3 lessons on success from an Arab businesswoman | Leila Hoteit

296,086 views ・ 2016-08-17

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
"Mom, who are these people?"
0
12880
1920
"आई, हे लोक कोण आहेत?"
00:15
It was an innocent question from my young daughter Alia
1
15480
2616
अलियाने, माझ्या मुलीने, निरागसपणे प्रश्न विचारला होता.
00:18
around the time when she was three.
2
18120
2136
ती तीन वर्षांची होती, तेव्हा.
00:20
We were walking along with my husband
3
20280
2096
आम्ही दोघी, माझ्या नवऱ्याबरोबर चाललो होतो.
00:22
in one of Abu Dhabi's big fancy malls.
4
22400
2776
अबू धाबीच्या मोठ्या, सुरेख मॉल्सपैकी एका मॉलमधून.
00:25
Alia was peering at a huge poster standing tall in the middle of the mall.
5
25200
4296
मॉलच्या मधोमध उभारलेल्या एका प्रचंड मोठ्या पोस्टरकडे अलिया निरखून पाहत होती.
00:29
It featured the three rulers of the United Arab Emirates.
6
29520
3360
त्यात संयुक्त अरब अमिरातींचे तीन राज्यकर्ते दाखवले होते.
00:33
As she tucked in my side,
7
33760
1456
ती माझ्या कुशीत शिरताच,
00:35
I bent down and explained that these were the rulers of the UAE
8
35240
3216
मी खाली वाकून तिला सांगितलं, ते तिघे अमिरातींचे राज्यकर्ते आहेत.
00:38
who had worked hard to develop their nation
9
38480
2256
त्यांनी खूप कष्ट केले आहेत. राष्ट्र उभारण्यासाठी
00:40
and preserve its unity.
10
40760
1240
आणि ऐक्य टिकवण्यासाठी.
00:43
She asked, "Mom, why is it that here where we live,
11
43040
3856
तिने विचारलं, आई, असं का ग? इथे आपल्या शहरात,
00:46
and back in Lebanon, where grandma and grandpa live,
12
46920
2656
आणि आजी आजोबांच्या लेबेनॉन मध्येदेखील,
00:49
we never see the pictures of powerful women on the walls?
13
49600
3136
भिंतीवर महत्त्वाच्या बायकांचे फोटो का दिसत नाहीत?
00:52
Is it because women are not important?"
14
52760
1880
बायकांना महत्त्व नसतं, म्हणून का?
00:56
This is probably the hardest question I've had to answer in my years as a parent
15
56040
3816
आईपद मिळाल्यानंतर मला विचारला गेलेला हा सगळ्यात कठीण प्रश्न होता.
00:59
and in my 16-plus years of professional life, for that matter.
16
59880
3440
खरं पाहिलं तर, माझ्या १६ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीतलाही.
01:04
I had grown up in my hometown in Lebanon,
17
64120
2976
माझं बालपण लेबेनॉनमधल्या एका गावात गेलं.
01:07
the younger of two daughters to a very hard-working pilot
18
67120
3456
मी दोन बहिणींतली धाकटी. आमचे वडील, एक मेहनती वैमानिक.
01:10
and director of operations for the Lebanese Airlines
19
70600
3616
ते लेबनीज एअरलाईन्सचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स होते.
01:14
and a super-supportive stay-at-home mom and grandma.
20
74240
2800
आमचा भक्कम आधार.होता माझी गृहिणी आई आणि आजी.
01:17
My father had encouraged my sister and I to pursue our education
21
77960
4096
माझ्या वडिलांनी आम्हा दोघी बहिणींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
01:22
even though our culture emphasized at the time
22
82080
3296
खरं तर, त्याकाळी आमच्या संस्कृतीत ठसवलं जायचं, की मुलींनी नव्हे, तर
01:25
that it was sons and not daughters who should be professionally motivated.
23
85400
4000
मुलांनी व्यावसायिक प्रेरणा बाळगावी. १८व्या वर्षी घर सोडून,
01:30
I was one of very few girls of my generation
24
90840
2176
शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या,
01:33
who left home at 18 to study abroad.
25
93040
2400
माझ्या पिढीतल्या फार थोड्या मुलींपैकी मी एक होते.
01:36
My father didn't have a son,
26
96480
1816
माझ्या वडिलांना मुलगा नव्हता, म्हणून
01:38
and so I, in a sense, became his.
27
98320
3000
एका अर्थाने मीच त्यांचा मुलगा झाले.
01:42
Fast-forward a couple of decades, and I hope I didn't do too badly
28
102880
3696
दोन दशकं पुढे जाऊन पाहिलं, तर मला वाटतं,
01:46
in making my father proud of his would-be son.
29
106600
2600
वडिलांना अभिमान वाटू देण्यात मी कमी पडले नाही.
01:50
As I got my Bachelor's and PhD in electrical engineering,
30
110680
3136
इलेक्ट्रिकल इंजिनियरींग मध्ये बॅचलर्स आणि पीएचडी मिळवताना,
01:53
did R and D in the UK, then consulting in the Middle East,
31
113840
2840
इंग्लंडमध्ये संशोधन आणि मध्यपूर्वेत कन्सल्टिंग करताना,
01:57
I have always been in male-dominated environments.
32
117360
2600
मी नेहमी पुरुषी वर्चस्वाच्या वातावरणात होते.
02:00
Truth be told, I have never found a role model I could truly identify with.
33
120720
4480
खरं सांगते, मला आदर्श वाटणारं असं कोणी सापडलंच नाही.
02:06
My mother's generation wasn't into professional leadership.
34
126240
2762
माझ्या आईच्या पिढीला व्यावसायिक नेतृत्व ठाऊक नव्हतं.
02:09
There were some encouraging men along the way,
35
129880
2176
कधीतरी कोणी प्रोत्साहन देणारे पुरुष भेटले
02:12
but none knew the demands and pressures I was facing,
36
132080
3160
पण मी किती ताण सहन करीत होते, हे त्यांपैकी कोणालाच ठाऊक नव्हतं.
02:16
pressures that got particularly acute when I had my own two beautiful children.
37
136000
4639
मला दोन मुलं झाली, तेव्हा हे ताण जास्तच वाढले.
02:21
And although Western women love to give us poor, oppressed Arab women advice,
38
141759
4561
पाश्चात्य महिलांना, आम्हा गरीब आणि पीडित अरब महिलांना उपदेश करायला फार आवडत असलं,
02:27
they live different lives with different constraints.
39
147160
2760
तरी त्यांचं आयुष्य वेगळं आहे, त्यांच्या कक्षा वेगळ्या आहेत.
02:31
So Arab women of my generation have had to become our own role models.
40
151120
4096
म्हणून, माझ्या पिढीतल्या अरब महिलांना, स्वतःच स्वतःचे आदर्श व्हावं लागलं.
02:35
We have had to juggle more than Arab men,
41
155240
2256
आम्हाला अरब पुरुषांहून जास्त कसरत करावी लागली.
02:37
and we have had to face more cultural rigidity than Western women.
42
157520
3360
आणि पाश्चात्य महिलांपेक्षा जास्त कडव्या संस्कृतीचा सामना करावा लागला.
02:41
As a result, I would like to think that we poor, oppressed women
43
161720
4096
त्यामुळेच, मला म्हणावंसं वाटतं, की खरं तर आम्ही गरीब, पीडित महिला
02:45
actually have some useful, certainly hard-earned lessons to share,
44
165840
3480
जे निःसंशय खूप कष्टाने शिकलो, ते उपयुक्त धडे इतरांना देऊ शकतो.
02:50
lessons that might turn out useful
45
170000
2016
आधुनिक जगात प्रगती करण्याची इच्छा असणाऱ्या
02:52
for anyone wishing to thrive in the modern world.
46
172040
2560
कोणालाही ते उपयुक्त ठरतील.
02:55
Here are three of mine.
47
175440
1296
माझे हे तीन मुद्दे :
02:56
["Convert their sh*t into your fuel."]
48
176760
1856
एक: त्यांच्या घाणीला आपलं इंधन बनवा.
02:58
(Laughter)
49
178640
1216
(हशा)
02:59
(Applause)
50
179880
1800
(टाळ्या)
03:06
There is this word that everybody is touting as the key to success:
51
186280
4376
हा एक शब्द यशाची गुरुकिल्ली म्हणून सर्वत्र चमकत असतो:
03:10
resilience.
52
190680
1240
लवचिकता.
03:12
Well, what exactly is resilience, and how do you develop it?
53
192520
3040
तर, लवचिकता म्हणजे काय? ती कशी वाढवायची?
03:16
I believe resilience is simply the ability to transform shit into fuel.
54
196640
5160
मला वाटतं, लवचिकता म्हणजे केवळ घाणीपासून इंधन बनवण्याची क्षमता.
03:23
In my previous job, well before my current firm,
55
203640
2816
माझ्या पूर्वीच्या नोकरीत, म्हणजे सध्याच्या फर्मच्या फार आधी,
03:26
I was working with a man we will call John.
56
206480
2120
मी एका माणसाबरोबर काम करत होते. समजा "जॉन".
03:29
I had teamed up with John and was working hard,
57
209400
2416
मी आणि जॉन एक टीम होतो. मी खूप मेहनत करीत होते.
03:31
hoping he would notice how great I was
58
211840
1976
मला आशा होती, की त्याला माझं महत्त्व कळेल
03:33
and that he would come to support my case to make partner at the firm.
59
213840
3320
आणि तो फर्ममध्ये भागीदार होण्याचा माझा प्रस्ताव उचलून धरेल.
03:38
I was, in addition to delivering on my consulting projects,
60
218040
3176
माझे कन्सल्टिंग प्रोजेक्ट्स पूर्ण करीत असतानाच
03:41
writing passionately on the topic of women economic empowerment.
61
221240
3160
मी महिलांच्या आर्थिक सबलीकरणाबद्दल आवेशाने लिहीत होते.
03:45
One day, I got to present my research to a roomful of MBA students.
62
225880
4040
एके दिवशी मला एमबीए च्या विद्यार्थ्यांसमोर माझं संशोधन सादर करण्याची संधी मिळाली.
03:50
John was part of the audience
63
230560
1576
प्रेक्षकांत जॉन होता.
03:52
listening for the first time to the details of my study.
64
232160
2640
माझ्या संशोधनाचे तपशील प्रथमच ऐकत होता.
03:56
As I proceeded with my presentation,
65
236000
2296
मी बोलत असताना,
03:58
I could see John in the corner of my eye.
66
238320
2200
नजरेच्या कडेला मला जॉन दिसत होता.
04:01
He had turned a dark shade of pink
67
241000
2536
तो लाल गुलाबी झाला होता
04:03
and had slid under his chair in apparent shame.
68
243560
2800
आणि जणु शरमेने खुर्चीखाली दडला होता.
04:07
I finished my presentation to an applauding audience
69
247840
2456
टाळ्यांच्या प्रतिसादात माझं भाषण संपलं,
04:10
and we rushed out and jumped into the car.
70
250320
2080
आणि आम्ही लगेच बाहेर पडून गाडीत शिरलो.
04:13
There he exploded.
71
253480
1880
गाडीत तो खवळला.
04:16
"What you did up there was unacceptable!
72
256040
2176
"तू तिथे जे केलंस ते मला पसंत नाही."
04:18
You are a consultant, not an activist!"
73
258240
2200
"तू एक कन्सल्टन्ट आहेस. समाजसुधारक नव्हेस!"
04:21
I said, "John, I don't understand.
74
261600
2456
मी म्हटलं, "जॉन, मला हे समजत नाही."
04:24
I presented a couple of gender parity indices,
75
264080
3656
मी फक्त स्त्रीपुरुषांतल्या साम्याबद्दल एक-दोन आकडेवाऱ्या मांडल्या.
04:27
and some conclusions about the Arab world.
76
267760
2055
आणि, अरब देशांबद्दल काही अनुमाने.
04:29
Yes, we do happen to be today at the bottom of the index,
77
269839
2976
होय, आज आपण या आकडेवारीच्या तळाला आहोत,
04:32
but what is it that I said or presented that was not factual?"
78
272839
3201
पण माझ्या बोलण्यात वस्तुस्थितीला सोडून काय होतं?
04:37
To which he replied, "The whole premise of your study is wrong.
79
277040
4056
यावर त्याने उत्तर दिलं, "तुझ्या अभ्यासाचा पायाच चुकीचा आहे.
04:41
What you are doing is dangerous and will break the social fabric of our society."
80
281120
3840
तू जे करीत आहेस ते धोकादायक आहे. त्यामुळे आपल्या समाजाची रचना कोलमडू शकते.
04:45
He paused, then added,
81
285720
2376
तो थोडं थांबून पुढे म्हणाला,
04:48
"When women have children, their place is in the home."
82
288120
3400
बायकांना मुलं झाली, की घर हेच त्यांचं स्थान.
04:53
Time stood still for a long while,
83
293360
2256
मला काळ थांबल्यासारखा वाटला.
04:55
and all I could think and repeat in the chaos of my brain was:
84
295640
3696
माझ्या चक्रावलेल्या डोक्यात एकच विचार परत परत येत होता:
04:59
"You can forget about that partnership, Leila.
85
299360
2176
"लैला, ती भागीदारी विसर आता.
05:01
It's just never going to happen."
86
301560
1572
ते कधीच घडणार नाही."
05:04
It took me a couple of days to fully absorb this incident and its implications,
87
304680
3896
ही घटना आणि तिचे परिणाम पूर्णपणे समजून घ्यायला मला दोन दिवस लागले.
05:08
but once I did, I reached three conclusions.
88
308600
2640
पण एकदा ते समजल्यावर, मी तीन निष्कर्ष काढले.
05:12
One, that these were his issues,
89
312160
2536
एक, या सर्व त्याच्या समस्या होत्या,
05:14
his complexes.
90
314720
1496
तो भयगंडाने ग्रासला होता .
05:16
There may be many like him in our society,
91
316240
2056
त्याच्यासारखे अनेक आपल्या समाजात असतील.
05:18
but I would never let their issues become mine.
92
318320
2200
पण त्यांचा त्रास मी कधीच करून घेणार नाही.
05:21
Two, that I needed another sponsor, and fast.
93
321400
2936
दोन, मला दुसरा प्रायोजक मिळवला पाहिजे, तोही तातडीने.
05:24
(Laughter)
94
324360
1216
(हशा)
05:25
I got one, by the way, and boy, was he great.
95
325600
2216
तसा एक मिळालाही, आणि तोही किती चांगला!
05:27
And three, that I would get to show John what women with children can do.
96
327840
4416
तीन, मुलं झाल्यानंतर बायका काय करू शकतात, हे मी जॉनला दाखवून देईन.
05:32
I apply this lesson equally well to my personal life.
97
332280
3416
हा धडा मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही वापरते.
05:35
As I have progressed in my career,
98
335720
1776
जसजशी मी व्यवसायात प्रगती करीत गेले,
05:37
I have received many words of encouragement,
99
337520
2456
तसं माझं खूप कौतुकही झालं.
05:40
but I have also often been met by women, men and couples
100
340000
4296
पण मला नेहमी असेही स्त्रिया, पुरुष आणि जोडपी भेटतात,
05:44
who have clearly had an issue with my husband and I
101
344320
2736
की ज्यांना, मी आणि माझ्या नवरा दोघांनीही
05:47
having chosen the path of a dual-career couple.
102
347080
2520
व्यवसाय करण्याचा मार्ग स्वीकारल्याचा त्रास होतो.
05:50
So you get this well-meaning couple
103
350600
2096
तर असं एखादं सद्हेतू बाळगणारं जोडपं,
05:52
who tells you straight out at a family gathering
104
352720
2256
नातेवाईक किंवा मित्र जमले असताना,
05:55
or at a friends gathering,
105
355000
1256
सरळच विचारतं,
05:56
that, come on, you must know you're not a great mom,
106
356280
2429
तुला कळतंय का, की तू आई म्हणून महान नाहीस.
05:58
given how much you're investing in your career, right?
107
358733
2560
कारण व्यवसायात तू इतकी गुंतली आहेस, हो ना?
06:02
I would lie if I said these words didn't hurt.
108
362720
2696
हे शब्द बोचत नाहीत असं म्हणणं खोटं ठरेल.
06:05
My children are the most precious thing to me,
109
365440
2456
माझी मुलं ही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेत.
06:07
and the thought that I could be failing them in any way is intolerable.
110
367920
3680
मी त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे कमी पडत असेन, हा विचारच असह्य आहे.
06:12
But just like I did with John,
111
372480
1536
पण जॉनच्या बाबतीत केलं तसंच,
06:14
I quickly reminded myself that these were their issues,
112
374040
3616
मी लगेच स्वतःला सांगितलं, की या त्यांच्या समस्या होत्या,
06:17
their complexes.
113
377680
1200
त्यांचे भयगंड होते.
06:19
So instead of replying,
114
379520
1296
मग त्यांना उत्तर देण्याऐवजी
06:20
I gave back one of my largest smiles
115
380840
2296
मी माझं एक मोठठं हास्य त्यांच्याकडे फेकलं.
06:23
as I saw, in flashing light,
116
383160
1856
मला माझ्या मनःचक्षुंसमोर
06:25
the following sign in my mind's eye.
117
385040
2136
एक मोठी झगमगणारी पाटी दिसली, "आनंदी रहा,
06:27
[Be happy, it drives people crazy.]
118
387200
2056
त्यामुळे लोकांवर वेड लागायची पाळी येते."
06:29
(Applause)
119
389280
2240
(टाळ्या)
06:34
You see, as a young woman in these situations, you have two options.
120
394760
3336
तर, या परिस्थितीत, एखाद्या तरुण स्त्रीसमोर दोन पर्याय असतात,
06:38
You can either decide to internalize these negative messages
121
398120
2856
एक, हे आपल्या दिशेने भिरकावले गेलेले
06:41
that are being thrown at you,
122
401000
1616
नकारार्थी संदेश मनात रुजू देणे,
06:42
to let them make you feel like a failure,
123
402640
1976
आपण हरलो असं समजू लागणे,
06:44
like success is way too hard to ever achieve,
124
404640
2576
आणि यश हे अशक्य कोटीतलं मानणे.
06:47
or you can choose to see that others' negativity is their own issue,
125
407240
3416
किंवा, इतरांची नकारात्मकता ही त्यांची समस्या मानणे
06:50
and instead transform it into your own personal fuel.
126
410680
3040
आणि तिचे रूपांतर आपल्या इंधनात करणे.
06:54
I have learned to always go for option two,
127
414880
3176
मी नेहमी दुसरा पर्याय स्वीकारायला शिकले आहे.
06:58
and I have found that it has taken me from strength to strength.
128
418080
3120
आणि त्यामुळे माझं सामर्थ्य वाढतच गेलं आहे.
07:01
And it's true what they say:
129
421800
1456
म्हणतात ना,
07:03
success is the best revenge.
130
423280
2160
यशस्वी होणं म्हणजेच सर्वात मोठा बदला घेणं.
07:06
Some women in the Middle East
131
426960
1416
मध्यपूर्वेतल्या काही
07:08
are lucky enough to be married to someone supportive of their career.
132
428400
3416
भाग्यवान बायकांना, त्यांच्या व्यवसायाला पाठिंबा देणारा पती मिळतो.
07:11
Correction: I should say "smart enough,"
133
431840
2456
दुरुस्ती: हुशार बायकांना, असं म्हणायला हवं. कारण,
07:14
because who you marry is your own choice,
134
434320
2376
कोणाशी लग्न करावं हा निर्णय तुमचा स्वतःचा असतो.
07:16
and you'd better marry someone supportive if you plan to have a long career.
135
436720
3600
आणि मोठा व्यवसाय करायचा बेत असेल, तर पाठिंबा देणारा पतीच निवडलेला बरा.
07:21
Still today, the Arab man is not an equal contributor in the home.
136
441240
4296
आजही, अरब पुरुष हा घरातलं काम बरोबरीने करीत नाही.
07:25
It's simply not expected by our society,
137
445560
2216
आमचा समाजच तशी अपेक्षा ठेवत नाही.
07:27
and even frowned upon as not very manly.
138
447800
2440
तसं करण्याला मर्दानीपणा समजत नाहीत.
07:31
As for the Arab woman, our society still assumes
139
451360
2696
अरब स्त्रीने मात्र, पतीचा आणि मुलांचा आनंद आणि प्रगती,
07:34
that her primary source of happiness should be the happiness and prosperity
140
454080
3736
यातच आपला आनंद मानला पाहिजे, असं आमचा समाज समजतो.
07:37
of her children and husband.
141
457840
1936
असं आमचा समाज समजतो.
07:39
She mostly exists for her family.
142
459800
2440
तिचं अस्तित्व केवळ आपल्या कुटुंबासाठीच असतं.
07:43
Things are changing, but it will take time.
143
463160
2576
परिस्थिती बदलते आहे, पण त्याला वेळ लागेल.
07:45
For now, it means that the professional Arab woman
144
465760
2496
पण सध्यातरी, व्यावसायिक अरब स्त्रीला
07:48
has to somehow maintain the perfect home,
145
468280
3336
घर आदर्श प्रकारे सांभाळावं लागतं
07:51
make sure that her children's every need is being taken care of
146
471640
3096
मुलांच्या गरजांकडे लक्ष द्यावं लागतं, आणि
07:54
and manage her demanding career.
147
474760
2000
व्यावसायिक जबाबदाऱ्याही झेलाव्या लागतात.
07:57
To achieve this, I have found the hard way
148
477760
3336
मी टक्केटोणपे खाऊन शिकले, की हे साध्य करण्यासाठी,
08:01
that you need to apply your hard-earned professional skills to your personal life.
149
481120
4776
कष्टाने कमावलेल्या व्यावसायिक कौशल्यांचा वापर वैयक्तिक आयुष्यात करायला हवा.
08:05
You need to work your life.
150
485920
1440
दोन: आयुष्य म्हणजे व्यवसायच.
08:08
Here is how I do this in my personal life.
151
488000
2240
मी स्वतः असं करते:
08:12
One thing to know about the Middle East
152
492998
1858
मध्यपूर्वेतली एक गोष्ट म्हणजे,
08:14
is that nearly every family has access to affordable domestic help.
153
494880
3440
जवळपास प्रत्येक कुटुंबाला परवडेल असे घरगुती मदतनीस मिळू शकतात.
08:19
The challenge therefore becomes how to recruit effectively.
154
499320
3000
योग्य मदतनीस कसा मिळवावा, हाच प्रश्न ठरतो.
08:23
Just like I would in my business life, I have based the selection
155
503160
3296
जसं मी माझ्या व्यवसायात करेन, तसंच घरातही,
08:26
of who would support me with my children while I'm at work
156
506480
3056
मुलं सांभाळायला सर्वात चांगलं कोण, हे ठरवताना, मी लक्षात घेतली
08:29
on a strong referral.
157
509560
1200
एक जोरदार शिफारस.
08:31
Cristina had worked for four years with my sister
158
511280
2936
क्रिस्टीनाने माझ्या बहिणीकडे चार वर्षं काम केलं होतं
08:34
and the quality of her work was well-established.
159
514240
2320
आणि तिचं काम किती चांगलं आहे, हे सिद्ध केलं होतं.
08:37
She is now an integral member of our family,
160
517880
2256
ती आता आमच्या कुटुंबापैकीच एक झाली आहे.
08:40
having been with us since Alia was six months old.
161
520160
2600
अलिया सहा महिन्यांची असल्यापासून.
08:43
She makes sure that the house is running smoothly while I'm at work,
162
523400
3495
मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये असते, तेव्हा ती घर व्यवस्थित सांभाळते.
08:46
and I make sure to empower her
163
526919
2216
आणि तिचं आणि मुलांचं सुरळित चालावं
08:49
in the most optimal conditions for her and my children,
164
529159
3177
म्हणून मी तिला अधिकार दिले आहेत.
08:52
just like I would my best talent at work.
165
532360
2199
ऑफिसमधल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना देते, तसेच.
08:55
This lesson applies whatever your childcare situation,
166
535559
3577
मुलांची काळजी कोणीही घेत असेल, तरी हे लागू पडतं.
08:59
whether an au pair, nursery,
167
539160
2416
पूर्णवेळ किंवा अर्धवेळ येणारी बाई, नर्सरी, किंवा
09:01
part-time nanny that you share with someone else.
168
541600
2336
दुसऱ्या कुटुंबातल्या मुलांबरोबर एकत्र सांभाळणारी.
09:03
Choose very carefully, and empower.
169
543960
2840
काळजीपूर्वक निवडा, आणि अधिकार द्या.
09:08
If you look at my calendar,
170
548040
1336
तुम्ही माझं कॅलेंडर पाहिलंत
09:09
you will see every working day
171
549400
1976
तर कामाच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी
09:11
one and a half hours from 7pm to 8:30pm UAE time
172
551400
3696
संध्याकाळी ७ ते ८:३० हा दीड तास
09:15
blocked and called "family time."
173
555120
1960
कौटुंबिक वेळ म्हणून राखीव ठेवलेला दिसेल.
09:17
This is sacred time.
174
557800
1536
पवित्र वेळ.
09:19
I have done this ever since Alia was a baby.
175
559360
2400
अलिया अगदी छोटं बाळ असल्यापासून मी हे करीत आले आहे.
09:23
I do everything in my power to protect this time
176
563040
2416
ही वेळ सांभाळण्यासाठी शक्य ते सगळं मी करते.
09:25
so that I can be home by then to spend quality time with my children,
177
565480
3416
म्हणजे मी त्या वेळेपर्यंत घरी येऊन मुलांबरोबर सुखाने वेळ घालवू शकते.
09:28
asking them about their day,
178
568920
1400
दिवस कसा गेला ते विचारते.
09:31
checking up on homework, reading them a bedtime story
179
571360
2896
त्यांचा गृहपाठ बघते, रात्री झोपण्याआधी गोष्ट सांगते.
09:34
and giving them lots of kisses and cuddles.
180
574280
2576
त्यांना मिठीत घेते आणि त्यांचे खूप खूप मुके घेते.
09:36
If I'm traveling, in whatever the time zone,
181
576880
2496
मी प्रवासात असेन, त्या ठिकाणी कोणतीही वेळ असो,
09:39
I use Skype to connect with my children even if I am miles away.
182
579400
3480
कितीही मैलांचं अंतर असो, मी स्काईप वापरून मुलांशी संवाद साधते.
09:44
Our son Burhan is five years old,
183
584200
2056
आमचा मुलगा बरहान पाच वर्षांचा आहे.
09:46
and he's learning to read and do basic maths.
184
586280
2560
तो लिहिणं आणि अंकगणित शिकतो आहे.
09:49
Here's another confession:
185
589920
1576
आता आणखी एक कबुली देते.
09:51
I have found that our daughter is actually more successful
186
591520
2736
मला असं आढळलं की, माझी मुलगी त्याला हे विषय
09:54
at teaching him these skills than I am.
187
594280
1896
माझ्यापेक्षा जास्त चांगले शिकवते.
09:56
(Laughter)
188
596200
1720
(हशा)
09:58
It started as a game, but Alia loves playing teacher to her little brother,
189
598800
4056
शाळा शाळा खेळताना अलिया धाकट्या भावाची टीचर बनली आणि तिला ते खूप आवडू लागलं.
10:02
and I have found that these sessions actually improve Burhan's literacy,
190
602880
5176
मग माझ्या लक्षात आलं, की या खेळामुळे त्याची अक्षरओळख वाढतेय,
10:08
increase Alia's sense of responsibility,
191
608080
2376
अलियाची जबाबदारीची जाणीव वाढतेय
10:10
and strengthen the bonding between them,
192
610480
1976
आणि दोघांतली जवळीक घट्ट होतेय.
10:12
a win-win all around.
193
612480
1280
म्हणजे चोहीकडून विजय.
10:15
The successful Arab women I know
194
615520
2216
माझ्या माहितीतल्या यशस्वी अरब महिलांपैकी
10:17
have each found their unique approach to working their life
195
617760
3136
प्रत्येकीने, घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये सिंहाचा वाटा उचलत असताना,
10:20
as they continue to shoulder
196
620920
1376
व्यावसायिक प्रगती साधण्याचा
10:22
the lion's share of responsibility in the home.
197
622320
2696
आपला स्वतःचा एक निराळा मार्ग शोधला आहे, याचा अर्थ,
10:25
But this is not just about surviving in your dual role
198
625040
2616
व्यावसायिक स्त्री आणि आई, या आयुष्यातल्या दोन्ही भूमिका
10:27
as a career woman and mother.
199
627680
1696
कशाबशा पार पाडणे, असा नव्हे.
10:29
This is also about being in the present.
200
629400
2520
याचा अर्थ, प्रत्येक क्षण सर्वस्वाने जगणे.
10:33
When I am with my children,
201
633000
1856
मी जेव्हा माझ्या मुलांबरोबर असते,
10:34
I try to leave work out of our lives.
202
634880
2416
तेव्हा मी काम बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते.
10:37
Instead of worrying about how many minutes I can spend with them every day,
203
637320
4016
रोज मला त्यांच्याबरोबर किती मिनिटं घालवता येतील, याची चिंता करण्याऐवजी
10:41
I focus on turning these minutes into memorable moments,
204
641360
3776
त्या मिनिटांच्या सुंदर आठवणी कशा बनतील, याकडे मी लक्ष देते.
10:45
moments where I'm seeing my kids,
205
645160
2216
मुलांना न्याहाळण्याचे, त्यांचे बोल ऐकण्याचे
10:47
hearing them, connecting with them.
206
647400
1816
आणि संवाद साधण्याचे क्षण.
10:49
["Join forces, don't compete."]
207
649240
1776
तीन: एकत्र या, स्पर्धा करू नका.
10:51
Arab women of my generation have not been very visible
208
651040
2776
माझ्या पिढीतल्या अरब स्त्रिया
10:53
in the public eye as they grew up.
209
653840
2096
सार्वजनिक जीवनात वावरताना दिसत नसत.
10:55
This explains, I think, to some extent,
210
655960
1896
यावरून थोडा अंदाज येईल, की
10:57
why you find so few women in politics in the Arab world.
211
657880
2680
अरब जगतात इतक्या कमी स्त्रिया राजकारणात का उतरतात.
11:01
The upside of this, however,
212
661320
1496
पण यातला फायदा असा, की
11:02
is that we have spent a lot of time
213
662840
2096
आपण पडद्यामागे राहून,
11:04
developing a social skill behind the scenes,
214
664960
2440
एक सामाजिक कौशल्य कमावण्यात वेळ खर्ची घातला आहे.
11:09
in coffee shops, in living rooms,
215
669040
1776
कॉफी शॉप्स मध्ये, दिवाणखान्यांत,
11:10
on the phone,
216
670840
1216
फोन वर.
11:12
a social skill that is very important to success:
217
672080
2776
यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे कौशल्य म्हणजे,
11:14
networking.
218
674880
1656
समाज जोडणे.
11:16
I would say the average Arab woman
219
676560
1656
कोणतीही साधारण अरब स्त्री
11:18
has a large network of friends and acquaintances.
220
678240
2536
पुष्कळ मैत्रिणी आणि ओळखीपाळखी जोडून असते.
11:20
The majority of those are also women.
221
680800
2000
त्या बहुतांशी स्त्रियाच असतात.
11:24
In the West, it seems like ambitious women often compare themselves to other women
222
684400
3976
पाश्चिमात्य जगात, महत्वाकांक्षी स्त्रिया सतत इतर स्त्रियांशी तुलना करीत असतात
11:28
hoping to be noticed as the most successful woman in the room.
223
688400
3160
आणि आपण सर्वात यशस्वी ठरावं अशी आशा बाळगून असतात.
11:32
This leads to the much-spoken-about competitive behavior
224
692360
2776
यातूनच, व्यावसायिक स्त्रियांची चढाओढ सुरु होते, ज्याबद्दल
11:35
between professional women.
225
695160
1320
नेहमी बोललं जातं.
11:37
If there's only room for one woman at the top,
226
697560
2176
यशाच्या शिखरावर जर एकाच स्त्रीपुरती जागा असेल
11:39
then you can't make room for others, much less lift them up.
227
699760
2840
तर ती दुसरीला देता येत नाही. तिला तिथवर चढवताही येत नाही.
11:43
Arab women, generally speaking,
228
703760
1496
साधारणपणे अरब स्त्रिया,
11:45
have not fallen for this psychological trap.
229
705280
2240
या मानसिक सापळ्यात अडकत नाहीत.
11:48
Faced with a patriarchal society,
230
708280
1936
पुरुषप्रधान संस्कृतीचा सामना करताना
11:50
they have found that by helping each other out,
231
710240
2336
त्या शिकल्या आहेत, की एकमेकींना सहाय्य करण्यात
11:52
all benefit.
232
712600
1240
सर्वांचं हित आहे.
11:55
In my previous job, I was the most senior woman in the Middle East,
233
715120
3176
माझ्या पूर्वीच्या नोकरीत, मध्यपूर्वेत मी सर्वात सीनियर स्त्री होते.
11:58
so one could think that investing in my network of female colleagues
234
718320
3856
त्यामुळे कुणालाही असं वाटलं असतं की सहकारी स्त्रियांशी नेटवर्क करण्याचा
12:02
couldn't bring many benefits
235
722200
1576
मला फायदा होणार नाही.
12:03
and that I should instead invest my time
236
723800
2256
त्याऐवजी पुरुष सहकारी आणि सिनियर्सशी
12:06
developing my relationships with male seniors and peers.
237
726080
2720
नेटवर्क वाढवण्यात मी वेळ गुंतवायला हवा.
12:09
Yet two of my biggest breaks came through the support of other women.
238
729760
3560
असं असूनही, स्त्रियांमुळेच मला दोन मोठ्या संधी मिळाल्या.
12:14
It was the head of marketing who initially suggested
239
734200
2456
मार्केटिंगच्या अध्यक्षांनी प्रथम
12:16
I be considered as a young global leader to the World Economic Forum.
240
736680
3296
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक नेतेपदासाठी माझी शिफारस केली.
12:20
She was familiar with my media engagements and my publications,
241
740000
2976
त्या माझं लिखाण आणि प्रसिद्धीमाध्यमांबरोबरचे संबंध
12:23
and when she was asked to voice her opinion,
242
743000
2096
जाणत होत्या. त्यांचं मत विचारलं असता,
12:25
she highlighted my name.
243
745120
1240
त्यांनी माझं नाव सुचवलं.
12:27
It was a young consultant, a Saudi lady and friend,
244
747280
2656
तसंच एका कन्सल्टंट सौदी मैत्रिणीने मला सौदी अरेबियात
12:29
who helped me sell my first project in Saudi Arabia,
245
749960
2736
माझ्या पहिल्या प्रोजेक्टची विक्री करायला मदत केली.
12:32
a market I was finding hard to gain traction in as a woman.
246
752720
3200
एक स्त्री म्हणून त्या बाजारपेठेत शिरणं मला कठीण वाटत होतं.
12:36
She introduced me to a client,
247
756840
1496
तिने माझी ओळख करून दिली,
12:38
and that introduction led to the first of very many projects for me in Saudi.
248
758360
4136
एका ग्राहकाशी. आणि त्यातूनच, सौदीतल्या अनेक प्रोजेक्ट्स पैकी पहिला सुरु झाला.
12:42
Today, I have two senior women on my team,
249
762520
2456
आज माझ्या टीममध्ये दोन सीनियर स्त्रिया आहेत.
12:45
and I see making them successful as key to my own success.
250
765000
3240
आणि त्यांना यशस्वी करण्यात माझ्या यशाचं रहस्य आहे असं मी मानते.
12:50
Women continue to advance in the world,
251
770320
1976
स्त्रिया जगात पुढे येत आहेत.
12:52
not fast enough, but we're moving.
252
772320
2376
वेग फार नसेल, पण आम्ही पुढे चाललो आहोत.
12:54
The Arab world, too, is making progress, despite many recent setbacks.
253
774720
4096
अरब जग देखील प्रगती करीत आहे. खीळ घालणाऱ्या घटना हल्लीच घडल्या असूनही.
12:58
Just this year, the UAE appointed five new female ministers to its cabinet,
254
778840
4616
या वर्षी संयुक्त अरब अमिरातींनी कॅबिनेट मध्ये पाच नवीन महिला मंत्री नेमल्या.
13:03
for a total of eight female ministers.
255
783480
2320
म्हणजे एकूण झाल्या आठ महिला मंत्री.
13:06
That's nearly 28 percent of the cabinet,
256
786360
2696
संपूर्ण कॅबिनेटच्या २८ टक्के.
13:09
and more than many developed countries can claim.
257
789080
2816
अनेक प्रगत देशांतल्यापेक्षा जास्त.
13:11
This is today my daughter Alia's favorite picture.
258
791920
2360
हे चित्र आज अलियाचं आवडतं चित्र आहे.
13:15
This is the result, no doubt, of great leadership,
259
795360
2496
हा निःसंशय चांगल्या नेतृत्वाचा परिणाम आहे.
13:17
but it is also the result of strong Arab women
260
797880
2616
तसाच तो समर्थ अरब स्त्रियांच्या
13:20
not giving up and continuously pushing the boundaries.
261
800520
2976
हार ना मानण्याचा आणि सतत कक्षा विस्तारण्याचाही आहे.
13:23
It is the result of Arab women deciding every day like me
262
803520
4136
हा परिणाम आहे अरब स्त्रियांनी रोज माझ्यासारखाच निर्णय घेऊन
13:27
to convert shit into fuel,
263
807680
1776
घाणीचं इंधन बनवण्याचा.
13:29
to work their life to keep work out of their life,
264
809480
2536
आयुष्य हा व्यवसाय मानण्याचा. काम घरी न आणण्याचा.
13:32
and to join forces and not compete.
265
812040
2040
एकमेकींशी स्पर्धा न करता, समाज जोडण्याचा.
13:34
As I look to the future,
266
814960
1416
भविष्याकडे पाहताना,
13:36
my hopes for my daughter when she stands on this stage
267
816400
2536
मला आशा वाटते, की जेव्हा माझी मुलगी २०-३० वर्षांनी
13:38
some 20, 30 years from now
268
818960
1816
याच व्यासपीठावर उभी राहील,
13:40
are that she be as proud to call herself her mother's daughter
269
820800
3096
तेव्हा तिला वडिलांच्या अभिमानाबरोबरच
13:43
as her father's daughter.
270
823920
1240
आईचाही अभिमान वाटेल.
13:46
My hopes for my son
271
826040
1456
माझ्या मुलासाठी मी आशा बाळगते,
13:47
are that by then, the expression "her mother's son" or "mama's boy"
272
827520
3616
की त्या वेळपर्यंत "आईसारखा मुलगा' किंवा "आईचा बेटा"
13:51
would have taken on a completely different meaning.
273
831160
2400
या उद्गारांना एक वेगळा अर्थ मिळालेला असेल.
13:54
Thank you.
274
834120
1216
धन्यवाद.
13:55
(Applause)
275
835360
5708
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7