn't be more different.
257
613260
2000
दोन टोकाच्या अशा या दोन जागा.
10:15
I guess one part of me has always been a nomad,
258
615260
3000
वाटतं की माझ्यातला एक अंश कायमचाच भटक्या राहिलेला आहे,
10:18
physically and spiritually.
259
618260
2000
शरीरानेही आणि मनानेही.
10:20
Stories accompany me,
260
620260
2000
कथा मला सोबत करतात,
10:22
keeping my pieces and memories together,
261
622260
2000
माझ्या अशा अंशांना आणि स्मृतींना एकत्र गुंफतात,
10:24
like an existential glue.
262
624260
2000
अस्तित्वाच्या विणीसारख्या.
10:26
Yet as much as I love stories,
263
626260
2000
जरी मला गोष्टी कितीही आवडत असल्या तरी,
10:28
recently, I've also begun to think
264
628260
3000
आताशा, मला असं वाटू लागलं आहे की
10:31
that they lose their magic
265
631260
2000
त्यांची जादू हरवून जाते जर
10:33
if and when a story is seen as more than a story.
266
633260
3000
एखाद्या गोष्टीकडे फक्त गोष्ट म्हणून न पाहता वेगळ्या नजरेने पाहिलं तर.
10:36
And this is a subject that I would love
267
636260
2000
आणि मला मनापासून आवडेल या विषयावर
10:38
to think about together.
268
638260
2000
एकत्र येऊन विचार करायला.
10:40
When my first novel written in English came out in America,
269
640260
3000
जेव्हा माझी पहिली इंग्रजी कादंबरी अमेरिकेत प्रकाशित झाली तेव्हा
10:43
I heard an interesting remark from a literary critic.
270
643260
3000
तेव्हा मला एका समीक्षकाकडून एक मार्मिक शेरा ऐकायला मिळाला.
10:46
"I liked your book," he said, "but I wish you had written it differently."
271
646260
3000
तो म्हणाला ''मला आवडलं तुझं पुस्तक पण वाटलं की तू ते खरं वेगळ्या पद्धतीनं लिहायला हवं होतंस."
10:49
(Laughter)
272
649260
4000
(हशा)
10:53
I asked him what he meant by that.
273
653260
2000
मी त्याला विचारलं की त्याला नक्की म्हणायचंय काय.
10:55
He said, "Well, look at it. There's so many
274
655260
2000
तो म्हणाला, ''बघ हं, त्यात अनेक
10:57
Spanish, American, Hispanic characters in it,
275
657260
2000
स्पॅनिश, अमेरिकी, दक्षिण अमेरिकी पात्रं आहेत.
10:59
but there's only one Turkish character and it's a man."
276
659260
3000
पण एकच पात्र तुर्की आहे आणि तोही एक पुरुष.''
11:02
Now the novel took place on a university campus in Boston,
277
662260
3000
आता कादंबरी घडते बोस्टनमधल्या एका विद्यापिठाच्या परिसरात,
11:05
so to me, it was normal
278
665260
2000
तेव्हा माझ्या मते साहजिकच
11:07
that there be more international characters in it
279
667260
2000
त्यात दुसर्‍या देशांची पात्रं जास्त असणार होती
11:09
than Turkish characters,
280
669260
2000
तुर्की पात्रांपेक्षा.
11:11
but I understood what my critic was looking for.
281
671260
2000
पण मला समजलं त्या समीक्षकाला काय अपेक्षित होतं ते.
11:13
And I also understood that I
282
673260
2000
आणि मला हेही जाणवलं की मी
11:15
would keep disappointing him.
283
675260
2000
त्याचा अपेक्षाभंग करत रहाणार आहे.
11:17
He wanted to see the manifestation of my identity.
284
677260
3000
त्याला माझ्या [तुर्की] अस्मितेचे प्रतिबिंब अपेक्षित होतं.
11:20
He was looking for a Turkish woman in the book
285
680260
3000
तो पुस्तकात एक तुर्की स्त्री शोधत होता
11:23
because I happened to be one.
286
683260
2000
कारण [लिहिणारी] मी [तुर्की स्त्रीच] होते.
11:25
We often talk about how stories change the world,
287
685260
3000
साहित्यामुळे जग कसं बदलतं याविषयी आपण कायम बोलतो.
11:28
but we should also see how the world of identity politics
288
688260
3000
पण आपण हे ही बघायला हवं की खुज्या अस्मितांच्या राजकारणांमुळे
11:31
affects the way stories
289
691260
2000
साहित्याच्या प्रसारावर,
11:33
are being circulated,
290
693260
2000
वाचनावर आणि समीक्षेवर
11:35
read and reviewed.
291
695260
2000
कायकाय परिणाम होतो.
11:37
Many authors feel this pressure,
292
697260
2000
खूप लेखकांना याचं दडपण येतं,
11:39
but non-Western authors feel it more heavily.
293
699260
3000
पण पाश्चात्येतर लेखकांना ते जास्त करून जाणवतं.
11:42
If you're a woman writer from the Muslim world, like me,
294
702260
3000
आता जर तुम्ही मुस्लीम जगातून आलेल्या एक लेखिका असाल, माझ्यासारख्या,
11:45
then you are expected to write
295
705260
2000
तर अपेक्षा अशी असते की
11:47
the stories of Muslim women
296
707260
2000
तुम्ही मुस्लीम स्त्रियांबद्दलच लिहावं,
11:49
and, preferably, the unhappy stories
297
709260
2000
आणि त्यातही, दु:खी मुस्लीम
11:51
of unhappy Muslim women.
298
711260
2000
स्त्रियांच्या दर्दभर्‍या कहाण्या पाडाव्या.
11:53
You're expected to write
299
713260
2000
अपेक्षा अशी असते की
11:55
informative, poignant and characteristic stories
300
715260
3000
तुम्ही तपशीलवार, करूण आणि व्यवच्छेदक लिखाण करावं
11:58
and leave the experimental and avant-garde
301
718260
2000
आणि प्रायोगिक किंवा नव्या मुशी घडवणारं लिखाण
12:00
to your Western colleagues.
302
720260
2000
तुमच्या पाश्चात्य सहकार्‍यांवर सोडून द्यावं.
12:02
What I experienced as a child in that school in Madrid
303
722260
3000
लहान असताना जे काही मी अनुभवलं माद्रिदमधल्या शाळेत,
12:05
is happening in the literary world today.
304
725260
3000
तेच चाललंय साहित्यविश्वात आज.
12:08
Writers are not seen
305
728260
2000
लेखकांकडे
12:10
as creative individuals on their own,
306
730260
2000
स्वयंभू, सर्जनशील व्यक्ती म्हणून न पाहता
12:12
but as the representatives
307
732260
2000
त्यांच्याच संस्कृतीचे प्रतिनिधी
12:14
of their respective cultures:
308
734260
2000
म्हणून पाहिलं जातंय.
12:16
a few authors from China, a few from Turkey,
309
736260
3000
चीन मधले मूठभर लेखक, मूठभर तुर्कस्थानातले
12:19
a few from Nigeria.
310
739260
2000
आणि मूठभर नायजेरियामधले.
12:21
We're all thought to have something very distinctive,
311
741260
2000
अशी कल्पना असते की आम्हा सगळ्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असणार,
12:23
if not peculiar.
312
743260
2000
ते नसेल, तर काहीतरी वेगळं तरी.
12:25
The writer and commuter James Baldwin
313
745260
3000
लेखक आणि मुशाफिर जेम्स बाल्डविनने
12:28
gave an interview in 1984
314
748260
2000
१९८४ मध्ये एक मुलाखत दिलेली,
12:30
in which he was repeatedly asked about his homosexuality.
315
750260
3000
त्यात त्याला सतत त्याच्या समलैंगिकतेविषयीच विचारत होते.
12:33
When the interviewer tried to pigeonhole him
316
753260
2000
जेव्हा मुलाखत घेणारा त्याला एक समलिंगी लेखक अशा चौकटीत
12:35
as a gay writer,
317
755260
2000
कोंबायला धडपडू लागला
12:37
Baldwin stopped and said,
318
757260
2000
तेव्हा बाल्डविन थांबला आणि म्हणाला,
12:39
"But don't you see? There's nothing in me
319
759260
2000
''पण तुला दिसत नाहीये का?
12:41
that is not in everybody else,
320
761260
2000
माझ्यात जगावेगळं असं काहीच नाहीये
12:43
and nothing in everybody else
321
763260
2000
आणि बाकी लोकांच्यातही असं काहीच नाहीये जे
12:45
that is not in me."
322
765260
2000
माझ्यात नाही.''
12:47
When identity politics tries to put labels on us,
323
767260
3000
जेव्हा अस्मितांच्या राजकारणांमुळे आपल्यावर शिक्के उमटवले जातात,
12:50
it is our freedom of imagination that is in danger.
324
770260
3000
तेव्हा आपल्या कल्पनांचं स्वातंत्र्य धोक्यात येतं.
12:53
There's a fuzzy category called
325
773260
2000
बहुसांस्कृतिक साहित्य अशी काहीतरी
12:55
multicultural literature
326
775260
2000
धूसर वर्गवारी करून
12:57
in which all authors from outside the Western world
327
777260
2000
पाश्चात्य जगाबाहेरच्या सगळ्या लेखकांची
12:59
are lumped together.
328
779260
2000
एकत्र मोट त्यात बांधली जाते.
13:01
I never forget my first multicultural reading,
329
781260
2000
दहा वर्षापूर्वीचं हार्वर्ड स्क्वेअरमधलं माझं पहिलं बहुसांस्कृतिक अभिवाचन
13:03
in Harvard Square about 10 years ago.
330
783260
3000
मी कधीच विसरत नाही.
13:06
We were three writers, one from the Philippines,
331
786260
3000
तीन लेखक होतो आम्ही, एक फिलिपीन्सचा,
13:09
one Turkish and one Indonesian --
332
789260
2000
एक तुर्की आणि एक इंडोनेशियाचा --
13:11
like a joke, you know.
333
791260
2000
जसा काही विनोदच होता तो एक!
13:13
(Laughter)
334
793260
2000
(हशा)
13:15
And the reason why we were brought together
335
795260
2000
आम्हाला एकत्र आणायचं कारण हे नव्हतं की
13:17
was not because we shared an artistic style
336
797260
2000
आमची शैली किंवा
13:19
or a literary taste.
337
799260
2000
साहित्यिक जाणिवा सारख्या होत्या.
13:21
It was only because of our passports.
338
801260
2000
फक्त आम्ही परकीय होतो एवढंच कारण.
13:23
Multicultural writers are expected to tell real stories,
339
803260
3000
बहुसांस्कृतिक लेखकांनी म्हणे खर्‍याखुर्‍या गोष्टी सांगाव्यात,
13:26
not so much the imaginary.
340
806260
2000
काल्पनिक नकोत.
13:28
A function is attributed to fiction.
341
808260
3000
त्यांनी लिहिलेल्या साहित्यामागे एक हेतू असावाच.
13:31
In this way, not only the writers themselves,
342
811260
2000
अशा प्रकारे फक्त लेखकच नव्हे तर
13:33
but also their fictional characters
343
813260
3000
त्यांनी रेखाटलेली पात्रंसुध्दा
13:36
become the representatives of something larger.
344
816260
3000
कशाचीतरी प्रतीकं होऊन जातात.
13:39
But I must quickly add
345
819260
2000
पण मी हे लगेचच स्पष्ट केलेलं बरं की
13:41
that this tendency to see a story
346
821260
2000
ही जी गोष्टीकडे फक्त एक गोष्ट म्हणून न पाहता
13:43
as more than a story
347
823260
2000
वेगळ्या नजरेने बघायची जी वृत्ती आहे
13:45
does not solely come from the West.
348
825260
2000
ती काही फक्त पश्चिमेकडून आलेली नाही.
13:47
It comes from everywhere.
349
827260
2000
ती सगळीकडूनच येते.
13:49
And I experienced this firsthand
350
829260
2000
आणि माझा स्वानुभव आहे हा,
13:51
when I was put on trial in 2005
351
831260
3000
माझ्यावर खटला भरला गेला होता २००५ साली,
13:54
for the words my fictional characters uttered in a novel.
352
834260
3000
माझ्या कादंबरीतल्या कल्पित पात्रांच्या तोंडच्या शब्दांमुळे.
13:57
I had intended to write
353
837260
2000
एक सकारात्मक,
13:59
a constructive, multi-layered novel
354
839260
3000
बहुपदरी कादंबरी लिहायची होती मला
14:02
about an Armenian and a Turkish family
355
842260
2000
एका आर्मेनियन आणि एका तुर्की कुटुंबाबद्दल,
14:04
through the eyes of women.
356
844260
2000
स्त्रियांच्या नजरेतून.
14:06
My micro story became a macro issue
357
846260
3000
पण खटल्यादरम्यान माझ्या गोष्टीबाबत
14:09
when I was prosecuted.
358
849260
2000
पराचा कावळा करण्यात आला.
14:11
Some people criticized, others praised me
359
851260
2000
काहींनी नावं ठेवली,
14:13
for writing about the Turkish-Armenian conflict.
360
853260
3000
तुर्की-आर्मेनियन संघर्षाविषयी लिहिलं म्हणून, तर काहींनी कौतुकही केलं.
14:16
But there were times when I wanted to remind both sides
361
856260
3000
ण काही वेळा मला दोन्ही बाजूंना सांगावसं वाटायचं की
14:19
that this was fiction.
362
859260
2000
बाबांनो, हे साहित्य आहे.
14:21
It was just a story.
363
861260
2000
एक गोष्ट आहे ही निव्वळ.
14:23
And when I say, "just a story,"
364
863260
2000
आणि जेव्हा मी म्हणतेय की "निव्वळ एक गोष्ट"
14:25
I'm not trying to belittle my work.
365
865260
2000
तेव्हा मी माझ्या कामाला कमी लेखत नाहीये.
14:27
I want to love and celebrate fiction
366
867260
2000
माझं साहित्यावर प्रेम आहे, मला त्यातून आनंद मिळतो,
14:29
for what it is,
367
869260
2000
ते निखळ साहित्य म्हणून,
14:31
not as a means to an end.
368
871260
2000
ते कशाचंतरी साधन आहे म्हणून नाही.
14:33
Writers are entitled to their political opinions,
369
873260
2000
लेखकांना त्यांची स्वत:ची राजकीय मतं मांडायचा हक्क आहेच,
14:35
and there are good political novels out there,
370
875260
3000
तशा चांगल्या राजकीय कादंबर्‍याही आहेत,
14:38
but the language of fiction
371
878260
2000
पण साहित्याची भाषा
14:40
is not the language of daily politics.
372
880260
2000
ही काही व्यवहारातल्या राजकारणाची भाषा नव्हे.
14:42
Chekhov said,
373
882260
2000
चेकॉव्ह म्हणाला होता,
14:44
"The solution to a problem
374
884260
2000
''एखाद्या समस्येचं उत्तर
14:46
and the correct way of posing the question
375
886260
2000
आणि प्रश्न मांडायची योग्य पध्दत
14:48
are two completely separate things.
376
888260
3000
या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत.
14:51
And only the latter is an artist's responsibility."
377
891260
3000
आणि यातली केवळ दुसरी बाब ही कलाकाराची जबाबदारी आहे.''
14:55
Identity politics divides us. Fiction connects.
378
895260
3000
अस्मितांच्या राजकारणांमुळे आपल्यात फूट पडते.साहित्य जोडणारं असतं.
14:58
One is interested in sweeping generalizations.
379
898260
3000
एकाला सरसकट मतं बनवायची हौस असते,
15:01
The other, in nuances.
380
901260
2000
तर दुसर्‍याला तरल फरकही भावतात.
15:03
One draws boundaries.
381
903260
2000
एक सीमा आखणारं.
15:05
The other recognizes no frontiers.
382
905260
2000
दुसरं असीम.
15:07
Identity politics is made of solid bricks.
383
907260
3000
अस्मितेचं राजकारण हे दगडविटांनी बनतं.
15:10
Fiction is flowing water.
384
910260
3000
साहित्य म्हणजे वाहतं पाणी.
15:13
In the Ottoman times, there were itinerant storytellers called "meddah."
385
913260
3000
ऑटोमन काळात भटके कथाकार असायचे 'मेद्दा' नावाचे.
15:16
They would go to coffee houses,
386
916260
2000
ते कॉफीगृहात जायचे,
15:18
where they would tell a story in front of an audience,
387
918260
2000
तिथे बघ्यांच्या समोर किस्सेकहाण्या ऐकवायचे,
15:20
often improvising.
388
920260
2000
बर्‍याचदा त्यात उत्स्फूर्तपणे बदलही करायचे.
15:22
With each new person in the story,
389
922260
2000
गोष्टीत एखादं नवीन पात्र आलं की
15:24
the meddah would change his voice,
390
924260
2000
मेद्दा वेगळा आवाज काढून
15:26
impersonating that character.
391
926260
2000
त्या व्यक्तिरेखेला जिवंत करीत.
15:28
Everybody could go and listen, you know --
392
928260
2000
कुणीही जाऊन ते ऐकू शकायचं -
15:30
ordinary people, even the sultan, Muslims and non-Muslims.
393
930260
3000
सामान्य जनता, अगदी सुलतान, मुस्लीम लोक आणि मुस्लीम नसलेलेही.
15:33
Stories cut across all boundaries,
394
933260
3000
कथा सगळ्या सीमा ओलांडतात.
15:36
like "The Tales of Nasreddin Hodja,"
395
936260
2000
"मुल्ला नसिरूद्दीनच्या गोष्टीं"सारख्या,
15:38
which were very popular throughout the Middle East,
396
938260
2000
त्या तर मध्य-पूर्वेत,
15:40
North Africa, the Balkans and Asia.
397
940260
3000
उत्तर आफ्रिकेत, बाल्कन प्रदेशात आणि आशियात प्रसिध्द होत्या.
15:43
Today, stories continue
398
943260
2000
आजही कथा
15:45
to transcend borders.
399
945260
2000
सीमांच्या पल्याड जातात.
15:47
When Palestinian and Israeli politicians talk,
400
947260
3000
जेव्हा पॅलेस्तिनी आणि इस्रायली नेते बोलतात,
15:50
they usually don't listen to each other,
401
950260
2000
तेव्हा ते बर्‍याच वेळा एकमेकांचे ऐकतच नाहीत.
15:52
but a Palestinian reader
402
952260
2000
पण एखादा पॅलेस्तिनी वाचक
15:54
still reads a novel by a Jewish author,
403
954260
2000
अजूनही एखाद्या ज्यू लेखकाचे पुस्तक वाचतो,
15:56
and vice versa, connecting and empathizing
404
956260
3000
त्याच्या भावना जाणून घेऊ शकतो, त्यांचे धागे जुळतात,
15:59
with the narrator.
405
959260
2000
तीच बाब एखाद्या ज्यूची देखील.
16:01
Literature has to take us beyond.
406
961260
2000
साहित्याने आपल्याला [भेदांच्या] पलीकडे न्यायला हवे.
16:03
If it cannot take us there,
407
963260
2000
जर तसे होत नसेल
16:05
it is not good literature.
408
965260
2000
तर ते चांगले साहित्य नव्हेच.
16:07
Books have saved the introverted,
409
967260
2000
एकेकाळच्या एका आत्मकेंद्री,
16:09
timid child that I was -- that I once was.
410
969260
3000
आणि भित्र्या मुलीला, मला, पुस्तकांनी वाचवलं आहे.
16:12
But I'm also aware of the danger
411
972260
2000
पण मला याची कल्पना आहे की
16:14
of fetishizing them.
412
974260
2000
त्यांच्या अती आहारी जाण्यातही धोका असतो.
16:16
When the poet and mystic, Rumi,
413
976260
2000
जेव्हा कवी आणि गूढवादी रूमी,
16:18
met his spiritual companion, Shams of Tabriz,
414
978260
3000
त्याच्या आध्यात्मिक गुरुतुल्य मित्राला, शम्स-ए-तब्रीज याला भेटला,
16:21
one of the first things the latter did
415
981260
2000
तेव्हा त्याने पहिल्यांदा काय केलं असेल
16:23
was to toss Rumi's books into water
416
983260
2000
तर रूमीची पुस्तकं पाण्यात फेकून दिली
16:25
and watch the letters dissolve.
417
985260
2000
आणि अक्षरं विरघळून जाताना पहात राहिला.
16:27
The Sufis say, "Knowledge that takes you not beyond yourself
418
987260
4000
सूफी म्हणतात, 'जे ज्ञान तुम्हाला तुमच्या 'स्व'च्या पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही
16:31
is far worse than ignorance."
419
991260
3000
ते अज्ञानापेक्षाही भयंकर आहे'.
16:34
The problem with today's cultural ghettos
420
994260
2000
आजकालच्या सांस्कृतिक कोंडवाड्यांमुळे
16:36
is not lack of knowledge --
421
996260
2000
उभा ठाकलेला प्रश्न अज्ञान हा नाही.
16:38
we know a lot about each other, or so we think --
422
998260
3000
आपल्याला एकमेकांबद्द्ल खूप काही माहीत असतं, निदान आपल्याला तसं वाटतं तरी.
16:41
but knowledge that takes us not beyond ourselves:
423
1001260
3000
पण जे ज्ञान आपल्याला आपल्यापलीकडे बघायला शिकवत नाही
16:44
it makes us elitist,
424
1004260
2000
ते आपल्याला तथाकथित उच्चभ्रू,
16:46
distant and disconnected.
425
1006260
2000
अलिप्त आणि बाकीच्यांपासून तोडत जातं.
16:48
There's a metaphor which I love:
426
1008260
2000
मला एक रूपक आवडतं:
16:50
living like a drawing compass.
427
1010260
2000
कंपासप्रमाणे जगणं.
16:52
As you know, one leg of the compass is static, rooted in a place.
428
1012260
3000
तुम्हाला माहीती आहे की कंपासचं एक टोक एका जागी स्थिर असतं.
16:55
Meanwhile, the other leg
429
1015260
2000
त्याचवेळी दुसरं टोक
16:57
draws a wide circle, constantly moving.
430
1017260
2000
सतत फिरत मोठं वर्तुळ रेखत जातं.
16:59
Like that, my fiction as well.
431
1019260
2000
माझ्या साहित्याचंही तसंच आहे.
17:01
One part of it is rooted in Istanbul,
432
1021260
2000
त्याचा एक भाग तुर्की मुळांनी
17:03
with strong Turkish roots,
433
1023260
3000
घट्ट इस्तंबूलमध्ये धरून ठेवला आहे.
17:06
but the other part travels the world,
434
1026260
2000
पण दुसरा भाग
17:08
connecting to different cultures.
435
1028260
2000
निरनिराळ्या संस्कृतीशी बंध जोडत जगभर प्रवास करतो.
17:10
In that sense, I like to think of my fiction
436
1030260
2000
त्या अर्थाने मला म्हणावसं वाटतं की माझं साहित्य
17:12
as both local and universal,
437
1032260
3000
हे प्रादेशिकही आहे आणि वैश्विकही आहे,
17:15
both from here and everywhere.
438
1035260
2000
इथलंही आहे आणि सगळीकडचंच आहे.
17:17
Now those of you who have been to Istanbul
439
1037260
2000
आता तुमच्यापैकी जे कुणी इस्तंबूलला आले असाल
17:19
have probably seen Topkapi Palace,
440
1039260
2000
त्यांनी टोपकऽपः महाल पाहिला असेल कदाचित,
17:21
which was the residence of Ottoman sultans
441
1041260
2000
तो ४०० हून अधिक वर्षे
17:23
for more than 400 years.
442
1043260
3000
ऑटोमन सुलतानांचे निवासस्थान होता.
17:26
In the palace, just outside the quarters
443
1046260
2000
महालात,
17:28
of the favorite concubines,
444
1048260
2000
नाटकशाळांच्या खणालगत,
17:30
there's an area called The Gathering Place of the Djinn.
445
1050260
3000
एक जागा आहे, त्या जागेला "जिनींची भेटायची जागा" म्हणतात.
17:33
It's between buildings.
446
1053260
2000
ती इमारतींच्या मधली जागा आहे.
17:35
I'm intrigued by this concept.
447
1055260
2000
या कल्पनेने मला भुरळ पाडली.
17:37
We usually distrust those areas
448
1057260
2000
शक्यतो आपण दोन वस्तूंमधल्या
17:39
that fall in between things.
449
1059260
2000
मोकळ्या अवकाशावर विश्वास ठेवायला जात नाही.
17:41
We see them as the domain
450
1061260
2000
आपल्याला अशा जागा
17:43
of supernatural creatures like the djinn,
451
1063260
2000
जिनींसारख्या अमानवी शक्तींच्या अंमलाखाली असल्यासारख्या भासतात,
17:45
who are made of smokeless fire
452
1065260
2000
तेच जिनी, ज्यांचे सर्वांग अग्नीमय आहे,
17:47
and are the symbol of elusiveness.
453
1067260
2000
जे मूर्तिमंत भ्रम आहेत.
17:49
But my point is perhaps
454
1069260
2000
पण माझा मुद्दा असा आहे की कदाचित
17:51
that elusive space
455
1071260
2000
ही अशी अनाकलनीय जागाच
17:53
is what writers and artists need most.
456
1073260
3000
लेखक आणि कलाकारांना हवीशी असते.
17:56
When I write fiction
457
1076260
2000
लिहिताना
17:58
I cherish elusiveness and changeability.
458
1078260
2000
ही अनाकलनीयता आणि बदलत जाण्याची शक्यता मला जपावीशी वाटते.
18:00
I like not knowing what will happen 10 pages later.
459
1080260
3000
मला आवडतं [लिहिताना] पुढच्या १० पानात काय होणार आहे, हे ही माहिती नसलेलं.
18:03
I like it when my characters surprise me.
460
1083260
2000
माझ्या पात्रांनी मलाच चकित केलेलं मला आवडतं.
18:05
I might write about
461
1085260
2000
मी एखाद्या मुस्लीम बाईबद्दल
18:07
a Muslim woman in one novel,
462
1087260
2000
लिहीनही एखाद्या कादंबरीत.
18:09
and perhaps it will be a very happy story,
463
1089260
2000
आणि कदाचित ती हलकीफुलकी, आनंदी कथा असेल.
18:11
and in my next book, I might write
464
1091260
2000
आणि माझ्या पुढच्या पुस्तकात मी कदाचित
18:13
about a handsome, gay professor in Norway.
465
1093260
3000
नॉर्वेमधल्या एखाद्या देखण्या, समलिंगी प्राध्यापकाविषयीही लिहीन.
18:16
As long as it comes from our hearts,
466
1096260
2000
जोपर्यंत लिखाण मनापासून येतं आहे,
18:18
we can write about anything and everything.
467
1098260
3000
तोपर्यंत आपण कशाहीबद्दल लिहू शकतो.
18:21
Audre Lorde once said,
468
1101260
2000
ऑड्रे लॉर्ड एकदा म्हणाली होती,
18:23
"The white fathers taught us to say,
469
1103260
3000
''आपल्याला श्वेतवर्णीय पूर्वसुरींनी असं म्हणायला शिकवलं की
18:26
'I think, therefore I am.'"
470
1106260
2000
'माझ्या विचारांमुळेच माझे अस्तित्व आहे'".
18:28
She suggested, "I feel, therefore I am free."
471
1108260
3000
तिनं सुचवलं,''माझ्या तरल जाणिवांमुळेच मी मुक्त आहे.'"
18:31
I think it was a wonderful paradigm shift.
472
1111260
3000
मला वाटतं हे विचारांतलं एक अद्भुतसं स्थित्यंतर आहे.
18:34
And yet, why is it that,
473
1114260
2000
आणि तरीही असं का की,
18:36
in creative writing courses today,
474
1116260
2000
सर्जनशील लेखनाच्या शि़क्षणात
18:38
the very first thing we teach students is
475
1118260
2000
आपण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा काय शिकवतो
18:40
"write what you know"?
476
1120260
2000
तर तुम्हाला जे माहीत आहे तेच लिहा. का बरं?
18:42
Perhaps that's not the right way to start at all.
477
1122260
3000
कदाचित हा मार्गच बरोबर नाही सुरुवात करण्याचा.
18:45
Imaginative literature is not necessarily about
478
1125260
3000
कल्पनारम्य साहित्य
18:48
writing who we are or what we know
479
1128260
3000
हे आपण कोण आहोत किंवा आपल्याला काय माहीत आहे
18:51
or what our identity is about.
480
1131260
3000
किंवा आपली ओळख काय आहे याबाबतच लिहावं असं नाही.
18:54
We should teach young people and ourselves
481
1134260
2000
आपण तरुणांना आणि आपल्यालाही शिकवायला हवं की
18:56
to expand our hearts
482
1136260
2000
खुल्या दिलानं
18:58
and write what we can feel.
483
1138260
2000
जे वाटतं ते लिहा.
19:00
We should get out of our cultural ghetto
484
1140260
2000
आपण आपल्या सांस्कृतिक रिंगणातून बाहेर पडलं पाहिजे,
19:02
and go visit the next one and the next.
485
1142260
3000
आणि बाकीच्या ठिकाणीही डोकावलं पाहिजे.
19:05
In the end, stories move like whirling dervishes,
486
1145260
3000
शेवटी कथा या भटकणार्‍या फकिरांसारख्या असतात,
19:08
drawing circles beyond circles.
487
1148260
3000
वर्तुळांमागून वर्तुळं काढत जाणार्‍या.
19:11
They connect all humanity,
488
1151260
2000
त्या सार्‍या माणुसकीला कवेत घेतात,
19:13
regardless of identity politics,
489
1153260
2000
अस्मितांच्या राजकारणांची पर्वा न करता.
19:15
and that is the good news.
490
1155260
2000
आणि ही किती चांगली गोष्ट आहे!
19:17
And I would like to finish with an old Sufi poem:
491
1157260
2000
आणि शेवट मला एका सूफी कविता सांगावीशी वाटते,
19:19
"Come, let us be friends for once;
492
1159260
3000
''या, सारे एकदातरी मित्र बनुया,
19:22
let us make life easy on us;
493
1162260
2000
जगणं सोपं करूया,
19:24
let us be lovers and loved ones;
494
1164260
2000
प्रेम देऊया, प्रेम घेऊया,
19:26
the earth shall be left to no one."
495
1166260
3000
मग जग सगळ्यांचेच होऊन जाईल"
19:29
Thank you.
496
1169260
2000
धन्यवाद.
19:31
(Applause)
497
1171260
7000
टाळ्या
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7