The beauty of being a misfit | Lidia Yuknavitch

520,567 views ・ 2016-06-15

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
So I know TED is about a lot of things that are big,
0
12841
3731
टेड हे मोठ्या गोष्टींसाठी आहे, हे मला ठाऊक आहे.
00:16
but I want to talk to you about something very small.
1
16596
3530
पण मी तुम्हाला एका अगदी छोट्या गोष्टीबद्दल सांगणार आहे.
00:20
So small, it's a single word.
2
20150
2158
इतकी छोटी, की तिच्यासाठी एकच शब्द पुरतो.
00:23
The word is "misfit."
3
23093
1556
तो शब्द आहे, वेगळी.
00:25
It's one of my favorite words, because it's so literal.
4
25347
3619
अगदी योग्य शब्द आहे.
00:29
I mean, it's a person who sort of missed fitting in.
5
29403
3946
म्हणजे, एखादी व्यक्ती, जी सर्वांसारखी होऊच शकत नाही.
00:33
Or a person who fits in badly.
6
33752
2296
किंवा, सर्वांच्यात वेगळी ठरते.
00:36
Or this: "a person who is poorly adapted
7
36658
2923
किंवा, अशी व्यक्ती, जी नव्या वातावरणाशी
00:39
to new situations and environments."
8
39605
2868
योग्य रीतीने जुळवून घेऊ शकत नाही.
00:43
I'm a card-carrying misfit.
9
43298
2222
माझ्यावर वेगळेपणाचा जणु शिक्काच आहे.
00:46
And I'm here for the other misfits in the room,
10
46307
2833
मी या सभागृहातल्या इतर वेगळ्यांसाठी इथे आले आहे.
00:49
because I'm never the only one.
11
49164
1811
कारण मी एकटीच वेगळी, असं कधीच होत नाही.
00:51
I'm going to tell you a misfit story.
12
51995
1885
मी वेगळेपणाची गोष्ट सांगणार आहे.
00:55
Somewhere in my early 30s,
13
55237
2532
मी तिशीत पाऊल टाकलं तेव्हा,
00:57
the dream of becoming a writer came right to my doorstep.
14
57793
3562
लेखिका होण्याचं स्वप्न माझ्या दारी चालत आलं.
01:02
Actually, it came to my mailbox
15
62198
1604
खरं तर, ते माझ्या टपालातून आलं.
01:03
in the form of a letter that said I'd won a giant literary prize
16
63826
3659
एका पत्राच्या रूपात. माझ्या एका लघुकथेला मोठं बक्षीस मिळाल्याचं
01:07
for a short story I had written.
17
67509
1925
त्यात लिहिलं होतं.
01:10
The short story was about my life as a competitive swimmer
18
70183
3761
ती लघुकथा माझ्याच आयुष्याबद्दल होती. माझ्या स्पर्धांतून पोहण्याबद्दल.
01:14
and about my crappy home life,
19
74632
2055
वाईट घरगुती आयुष्याबद्दल. आणि थोडीशी,
01:17
and a little bit about how grief and loss can make you insane.
20
77258
4897
दुःखामुळे आणि आपलं माणूस गमावल्यामुळे कशी वेड लागायची वेळ येऊ शकते, त्याबद्दल.
01:23
The prize was a trip to New York City to meet big-time editors and agents
21
83829
4673
मोठमोठे प्रकाशक, एजंट्स आणि लेखक यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कची सफर,
01:28
and other authors.
22
88526
1324
असं ते बक्षीस होतं.
01:30
So kind of it was the wannabe writer's dream, right?
23
90278
3064
म्हणजे होतकरू लेखिकेचं स्वप्नच, हो ना?
01:34
You know what I did the day the letter came to my house?
24
94573
2840
ते पत्र मिळाल्याच्या दिवशी मी काय केलं, ठाऊक आहे तुम्हाला?
01:38
Because I'm me,
25
98037
1798
मी अशी आहे ना,
01:39
I put the letter on my kitchen table,
26
99859
2197
ते पत्र मी स्वयंपाकघरातल्या टेबलावर ठेवलं
01:42
I poured myself a giant glass of vodka
27
102080
3442
स्वतःसाठी एक मोठा ग्लासभरून वोडका ओतली,
01:45
with ice and lime,
28
105922
2370
सोबत बर्फ आणि लिंबू,
01:48
and I sat there in my underwear for an entire day,
29
108722
4204
आणि दिवसभर नुसत्या अंतर्वस्त्रांत तिथेच बसले.
01:52
just staring at the letter.
30
112950
2082
त्या पत्राकडे बघत.
01:56
I was thinking about all the ways I'd already screwed my life up.
31
116608
3145
आजवर आयुष्यात मी किती प्रकारचे घोळ घातले आहेत, त्याचा विचार करीत.
01:59
Who the hell was I to go to New York City
32
119777
3174
न्यूयॉर्कमध्ये जाऊन, लेखिका असल्याची बतावणी करायला
02:02
and pretend to be a writer?
33
122975
1730
मी होते तरी कोण?
02:05
Who was I?
34
125681
1365
कोण होते मी?
02:07
I'll tell you.
35
127070
1198
तुम्हांला सांगते,
02:08
I was a misfit.
36
128745
1167
मी होते "वेगळी."
02:10
Like legions of other children,
37
130625
2363
कित्येक मुलांसारखी,
02:13
I came from an abusive household
38
133908
2368
कौटुंबिक अत्याचारापासून
02:16
that I narrowly escaped with my life.
39
136300
2656
कसाबसा जीव वाचवून निसटलेली.
02:19
I already had two epically failed marriages underneath my belt.
40
139727
4491
अगदी वाईट प्रकारे विस्कटलेली दोन लग्नें गाठीला होती.
02:24
I'd flunked out of college not once but twice
41
144242
2966
एकदाच नव्हे, तर दोनदा मला कॉलेजातून डच्चू मिळाला होता.
02:27
and maybe even a third time that I'm not going to tell you about.
42
147232
3192
मला वाटतं, तिसऱ्यांदा देखील, पण ते मी तुम्हाला सांगणार नाही.
02:30
(Laughter)
43
150448
1810
(हशा)
02:32
And I'd done an episode of rehab for drug use.
44
152582
3661
मी एकदा ड्रग्स सोडण्याचा प्रयत्नही केला होता.
02:36
And I'd had two lovely staycations in jail.
45
156795
4450
आणि दोनदा तुरुंगातही पाहुणचार झोडला होता.
02:42
So I'm on the right stage.
46
162228
1904
म्हणजे मी इथे आले ते बरोबरच आहे.
02:45
(Laughter)
47
165680
2090
(हशा)
02:48
But the real reason, I think, I was a misfit,
48
168744
3493
पण माझ्या वेगळेपणाचं खरं कारण हे,
02:52
is that my daughter died the day she was born,
49
172261
3262
की माझी मुलगी जन्मल्या दिवशीच मरण पावली होती,
02:55
and I hadn't figured out how to live with that story yet.
50
175547
3119
आणि हे दुःख घेऊन कसं जगायचं ते मला कळत नव्हतं.
03:00
After my daughter died I also spent a long time homeless,
51
180233
5127
तिच्या मृत्यूनंतर मी बराच काळ घरहीन अवस्थेत काढला.
03:05
living under an overpass
52
185384
1944
मी एका पुलाखाली राहत होते.
03:07
in a kind of profound state of zombie grief and loss
53
187352
4218
तीव्र दुःखामुळे आणि तिला गमावल्यामुळे भ्रमिष्ट झालेल्या अवस्थेत.
03:11
that some of us encounter along the way.
54
191594
2514
आयुष्यात काहींना या अवस्थेचा अनुभव येतो.
03:14
Maybe all of us, if you live long enough.
55
194132
2731
कदाचित पुष्कळ जगलात, तर तुम्हांलाही तो अनुभव येईल.
03:18
You know, homeless people are some of our most heroic misfits,
56
198240
3997
घरहीन लोक हे "वेगळ्या" लोकांमधले शूर लोक असतात.
03:22
because they start out as us.
57
202261
3096
कारण त्यांचं आयुष्य आपल्यासारखंच सुरु होतं.
03:26
So you see, I'd missed fitting in to just about every category out there:
58
206670
5418
मी कुठल्याच साच्यात बसत नव्हते.
03:32
daughter, wife, mother, scholar.
59
212112
4468
मुलगी, बायको, आई, विदुषी.
03:37
And the dream of being a writer
60
217474
2499
आणि माझं लेखिका होण्याचं स्वप्न म्हणजे
03:39
was really kind of like a small, sad stone in my throat.
61
219997
5441
जणु माझ्या घशाशी दाटलेला हुंदका होता.
03:46
It was pretty much in spite of myself that I got on that plane
62
226906
3469
इतकं असूनही मी विमानात बसले
03:50
and flew to New York City,
63
230399
2387
आणि न्यूयॉर्कला गेले.
03:52
where the writers are.
64
232810
1556
लेखकांच्या गावी.
03:55
Fellow misfits, I can almost see your heads glowing.
65
235168
3675
माझासारख्या "वेगळ्यांनो", तुमचे चेहरे उजळलेले दिसताहेत.
03:58
I can pick you out of a room.
66
238867
1912
मी कुठेही तुम्हाला ओळखेन.
04:00
At first, you would've loved it.
67
240803
2438
तसं सुरुवातीला ते आवडण्यासारखंच होतं.
04:03
You got to choose the three famous writers you wanted to meet,
68
243265
2952
कोणत्या तीन प्रसिद्ध लेखकांना भेटायचं, ते आपण ठरवायचं.
04:06
and these guys went and found them for you.
69
246241
2358
मग ते लोक जाऊन त्या लेखकांना शोधून आणीत.
04:08
You got set up at the Gramercy Park Hotel,
70
248623
2790
ग्रामरसी पार्क हॉटेल मध्ये राहायचं.
04:11
where you got to drink Scotch late in the night
71
251437
2634
रात्री उशिरा स्कॉच प्यायची.
04:14
with cool, smart, swank people.
72
254095
2491
तीही एकदम सही, स्मार्ट भपकेबाज लोकांबरोबर.
04:16
And you got to pretend you were cool and smart and swank, too.
73
256610
4509
आणि आपणही सही, स्मार्ट आणि भपकेबाज आहोत असं दाखवायचं.
04:21
And you got to meet a bunch of editors and authors and agents
74
261143
3188
तिथे पुष्कळ लेखक, संपादक आणि एजन्ट्स भेटत.
04:24
at very, very fancy lunches and dinners.
75
264355
4063
खूप म्हणजे खूपच भारी लंच आणि डिनर्स असत.
04:29
Ask me how fancy.
76
269377
1628
किती भारी ते विचारा.
04:31
Audience: How fancy?
77
271735
1961
प्रेक्षक : किती भारी?
04:34
Lidia Yuknavitch: I'm making a confession: I stole three linen napkins --
78
274077
4318
मी कबुली देते: मी तीन नॅपकिन्स चोरले.
04:38
(Laughter)
79
278419
1571
(हशा)
04:40
from three different restaurants.
80
280014
1657
तीन रेस्टोरंटस मधून.
04:42
And I shoved a menu down my pants.
81
282430
2266
आणि एक मेन्यू कार्ड पॅंटमधे लपवून आणलं.
04:44
(Laughter)
82
284720
2076
(हशा)
04:46
I just wanted some keepsakes so that when I got home,
83
286820
3706
मला आठवण म्हणून घरी न्यायला काहीतरी हवं होतं.
04:50
I could believe it had really happened to me.
84
290550
2285
हे खरंच घडलं यावर
04:53
You know?
85
293241
1229
विश्वास बसण्यासाठी.
04:55
The three writers I wanted to meet
86
295467
1664
मला कॅरोल मेसो, लिन टिलमन
04:57
were Carole Maso, Lynne Tillman and Peggy Phelan.
87
297155
2809
आणि पेगी फेलन या तीन लेखिकांना भेटायचं होतं
05:00
These were not famous, best-selling authors,
88
300496
3054
या सर्वाधिक खपाच्या, प्रसिद्ध लेखिका नव्हत्या.
05:03
but to me, they were women-writer titans.
89
303574
3307
पण माझ्या नजरेत त्या महान लेखिका होत्या.
05:07
Carole Maso wrote the book that later became my art bible.
90
307700
3562
कॅरोल मेसो ने लिहिलेलं पुस्तक माझ्या कलेसाठी बायबल ठरलं.
05:12
Lynne Tillman gave me permission to believe
91
312056
2501
लिन टिलमनने मला विश्वास दिला,
05:14
that there was a chance my stories could be part of the world.
92
314581
3481
की माझ्या गोष्टींना या जगात जागा मिळू शकेल.
05:18
And Peggy Phelan reminded me
93
318839
1954
पेगी फेलन ने आठवण करून दिली,
05:20
that maybe my brains could be more important than my boobs.
94
320817
5009
की माझ्या रूपापेक्षा माझा मेंदू जास्त महत्वाचा आहे.
05:27
They weren't mainstream women writers,
95
327500
2684
त्या लेखनाच्या मुख्य प्रवाहातल्या लेखिका नव्हत्या.
05:30
but they were cutting a path through the mainstream
96
330208
3777
पण आपल्या लिखाणाने त्या मुख्य प्रवाहात
05:34
with their body stories,
97
334009
1333
मार्ग काटत होत्या.
05:36
I like to think, kind of the way water cut the Grand Canyon.
98
336294
4135
नदीने मार्ग काटून ग्रँड कॅनियन निर्माण झाली, तशा.
05:41
It nearly killed me with joy
99
341371
1711
पन्नाशीपुढल्या त्या तीन लेखिकांच्या
05:43
to hang out with these three over-50-year-old women writers.
100
343106
3841
भेटीमुळे, अत्यानंदाने माझा प्राण जाईल असं वाटू लागलं.
05:46
And the reason it nearly killed me with joy
101
346971
2926
कारण,
05:49
is that I'd never known a joy like that.
102
349921
2069
यापूर्वी कधीच मला इतका आनंद वाटला नव्हता.
05:52
I'd never been in a room like that.
103
352014
1682
अशा ठिकाणी मी कधीच गेले नव्हते.
05:54
My mother never went to college.
104
354350
1758
माझी आई कधीच कॉलेजात गेली नव्हती.
05:56
And my creative career to that point
105
356747
2489
त्या वेळेपर्यंत माझी प्रतिभा म्हणजे
05:59
was a sort of small, sad, stillborn thing.
106
359260
4452
जणु मृतावस्थेत जन्मलेलं अर्भक होतं.
06:05
So kind of in those first nights in New York I wanted to die there.
107
365394
3279
तर न्यूयॉर्कमधल्या सुरुवातीच्या काही रात्रींत, मला मरावंसं वाटे.
06:08
I was just like, "Kill me now. I'm good. This is beautiful."
108
368697
3440
"हे किती सुंदर आहे. जगण्याचं सार्थक झालं. आता मी मरायला तयार आहे."
06:13
Some of you in the room will understand what happened next.
109
373187
3148
त्यानंतर जे घडलं, ते आपल्यापैकी काही समजू शकतील.
06:16
First, they took me to the offices of Farrar, Straus and Giroux.
110
376935
4295
त्यांनी मला फरार, स्ट्राउस आणि जरू यांच्या ऑफिसांत नेलं.
06:21
Farrar, Straus and Giroux was like my mega-dream press.
111
381863
3175
फरार, स्ट्राउस आणि जरू म्हणजे माझ्या कल्पनेतले भव्यदिव्य प्रकाशक.
06:25
I mean, T.S. Eliot and Flannery O'Connor were published there.
112
385062
3691
टी. एस. एलियट आणि फ्लॅनरी ओ'कॉनर यांचे प्रकाशक.
06:29
The main editor guy sat me down and talked to me for a long time,
113
389418
4375
त्यांच्या मुख्य संपादकांनी मला बसवून घेतलं आणि ते माझ्याशी बराच वेळ बोलले.
06:33
trying to convince me I had a book in me
114
393817
2318
माझ्या पोहण्याबद्दल मी एक पुस्तक लिहावं,
06:36
about my life as a swimmer.
115
396159
1705
म्हणजे आठवणींचा संग्रह,
06:38
You know, like a memoir.
116
398498
1287
असा आग्रह करीत होते.
06:40
The whole time he was talking to me,
117
400630
2236
ते जितका वेळ माझ्याशी बोलत होते,
06:42
I sat there smiling and nodding like a numb idiot,
118
402890
3705
तितका सगळं वेळ मी मूर्खासारखी हसत आणि मान डोलावत बसले होते.
06:47
with my arms crossed over my chest,
119
407509
1852
हाताची घडी घालून.
06:49
while nothing, nothing, nothing came out of my throat.
120
409385
4917
माझ्या तोंडून एकही शब्द निघाला नाही.
06:55
So in the end, he patted me on the shoulder
121
415875
3367
शेवटी त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं.
06:59
like a swim coach might.
122
419266
1581
पोहण्याच्या शिक्षकांसारखंच.
07:01
And he wished me luck
123
421580
1835
त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.
07:03
and he gave me some free books
124
423439
2438
आणि काही पुस्तकं विनामूल्य दिली.
07:05
and he showed me out the door.
125
425901
1791
ते मला दारापर्यंत सोडायला आले.
07:09
Next, they took me to the offices of W.W. Norton,
126
429588
3267
त्यानंतर त्या लोकांनी मला डब्ल्यू डब्ल्यू नॉर्टनच्या ऑफिसात नेलं.
07:12
where I was pretty sure I'd be escorted from the building
127
432879
2700
मला खात्री वाटत होती, की ते मला लगेच बाहेर नेऊन सोडतील.
07:15
just for wearing Doc Martens.
128
435603
1889
डॉक मार्टेन चे बूट घातले, म्हणून.
07:18
But that didn't happen.
129
438190
1449
पण तसं काही घडलं नाही.
07:20
Being at the Norton offices
130
440512
2429
नॉर्टनच्या ऑफिसात असं वाटलं, की
07:22
felt like reaching up into the night sky and touching the moon
131
442965
4472
मी रात्रीच्या अंधारात हात उंचावून आभाळातल्या चंद्राला स्पर्श करते आहे, आणि
07:27
while the stars stitched your name across the cosmos.
132
447461
3637
चांदण्या ब्रह्मांडावर माझं नाव कोरताहेत.
07:31
I mean, that's how big a deal it was to me.
133
451599
2145
ही गोष्ट मला अशी प्रचंड मोठी वाटत होती.
07:33
You get it?
134
453768
1181
कळलं ना?
07:35
Their lead editor, Carol Houck Smith,
135
455567
2498
त्यांच्या मुख्य संपादिका कॅरोल हूक स्मिथ,
07:38
leaned over right in my face with these beady, bright, fierce eyes
136
458089
4343
जरा वाकल्या, आणि आपले तेजस्वी डोळे माझ्यावर रोखून म्हणाल्या,
07:42
and said, "Well, send me something then, immediately!"
137
462456
3110
चल तर मग, ताबडतोब मला काहीतरी लिखाण पाठवून दे.
07:46
See, now most people, especially TED people,
138
466328
2292
इतकं झाल्यावर कोणीही, विशेषतः टेड मधले लोक,
07:48
would have run to the mailbox, right?
139
468644
2340
लगेच पोष्टात धावले असते ना?
07:51
It took me over a decade to even imagine
140
471651
3278
पण पाकिटात काहीतरी घालून त्याला स्टँम्प लावण्याची कल्पना करायलाच
07:54
putting something in an envelope and licking a stamp.
141
474953
3877
मला एका दशकाहून जास्त वेळ लागला.
08:00
On the last night,
142
480741
1574
शेवटच्या रात्री,
08:02
I gave a big reading at the National Poetry Club.
143
482339
3269
मी नॅशनल पोएट्री क्लब मध्ये मी एक मोठं साहित्यवाचन केलं.
08:06
And at the end of the reading,
144
486342
1947
ते संपताच
08:08
Katharine Kidde of Kidde, Hoyt & Picard Literary Agency,
145
488313
4303
किडी, हॉयट आणि पिकार्ड या साहित्य संस्थेच्या कॅथरीन किडी सरळ माझ्याजवळ आल्या
08:12
walked straight up to me and shook my hand
146
492640
2587
आणि त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं.
08:15
and offered me representation, like, on the spot.
147
495251
3178
लगेच तिथल्या तिथे त्यांनी माझं प्रतिनिधित्व करण्याची तयारी दाखविली.
08:20
I stood there and I kind of went deaf.
148
500558
2987
माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.
08:23
Has this ever happened to you?
149
503569
1586
तुम्हांला असा अनुभव आला आहे का?
08:25
And I almost started crying
150
505703
2112
मला वाटलं, आता मला रडू कोसळणार.
08:27
because all the people in the room were dressed so beautifully,
151
507839
3925
कारण, इतके सुरेख कपडे घातलेल्या लोकांच्या त्या खोलीत हे घडत होतं.
08:31
and all that came out of my mouth was:
152
511788
3153
मी फक्त इतकंच बोलू शकले:
08:34
"I don't know. I have to think about it."
153
514965
3110
"मी आत्ता काही सांगू शकत नाही. मला विचार करावा लागेल. "
08:38
And she said, "OK, then," and walked away.
154
518805
4292
त्या म्हणाल्या, "ठीक आहे." आणि निघून गेल्या.
08:44
All those open hands out to me, that small, sad stone in my throat ...
155
524884
6519
इतके हात मला मदत करायला पुढे आले होते. माझ्या घशातला तो हुंदका..
08:51
You see, I'm trying to tell you something about people like me.
156
531427
3938
मी तुम्हांला माझ्यासारख्या लोकांबद्दल काही सांगायचा प्रयत्न करते आहे.
08:55
Misfit people -- we don't always know how to hope or say yes
157
535389
4053
आम्हां वेगळ्यांना कधी कळतच नाही, कशाची आशा बाळगावी, कशाला होकार द्यावा.
08:59
or choose the big thing,
158
539466
1611
किंवा एखादी महत्त्वाची गोष्टही
09:01
even when it's right in front of us.
159
541101
2146
घेता येत नाही. अगदी डोळ्यासमोर असली तरी.
09:03
It's a shame we carry.
160
543271
1619
आम्ही शरमेचं ओझं वाहात असतो.
09:04
It's the shame of wanting something good.
161
544914
1991
आपल्याला चांगलं काही हवंसं वाटतं याची शरम.
09:06
It's the shame of feeling something good.
162
546929
1992
काही चांगली भावना जाणवते आहे, याची शरम.
09:08
It's the shame of not really believing we deserve to be in the room
163
548945
4382
आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या लोकांच्यात मिसळायचा आपल्याला हक्क आहे,
09:13
with the people we admire.
164
553351
2117
या अविश्वसनीय गोष्टीबद्दलची शरम.
09:16
If I could, I'd go back and I'd coach myself.
165
556472
2926
शक्य झालं असतं तर मी भूतकाळात जाऊन स्वतःला सुधारलं असतं.
09:19
I'd be exactly like those over-50-year-old women who helped me.
166
559422
4343
मग मी, मला मदत करणाऱ्या त्या पन्नाशीपुढल्या स्त्रियांसारखीच झाले असते.
09:23
I'd teach myself how to want things,
167
563789
1901
मी स्वतःला ध्येय ठेवायला शिकवलं असतं.
09:25
how to stand up, how to ask for them.
168
565714
2340
त्यासाठी उभं राहून, ते मिळवायला शिकवलं असतं.
09:28
I'd say, "You! Yeah, you! You belong in the room, too."
169
568078
4306
मी म्हणाले असते, "तू! हो तूच. तूही या खोलीतलीच एक आहेस."
09:32
The radiance falls on all of us,
170
572408
2272
ते दैवी तेज आपल्या सर्वाना लाभलं आहे.
09:34
and we are nothing without each other.
171
574704
2911
आणि एकमेकांशिवाय आपण कुणीच नाही आहोत.
09:39
Instead, I flew back to Oregon,
172
579041
3272
मी ओरेगॉनला परत आले.
09:42
and as I watched the evergreens and rain come back into view,
173
582337
5692
विमानातून झाडी आणि पाऊस पहात
09:48
I just drank many tiny bottles of airplane "feel sorry for yourself."
174
588053
4292
मी "स्वतःची कीव करणे" या पेयाच्या अनेक छोट्या बाटल्या ढोसल्या.
09:53
I thought about how, if I was a writer, I was some kind of misfit writer.
175
593491
4842
मी जर लेखिका असलेच, तर एक "वेगळी" लेखिका असेन, असं मला वाटत होतं.
09:59
What I'm saying is,
176
599244
1159
म्हणजे असं की,
10:00
I flew back to Oregon without a book deal,
177
600427
2004
मी ओरेगॉनला परत गेले लिखाणाच्या कराराशिवाय,
10:02
without an agent,
178
602455
1151
एजन्ट न नेमता.
10:03
and with only a headful and heart-ful of memories
179
603630
2485
मनात आणि डोक्यात आठवणी भरून घेऊन.
10:06
of having sat so near
180
606139
3148
इतक्या छान लेखिकांच्या
10:09
the beautiful writers.
181
609311
2270
इतकं जवळ जाता आल्याच्या आठवणी.
10:12
Memory was the only prize I allowed myself.
182
612278
3406
आठवणी हे एकच बक्षीस मी स्वतःला घेऊ दिलं.
10:17
And yet, at home in the dark,
183
617175
3129
तरीही, घरी परतल्यावर अंधारात
10:21
back in my underwear,
184
621272
1563
पुन्हा अंतर्वस्त्रांत बसल्यावर
10:23
I could still hear their voices.
185
623788
1730
मला त्यांचे आवाज ऐकू येऊ लागले.
10:26
They said, "Don't listen to anyone who tries to get you to shut up
186
626264
4041
त्या म्हणाल्या, "कुणाचं ऐकून तोंड बंद करू नकोस.
10:30
or change your story."
187
630329
1551
तुझी कहाणी सुद्धा बदलू नकोस.
10:32
They said, "Give voice to the story only you know how to tell."
188
632861
3679
तुझी कहाणी, जी फक्त तुलाच ठाऊक आहे, तिला व्यक्त होऊ दे.
10:36
They said, "Sometimes telling the story
189
636564
2430
काहीवेळा कहाणी सांगितल्यामुळे
10:39
is the thing that saves your life."
190
639018
3046
आपला प्राण वाचू शकतो."
10:43
Now I am, as you can see, the woman over 50.
191
643703
3690
आता पहा, मी पन्नाशीपुढची स्त्री आहे.
10:48
And I'm a writer.
192
648278
1175
आणि मी एक लेखिका आहे.
10:50
And I'm a mother.
193
650516
1227
आई आहे.
10:52
And I became a teacher.
194
652441
1537
शिक्षिका आहे.
10:54
Guess who my favorite students are.
195
654970
1881
माझे आवडते विद्यार्थी कोण असतील, ओळखा.
10:58
Although it didn't happen the day
196
658604
1628
ते पत्र आल्यादिवशी नसेल,
11:00
that dream letter came through my mailbox,
197
660256
2254
पण नंतर
11:02
I did write a memoir,
198
662534
1673
मी माझ्या आठवणी लिहिल्या.
11:04
called "The Chronology of Water."
199
664231
1833
"क्रोनॉलॉजी ऑफ वॉटर"
11:06
In it are the stories of how many times I've had to reinvent a self
200
666889
4699
किती वेळा मला चुकीच्या निर्णयांच्या अवशेषांतून पुन्हा स्वतःला घडवावं लागलं,
11:11
from the ruins of my choices,
201
671612
2404
त्याबद्दलच्या गोष्टी त्यात आहेत.
11:14
the stories of how my seeming failures were really just weird-ass portals
202
674575
5410
अपयश भासलं तरी त्यातून विचित्र प्रकारे सुंदर भविष्याची वाट सापडली,
11:20
to something beautiful.
203
680009
1522
अशा गोष्टीही.
11:22
All I had to do was give voice to the story.
204
682309
3452
मी फक्त त्या गोष्टी व्यक्त केल्या.
11:27
There's a myth in most cultures about following your dreams.
205
687552
4246
अनेक समाजांत, आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करा, असा समज असतो.
11:32
It's called the hero's journey.
206
692664
1721
हा यशस्वी लोकांचा समज.
11:35
But I prefer a different myth,
207
695679
1824
पण माझा जास्त विश्वास आहे,
11:37
that's slightly to the side of that
208
697527
1779
तो त्याशेजारीच किंवा
11:39
or underneath it.
209
699330
1157
त्याच्या मुळाशी असलेल्या
11:41
It's called the misfit's myth.
210
701089
1852
"वेगळ्यांच्या" समजावर.
11:43
And it goes like this:
211
703763
1265
तो समज असा:
11:45
even at the moment of your failure,
212
705623
2255
अपयशाच्या क्षणी देखील
11:47
right then, you are beautiful.
213
707902
2578
तुम्ही सुंदरच असता.
11:51
You don't know it yet,
214
711585
1152
त्या वेळी ठाऊक नसलं,
11:52
but you have the ability to reinvent yourself
215
712761
3177
तरी स्वतःला पुन्हा एकदा घडवणं शक्य असतं.
11:55
endlessly.
216
715962
1198
सतत.
11:57
That's your beauty.
217
717184
1594
हेच तुमचं सौंदर्य.
11:59
You can be a drunk,
218
719694
1516
तुम्ही दारुडे असाल,
12:01
you can be a survivor of abuse,
219
721234
2349
अत्याचारातून वाचलेले असाल,
12:03
you can be an ex-con,
220
723607
1436
एकेकाळचे ठग असाल,
12:05
you can be a homeless person,
221
725067
1498
घरहीन असाल,
12:06
you can lose all your money or your job or your husband
222
726589
3278
तुम्ही सगळे पैसे गमावले असतील, किंवा नोकरी, किंवा नवरा,
12:09
or your wife, or the worst thing of all,
223
729891
2414
किंवा बायको, किंवा,
12:12
a child.
224
732329
1150
सर्वात वाईट म्हणजे,
12:13
You can even lose your marbles.
225
733864
2053
तुमचं मूल.
12:15
You can be standing dead center in the middle of your failure
226
735941
4069
तुम्ही तुमच्या अपयशाच्या अगदी मध्यभागी उभे असाल,
12:20
and still, I'm only here to tell you,
227
740034
2878
आणि तरीही, मी तुम्हांला इतकंच सांगेन,
12:22
you are so beautiful.
228
742936
2113
की तुम्ही खूप सुंदर आहात.
12:25
Your story deserves to be heard,
229
745073
2299
तुमच्या कहाणीला व्यक्त होण्याचा हक्क आहे.
12:27
because you, you rare and phenomenal misfit,
230
747396
4273
कारण तुम्ही आहात, एक दुर्मिळ आणि जबरदस्त "वेगळा".
12:31
you new species,
231
751693
2256
एक नवीन प्रजाति.
12:34
are the only one in the room
232
754568
1969
तुमची कहाणी
12:36
who can tell the story
233
756561
1616
तुम्ही जशी सांगू शकता,
12:38
the way only you would.
234
758201
2408
तशी ती इतर कुणीही सांगू शकणार नाही.
12:41
And I'd be listening.
235
761710
1510
आणि मी ती ऐकेन.
12:44
Thank you.
236
764863
1176
धन्यवाद.
12:46
(Applause)
237
766063
11360
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7