The gift and power of emotional courage | Susan David

1,333,525 views ・ 2018-02-20

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:13
Hello, everyone.
0
13167
1190
हॅलो.
00:15
Sawubona.
1
15531
1150
सावबोना.
00:20
In South Africa, where I come from,
2
20412
2206
सावबोना म्हणजे आमच्या
00:22
"sawubona" is the Zulu word for "hello."
3
22642
2555
दक्षिण आफ्रिकेतल्या झुलू भाषेत हॅलो.
00:26
There's a beautiful and powerful intention behind the word
4
26122
2722
या शब्दामागे एक सुंदर आणि प्रबळ प्रयोजन आहे.
00:28
because "sawubona" literally translated means,
5
28868
2230
सावबोना शब्दाचा अक्षरशः अर्थ होतो,
00:31
"I see you, and by seeing you, I bring you into being."
6
31122
3291
मी तुम्हाला पाहते आहे आणि त्यामुळे तुम्हाला अस्तित्व प्राप्त झालं आहे.
00:35
So beautiful, imagine being greeted like that.
7
35538
2920
अशा सुंदर अभिवादनाची कल्पना करून पहा.
00:40
But what does it take in the way we see ourselves?
8
40093
2920
पण आपण स्वतःला कशा स्वरूपात पाहतो?
00:43
Our thoughts, our emotions and our stories
9
43037
2746
सतत गुंतागुंत वाढत चाललेल्या या जगात विकास साधताना
00:45
that help us to thrive
10
45807
1332
कोणत्या विचारांची, भावनांची
00:47
in an increasingly complex and fraught world?
11
47163
2950
आपल्याला मदत होते?
00:50
This crucial question has been at the center of my life's work.
12
50958
3825
हा महत्त्वाचा प्रश्न माझ्या कार्याचा केंद्रबिंदु आहे.
00:54
Because how we deal with our inner world drives everything.
13
54807
3310
कारण, अंतर्मनाशी चाललेला आपला संवाद आपल्या आयुष्याला गती देत असतो.
00:58
Every aspect of how we love, how we live,
14
58593
3190
म्हणजे आपण कसे जगतो, प्रेम करतो,
01:01
how we parent and how we lead.
15
61807
2000
मुलं वाढवतो, नेतृत्व करतो, या सगळ्याला.
01:04
The conventional view of emotions as good or bad,
16
64696
3785
भावनांना चांगल्या-वाईट, सकारात्मक-नकारात्मक
01:08
positive or negative,
17
68505
1667
ठरवण्याची प्रथा पडली आहे.
01:10
is rigid.
18
70196
1150
हे साचेबद्ध आहे.
01:11
And rigidity in the face of complexity is toxic.
19
71768
3283
साचेबद्धपणा हा गुंतागुंतीच्या परिस्थितीत विनाशकारी ठरू शकतो.
01:16
We need greater levels of emotional agility
20
76093
3294
अशावेळी लवचिकतेने विकास साधण्यासाठी
01:19
for true resilience and thriving.
21
79411
2200
भावनिक चापल्य वाढवण्याची गरज आहे.
01:23
My journey with this calling
22
83302
1683
माझ्या या कार्याची सुरुवात झाली,
01:25
began not in the hallowed halls of a university,
23
85009
3618
ती विद्यापीठाच्या पवित्र वास्तूत नव्हे,
01:28
but in the messy, tender business of life.
24
88651
2268
तर आयुष्याच्या खडबडीत वाटेवर.
01:31
I grew up in the white suburbs of apartheid South Africa,
25
91728
3635
वर्णद्वेष्ट्या दक्षिण आफ्रिकेत गौरवर्णियांच्या उपनगरांत माझं बालपण गेलं.
01:35
a country and community committed to not seeing.
26
95387
3523
त्या देशाने, त्या समाजाने शपथ घेतली आहे, डोळेझाक करण्याची.
01:38
To denial.
27
98934
1150
सत्य नाकबूल करण्याची.
01:40
It's denial that makes 50 years of racist legislation possible
28
100578
4548
सत्य नाकबूल केल्यामुळेच तिथे ५० वर्षं कायदेशीर वंशभेद चालू आहे,
01:45
while people convince themselves that they are doing nothing wrong.
29
105150
3372
आणि यात काही चुकीचं नाही असं लोक स्वतःला पटवून देताहेत.
01:49
And yet, I first learned of the destructive power of denial
30
109461
3806
तरीदेखील,सत्य नाकारणं किती विनाशकारी असू शकतं, ते मी
01:53
at a personal level,
31
113291
1333
वैयक्तिक पातळीवर शिकले.
01:55
before I understood what it was doing to the country of my birth.
32
115117
4015
माझ्या जन्मभूमीवर त्याचा काय परिणाम होत होता, ते नंतर समजलं.
02:01
My father died on a Friday.
33
121850
1800
माझे वडील एका शुक्रवारी वारले.
02:04
He was 42 years old and I was 15.
34
124564
2200
ते ४२ वर्षांचे होते, आणि मी १५ वर्षांची.
02:07
My mother whispered to me to go and say goodbye to my father
35
127802
2833
शाळेत जाण्यापूर्वी वडिलांचा निरोप घेऊन जा,
02:10
before I went to school.
36
130659
1551
असं आईने हळूच मला सांगितलं.
02:12
So I put my backpack down and walked the passage that ran through
37
132234
3571
मी माझं दप्तर खाली ठेवलं आणि वडिलांजवळ गेले.
02:15
to where the heart of our home my father lay dying of cancer.
38
135829
2897
कॅन्सरमुळे ते मरणोन्मुख अवस्थेत होते.
02:19
His eyes were closed, but he knew I was there.
39
139526
2790
त्यांचे डोळे मिटलेले होते. पण मी जवळ आल्याचं त्यांना समजलं.
02:22
In his presence, I had always felt seen.
40
142997
2631
आपण "दिसतो" आहोत, असं त्यांच्या सान्निध्यात मला वाटे.
02:26
I told him I loved him,
41
146331
1452
मी त्यांचा निरोप घेतला,
02:27
said goodbye and headed off for my day.
42
147807
2600
आणि तिथून निघाले.
02:31
At school, I drifted from science to mathematics to history to biology,
43
151984
4088
शाळेत मी विज्ञान, गणित, इतिहास, जीवशास्त्र करीत होते.
02:36
as my father slipped from the world.
44
156096
2196
त्याचवेळी माझे वडील या जगाचा निरोप घेत होते.
02:38
From May to July to September to November,
45
158889
2798
मे ते जुलै, सप्टेंबर ते नोव्हेंबर
02:41
I went about with my usual smile.
46
161711
2200
मी चेहऱ्यावर माझं नेहमीचं हास्य वागवीत होते.
02:44
I didn't drop a single grade.
47
164251
1933
माझे मार्क कुठेही कमी पडले नाहीत.
02:46
When asked how I was doing, I would shrug and say, "OK."
48
166673
3666
"कशी आहेस?" असं कुणी विचारलं, तर मी खांदे उडवून सांगे, "ठीक आहे".
02:51
I was praised for being strong.
49
171292
2066
माझ्या खंबीरपणाचं कौतुक झालं.
02:54
I was the master of being OK.
50
174108
2794
सगळं ठीक आहे असं भासवण्यात मी निष्णात होते.
02:58
But back home, we struggled --
51
178673
1582
पण घरची परिस्थिती चांगली नव्हती.
03:00
my father hadn't been able to keep his small business going
52
180279
2766
वडिलांचं आजारपण सुरु झाल्यापासून त्यांचा छोटासा बिझिनेस
03:03
during his illness.
53
183069
1159
बंद पडला होता.
03:04
And my mother, alone, was grieving the love of her life
54
184252
3031
माझी आई वैधव्याचं दुःख पेलून, एकटीने तीन मुलं वाढवण्याचा
03:07
trying to raise three children,
55
187307
1477
प्रयत्न करीत होती.
03:08
and the creditors were knocking.
56
188808
1877
सावकार दार ठोठावत होते.
03:11
We felt, as a family, financially and emotionally ravaged.
57
191355
3665
आमचं कुटुंब आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या उध्वस्त झालं होतं.
03:15
And I began to spiral down, isolated, fast.
58
195553
3972
एकाकीपणाच्या गर्तेत माझं आयुष्य वेगाने घसरू लागलं.
03:20
I started to use food to numb my pain.
59
200798
3118
दुःख जाणवू नये म्हणून मी अन्न हा उपाय वापरू लागले.
03:24
Binging and purging.
60
204733
1414
अति खाणे आणि वमन करणे.
03:26
Refusing to accept the full weight of my grief.
61
206893
3200
माझ्या दुःखाचा संपूर्ण भार सहन करणं मी नाकारत होते.
03:31
No one knew, and in a culture that values relentless positivity,
62
211125
4238
हे कुणालाच कळलं नाही. कठोर सकारात्मकतेचा उदो उदो करणाऱ्या संस्कृतीत
03:35
I thought that no one wanted to know.
63
215387
2037
हे कुणाला कळावं, असंही मला वाटत नव्हतं.
03:39
But one person did not buy into my story of triumph over grief.
64
219339
4267
दुःखावर मात केल्याची माझी कहाणी फक्त एकाच व्यक्तीला पटली नाही.
03:44
My eighth-grade English teacher fixed me with burning blue eyes
65
224751
3517
माझ्या आठवीच्या इंग्रजीच्या शिक्षिका. त्यांनी कोऱ्या वह्या वर्गात वाटताना
03:48
as she handed out blank notebooks.
66
228292
2461
आपले निळे डोळे थेट माझ्यावर रोखले.
03:51
She said, "Write what you're feeling.
67
231598
2533
त्या म्हणाल्या, "यात तुझ्या भावना लिही.
03:55
Tell the truth.
68
235106
1150
सत्य तेच लिही.
03:56
Write like nobody's reading."
69
236876
2000
कुणीही वाचणार नाही, असं समजून लिही."
04:00
And just like that,
70
240093
1214
आणि असं अचानक
04:01
I was invited to show up authentically to my grief and pain.
71
241331
3622
मला माझ्या दुःखाला आणि वेदनेला सच्चेपणाने सामोरं जाण्याचं आमंत्रण मिळालं.
04:05
It was a simple act
72
245395
2325
ही एक साधीशी कृती होती.
04:07
but nothing short of a revolution for me.
73
247744
2610
पण तिचं महत्त्व एखाद्या क्रांतीहून कमी नव्हतं.
04:11
It was this revolution that started in this blank notebook
74
251040
4301
३० वर्षांपूर्वी या कोऱ्या वहीत
04:15
30 years ago
75
255365
2239
सुरू झालेल्या त्या क्रांतीने
04:17
that shaped my life's work.
76
257628
1872
माझ्या कार्याला गती दिली.
04:20
The secret, silent correspondence with myself.
77
260117
3288
स्वतःशी मूकपणे केलेला तो संवाद होता.
04:24
Like a gymnast,
78
264656
1176
हळूहळू मी
04:25
I started to move beyond the rigidity of denial
79
265856
4531
कठोरपणे भावना नाकारण्याच्या अवस्थेमधून
04:30
into what I've now come to call
80
270411
2104
ज्याला मी आता भावनिक चापल्य म्हणते,
04:32
emotional agility.
81
272539
1532
त्या अवस्थेत पोहोचले.
04:38
Life's beauty is inseparable from its fragility.
82
278187
3222
आयुष्य सुंदर असतं, पण ते क्षणभंगुरही असतं.
04:43
We are young until we are not.
83
283036
1933
आपलं तारुण्य टिकतं तोवरच आपण तरुण असतो.
04:45
We walk down the streets sexy
84
285807
1873
एकेकाळी आपण मादक दिसत असू,
04:47
until one day we realize that we are unseen.
85
287704
2869
पण कधीतरी लक्षात येतं की आता कोणीच आपल्याला पाहत नाही.
04:53
We nag our children and one day realize
86
293488
2221
मुलं लहान असताना आपण त्यांच्यामागे कटकट लावतो.
04:55
that there is silence where that child once was,
87
295733
2257
मग अचानक घर सुनं सुनं वाटतं आणि लक्षात येतं,
04:58
now making his or her way in the world.
88
298014
1969
की आता मुलं आपल्या मार्गाला लागली आहेत.
05:01
We are healthy until a diagnosis brings us to our knees.
89
301009
4928
आपण स्वतःला निरोगी समजतो, ते एखाद्या रोगाचं निदान कळेपर्यंतच टिकतं.
05:07
The only certainty is uncertainty,
90
307009
2342
अनिश्चितता ही एकच गोष्ट निश्चित आहे.
05:09
and yet we are not navigating this frailty successfully or sustainably.
91
309375
3602
आणि तरीही आपण हे क्षणभंगुर आयुष्य शाश्वत आनंदाने पार करू शकत नाही.
05:14
The World Health Organization tells us that depression
92
314164
3008
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,
05:17
is now the single leading cause of disability globally --
93
317196
3609
नैराश्य हा माणसाला हतबल करणारा सर्वात मोठा विकार आहे.
05:21
outstripping cancer,
94
321585
1801
कॅन्सरपेक्षा मोठा.
05:23
outstripping heart disease.
95
323410
1669
हृदयविकारापेक्षाही मोठा.
05:26
And at a time of greater complexity,
96
326411
4094
तंत्रज्ञान, राजकारण आणि अर्थकारणाच्या क्षेत्रांत
05:30
unprecedented technological, political and economic change,
97
330529
3548
अभूतपूर्व बदल घडवणाऱ्या आजच्या गुंतागुंतीच्या जगात असं दिसतं, की
05:34
we are seeing how people's tendency
98
334895
1777
भावनांना कठोर साचेबद्ध प्रतिसाद देणं
05:36
is more and more to lock down into rigid responses to their emotions.
99
336696
4111
अधिकाधिक वाढतं आहे.
05:42
On the one hand we might obsessively brood on our feelings.
100
342371
3067
एकीकडे आपण अट्टाहासाने आपल्या भावनांच्या आहारी जातो.
05:46
Getting stuck inside our heads.
101
346387
1833
त्यांना डोक्यात घर करू देतो.
05:48
Hooked on being right.
102
348735
1469
त्या नक्कीच योग्य असणार.
05:51
Or victimized by our news feed.
103
351085
2127
किंवा आपण भावनांचे बळी ठरतो.
05:55
On the other, we might bottle our emotions,
104
355124
2024
दुसऱ्या टोकाला,
05:57
pushing them aside
105
357172
1984
आपण भावना दडपून टाकतो.
05:59
and permitting only those emotions deemed legitimate.
106
359180
3136
आणि ज्या भावना सर्वमान्य असतील, त्याच प्रकटू देतो.
06:04
In a survey I recently conducted with over 70,000 people,
107
364068
3170
नुकतीच मी ७०००० हून अधिक लोकांची एक पाहणी केली.
06:07
I found that a third of us --
108
367262
1734
मला आढळलं की, त्यापैकी
06:09
a third --
109
369704
1150
एक तृतीयांश लोक
06:11
either judge ourselves for having so-called "bad emotions,"
110
371466
4900
खिन्नता, संताप किंवा दुःख
06:16
like sadness,
111
376390
1794
अशा तथाकथित "वाईट भावना"
06:18
anger or even grief.
112
378208
1959
मनात आल्याबद्दल स्वतःला दोषी ठरवतात.
06:22
Or actively try to push aside these feelings.
113
382057
3747
किंवा या भावना दूर ढकलण्याचा जोरदार प्रयत्न करतात.
06:27
We do this not only to ourselves,
114
387273
1650
स्वतःशीच नव्हे तर जवळच्या माणसांशी,
06:28
but also to people we love, like our children --
115
388947
2254
आपल्या मुलांशीही आपण असे वागतो.
06:31
we may inadvertently shame them out of emotions seen as negative,
116
391225
4598
नकळत आपण त्यांना तथाकथित नकारात्मक भावनांची शरम वाटायला लावतो.
06:35
jump to a solution,
117
395847
2024
त्यांच्यावर तोडगे सुचवतो.
06:37
and fail to help them
118
397895
1480
त्या भावनांचा अंगभूत उपयोग
06:39
to see these emotions as inherently valuable.
119
399399
3090
त्यांना दाखवून देण्यात अपयशी ठरतो.
06:45
Normal, natural emotions are now seen as good or bad.
120
405030
5412
आज स्वाभाविक, नैसर्गिक भावनांना चांगलं किंवा वाईट ठरवलं जातं.
06:52
And being positive has become a new form of moral correctness.
121
412474
4188
सकारात्मकता म्हणजे नैतिक योग्यता असा समज निर्माण झाला आहे.
06:59
People with cancer are automatically told to just stay positive.
122
419522
3871
कॅन्सरच्या रुग्णांना सहजपणे सांगितलं जातं, सकारात्मक रहा.
07:06
Women, to stop being so angry.
123
426434
2803
स्त्रियांना सांगितलं जातं, राग आवरा.
07:11
And the list goes on.
124
431191
1400
ही यादी वाढतच जाते.
07:14
It's a tyranny.
125
434000
1414
हा तर जुलूम आहे.
07:16
It's a tyranny of positivity.
126
436303
2147
सकारात्मकतेचा जुलूम.
07:20
And it's cruel.
127
440752
1309
हा क्रूरपणा आहे.
07:23
Unkind.
128
443021
1150
निर्दयपणा.
07:25
And ineffective.
129
445260
1381
निरुपयोगी आहे तो.
07:27
And we do it to ourselves,
130
447728
2532
आपण स्वतःशी असे वागतो,
07:30
and we do it to others.
131
450284
1533
आणि इतरांशीही.
07:33
If there's one common feature
132
453373
2697
भावनांच्या आहारी जाणे किंवा त्या दडपणे
07:36
of brooding, bottling or false positivity, it's this:
133
456094
3651
आणि खोटी सकारात्मकता बाळगणे यांच्यात एक साम्य आहे.
07:40
they are all rigid responses.
134
460666
2413
हे सर्व साचेबद्ध प्रतिसाद आहेत.
07:44
And if there's a single lesson we can learn
135
464586
2080
वर्णद्वेषाचा झालेला पराभव हेच शिकवतो,
07:46
from the inevitable fall of apartheid
136
466690
2793
की निष्ठूरपणे एखादी गोष्ट नाकारण्याने
07:49
it is that rigid denial doesn't work.
137
469507
2685
काही साध्य होत नाही.
07:53
It's unsustainable.
138
473642
1350
हे नाकारणं
07:55
For individuals, for families,
139
475967
2864
व्यक्ती, कुटुंबं, समाज
07:58
for societies.
140
478855
1150
कोणासाठीही शाश्वत नसतं.
08:00
And as we watch the ice caps melt,
141
480783
4080
हिमनगदेखील वितळू शकतात, तसंच
08:04
it is unsustainable for our planet.
142
484887
2706
पृथ्वीसाठीही ते शाश्वत नसतं.
08:09
Research on emotional suppression shows
143
489831
1865
भावना दडपण्याबद्दल झालेलं संशोधन
08:11
that when emotions are pushed aside or ignored,
144
491720
2968
असं सिद्ध करतं, की त्या जितक्या दडपाव्या
08:14
they get stronger.
145
494712
1200
तितक्या प्रबळ होत जातात.
08:16
Psychologists call this amplification.
146
496664
2214
मानसशास्त्रज्ञ याला प्रवर्धन असं म्हणतात.
08:18
Like that delicious chocolate cake in the refrigerator --
147
498902
3252
हे फ्रिजमध्ये ठेवलेल्या चॉकलेट केकसारखं आहे.
08:23
the more you try to ignore it ...
148
503061
1934
त्याच्याकडे जितकं दुर्लक्ष करावं...
08:26
(Laughter)
149
506124
3604
(हशा)
08:30
the greater its hold on you.
150
510744
2158
तितका तो जास्त मोहात पाडतो.
08:34
You might think you're in control of unwanted emotions when you ignore them,
151
514619
3572
नकोशा भावनांकडे दुर्लक्ष करून त्यांना काबूत आणता येत नाही.
08:38
but in fact they control you.
152
518215
2642
प्रत्यक्षात त्या तुमच्यावर सत्ता गाजवत असतात.
08:42
Internal pain always comes out.
153
522127
2179
दडवलेली वेदना
08:45
Always.
154
525068
1150
हमखास प्रकट होते.
08:46
And who pays the price?
155
526863
1532
आणि तिची किंमत कोण मोजतं?
08:49
We do.
156
529244
1405
आपण.
08:50
Our children,
157
530673
1150
आपली मुलं,
08:52
our colleagues,
158
532696
1150
आपले सहकारी,
08:55
our communities.
159
535354
1150
आपला समाज.
09:01
Now, don't get me wrong.
160
541354
1412
गैरसमज करून घेऊ नका.
09:03
I'm not anti-happiness.
161
543203
1638
मला आनंद बघवत नाही असं समजू नका.
09:06
I like being happy.
162
546213
1309
मला आनंदात राहायला आवडतं.
09:07
I'm a pretty happy person.
163
547546
1587
मी खूप आनंदी आहे.
09:10
But when we push aside normal emotions to embrace false positivity,
164
550181
5777
जेव्हा आपण साधारण नैसर्गिक भावनांना दूर ढकलून खोटी सकारात्मकता कवटाळतो, तेव्हा
09:15
we lose our capacity to develop skills to deal with the world as it is,
165
555982
5000
आपण आपल्या स्वप्नातल्या नव्हे, तर खऱ्या जगात जगण्यासाठी आवश्यक ती कौशल्यं
09:22
not as we wish it to be.
166
562013
1683
वाढवण्याची क्षमता गमावून बसतो.
09:24
I've had hundreds of people tell me what they don't want to feel.
167
564950
3259
आजवर शेकडो लोकांनी मला त्यांच्या नकोशा भावना सांगितल्या आहेत.
09:29
They say things like,
168
569180
1698
ते म्हणतात,
09:30
"I don't want to try because I don't want to feel disappointed."
169
570902
3142
"मला प्रयत्न करावासा वाटत नाही कारण मला निराश व्हायचं नाही."
09:35
Or, "I just want this feeling to go away."
170
575022
3468
किंवा, "माझी ही भावना नष्ट व्हायला हवी."
09:41
"I understand," I say to them.
171
581235
1867
"कळलं." मी म्हणते. "पण ही ध्येयं केवळ
09:44
"But you have dead people's goals."
172
584061
2200
मेलेल्या मुडद्यांनी ठेवण्याच्या लायकीची आहेत."
09:47
(Laughter)
173
587187
5350
(हशा)
09:52
(Applause)
174
592561
6293
(टाळ्या)
09:58
Only dead people
175
598878
2040
नकोशा भावना फक्त त्यांनाच त्रास देत नाहीत
10:00
never get unwanted or inconvenienced by their feelings.
176
600942
3635
किंवा गैरसोयीच्या वाटत नाहीत.
10:04
(Laughter)
177
604601
1309
(हशा)
10:05
Only dead people never get stressed,
178
605934
2296
मृतांना कधीच ताण सोसावा लागत नाही.
10:09
never get broken hearts,
179
609101
1600
त्यांची मनं दुखावत नाहीत.
10:11
never experience the disappointment that comes with failure.
180
611196
3944
अपयशामुळे ते निराश होत नाहीत.
10:17
Tough emotions are part of our contract with life.
181
617195
3500
अशा कठीण भावना हा आयुष्याचा एक भाग आहे.
10:21
You don't get to have a meaningful career
182
621949
2325
चांगला व्यवसाय, सुखी कुटुंब किंवा
10:24
or raise a family
183
624298
1795
समाजाच्या हिताचं कार्य या गोष्टी
10:26
or leave the world a better place
184
626117
2778
ताण आणि गैरसोय
10:28
without stress and discomfort.
185
628919
2118
सोसल्याशिवाय मिळत नाहीत.
10:32
Discomfort is the price of admission to a meaningful life.
186
632173
4880
आयुष्याला चांगला आकार द्यायचा असेल, तर कळ सोसण्याची किंमत मोजावी लागते.
10:39
So, how do we begin to dismantle rigidity
187
639561
2572
तर मग साचेबद्धता सोडून
10:42
and embrace emotional agility?
188
642157
2000
भावनिक चापल्य कसं मिळवावं?
10:45
As that young schoolgirl,
189
645791
1659
शाळेच्या त्या दिवसांत, अमुक भावना
10:47
when I leaned into those blank pages,
190
647474
3367
असायलाच हव्यात असा माझा समज होता.
10:50
I started to do away with feelings
191
650865
2389
त्या कोऱ्या वहीच्या साथीने,
10:53
of what I should be experiencing.
192
653278
3118
त्या भावनांचा मी त्याग केला.
10:57
And instead started to open my heart to what I did feel.
193
657254
3346
त्याऐवजी, त्यावेळच्या खऱ्या भावना खुल्या मनाने स्वीकारल्या.
11:01
Pain.
194
661103
1187
वेदना.
11:02
And grief.
195
662679
1150
दुःख.
11:04
And loss.
196
664838
1539
विरह.
11:06
And regret.
197
666401
1150
पश्चात्ताप.
11:09
Research now shows
198
669972
2581
आता संशोधनाने सिद्ध झालं आहे, की
11:12
that the radical acceptance of all of our emotions --
199
672577
3333
आपल्या सर्व भावनांचा,
11:15
even the messy, difficult ones --
200
675934
1659
अगदी वाईट, कठीण भावनांचा सुद्धा,
11:17
is the cornerstone to resilience, thriving,
201
677617
2747
मूलभूत पातळीवरून स्वीकार करणे
11:20
and true, authentic happiness.
202
680388
3141
हा खऱ्याखुऱ्या आनंदी आयुष्याचा पाया आहे.
11:25
But emotional agility is more that just an acceptance of emotions.
203
685268
4937
परंतु केवळ भावनांचा स्वीकार करण्यापेक्षा भावनिक चापल्य हे जास्त मोठं आहे.
11:30
We also know that accuracy matters.
204
690229
2150
अचूकतेचं महत्त्व आपण जाणतो.
11:33
In my own research, I found that words are essential.
205
693228
4523
माझ्या संशोधनात मला शब्दांचं महत्त्व जाणवलं.
11:37
We often use quick and easy labels to describe our feelings.
206
697775
3032
बरेचदा आपण भावनांचं वर्णन करताना सहज सोपे शब्द वापरतो.
11:40
"I'm stressed" is the most common one I hear.
207
700831
2635
ताण हा शब्द आपण बरेचदा वापरतो.
11:43
But there's a world of difference between stress and disappointment
208
703490
3381
पण ताण आणि निराशा यात जमीन अस्मानाचं अंतर आहे.
11:46
or stress and that knowing dread of "I'm in the wrong career."
209
706895
3668
तसंच अंतर, कामाचा ताण आणि चुकीचा व्यवसाय निवडल्याची भीती, यात आहे.
11:51
When we label our emotions accurately,
210
711804
1905
भावनांना योग्य ते नाव देता आलं,
11:53
we are more able to discern the precise cause of our feelings.
211
713733
3409
तर त्यांच्यामागचं कारण नीट ओळखता येतं.
11:57
And what scientists call the readiness potential in our brain
212
717692
2988
त्यामुळे शास्त्रज्ञ ज्याला मनाची तयारी म्हणतात,
12:00
is activated, allowing us to take concrete steps.
213
720704
3202
ती कार्यान्वित होऊन
12:04
But not just any steps -- the right steps for us.
214
724513
2905
आपल्याला योग्य ती ठोस पावलं उचलायला मदत करते.
12:07
Because our emotions are data.
215
727442
2000
कारण भावना त्यासाठी माहिती पुरवतात.
12:10
Our emotions contain flashing lights to things that we care about.
216
730109
3949
आपल्याला जी मूल्यं महत्त्वाची वाटतात, त्यांच्याकडे भावना आपलं लक्ष वेधतात.
12:14
We tend not to feel strong emotion
217
734720
3071
ज्या गोष्टींची आपण फिकीर करत नाही,
12:17
to stuff that doesn't mean anything in our worlds.
218
737815
3221
त्यांच्याबद्दल तीव्र भावना जागृत होत नाहीत.
12:22
If you feel rage when you read the news,
219
742251
2612
बातम्या वाचून आपला संताप होत असेल, तर
12:24
that rage is a signpost, perhaps, that you value equity and fairness --
220
744887
4249
आपल्याला समता आणि न्याय यांचं मोठं महत्त्व वाटतं, असं तो संताप दर्शवतो.
12:29
and an opportunity to take active steps
221
749760
1976
आपल्या आयुष्यात ही मूल्यं आणण्याकरता
12:31
to shape your life in that direction.
222
751760
2206
पावलं उचलण्याची सूचना तो देतो.
12:35
When we are open to the difficult emotions,
223
755093
2183
कठीण भावना खुल्या मनाने स्वीकारल्या,
12:37
we are able to generate responses that are values-aligned.
224
757300
3436
तर मूल्यांवर आधारित प्रतिसाद देणं शक्य होतं.
12:41
But there's an important caveat.
225
761957
1985
इथे एक इशारा द्यायला हवा.
12:43
Emotions are data, they are not directives.
226
763966
2420
भावना माहिती देतात, पण ते काही आदेश नव्हेत.
12:46
We can show up to and mine our emotions for their values
227
766752
3142
भावना कोणती मूल्यं दर्शवतात ते शोधून आपण थांबू शकतो.
12:49
without needing to listen to them.
228
769918
1928
त्यांनी दर्शवलेली कृती केलीच पाहिजे असं नव्हे.
12:52
Just like I can show up to my son in his frustration with his baby sister --
229
772419
5293
उदाहरणार्थ, माझ्या मुलाची छोट्या बहिणीबद्दलची तक्रार मी ऐकून घेऊ शकते.
12:58
but not endorse his idea that he gets to give her away
230
778673
2566
पण मॉलमध्ये दिसेल त्या माणसाला ती बहीण देऊन टाकूया
13:01
to the first stranger he sees in a shopping mall.
231
781263
2326
हे त्याचं म्हणणं मान्य केलंच पाहिजे असं नव्हे.
13:03
(Laughter)
232
783613
1528
(हशा)
13:05
We own our emotions, they don't own us.
233
785165
3031
भावनांवर आपला मालकीहक्क असतो. आपल्यावर त्यांचा नव्हे.
13:09
When we internalize the difference between how I feel in all my wisdom
234
789520
3803
भावना आपल्याला काय सांगतात, आणि मूल्यांच्या दिशेने आपण कशी वाटचाल करतो
13:13
and what I do in a values-aligned action,
235
793347
3913
यातला फरक जाणून घेतला,
13:17
we generate the pathway to our best selves
236
797284
3191
तर भावनांच्या आधारे चांगलं आयुष्य घडवण्याचा मार्ग
13:20
via our emotions.
237
800499
1407
आपल्याला खुला होईल.
13:24
So, what does this look like in practice?
238
804466
2733
म्हणजे प्रत्यक्षात काय करावं?
13:28
When you feel a strong, tough emotion,
239
808474
1818
जेव्हा एखाद्या प्रबळ भावनेचा अनुभव येईल
13:30
don't race for the emotional exits.
240
810316
1975
तेव्हा तिच्यापासून पळू नका.
13:33
Learn its contours, show up to the journal of your hearts.
241
813203
3644
तिचे बारकावे समजून घ्या. हृदयात काय कोरलं गेलं ते पहा.
13:37
What is the emotion telling you?
242
817625
1944
त्या भावनेने तुम्हांला काय सांगितलं?
13:41
And try not to say "I am," as in, "I'm angry" or "I'm sad."
243
821570
3801
तिचं वर्णन "मी दुःखी आहे" किंवा "मी रागावलो आहे" असं करू नका.
13:45
When you say "I am"
244
825395
1159
हे ऐकून, तुम्ही स्वतः
13:46
it makes you sound as if you are the emotion.
245
826578
2547
दुःख किंवा राग आहात असा भास होतो.
13:49
Whereas you are you, and the emotion is a data source.
246
829149
2729
पण तुम्ही एक व्यक्ती आहात. भावना हा माहितीचा स्रोत आहे.
13:52
Instead, try to notice the feeling for what it is:
247
832577
2445
त्याऐवजी भावनांकडे लक्ष द्या.
13:55
"I'm noticing that I'm feeling sad"
248
835046
1688
"मी दुःखी आहे किंवा रागावलो आहे
13:56
or "I'm noticing that I'm feeling angry."
249
836758
2022
असं माझ्या लक्षात आलं आहे."
14:00
These are essential skills for us,
250
840037
2118
ही कौशल्यं आपल्यासाठी,
14:02
our families, our communities.
251
842179
2255
आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि
14:04
They're also critical to the workplace.
252
844458
2250
कामाच्या ठिकाणी फार महत्त्वाची आहेत.
14:08
In my research,
253
848132
1168
मी संशोधन करत होते, की
14:09
when I looked at what helps people to bring the best of themselves to work,
254
849324
3539
कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम वागणूक ठेवण्याऱ्या लोकांना कशाची मदत होत असेल?
14:12
I found a powerful key contributor:
255
852887
1674
मला एक प्रबळ घटक सापडला.
14:14
individualized consideration.
256
854585
1934
स्वतःच्या मनाचा मागोवा घेणे.
14:17
When people are allowed to feel their emotional truth,
257
857084
3762
लोकांना स्वतःच्या खऱ्याखुऱ्या भावना जाणवण्याचं स्वातंत्र्य मिळतं,
14:20
engagement, creativity and innovation flourish in the organization.
258
860870
3467
तेव्हा संस्थेमध्ये बांधिलकी, सर्जनशीलता आणि नवनिर्माण वाढीस लागतं.
14:25
Diversity isn't just people,
259
865661
1508
विविधता ही केवळ
14:27
it's also what's inside people.
260
867193
2341
व्यक्तींमध्ये नसते, त्यांच्या अंतरंगांतही असते.
14:29
Including diversity of emotion.
261
869558
2067
भावनांचं वैविध्यही यात आलं.
14:34
The most agile, resilient individuals, teams,
262
874425
3888
सर्वात चपळ आणि लवचिक असणाऱ्या व्यक्ती, गट, संस्था, कुटुंबं आणि समाज
14:38
organizations, families, communities
263
878337
2312
हे नैसर्गिक भावना खुलेपणाने स्वीकारण्याच्या
14:40
are built on an openness to the normal human emotions.
264
880673
2748
पायावर उभारलेले आढळतात.
14:44
It's this that allows us to say,
265
884189
2309
यामुळेच आपण म्हणू शकतो,
14:46
"What is my emotion telling me?"
266
886522
2078
"माझी भावना मला काय सांगते आहे?"
14:48
"Which action will bring me towards my values?"
267
888624
3057
"कोणती कृती मला माझ्या मूल्यांच्या जवळ नेईल?"
14:51
"Which will take me away from my values?"
268
891705
2388
"आणि कोणती कृती दूर नेईल?"
14:55
Emotional agility is the ability to be with your emotions
269
895436
3729
भावनिक चापल्य म्हणजे आपल्या भावनांकडे
14:59
with curiosity, compassion,
270
899189
2976
चौकसपणे आणि सहानुभूतीने पाहण्याची क्षमता,
15:02
and especially the courage to take values-connected steps.
271
902189
3766
आणि आपल्या मूल्यांच्या दिशेने पावलं उचलण्याचं धैर्य.
15:07
When I was little,
272
907891
1166
लहानपणी,
15:09
I would wake up at night terrified by the idea of death.
273
909081
2810
मी मृत्यूच्या कल्पनेने घाबरून रात्री उठत असे.
15:11
My father would comfort me with soft pats and kisses.
274
911915
3032
वडील मला थोपटून, मुके घेऊन शांत करत असत.
15:15
But he would never lie.
275
915677
1534
पण ते कधीही खोटं बोलले नाहीत.
15:18
"We all die, Susie," he would say.
276
918738
2118
ते म्हणत, "सर्वांना मृत्यू येतो, सुझी.
15:21
"It's normal to be scared."
277
921780
1845
भीती वाटणं साहजिक आहे."
15:24
He didn't try to invent a buffer between me and reality.
278
924483
3541
त्यांनी सत्य परिस्थिती झाकायचा प्रयत्न केला नाही.
15:29
It took me a while to understand
279
929037
1850
त्या रात्रींमधल्या शिकवणुकीचं
15:30
the power of how he guided me through those nights.
280
930911
2588
सामर्थ्य कळायला काही काळ जावा लागला.
15:34
What he showed me is that courage is not an absence of fear;
281
934228
4133
त्यांनी मला शिकवलं, की धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे.
15:39
courage is fear walking.
282
939579
2944
धैर्य म्हणजे भीतीचा सामना करणं.
15:44
Neither of us knew that in 10 short years,
283
944791
2239
दहाच वर्षांत ते जाणार, हे त्यावेळी
15:47
he would be gone.
284
947054
1212
माहीत नव्हतं.
15:48
And that time for each of us is all too precious
285
948950
2904
हा वेळ सर्वांनाच मोलाचा असतो,
15:51
and all too brief.
286
951878
1200
आणि तो कमीच पडतो.
15:54
But when our moment comes
287
954494
2793
भंगुरतेला शरण जाताना
15:57
to face our fragility,
288
957311
2198
आपला
15:59
in that ultimate time,
289
959533
1699
शेवटचा क्षण
16:01
it will ask us,
290
961256
1261
आपल्याला विचारेल,
16:03
"Are you agile?"
291
963359
1300
"आहेस का तू तयार?"
16:05
"Are you agile?"
292
965421
1150
"आहेस का तू तयार?"
16:07
Let the moment be an unreserved "yes."
293
967738
3444
"होय" असं निर्भीड उत्तर त्या क्षणी यायला हवं.
16:12
A "yes" born of a lifelong correspondence with your own heart.
294
972381
4301
हा होकार यायला हवा आपल्या मनाशी आयुष्यभर केलेल्या संवादाचा.
16:17
And in seeing yourself.
295
977784
1716
आणि स्वतःला पाहण्याचा.
16:20
Because in seeing yourself,
296
980839
2389
कारण स्वतःला पाहत असतानाच
16:23
you are also able to see others, too:
297
983252
2467
आपण दुसऱ्यांना पाहू शकतो.
16:27
the only sustainable way forward
298
987218
3423
या सुंदर क्षणभंगुर जगात पुढे जाण्याचा
16:30
in a fragile, beautiful world.
299
990665
2626
तो एकच शाश्वत मार्ग आहे.
16:34
Sawubona.
300
994972
1446
सावबोना.
16:36
And thank you.
301
996442
1167
धन्यवाद.
16:37
(Laughter)
302
997633
1033
(हशा)
16:38
Thank you.
303
998690
1151
धन्यवाद.
16:39
(Applause)
304
999865
2270
(टाळ्या)
16:42
Thank you.
305
1002159
1261
धन्यवाद.
16:43
(Applause)
306
1003444
3976
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7