Why you should define your fears instead of your goals | Tim Ferriss | TED

4,405,055 views ・ 2017-07-14

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
So, this happy pic of me was taken in 1999.
0
12796
3144
१९९९ मधला हा माझा एक आनंदी फोटो.
00:15
I was a senior in college,
1
15964
2090
मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो.
00:18
and it was right after a dance practice.
2
18078
1932
आमची डान्स प्रॅक्टिस नुकतीच संपली होती.
00:20
I was really, really happy.
3
20034
1518
मी खूप खूप आनंदात होतो.
00:22
And I remember exactly where I was about a week and a half later.
4
22148
3886
त्यानंतर एका आठवड्याने मी कुठे होतो, ते पक्कं आठवतंय मला.
00:26
I was sitting in the back of my used minivan
5
26058
3219
मी कॅम्पसच्या पार्किंग लॉटमध्ये माझ्या सेकंडहँड मिनीव्हॅनच्या
00:29
in a campus parking lot,
6
29301
1763
मागच्या भागात बसलो होतो.
00:31
when I decided
7
31088
1151
त्यावेळी तिथे बसून मी
00:32
I was going to commit suicide.
8
32263
1779
आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.
00:35
I went from deciding to full-blown planning very quickly.
9
35796
4037
निर्णय घेतल्यानंतर लगेचच मी सविस्तर बेतसुद्धा आखला.
00:40
And I came this close to the edge of the precipice.
10
40388
2995
पूर्वी कधीच आलो नसेन,
00:43
It's the closest I've ever come.
11
43407
1637
इतका कड्याच्या पार टोकाशी आलो.
00:45
And the only reason I took my finger off the trigger
12
45529
2952
केवळ नशीबानेच काही योगायोग घडले,
00:48
was thanks to a few lucky coincidences.
13
48505
2423
आणि त्यांनी मला चाप ओढण्यापासून रोखलं.
00:51
And after the fact,
14
51499
1691
त्या घटनेनंतर,
00:53
that's what scared me the most: the element of chance.
15
53214
3122
काय घडू शकलं असतं या जाणिवेनेच मी हादरलो.
00:57
So I became very methodical about testing different ways
16
57062
3192
मग मी मनाला वाटणारी उभारी आणि खंत हाताळण्याचे
01:00
that I could manage my ups and downs,
17
60278
2130
निरनिराळे मार्ग पद्धतशीरपणे अजमावून पहिले.
01:02
which has proven to be a good investment. (Laughs)
18
62432
3869
हा उद्योग फायदेशीर ठरला.
01:06
Many normal people might have, say, six to 10 major depressive episodes
19
66301
4176
अनेक सामान्य व्यक्तींच्या आयुष्यात खोल नैराश्याचे कालखंड
01:10
in their lives.
20
70501
1527
६ ते १० वेळा येऊ शकतात.
01:12
I have bipolar depression. It runs in my family.
21
72052
2326
मला आनुवांशिक द्विध्रुवी नैराश्यविकार आहे.
01:14
I've had 50-plus at this point,
22
74402
3025
आजवर माझ्या आयुष्यात असे कालखंड पन्नासेक वेळा आले आहेत.
01:17
and I've learned a lot.
23
77451
1521
मी त्यातून खूप काही शिकलो आहे.
01:19
I've had a lot of at-bats,
24
79715
1853
नैराश्याच्या अंधाराशी
01:21
many rounds in the ring with darkness,
25
81592
2341
मी अनेकदा लढलो आहे,
01:23
taking good notes.
26
83957
1460
आणि अनुभव नोंदून ठेवले आहेत.
01:25
So I thought rather than get up and give any type of recipe for success
27
85781
3335
म्हणूनच मी ठरवलं, की यशाची गुरुकिल्ली किंवा माझ्या विजयाची क्षणचित्रे,
01:29
or highlight reel,
28
89140
1153
असं काही सांगण्याऐवजी,
01:30
I would share my recipe for avoiding self-destruction,
29
90317
3839
स्वतःचा नाश होऊ नये म्हणून, किंवा हतबलता येऊ नये म्हणून
01:35
and certainly self-paralysis.
30
95061
1997
मी काय केलं, ते सांगायचं.
01:38
And the tool I've found which has proven to be the most reliable safety net
31
98249
3786
माझ्या बिझिनेसविषयी सर्वोत्तम निर्णय घेताना
01:42
for emotional free fall
32
102059
1436
मदतीला येणारं सुरक्षा तंत्रच
01:44
is actually the same tool
33
104503
1569
मानसिक पतनातून सावरण्यासाठीही
01:46
that has helped me to make my best business decisions.
34
106096
2601
हमखास उपयोगी पडतं, असं मला आढळलं.
01:48
But that is secondary.
35
108721
1320
पण ते महत्त्वाचं नाही.
01:50
And it is ... stoicism.
36
110553
3117
स्थितप्रज्ञता.
01:53
That sounds boring.
37
113694
1524
हा शब्दच कंटाळवाणा आहे.
01:55
(Laughter)
38
115242
1063
(हशा)
01:56
You might think of Spock,
39
116329
1616
स्पॉकची आठवण आली ना?
01:57
or it might conjure and image like this --
40
117969
2515
कसा दिसेल तो?
02:00
(Laughter)
41
120508
1476
(हशा)
02:02
a cow standing in the rain.
42
122008
1977
पावसात उभ्या राहिलेल्या गायीसारखा.
02:04
It's not sad. It's not particularly happy.
43
124440
2890
दुःखी नव्हे. फार आनंदीही नव्हे.
02:07
It's just an impassive creature taking whatever life sends its way.
44
127354
3800
वाट्याला आलेलं आयुष्य भावनाशून्य मनाने जगणारा प्राणी.
02:11
You might not think of the ultimate competitor, say, Bill Belichick,
45
131673
4442
कदाचित तुम्हाला बिल बेलिचेक आठवला नसेल. अतिशय स्पर्धात्मक वृत्तीचा
02:16
head coach of the New England Patriots,
46
136139
2256
न्यू इंग्लंड पेट्रियटसचा प्रमुख प्रशिक्षक.
02:18
who has the all-time NFL record for Super Bowl titles.
47
138419
3049
एनएफएल सुपरबॉल मधल्या विजयांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
02:21
And stoicism has spread like wildfire in the top of the NFL ranks
48
141492
5355
गेल्या काही वर्षांत एनएफएलच्या सर्वोत्कृष्ठ टीम्समध्ये मानसिक कणखरपणासाठी
02:26
as a means of mental toughness training in the last few years.
49
146871
3157
स्थितप्रज्ञता शिकवणं प्रचलित झालं आहे.
02:30
You might not think of the Founding Fathers --
50
150679
3582
तुम्हाला कदाचित तीन राष्ट्रपुरुष आठवले नसतील -
02:34
Thomas Jefferson, John Adams, George Washington
51
154285
3138
थॉमस जेफरसन, जॉन ऍडम्स, जॉर्ज वाॅशिंग्टन
02:37
to name but three students of stoicism.
52
157447
2792
स्थितप्रज्ञ वृत्तीचे अभ्यासक.
02:40
George Washington actually had a play about a Stoic --
53
160263
4098
जॉर्ज वाॅशिंग्टनने व्हॅली फोर्जमधल्या
02:44
this was "Cato, a Tragedy" --
54
164385
1983
आपल्या सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी
02:46
performed for his troops at Valley Forge to keep them motivated.
55
166392
3187
एका स्थितप्रज्ञाबद्दलचं "कीटो..एक शोकांतिका" हे नाटक दाखवलं होतं.
02:50
So why would people of action focus so much on an ancient philosophy?
56
170166
4080
असे कर्तबगार लोक स्थितप्रज्ञतेचं प्राचीन तत्त्वज्ञान का कवटाळत असतील?
02:54
This seems very academic.
57
174270
1686
यात शिकण्यासारखं बरंच काही आहे.
02:56
I would encourage you to think about stoicism a little bit differently,
58
176615
3413
मी तर म्हणेन, धकाधकीच्या आयुष्यात टिकून राहण्यासाठी
03:00
as an operating system for thriving in high-stress environments,
59
180052
3263
योग्य निर्णय घेताना
03:03
for making better decisions.
60
183339
1482
स्थितप्रज्ञताच कामी येते.
03:05
And it all started here,
61
185459
2510
तर हा विचार
03:07
kind of,
62
187993
1163
काहीसा इथे सुरु झाला,
03:09
on a porch.
63
189180
1446
या पोर्च वर.
03:10
So around 300 BC in Athens,
64
190650
3257
ख्रिस्तपूर्व ३०० साली
03:13
someone named Zeno of Citium taught many lectures
65
193931
2873
अथेन्स शहरी, झिनो नामक व्यक्ती पोर्चभोवती व्याख्याने देत असे.
03:16
walking around a painted porch, a "stoa."
66
196828
2752
त्या रंगीत पोर्चला म्हणत, स्टोआ.
03:19
That later became "stoicism."
67
199604
1732
त्यावरून, स्टोईसिझ्म (स्थितप्रज्ञता)
03:22
And in the Greco-Roman world,
68
202221
2396
ग्रीक - रोमन समाजाने
03:24
people used stoicism as a comprehensive system
69
204641
2762
ही संकल्पना
03:27
for doing many, many things.
70
207427
1410
अनेक गोष्टींसाठी वापरली.
03:29
But for our purposes, chief among them was training yourself
71
209360
4189
त्यापैकी आपल्या उपयोगाची गोष्ट म्हणजे, स्व-प्रशिक्षण.
03:33
to separate what you can control from what you cannot control,
72
213573
3447
आपल्या नियंत्रणातल्या आणि नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी ओळखणे,
03:37
and then doing exercises to focus exclusively
73
217044
3058
आणि पहिल्या प्रकारच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा
03:40
on the former.
74
220126
1151
सराव करणे.
03:41
This decreases emotional reactivity,
75
221301
2378
यामुळे भावनेच्या आहारी जाणे कमी होते.
03:43
which can be a superpower.
76
223703
1548
ही एक मोठीच शक्ती आहे.
03:45
Conversely, let's say you're a quarterback.
77
225983
2861
याविरुद्ध उदाहरण: फुटबॉलच्या खेळात एखादी खेळी चुकल्यामुळे
03:48
You miss a pass. You get furious with yourself.
78
228868
2192
खेळाडू जर स्वतःवरच चिडला, तर उरलेला सामना
03:51
That could cost you a game.
79
231084
1506
पराभवाच्या छायेत जाऊ शकतो.
03:53
If you're a CEO, and you fly off the handle at a very valued employee
80
233098
3910
एखाद्या निष्णात कर्मचाऱ्याच्या बारीकशा चुकीमुळे जर कंपनीचा सी ई ओ
03:57
because of a minor infraction,
81
237032
1500
त्याच्यावर उखडला,
03:58
that could cost you the employee.
82
238556
2011
तर कंपनीला तो कर्मचारी गमवावा लागू शकतो.
04:01
If you're a college student who, say, is in a downward spiral,
83
241401
4698
अधोगतीला लागलेला एखादा कॉलेजकुमार,
04:06
and you feel helpless and hopeless,
84
246758
2155
निराशा आणि हतबलतेच्या फेऱ्यात सापडल्यामुळे
04:08
unabated, that could cost you your life.
85
248937
1977
प्राण गमावू शकतो.
04:10
So the stakes are very, very high.
86
250938
2259
इथे महत्त्वाच्या गोष्टी पणाला लागलेल्या असतात.
04:14
And there are many tools in the toolkit to get you there.
87
254078
3137
त्या साध्य करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
04:17
I'm going to focus on one that completely changed my life in 2004.
88
257239
3837
२००४ साली माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या मार्गाबद्दल आता सांगतो.
04:21
It found me then because of two things:
89
261808
2631
त्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या:
04:24
a very close friend, young guy, my age, died of pancreatic cancer unexpectedly,
90
264463
5365
माझा एक अत्यंत जवळचा मित्र अनपेक्षितपणे स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे मरण पावला.
04:29
and then my girlfriend, who I thought I was going to marry, walked out.
91
269852
3828
त्यानंतर, मी जिच्याशी लग्न करणार होतो, ती माझी मैत्रीण मला दुरावली.
04:33
She'd had enough, and she didn't give me a Dear John letter,
92
273704
4045
ती वैतागली होती. तिने मला "डियर जॉन" लिहिलेलं पत्र दिलं नाही, तर
04:37
but she did give me this,
93
277773
2351
त्याऐवजी दिला,
04:40
a Dear John plaque.
94
280148
1312
"डियर जॉन" लिहिलेला फलक.
04:41
(Laughter)
95
281484
1048
(हशा)
04:42
I'm not making this up. I've kept it.
96
282556
1785
खरंच सांगतोय. अजून आहे तो माझ्याजवळ.
04:44
"Business hours are over at five o'clock."
97
284365
2637
"कामाची वेळ पाच वाजता संपते."
04:47
She gave this to me to put on my desk for personal health,
98
287026
2766
तो टेबलावर ठेवावा, म्हणून दिला होता. माझ्या आरोग्यासाठी.
04:49
because at the time, I was working on my first real business.
99
289816
3269
कारण त्यावेळी मी माझ्या पहिल्या बिझिनेसचं काम करीत होतो. चाचपडत होतो.
04:53
I had no idea what I was doing. I was working 14-plus hour days,
100
293109
3119
दिवसाला चौदा तासांहून जास्त काम करीत होतो.
04:56
seven days a week.
101
296252
1433
आठवड्याचे सातही दिवस.
04:58
I was using stimulants to get going.
102
298118
2294
उत्साह टिकवण्यासाठी उत्तेजक औषधं घेत होतो.
05:00
I was using depressants to wind down and go to sleep.
103
300436
2581
तशीच झोपेसाठीही औषधं घेत होतो.
05:03
It was a disaster.
104
303041
1191
परिस्थिती कठीण होती.
05:04
I felt completely trapped.
105
304256
1504
मी पूर्णपणे अडकून पडलो होतो.
05:06
I bought a book on simplicity to try to find answers.
106
306465
4067
या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मी सुलभता या विषयावरचं एक पुस्तक आणलं.
05:10
And I did find a quote that made a big difference in my life,
107
310556
3829
आणि आयुष्यात मोठाच बदल घडवणारा एक विचार मला त्यात सापडला.
05:14
which was, "We suffer more often in imagination than in reality,"
108
314409
5147
"वास्तवापेक्षा कल्पनेतच आपण जास्त त्रास भोगतो."
05:19
by Seneca the Younger,
109
319580
1784
लेखक, "सेनेका द यंगर".
05:21
who was a famous Stoic writer.
110
321388
1623
प्रसिद्ध स्थितप्रज्ञ लेखक.
05:23
That took me to his letters,
111
323035
1816
मग मी, त्यांनी लिहिलेली पत्रं वाचली.
05:24
which took me to the exercise,
112
324875
2453
त्यातून सापडला एक अभ्यास प्रकार.
05:27
"premeditatio malorum,"
113
327352
2503
"प्रीमेडिटाटिओ मलोरम"
05:29
which means the pre-meditation of evils.
114
329879
2296
म्हणजे, वाईट गोष्टींचं पूर्वचिंतन.
05:32
In simple terms,
115
332199
1156
सोप्या शब्दांत,
05:33
this is visualizing the worst-case scenarios, in detail, that you fear,
116
333379
5119
अत्यंत वाईट गोष्टीं घडण्याच्या भीतीमुळे आपण काही करू धजत नाही, अशावेळी
05:38
preventing you from taking action,
117
338522
1717
त्याच गोष्टी सविस्तर रूपात पाहणे.
05:40
so that you can take action to overcome that paralysis.
118
340263
2740
यामुळे आपण त्या हतबलतेवर मात करण्यासाठी काहीतरी करू शकतो.
05:43
My problem was monkey mind -- super loud, very incessant.
119
343027
3889
मला सतावत होतं माझं माकडरुपी मन. मोठमोठ्याने अखंड बडबडणारं.
05:46
Just thinking my way through problems doesn't work.
120
346940
2589
या प्रश्नांचा केवळ मनात विचार करून भागत नाही.
05:49
I needed to capture my thoughts on paper.
121
349553
2025
ते कागदावर उतरवावे लागतात.
05:51
So I created a written exercise
122
351602
1967
मग मी स्वतःसाठी एक लेखी साचा तयार केला.
05:53
that I called "fear-setting," like goal-setting,
123
353593
2382
त्याला नाव दिलं, भीती-निश्चिती.
05:55
for myself.
124
355999
1169
ध्येय-निश्चिती सारखंच.
05:57
It consists of three pages.
125
357192
2099
यात तीन पानं आहेत.
05:59
Super simple.
126
359728
1261
अगदी सोपं आहे.
06:01
The first page is right here.
127
361407
2210
हे पहिलं पान:
06:03
"What if I ...?"
128
363641
2176
"मी जर ... ?"
06:05
This is whatever you fear,
129
365841
1557
इथे लिहायची तुमची भीती.
06:07
whatever is causing you anxiety,
130
367422
2083
तुम्हाला चिंतातुर करणारी कोणतीही गोष्ट.
06:09
whatever you're putting off.
131
369529
1361
सतत टाळलेली गोष्ट.
06:10
It could be asking someone out,
132
370914
1487
कुणाला डेटसाठी विचारणं असेल,
06:12
ending a relationship,
133
372425
1624
किंवा कुणाशी संबंध तोडणं.
06:14
asking for a promotion, quitting a job, starting a company.
134
374073
3038
नोकरीत पगारवाढ मागणं, नोकरी सोडणं, व्यवसाय सुरु करणं,
06:17
It could be anything.
135
377135
1157
काहीही.
06:18
For me, it was taking my first vacation in four years
136
378316
3032
माझ्या बाबतीत ही गोष्ट होती, चार वर्षांत प्रथमच
06:21
and stepping away from my business for a month to go to London,
137
381372
3007
एका महिन्याची सुट्टी घेणं. व्यवसायापासून लांब लंडनला जाऊन
06:24
where I could stay in a friend's room for free,
138
384403
3044
एका मित्राच्या घरी विनाखर्च राहणं.
06:27
to either remove myself as a bottleneck in the business
139
387471
2706
व्यवसायातून स्वतः बाजूला होणं,
06:30
or shut it down.
140
390201
1245
किंवा व्यवसाय बंद करणं.
06:32
In the first column, "Define,"
141
392345
1958
पहिला कॉलम, व्याख्या.
06:34
you're writing down all of the worst things you can imagine happening
142
394327
3504
एखादं पाऊल उचलल्यामुळे होऊ शकणाऱ्या सर्व वाईट गोष्टींबद्दलच्या
06:37
if you take that step.
143
397855
1551
तुमच्या कल्पना इथे लिहा.
06:39
You want 10 to 20.
144
399430
1562
१० ते २० तरी हव्यातच.
06:41
I won't go through all of them, but I'll give you two examples.
145
401016
3020
दोन उदाहरणं देतो.
06:44
One was, I'll go to London, it'll be rainy, I'll get depressed,
146
404060
3716
एक, मी लंडनला जाईन. तिथे पावसाळी हवा असेल. मला नैराश्य येईल.
06:47
the whole thing will be a huge waste of time.
147
407800
2223
सगळा वेळ वाया जाईल.
06:50
Number two, I'll miss a letter from the IRS,
148
410047
2804
दोन, मी लंडनला असताना इथे इन्कम टॅक्सची नोटीस आलेली असेल.
06:52
and I'll get audited
149
412875
1515
मग ऑडिट होईल. किंवा माझ्यावर
06:54
or raided or shut down or some such.
150
414414
2538
छापा टाकतील किंवा टाळं लावतील वगैरे काहीतरी.
06:57
And then you go to the "Prevent" column.
151
417405
1974
मग पुढचा कॉलम "प्रतिबंध"
06:59
In that column, you write down the answer to:
152
419403
2150
यात पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा:
07:01
What could I do to prevent each of these bullets from happening,
153
421577
3095
या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी काय करावं?
07:04
or, at the very least, decrease the likelihood even a little bit?
154
424696
3474
किंवा, निदान त्या गोष्टी घडण्याची शक्यता थोडीशी कमी कशी करावी?
07:08
So for getting depressed in London,
155
428649
2395
तर, लंडनमध्ये उदास वाटू नये म्हणून मी माझ्याबरोबर
07:11
I could take a portable blue light with me
156
431068
2014
एक निळा दिवा घेऊन जाऊ शकतो.
07:13
and use it for 15 minutes in the morning.
157
433106
1995
आणि तो रोज सकाळी १५ मिनिटं वापरू शकतो.
07:15
I knew that helped stave off depressive episodes.
158
435125
2655
त्यामुळे नैराश्य येण्याचं प्रमाण कमी होतं.
07:17
For the IRS bit, I could change the mailing address on file with the IRS
159
437804
3871
इन्कम टॅक्स ऑफिसला मी माझ्या अकौंटंन्टचा पत्ता देऊ शकतो.
07:21
so the paperwork would go to my accountant
160
441699
2067
म्हणजे ती नोटीस माझ्या पत्त्याऐवजी
07:23
instead of to my UPS address.
161
443790
1953
त्याच्या हाती पडेल.
07:25
Easy-peasy.
162
445767
1449
किती सोपं आहे!
07:27
Then we go to "Repair."
163
447240
2042
पुढचा कॉलम, दुरुस्ती
07:30
So if the worst-case scenarios happen,
164
450058
2470
म्हणजे, त्या अतिशय वाईट गोष्टी घडल्याच,
07:32
what could you do to repair the damage even a little bit,
165
452552
2966
तर त्यांची, निदान थोडीशी तरी, दुरुस्ती कशी करावी?
07:35
or who could you ask for help?
166
455542
1766
कोणाकडे मदत मागावी?
07:38
So in the first case, London,
167
458251
1489
तर, लंडनच्या बाबतीत,
07:39
well, I could fork over some money, fly to Spain, get some sun --
168
459764
3675
मी थोडा खर्च करून विमानाने स्पेनला जाईन, सूर्यप्रकाश पाहीन.
07:43
undo the damage, if I got into a funk.
169
463463
2647
नैराश्य दुरुस्त करून उत्साही होईन.
07:46
In the case of missing a letter from the IRS,
170
466134
2409
इन्कम टॅक्सच्या बाबतीत,
07:48
I could call a friend who is a lawyer
171
468567
2441
मी माझ्या वकील मित्राला
07:51
or ask, say, a professor of law
172
471032
2494
किंवा लॉ प्रोफेसर मित्राला फोन करीन.
07:54
what they would recommend,
173
474597
1301
त्यांचा सल्ला घेईन.
07:55
who I should talk to, how had people handled this in the past.
174
475922
3196
त्यांना विचारीन, अशा वेळी लोक काय करतात?
07:59
So one question to keep in mind as you're doing this first page is:
175
479142
4037
हे पहिलं पान लिहिताना एक प्रश्न लक्षात ठेवायला हवा.
08:03
Has anyone else in the history of time
176
483203
2157
आजपर्यंतच्या इतिहासात आपल्याहून कमी चातुर्य
08:05
less intelligent or less driven
177
485384
2107
आणि प्रेरणा असणाऱ्या एखाद्या माणसाने
08:07
figured this out?
178
487515
1224
हा प्रश्न सोडवला आहे का?
08:09
Chances are, the answer is "Yes."
179
489203
2296
उत्तर होकारार्थी येण्याची दाट शक्यता आहे.
08:11
(Laughter)
180
491523
1002
(हशा)
08:12
The second page is simple:
181
492549
3077
दुसरं पान सोपं आहे.
08:16
What might be the benefits of an attempt or a partial success?
182
496073
3421
प्रयत्न करण्याचे किंवा थोडंसंच यश मिळण्याचे फायदे काय असू शकतील?
08:19
You can see we're playing up the fears
183
499518
1811
आपण इथे भीतीला झुकतं माप देतो आहोत
08:21
and really taking a conservative look at the upside.
184
501353
2882
आणि सकारात्मक गोष्टींकडे जरा बेतानेच बघतो आहोत.
08:24
So if you attempted whatever you're considering,
185
504744
2366
आपण आपल्या ध्येयासाठी प्रयत्न केले,
08:27
might you build confidence, develop skills,
186
507134
2184
तर आत्मविश्वास वाढू शकेल का?
08:29
emotionally, financially, otherwise?
187
509342
2782
भावनिक, आर्थिक किंवा इतर विकास होईल का?
08:32
What might be the benefits of, say, a base hit?
188
512148
2739
आणि ठोकलाच षटकार, तर काय फायदे होतील?
08:34
Spend 10 to 15 minutes on this.
189
514911
2067
या पानावर १० ते १५ मिनिटं वेळ द्या.
08:37
Page three.
190
517002
1546
पान तीन.
08:38
This might be the most important, so don't skip it:
191
518572
2412
हे सर्वात महत्त्वाचं आहे, गाळू नका.
08:41
"The Cost of Inaction."
192
521008
1550
"निष्क्रियतेमुळे होणारं नुकसान"
08:42
Humans are very good at considering what might go wrong
193
522582
2908
कोणतीही नवीन गोष्ट करताना काय चुका होऊ शकतील
08:45
if we try something new, say, ask for a raise.
194
525514
3389
हे शोधण्यात आपण पटाईत असतो. उदा. पगारवाढ मागणे.
08:48
What we don't often consider is the atrocious cost of the status quo --
195
528927
5598
पण निष्क्रियतेमुळे होणारं गंभीर नुकसान
08:54
not changing anything.
196
534549
1434
आपण लक्षात घेत नाही.
08:56
So you should ask yourself,
197
536779
1851
आपण स्वतःलाच विचारू,
08:58
if I avoid this action or decision
198
538654
3200
मी ही कृती करणं किंवा हा निर्णय घेणं टाळलं,
09:02
and actions and decisions like it,
199
542862
2523
किंवा, अशाच अनेक कृती किंवा निर्णय टाळले,
09:05
what might my life look like in, say, six months, 12 months, three years?
200
545409
4757
आणखी सहा महिने, बारा महिने, तीन वर्षांनंतर, माझं आयुष्य कसं असेल?
09:10
Any further out, it starts to seem intangible.
201
550190
2488
त्याहीपुढचं आयुष्य कसं असेल, कल्पनाही करवत नाही.
09:12
And really get detailed -- again, emotionally, financially,
202
552702
3847
आणखी सविस्तर कल्पना करा: भावनिक, आर्थिक,
09:16
physically, whatever.
203
556573
1198
शारीरिक परिणाम, वगैरे.
09:18
And when I did this, it painted a terrifying picture.
204
558391
2703
मी हे केलं, आणि एक भयानक चित्र दिसू लागलं.
09:21
I was self-medicating,
205
561118
1536
मी स्वतःवरच विषप्रयोग करीत होतो.
09:23
my business was going to implode at any moment at all times,
206
563237
3761
मी माझ्या बिझिनेसमधून बाजूला झालो नसतो, तर तो केव्हाही
09:27
if I didn't step away.
207
567022
1165
कोसळू शकला असता.
09:28
My relationships were fraying or failing.
208
568211
2533
मला कोणाची साथ मिळत नव्हती.
09:30
And I realized that inaction was no longer an option for me.
209
570768
4101
त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की आता मला निष्क्रिय राहणं शक्य नव्हतं.
09:35
Those are the three pages. That's it. That's fear-setting.
210
575951
2791
तर अशी ही तीन पानं. इतकीच. हीच भीती-निश्चिती.
09:38
And after this, I realized that on a scale of one to 10,
211
578766
3591
जर शून्य म्हणजे अत्यंत कमी परिणाम
09:42
one being minimal impact, 10 being maximal impact,
212
582381
3567
आणि १० म्हणजे सर्वात जास्त परिणाम असं प्रमाण ठरवलं, तर-
09:45
if I took the trip, I was risking
213
585972
1642
माझ्या लंडन प्रवासातला धोका
09:47
a one to three of temporary and reversible pain
214
587638
3334
म्हणजे १ ते ३ पातळीचं तात्पुरतं, दूर करता येणारं दुःख होतं.
09:50
for an eight to 10 of positive, life-changing impact
215
590996
4011
त्याबदल्यात मला ८ ते १० पातळीचा सकारात्मक, आणि जवळजवळ
09:55
that could be a semi-permanent.
216
595031
1602
कायमस्वरूपी फायदा झाला असता.
09:57
So I took the trip.
217
597209
1774
म्हणून मी तो प्रवास केला.
09:59
None of the disasters came to pass.
218
599007
1775
वरीलपैकी कोणतीच संकटं फिरकली नाहीत.
10:00
There were some hiccups, sure.
219
600806
1495
थोडे अडथळे नक्कीच आले.
10:02
I was able to extricate myself from the business.
220
602325
2542
मी स्वतःला बिझिनेसमधून बाहेर काढू शकलो.
10:04
I ended up extending that trip for a year and a half around the world,
221
604891
3858
तो प्रवास वाढवत मी दीड वर्षं जगभर फिरलो.
10:08
and that became the basis for my first book,
222
608773
2206
त्याच आधारावर मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं.
10:11
that leads me here today.
223
611003
1477
त्यामुळेच आज मी इथे आलो आहे.
10:12
And I can trace all of my biggest wins
224
612504
3332
वर्षातून निदान चार वेळा
10:15
and all of my biggest disasters averted
225
615860
2903
भीती निश्चिती केल्यामुळेच
10:18
back to doing fear-setting
226
618787
1882
मी यशस्वी होत गेलो
10:20
at least once a quarter.
227
620693
1571
आणि अनेक संकटं टाळू शकलो.
10:23
It's not a panacea.
228
623060
1169
हा रामबाण उपाय नाही.
10:24
You'll find that some of your fears are very well-founded.
229
624253
2890
काही वेळा भीतीमागे खरंच काही कारण असतं.
10:27
(Laughter)
230
627167
1055
(हशा)
10:28
But you shouldn't conclude that
231
628246
1651
पण असा निष्कर्ष काढण्याआधी
10:29
without first putting them under a microscope.
232
629921
2547
ती भीती सूक्ष्मपणे तपासली पाहिजे.
10:33
And it doesn't make all the hard times, the hard choices, easy,
233
633144
3209
आणि तरीही यामुळे सगळेच प्रश्न सुटणार नाहीत.
10:36
but it can make a lot of them easier.
234
636377
1951
पण निदान बरेचसे प्रश्न सोपे होतील.
10:39
I'd like to close with a profile of one of my favorite modern-day Stoics.
235
639005
4389
शेवटी, आजच्या काळातल्या माझ्या एका आवडत्या स्थितप्रज्ञाचं उदाहरण देतो.
10:43
This is Jerzy Gregorek.
236
643961
1922
हे आहेत जरझी ग्रेगोरेक
10:46
He is a four-time world champion in Olympic weightlifting,
237
646622
3429
ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत चार वेळा जागतिक विजेते.
10:50
political refugee,
238
650075
1374
राजकीय कारणामुळे निर्वासित.
10:51
published poet,
239
651473
1281
प्रसिद्ध कवी.
10:53
62 years old.
240
653366
1389
वय वर्षे ६२.
10:54
He can still kick my ass and probably most asses in this room.
241
654779
3470
आजही ते मला आणि आपल्यापैकी अनेकांना वरचढ ठरतील.
10:59
He's an impressive guy.
242
659257
1202
प्रभावी व्यक्तिमत्व.
11:00
I spent a lot of time on his stoa, his porch,
243
660483
2264
मी त्यांच्या "स्टोआ"वर पोर्च वर बराच काळ घालवला.
11:02
asking life and training advice.
244
662771
2004
आयुष्य, प्रशिक्षण याबद्दल प्रश्न विचारले.
11:05
He was part of the Solidarity in Poland,
245
665988
3184
"सॉलिडॅरिटी इन पोलंड" शी ते संलग्न होते.
11:09
which was a nonviolent movement for social change
246
669196
2666
ही अहिंसात्मक चळवळ सामाजिक बदलासाठी सक्रिय होती.
11:11
that was violently suppressed by the government.
247
671886
2777
सरकारने हिंसेच्या बळाने ती दडपून टाकली.
11:14
He lost his career as a firefighter.
248
674687
2046
अग्निशामक दलातली त्यांची नोकरी गेली.
11:16
Then his mentor, a priest, was kidnapped, tortured, killed
249
676757
3121
त्यांच्या मार्गदर्शकाचं अपहरण, छळ आणि हत्या करून
11:19
and thrown into a river.
250
679902
1634
नदीत फेकून देण्यात आलं.
11:21
He was then threatened.
251
681560
1214
ग्रेगोरेकनाही धमकी मिळाली
11:22
He and his wife had to flee Poland, bounce from country to country
252
682798
3158
त्यांना पोलंड सोडून पत्नीसहित देशोदेशी भटकावं लागलं.
11:25
until they landed in the US with next to nothing,
253
685980
2454
शेवटी ते अमेरिकेत पोहोचले. जवळ काहीच सामान नव्हतं.
11:28
sleeping on floors.
254
688458
1393
ते फरशीवर झोपत.
11:30
He now lives in Woodside, California, in a very nice place,
255
690495
3787
आता ते वुडसाईड, कॅलिफोर्निया येथे एका सुरेख घरात राहतात.
11:34
and of the 10,000-plus people I've met in my life,
256
694306
2625
आजवर मला जगात दहा हजारावर लोक भेटले असतील.
11:36
I would put him in the top 10,
257
696955
2284
त्या सर्वांत, यश आणि आनंद या बाबतीत
11:39
in terms of success and happiness.
258
699263
2194
मी यांचा क्रमांक पहिल्या दहात लावेन.
11:42
And there's a punchline coming, so pay attention.
259
702391
2327
आता नीट ऐका, महत्त्वाची गोष्ट पुढेच आहे.
11:44
I sent him a text a few weeks ago,
260
704742
1863
काही दिवसांपूर्वी मी त्यांना विचारलं,
11:46
asking him: Had he ever read any Stoic philosophy?
261
706629
2795
स्थितप्रज्ञतेबद्दल आपण काही वाचलं आहे काय?
11:49
And he replied with two pages of text.
262
709448
2398
त्यावर त्यांनी दोन पानी उत्तर पाठवलं.
11:51
This is very unlike him. He is a terse dude.
263
711870
2245
हे काही निराळंच होतं. कारण ते मितभाषी आहेत.
11:54
(Laughter)
264
714139
1492
(हशा)
11:55
And not only was he familiar with stoicism,
265
715655
3061
त्यांना स्थितप्रज्ञता ठाऊक होती, इतकंच नव्हे, तर
11:58
but he pointed out, for all of his most important decisions,
266
718740
3394
दरवेळी महत्त्वाचे निर्णय घेताना,
12:02
his inflection points,
267
722158
1507
किंवा काही निराळं करताना,
12:03
when he stood up for his principles and ethics,
268
723689
3586
आपल्या तत्त्वांचा आणि नीतिनियमांचा पाठपुरावा करताना त्यांनी
12:07
how he had used stoicism and something akin to fear-setting,
269
727962
3102
स्थितप्रज्ञता आणि भीती निश्चिती सारखीच एक पद्धत वापरल्याचं
12:11
which blew my mind.
270
731088
1162
पाहून मी चकित झालो.
12:12
And he closed with two things.
271
732274
1647
शेवटच्या दोन गोष्टी:
12:13
Number one: he couldn't imagine any life more beautiful
272
733945
3727
एक: त्यांच्या कल्पनेत सर्वात सुंदर आयुष्य आहे
12:17
than that of a Stoic.
273
737696
1459
स्थितप्रज्ञाचं.
12:20
And the last was his mantra, which he applies to everything,
274
740633
2928
आणि शेवटी, त्यांचा मंत्र, जो ते प्रत्येक गोष्टीसाठी वापरतात.
12:23
and you can apply to everything:
275
743585
2124
तुम्हीही तो प्रत्येक गोष्टीसाठी वापरू शकता:
12:27
"Easy choices, hard life.
276
747224
2009
"सोपे पर्याय, कठीण आयुष्य"
12:29
Hard choices, easy life."
277
749877
2509
"कठीण पर्याय, सोपं आयुष्य"
12:34
The hard choices --
278
754092
1977
कठीण पर्याय :
12:36
what we most fear doing, asking, saying --
279
756093
3809
जे बोलायची, विचारायची, करायची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते, ते.
12:40
these are very often exactly what we most need to do.
280
760841
3550
बरेचदा, आपण करायलाच हव्यात अशा या गोष्टी असतात.
12:45
And the biggest challenges and problems we face
281
765788
2489
मोठाली आव्हानं किंवा समस्या
12:48
will never be solved with comfortable conversations,
282
768301
3095
कधीच आरामशीर संवादाने सुटत नाहीत.
12:51
whether it's in your own head or with other people.
283
771420
2706
मग ते संवाद स्वतःशी असोत की इतरांबरोबरचे असोत.
12:55
So I encourage you to ask yourselves:
284
775184
1805
म्हणून म्हणतो, स्वतःलाच विचारा:
12:57
Where in your lives right now
285
777013
1915
तुम्हांला कोणत्या बाबतीत
12:58
might defining your fears be more important than defining your goals?
286
778952
4794
ध्येयनिश्चिती पेक्षा भीती-निश्चिती जास्त महत्त्वाची वाटते?
13:04
Keeping in mind all the while, the words of Seneca:
287
784786
3205
सेनेका यांचे शब्द सतत ध्यानी ठेवा:
13:08
"We suffer more often in imagination than in reality."
288
788015
3949
"वास्तवापेक्षा कल्पनेतच आपण जास्त त्रास भोगतो."
13:11
Thank you very much.
289
791988
1172
आभारी आहे.
13:13
(Applause)
290
793184
6858
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7