There's no shame in taking care of your mental health | Sangu Delle

383,259 views ・ 2017-05-26

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:12
Last year ...
0
12942
1691
मागचं वर्ष
00:14
was hell.
1
14657
1203
फारच वाईट गेलं.
00:15
(Laughter)
2
15884
1798
(हशा)
00:20
It was my first time eating Nigerian "jollof."
3
20391
3552
मी पहिल्यांदाच नायजेरियन जोलोफ भात खाल्ला.
00:23
(Laughter)
4
23967
1582
(हशा)
00:26
Actually, in all seriousness,
5
26436
2859
खरोखरीच सांगतो,
00:29
I was going through a lot of personal turmoil.
6
29319
2814
त्यावेळी मी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होतो.
00:33
Faced with enormous stress,
7
33055
2181
प्रचंड ताणाला तोंड देता देता
00:35
I suffered an anxiety attack.
8
35260
2023
मला चिंताविकाराचा झटका आला.
00:38
On some days, I could do no work.
9
38362
2690
काही दिवशी, मी कुठलंच काम करू शकत नसे.
00:42
On other days,
10
42156
1896
आणि इतर दिवशी,
00:44
I just wanted to lay in my bed and cry.
11
44076
3289
मला बिछान्यात पडून रडत राहावं असं वाटत असे.
00:48
My doctor asked if I'd like to speak with a mental health professional
12
48478
5249
ताण आणि चिंताविकार याबद्दल मनोविकार तज्ज्ञांशी बोलावं,
00:53
about my stress and anxiety.
13
53751
2103
असं माझ्या डॉक्टरांनी सुचवलं.
00:56
Mental health?
14
56589
1302
मनोविकार?
00:58
I clammed up and violently shook my head in protest.
15
58792
3890
माझी वाचाच बसली. मी जोरजोरात मान हलवून विरोध दर्शवला.
01:05
I felt a profound sense of a shame.
16
65065
3752
मला प्रचंड शरम वाटली.
01:10
I felt the weight of stigma.
17
70233
3438
या लांच्छनास्पद जाणिवेचं ओझं मला जाणवू लागलं.
01:14
I have a loving, supportive family
18
74959
2359
माझं कुटुंब प्रेमळ आहे. त्यांचा मला आधार वाटतो.
01:17
and incredibly loyal friends,
19
77342
2307
जीवाला जीव देणारे मित्र आहेत.
01:19
yet I could not entertain the idea of speaking to anyone
20
79673
4569
तरीही या वेदनेबद्दल कुणाशी बोलावं,
01:24
about my feeling of pain.
21
84266
2030
ही कल्पनाच मी सहन करू शकलो नाही.
01:27
I felt suffocated by the rigid architecture
22
87824
4467
आफ्रिकन मर्दानगीच्या कल्पनांच्या भक्कम तटबंदीमध्ये
01:32
of our African masculinity.
23
92315
2290
मी गुदमरून गेलो होतो.
01:35
"People have real problems, Sangu.
24
95585
2115
"लोकांपुढे खरोखरीचे प्रश्न असतात, संगू.
01:37
Get over yourself!"
25
97724
1455
तुझ्या नसत्या कल्पना आवर."
01:40
The first time I heard "mental health,"
26
100776
1981
"मानसिक आरोग्य" हे शब्द प्रथम ऐकले,
01:43
I was a boarding school student fresh off the boat from Ghana,
27
103700
3963
तेव्हा मी नुकताच घानाहून बोटीने येऊन, न्यू जर्सीतल्या पेडी स्कूलचा
01:47
at the Peddie School in New Jersey.
28
107687
1931
निवासी विद्यार्थी झालो होतो.
01:50
I had just gone through the brutal experience
29
110887
3406
त्याच महिन्यात मी सात जीवलग गमावण्याचा
01:54
of losing seven loved ones in the same month.
30
114317
2553
विदारक अनुभव घेतला होता.
01:58
The school nurse,
31
118389
1456
माझ्यावरच्या या आपत्तीमुळे
01:59
concerned about what I'd gone through -- God bless her soul --
32
119869
4064
शाळेच्या नर्सला माझी काळजी वाटली. देव तिचं भलं करो.
02:03
she inquired about my mental health.
33
123957
1950
तिने माझ्या मानसिक आरोग्याबद्दल विचारलं.
02:07
"Is she mental?" I thought.
34
127246
1983
मला वाटलं, "ही मेंटल आहे का?"
02:10
Does she not know I'm an African man?
35
130034
2444
मी एक आफ्रिकन पुरुष आहे, हे तिला ठाऊक नाही का?
02:12
(Laughter)
36
132502
1014
(हशा)
02:13
Like Okonkwo in "Things Fall Apart,"
37
133540
1871
"थिंग्ज फाॅल अपार्ट" मधल्या
02:15
we African men neither process nor express our emotions.
38
135435
4741
ओकोन्कोवोप्रमाणे, आम्ही आफ्रिकन पुरुष भावना व्यक्त न करता, प्रक्रिया न करता
02:20
We deal with our problems.
39
140791
1691
समस्या दडपून टाकतो.
02:22
(Applause)
40
142506
1543
(टाळ्या)
02:25
We deal with our problems.
41
145001
1999
आम्ही समस्या दडपून टाकतो.
02:27
I called my brother and laughed about "Oyibo" people -- white people --
42
147024
4771
मी माझ्या भावाला फोन केला आणि आम्ही हसलो - ओईबो (गोऱ्या) लोकांना,
02:31
and their strange diseases --
43
151819
1857
आणि त्यांच्या विचित्र आजारांना.
02:33
depression, ADD and those "weird things."
44
153700
3238
नैराश्य, ए डी डी यासारख्या चमत्कारिक गोष्टींना.
02:38
Growing up in West Africa,
45
158320
1991
लहानपणी, पश्चिम आफ्रिकेत असताना
02:40
when people used the term "mental," what came to mind was a madman
46
160335
4381
कोणी "मेंटल" शब्द वापरला, की एक वेडा आठवे.
02:44
with dirty, dread-locked hair,
47
164740
2243
मलिन केसांच्या जटा घेऊन
02:47
bumbling around half-naked on the streets.
48
167007
2776
अर्धनग्न अवस्थेत रस्तोरस्ती भटकणारा.
02:50
We all know this man.
49
170904
1820
आम्हां सगळ्यांना तो ठाऊक होता.
02:52
Our parents warned us about him.
50
172748
2281
पालक आम्हांला त्याच्यापासून सावध राहायला सांगत.
02:55
"Mommy, mommy, why is he mad?"
51
175640
1545
"आई, आई, तो वेडा कसा झाला?"
02:57
"Drugs!
52
177209
1212
"ड्रग्ज !"
02:58
If you even look at drugs, you end up like him."
53
178445
2389
"ड्रग्ज कडे नुसतं पाहिलंस ना, तरी असा वेडा होशील."
03:00
(Laughter)
54
180858
1189
(हशा)
03:02
Come down with pneumonia,
55
182800
2065
न्यूमोनिया झाला असता,
03:04
and your mother will rush you to the nearest hospital
56
184889
2532
तर आई लगेच सर्वात जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असती.
03:07
for medical treatment.
57
187445
1382
वैद्यकीय उपचारासाठी.
03:09
But dare to declare depression,
58
189910
2616
पण नैराश्य आलं आहे असं सांगण्याचं धाडस केलं असतं,
03:13
and your local pastor will be driving out demons
59
193278
3402
तर पाद्री भूतपिशाच्च उतरवायला आला असता, आणि चेटक्यांवर
03:16
and blaming witches in your village.
60
196704
1844
त्याचं खापर फोडलं असतं.
03:19
According to the World Health Organization,
61
199118
2900
जागतिक आरोग्य संस्थेनुसार, मानसिक आरोग्य म्हणजे
03:22
mental health is about being able to cope
62
202042
3058
आयुष्यात माफक ताण निर्माण करणाऱ्या
03:25
with the normal stressors of life;
63
205124
1699
घटकांना तोंड देता येणे,
03:27
to work productively and fruitfully;
64
207741
3443
काही उपयुक्त काम करता येणे
03:31
and to be able to make a contribution to your community.
65
211208
3627
आणि आपल्या समाजात हातभार लावता येणे.
03:35
Mental health includes our emotional, psychological and social well-being.
66
215321
6612
मानसिक आरोग्य याचा अर्थ आपले भावनिक, मानसशास्त्रीय आणि सामाजिक आरोग्य.
03:42
Globally, 75 percent of all mental illness cases
67
222676
4760
जगातील मानसिक आजारांपैकी ७५ टक्के केसेस
03:47
can be found in low-income countries.
68
227460
2634
गरीब देशांत आढळतात.
03:50
Yet most African governments
69
230118
1832
असं असूनही, आफ्रिकेतील अनेक राज्यकर्ते
03:51
invest less than one percent of their health care budget
70
231974
4207
त्यांच्या एकूण आरोग्यविषयक अंदाजपत्रकाच्या एक टक्क्याहूनही कमी रक्कम
03:56
in mental health.
71
236205
1276
मानसिक आरोग्यात गुंतवतात.
03:58
Even worse,
72
238501
1180
त्याहूनही वाईट म्हणजे,
03:59
we have a severe shortage of psychiatrists in Africa.
73
239705
4119
आफ्रिकेत मानसोपचार तज्ज्ञांची संख्या अतिशय कमी आहे.
04:04
Nigeria, for example, is estimated to have 200 --
74
244656
4283
उदाहरणार्थ, नायजेरियात केवळ २०० आहेत,
04:09
in a country of almost 200 million.
75
249632
3021
आणि देशाची लोकसंख्या आहे २०० दशलक्ष.
04:14
In all of Africa,
76
254242
1469
संपूर्ण आफ्रिकेत,
04:15
90 percent of our people lack access to treatment.
77
255735
3903
९०% लोकांना मानसोपचार सहज उपलब्ध नाहीत.
04:20
As a result,
78
260501
1753
त्यामुळे, आम्ही एकाकी अवस्थेत
04:22
we suffer in solitude,
79
262278
3004
केवळ सहन करीत राहतो.
04:25
silenced by stigma.
80
265306
2444
या कलंकामुळे मुके होतो.
04:29
We as Africans often respond to mental health with distance,
81
269318
4675
आम्ही आफ्रिकन लोक मानसिक समस्यांवर साधारणपणे हे उपाय वापरतो: दूर पळणे,
04:34
ignorance,
82
274664
1202
अज्ञान,
04:36
guilt,
83
276355
1178
अपराधीपणा,
04:37
fear
84
277954
1206
भीती
04:39
and anger.
85
279754
1286
आणि संताप.
04:42
In a study conducted by Arboleda-Flórez,
86
282129
4677
अरबोलेडा फ्लोरेज यांनी आपल्या संशोधनात थेट प्रश्न विचारला,
04:46
directly asking, "What is the cause of mental illness?"
87
286830
3658
"मानसिक आजाराचं कारण काय?"
04:51
34 percent of Nigerian respondents cited drug misuse;
88
291487
5284
३४ टक्के नायजेरियन प्रतिसादक म्हणाले, "ड्रग्जचा गैरवापर".
04:58
19 percent said divine wrath and the will of God --
89
298160
5184
१९ टक्के म्हणाले, "दैवी प्रकोप" आणि "परमेश्वराची इच्छा"
05:03
(Laughter)
90
303368
1305
(हशा)
05:05
12 percent,
91
305270
1458
१२ टक्के म्हणाले,
05:07
witchcraft and spiritual possession.
92
307950
2766
"चेटूक आणि भूतबाधा"
05:11
But few cited other known causes of mental illness,
93
311616
4560
पण काहींनी माहितीतल्या इतर कारणांचे दाखले दिले.
05:16
like genetics,
94
316200
1646
जसे, "अनुवंशिकता",
05:17
socioeconomic status,
95
317870
1936
"आर्थिक आणि सामाजिक स्तर",
05:19
war,
96
319830
1595
"युद्ध",
05:21
conflict
97
321449
1413
"प्रतिकूल परिस्थिती",
05:22
or the loss of a loved one.
98
322886
1515
"आप्ताचा मृत्यु".
05:25
The stigmatization against mental illness
99
325829
2887
मानसिक आजार लांच्छनास्पद मानले गेल्यामुळे
05:28
often results in the ostracizing and demonizing of sufferers.
100
328740
4466
मनोरुग्ण बहिष्कृत होतात, वाईट ठरवले जातात.
05:34
Photojournalist Robin Hammond has documented some of these abuses ...
101
334255
3996
पत्रकार रॉबिन हॅमंड यांनी अशा प्रकारच्या छळाच्या नोंदी केल्या आहेत.
05:38
in Uganda,
102
338275
1393
युगांडात,
05:40
in Somalia,
103
340665
1329
सोमालियात
05:43
and here in Nigeria.
104
343089
1829
आणि इथे नायजेरियात
05:47
For me,
105
347374
1342
मला स्वतःला
05:49
the stigma is personal.
106
349877
2319
या लांच्छनाचा अनुभव आला आहे.
05:53
In 2009,
107
353942
1629
२००९ मध्ये
05:56
I received a frantic call in the middle of the night.
108
356616
3106
एका मध्यरात्री मला अत्यंत भयाकूल स्वरात एक फोन आला.
06:01
My best friend in the world --
109
361179
2348
माझ्या अत्यंत जिवलग मित्राला
06:03
a brilliant, philosophical, charming, hip young man --
110
363551
5139
- एका बुद्धिमान, तत्वज्ञानी, आकर्षक, सुस्वरूप तरुण मुलाला -
06:08
was diagnosed with schizophrenia.
111
368714
2151
स्किझोफ्रेनिया झाला होता.
06:12
I witnessed some of the friends we'd grown up with recoil.
112
372424
4418
हे ऐकून लहानपणापासूनचे आमचे काही मित्र मागे सरलेले मी पाहिले.
06:19
I heard the snickers.
113
379136
1523
त्यांना आडून हसताना पाहिलं.
06:21
I heard the whispers.
114
381448
1592
त्यांची कुजबुज ऐकली.
06:24
"Did you hear he has gone mad?"
115
384006
2230
"त्याला वेड लागलंय. तुम्हाला ठाऊक आहे का?"
06:27
(Kru English) "He has gone crazy!"
116
387095
2530
"तो वेडा आहे!"
06:29
Derogatory, demeaning commentary about his condition --
117
389669
4320
त्याच्या अवस्थेबद्दल अपमानास्पद टीका टिप्पणी.
06:34
words we would never say about someone with cancer
118
394013
3977
कॅन्सर किंवा मलेरियाच्या रुग्णाबद्दल
06:38
or someone with malaria.
119
398014
1760
असे शब्द आपण कधीही बोलणार नाही.
06:40
Somehow, when it comes to mental illness,
120
400484
3679
का कोण जाणे, मानसिक आरोग्याचा संबंध आला, की आपलं अज्ञान,
06:44
our ignorance eviscerates all empathy.
121
404187
3050
आपली अनुकंपा नष्ट करून टाकतं.
06:48
I stood by his side as his community isolated him,
122
408539
4169
समाजाने त्याला एकटं टाकलं, तेव्हा मी त्याच्या पाठीशी उभा राहिलो.
06:53
but our love never wavered.
123
413980
2332
आमची मैत्री कधीच कमी झाली नाही.
06:57
Tacitly, I became passionate about mental health.
124
417668
3079
नकळत मला मानसिक आरोग्याबद्दल प्रचंड ओढ निर्माण झाली.
07:01
Inspired by his plight,
125
421694
2632
माझ्या मित्राच्या अवस्थेकडून प्रेरणा घेऊन,
07:04
I helped found the mental health special interest alumni group
126
424350
3323
मी मानसिक आरोग्याला वाहिलेला माजी विद्यार्थीगट
07:07
at my college.
127
427697
1655
कॉलेजमध्ये सुरु केला.
07:09
And during my tenure as a resident tutor in graduate school,
128
429376
3377
आणि पदव्युत्तर कॉलेजचा निवासी शिक्षक असण्याच्या काळात
07:12
I supported many undergraduates with their mental health challenges.
129
432777
3962
अनेक विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सावरण्यासाठी आधार दिला.
07:17
I saw African students struggle
130
437271
2515
आफ्रिकन विद्यार्थी मानसिक आजारांशी झगडताना मी पाहिले.
07:19
and unable to speak to anyone.
131
439810
1837
ते कोणाला काही सांगू शकत नव्हते.
07:22
Even with this knowledge and with their stories in tow,
132
442566
3996
हे ठाऊक असताना, आणि त्या विद्यार्थ्यांच्या कहाण्या ठाऊक असतानाही,
07:26
I, in turn, struggled,
133
446586
1986
माझी वेळ आली, तेव्हा मीही तसाच झगडलो.
07:28
and could not speak to anyone when I faced my own anxiety,
134
448596
4573
माझ्या चिंताविकाराविषयी कोणालाच काही सांगू शकलो नाही.
07:33
so deep is our fear of being the madman.
135
453193
3962
वेडा ठरण्याची भीती ही इतकी खोल रुजलेली असते.
07:39
All of us --
136
459735
1198
आपल्याला सर्वांनाच -
07:41
but we Africans especially --
137
461698
2187
आणि खासकरून आम्हां आफ्रिकन लोकांना -
07:44
need to realize that our mental struggles do not detract from our virility,
138
464775
5907
समजायला हवं, की मानसिक आजारांशी झगडण्यामुळे पौरुष कमी होत नाही.
07:50
nor does our trauma taint our strength.
139
470706
2891
किंवा वेदनेच्या आघातामुळे सामर्थ्याला कलंक लागत नाही.
07:54
We need to see mental health as important as physical health.
140
474756
4709
मानसिक आजाराला, शारीरिक आजाराइतकंच महत्त्व द्यायला हवं.
08:00
We need to stop suffering in silence.
141
480403
4403
मूकपणे त्रास सहन करणं थांबवायला हवं.
08:05
We must stop stigmatizing disease
142
485939
3458
मानसिक आजाराला कलंक समजणं थांबवलंच पाहिजे,
08:09
and traumatizing the afflicted.
143
489421
2206
आणि मनोरुग्णाचा छळ करणंही.
08:13
Talk to your friends.
144
493399
1459
आपल्या मित्रांशी बोला.
08:15
Talk to your loved ones.
145
495834
1576
आप्तांशी बोला.
08:18
Talk to health professionals.
146
498394
1765
आरोग्यसेवा देणाऱ्या व्यक्तींशी बोला.
08:21
Be vulnerable.
147
501437
1278
आधार घ्यायला लाजू नका.
08:23
Do so with the confidence
148
503615
1877
आपण एकटे नाही,
08:26
that you are not alone.
149
506335
2527
असा विश्वास बाळगा.
08:30
Speak up if you're struggling.
150
510011
2180
मानसिक आजाराशी झगडत असाल, तर कोणाशी तरी बोला.
08:34
Being honest about how we feel
151
514414
3527
आपल्या भावना बोलून दाखवण्यामुळे
08:37
does not make us weak;
152
517965
1659
आपलं दुबळेपण नव्हे,
08:40
it makes us human.
153
520629
1543
तर केवळ मनुष्यपण सिद्ध होतं.
08:43
It is time to end the stigma associated with mental illness.
154
523499
4546
मानसिक आजारांना लागलेला कलंक धुवून टाकण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
08:48
So the next time your hear "mental,"
155
528930
3411
यापुढे जेव्हा "मेंटल" शब्द ऐकाल,
08:53
do not just think of the madman.
156
533228
1995
तेव्हा कोण्या वेड्याची नव्हे,
08:56
Think of me.
157
536163
1209
तर माझी आठवण काढा.
08:57
(Applause)
158
537796
1924
(टाळ्या)
08:59
Thank you.
159
539744
1283
धन्यवाद.
09:01
(Applause)
160
541051
3992
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7