How to spark your curiosity, scientifically | Nadya Mason

133,497 views ・ 2020-05-07

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Transcriber: Joseph Geni Reviewer: Joanna Pietrulewicz
0
0
7000
Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:13
A friend called me a few weeks ago
1
13458
2351
काही आठवड्यांपूर्वी एका मैत्रिणीने मला फोन केला.
00:15
with bad news.
2
15833
1935
बातमी वाईट होती.
00:17
She dropped her cell phone into the toilet.
3
17792
2378
तिचा मोबाईल संडासात पडला होता.
00:21
Anyone here done that before?
4
21083
1851
आपल्यापैकी कोणाचं असं झालं आहे काय?
00:22
(Laughter)
5
22958
1685
(हशा)
00:24
So it was a bad situation.
6
24667
1559
परिस्थिती वाईट होती.
00:26
You know, without getting into the details of exactly how that happened
7
26250
3351
म्हणजे कसं घडलं, तिने तो बाहेर कसा काढला,
00:29
or how she got it out,
8
29625
1893
वगैरे तपशिलात न शिरता
00:31
let's just say it was a bad situation.
9
31542
2476
आपण इतकंच म्हणूया, की परिस्थिती वाईट होती.
00:34
And she panicked because, like for many of us,
10
34042
2726
ती पार घाबरून गेली, कारण आपल्या सर्वांप्रमाणे
00:36
her phone is one of the most used and essential tools in her life.
11
36792
4434
मोबाईल हे तिच्या आयुष्यातलं सर्वाधिक गरजेचं आणि वापराचं साधन आहे.
00:41
But, on the other hand, she had no idea how to fix it,
12
41250
3018
पण तो दुरुस्त कसा करायचा, हे काही तिला ठाउक नव्हतं.
00:44
because it's a completely mysterious black box.
13
44292
3291
कारण ते एक पूर्णपणे गूढ प्रकरण आहे.
00:48
So think about it: what would you do?
14
48083
2667
विचार करा: तुम्ही काय कराल?
00:51
What do you really understand about how your phone works?
15
51583
3226
मोबाईलचं कार्य कसं चालतं, हे तुम्हांला कितपत समजतं?
00:54
What are you willing to test or fix?
16
54833
3393
कोणत्या गोष्टीतला बिघाड शोधून तुम्ही ती दुरुस्त करू शकाल?
00:58
For most people, the answer is, nothing.
17
58250
3809
बरेचसे लोक म्हणतील, "कोणतीच नाही."
01:02
In fact, one survey found
18
62083
1810
एका पाहणीनुसार,
01:03
that almost 80 percent of smartphone users in this country
19
63917
3184
या देशातल्या मोबाईलधारकांपैकी ८०% लोकांनी
01:07
have never even replaced their phone batteries,
20
67125
2518
कधीच त्यांच्या मोबाईलची बॅटरी स्वतः बदललेली नाही.
01:09
and 25 percent didn't even know this was possible.
21
69667
3708
आणि २५% लोकांना, ती तशी बदलता येते हेही ठाऊक नाही.
01:14
Now, I'm an experimental physicist,
22
74500
2143
मी एक प्रयोगशील भौतिकशास्त्रज्ञ आहे.
01:16
hence the toys.
23
76667
1625
ही माझी खेळणी.
01:19
I specialize in making new types of nanoscale electronic devices
24
79458
4726
माझं विशेष कार्यक्षेत्र म्हणजे, मूलभूत क्वांटम मेकॅनिकल गुणधर्मांच्या अभ्यासासाठी
01:24
to study their fundamental quantum mechanical properties.
25
84208
3334
नवी सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक साधने बनवणे.
01:28
But even I wouldn't know where to start in terms of testing elements on my phone
26
88208
5518
पण माझा मोबाईल बिघडला, तर त्यावर चाचण्या कुठून सुरू कराव्यात,
01:33
if it broke.
27
93750
1476
हे मलाही समजणार नाही.
01:35
And phones are just one example of the many devices that we depend upon
28
95250
3976
मोबाईलसारख्या अनेक वस्तूंवर आपलं आयुष्य अवलंबून असतं,
01:39
but can't test, take apart, or even fully understand.
29
99250
4101
पण त्या कशा चालतात, त्या उघडून कशा तपासाव्यात, हे आपल्याला ठाऊक नसतं.
01:43
Cars, electronics, even toys are now so complicated and advanced
30
103375
4934
मोटारी, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी यांची रचना हल्ली इतकी गुंतागुंतीची आणि प्रगत असते, की
01:48
that we're scared to open and fix them.
31
108333
2584
ती उघडून दुरुस्त करण्याची आपल्याला भीती वाटते.
01:52
So here's the problem:
32
112375
2184
म्हणजे समस्या अशी आहे, की
01:54
there's a disconnect between us and the technology that we use.
33
114583
4792
आपण आणि आपल्या वापरातलं तंत्रज्ञान यामध्ये अंतर आहे.
02:00
We're completely alienated from the devices that we most depend upon,
34
120708
3851
ज्या साधनांवर आपण अवलंबून आहोत, त्यांच्याबद्दलच्या या दुराव्यामुळे
02:04
which can make us feel helpless and empty.
35
124583
2834
आपल्याला असहायता, रितेपणा वाटतो.
02:08
In fact, it's not surprising then that one study found
36
128125
3559
एका पाहणीच्या निष्कर्षानुसार,
02:11
that we are now more afraid of technology
37
131708
3185
आज आपल्या सर्वांना तंत्रज्ञानाची भीती
02:14
than we are of death.
38
134917
2601
मृत्यूपेक्षाही जास्त वाटते.
02:17
(Laughter)
39
137542
3851
(हशा)
02:21
But I think that we can reconnect to our devices,
40
141417
4684
पण मला वाटतं या साधनांशी सुसंवाद साधून
02:26
rehumanize them in a sense,
41
146125
2351
आपल्याला त्यांची ओळख करून घेता येईल,
02:28
by doing more hands-on experiments.
42
148500
2958
ती प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे.
02:32
Why? Well, because an experiment is a procedure to test a hypothesis,
43
152458
4685
का? कारण प्रयोगाद्वारे प्रमेयाची पडताळणी, किंवा
02:37
demonstrate a fact.
44
157167
1291
प्रात्यक्षिक देता येते.
02:39
It's the way that we use our senses,
45
159417
2976
जसे आपण आपली ज्ञानेंद्रिये,
02:42
our hands,
46
162417
1309
आपले हात
02:43
to connect the world
47
163750
1643
वापरुन जगाशी संपर्क साधतो
02:45
and figure out how it works.
48
165417
2392
आणि त्याविषयी माहिती घेतो.
02:47
And that's the connection that we're missing.
49
167833
2976
हा सुसंवाद हरवलेला आहे.
02:50
So let me give you an example.
50
170833
2518
आता मी एक उदाहरण देते.
02:53
Here's an experiment that I did recently
51
173375
1976
नुकताच मी हा प्रयोग केला,
02:55
to think about how a touchscreen works.
52
175375
2143
टचस्क्रीनचं कार्य कसं चालतं, ते पाहण्यासाठी.
02:57
It's just two metal plates,
53
177542
1892
या दोन धातूच्या तबकड्या आहेत.
02:59
and I can put charge on one of the plates from a battery.
54
179458
4084
बॅटरी वापरून मी यातील एक संभारित केली.
03:07
OK.
55
187917
1267
ठीक.
03:09
And I can measure the charge separation with this voltmeter here.
56
189208
3143
त्या भाराचं विस्थापन मी व्होल्टमीटरद्वारे मोजलं.
03:12
Now -- let's make sure it's working.
57
192375
1768
आता, ते नीट चालतं आहे का पाहू.
03:14
So when I wave my hand near the plates,
58
194167
2267
आता मी जेव्हा तबकड्यांजवळ माझा हात हलवेन,
03:16
you can see that the voltage changes
59
196458
2226
तेव्हा व्होल्टेज बदलल्याचं दिसेल.
03:18
just like the touchscreen responds to my hand.
60
198708
2542
टचस्क्रीनने माझ्या हाताला दिलेला हा प्रतिसाद.
03:21
But what is it about my hand? Now I need to do more experiments.
61
201958
3560
पण यात माझ्या हाताचं वैशिष्ट्य काय? आता मला आणखी प्रयोग केले पाहिजेत.
03:25
So I can, say, take a piece of wood
62
205542
2309
आता समजा मी एखादा लाकडाचा तुकडा घेतला,
03:27
and touch one of the plates and see that not much happens,
63
207875
3559
आणि एका तबकडीला जोडला, तर फारसं काही घडत नाही.
03:31
but if I take a piece of metal and touch the plate,
64
211458
2643
पण एखादा धातूचा तुकडा तबकडीला जोडला,
03:34
then the voltage changes dramatically.
65
214125
1875
तर व्होल्टेजमध्ये मोठा बदल होतो.
03:36
So now I can do further experiments to see what the difference is
66
216958
3143
आता मी आणखी प्रयोग करून, लाकूड आणि धातू यामधला फरक
03:40
between the wood and the metal,
67
220125
1559
शोधून काढू शकते.
03:41
and I should find out that the wood is not conducting
68
221708
2518
मला असं आढळून येईल, की लाकूड हे विद्युतवाहक नाही.
03:44
but the metal is conducting like my hand.
69
224250
2643
पण माझा हात आणि धातू, हे वाहक आहेत.
03:46
And, you see, I build up my understanding.
70
226917
2726
आता तुमच्या लक्षात आलं असेल, की यामुळे माझं ज्ञान वाढलं.
03:49
Like, now I can see why I can't use a touchscreen with gloves,
71
229667
3101
टचस्क्रीन वापरताना हातमोजे का घालू नयेत, ते आता मला समजतं.
03:52
because gloves aren't conducting.
72
232792
1666
कारण हातमोजे वाहक नसतात.
03:55
But I've also broken down some of the mystery behind the technology
73
235375
5101
आता माझ्यासाठी या तंत्रज्ञानामागचं रहस्य थोडंसं उलगडलं आहे.
04:00
and built up my agency,
74
240500
2101
माझ्या साधनांच्या मूलतत्त्वांशी
04:02
my personal input and interactions with the basis of my devices.
75
242625
4708
वैयक्तिक सुसंवाद साधण्याची माझी क्षमता वाढली आहे.
04:08
But experimenting is a step beyond just taking things apart.
76
248875
3476
पण प्रयोग करणं म्हणजे फक्त वस्तूंची मोडतोड करणं नव्हे.
04:12
It's testing and doing hands-on critical thinking.
77
252375
4018
प्रयोग म्हणजे परीक्षण करणे, आणि चिकित्सक विचारांनुसार प्रात्यक्षिक करणे.
04:16
And it doesn't really matter whether I'm testing how a touchscreen works
78
256417
3476
प्रयोग कशासाठी केला, हे महत्त्वाचं नाही. टचस्क्रीनचं कार्य तपासणं असो,
04:19
or if I'm measuring how conducting different types of materials are,
79
259917
3476
कोणता पदार्थ किती वाहक आहे हे शोधणं असो,
04:23
or even if I'm just using my hands to see how hard it is to break
80
263417
3476
किंवा किती जाडीचा पदार्थ हातांनी तोडता येतो,
04:26
different thicknesses of materials.
81
266917
2434
हे तपासणं असो.
04:29
In all cases, I'm gaining control and understanding
82
269375
3184
माझ्या साधनांच्या मूलतत्त्वाबद्दलची
04:32
of the basis of the things that I use.
83
272583
2209
माझी समज, त्यावरचं नियंत्रण याद्वारे वाढते.
04:35
And there's research behind this.
84
275875
1726
यामागे संशोधन आहे.
04:37
For one, I'm using my hands,
85
277625
1893
पहिली गोष्ट, मी माझे हात वापरते आहे.
04:39
which seem to promote well-being.
86
279542
2041
याचा संबंध आरोग्य सुधारण्याशी आहे.
04:42
I'm also engaging in hands-on learning,
87
282417
2351
दुसरी गोष्ट, मी प्रात्यक्षिकाद्वारे शिकते आहे.
04:44
which has been shown to improve understanding and retention,
88
284792
3976
यामुळे समज आणि स्मरणशक्ती वाढते, असं सिद्ध झालेलं आहे.
04:48
and even activate more parts of your brain.
89
288792
2541
यामुळे मेंदूच्या जास्त भागांना चालना मिळते.
04:52
So hands-on thinking through experiments
90
292125
3393
म्हणजे प्रयोग आणि प्रात्यक्षिकाद्वारे
04:55
connects our understanding,
91
295542
2226
विचार केल्याने आपल्याला
04:57
even our sense of vitality,
92
297792
2101
भोवतालच्या जगाचं, आपल्या अस्तित्वाचं,
04:59
to the physical world and the things that we use.
93
299917
2916
आणि आपल्या साधनांचं आकलन होतं.
05:03
Looking things up on the internet
94
303833
1726
आंतरजालावर माहिती शोधण्याचा
05:05
does not have the same effect.
95
305583
1625
असा परिणाम होत नाही.
05:09
Now, for me this focus on experiments
96
309500
2768
माझ्या बाबतीत प्रयोगाला
05:12
is also personal.
97
312292
1684
वैयक्तिक पातळीवर महत्त्व आहे.
05:14
I didn't grow up doing experiments.
98
314000
2018
मी लहानपणापासून प्रयोग करत नव्हते.
05:16
I didn't know what a physicist did.
99
316042
1892
भौतिकशास्त्रज्ञांविषयी माहिती नव्हती.
05:17
I remember my sister had a chemistry set that I always wanted to use
100
317958
3226
माझ्या बहिणीजवळ रसायनशास्त्राची उपकरणं होती, पण तिने मला
05:21
but she never let me touch.
101
321208
1334
कधीच हात लावू दिला नाही.
05:23
I felt mentally disconnected from the world
102
323708
2643
मला जगाशी मानसिकदृष्टया संपर्क तुटल्यासारखं वाटत असे,
05:26
and didn't know why.
103
326375
2018
आणि असं का वाटतं ते समजत नसे.
05:28
In fact, when I was nine years old,
104
328417
1851
मी नऊ वर्षांची होते, तेव्हा
05:30
my grandmother called me a solipsist,
105
330292
2309
माझी आजी मला अहंमात्र म्हणत असे.
05:32
which is something I had to look up.
106
332625
1768
या शब्दाचा अर्थ मला शोधावा लागला.
05:34
It means that you think that yourself is all that exists.
107
334417
3875
याचा अर्थ, जगात फक्त आपण एकटेच अस्तित्वात आहोत, असं वाटणं.
05:39
And at the time I was pretty offended,
108
339875
1893
त्यावेळी मला फार राग आला होता.
05:41
because whose grandmother calls them that?
109
341792
2101
कारण, कोणती आजी आपल्या नातीला असं म्हणेल?
05:43
(Laughter)
110
343917
2684
(हशा)
05:46
But I think that it was true.
111
346625
3851
पण मला वाटतं, ते खरं आहे.
05:50
And it wasn't until years later,
112
350500
2101
त्यानंतर अनेक वर्षांनी
05:52
when I was in college and studying basic physics,
113
352625
2934
जेव्हा मी विद्यापीठात मूलभूत भौतिकशास्त्र शिकत होते,
05:55
that I had a revelation
114
355583
1393
तेव्हा मला समजलं,
05:57
that the world,
115
357000
1268
की या जगाच्या,
05:58
at least the physical world,
116
358292
1851
निदान भौतिक जगाच्या
06:00
could be tested and understood,
117
360167
2434
चाचण्या करून ते समजून घेता येतं.
06:02
that I started to gain a completely different sense
118
362625
2434
जगाचं कार्य कसं चालतं,
06:05
of how the world worked
119
365083
1310
आणि त्यात माझं स्थान काय,
06:06
and what my place was in it.
120
366417
1976
याची एक निराळी जाण मला येऊ लागली.
06:08
And then later, when I was able my own testing
121
368417
3184
त्यानंतर जेव्हा स्वतः चाचण्या आणि संशोधन केल्याने
06:11
and understanding through research,
122
371625
1809
माझं आकलन वाढलं,
06:13
a big part of my connection to the world was complete.
123
373458
2750
तेव्हा जगाशी सुसंवाद साधण्यामधला एक मोठा भाग पूर्ण झाला.
06:17
Now, I know that not everyone is an experimental physicist by profession,
124
377000
5309
प्रत्येकजण प्रयोगशील भौतिकशास्त्र नसतो, हे मला ठाऊक आहे.
06:22
but I think that everyone could be doing more hands-on experiments.
125
382333
3584
पण मला वाटतं, प्रत्येकाने प्रयोग करून पाहायला हरकत नाही.
06:26
And actually I think we sort of --
126
386792
1809
आणि मला वाटतं --
06:28
I'll give you another example.
127
388625
2292
मी आणखी एक उदाहरण देते.
06:32
I was recently working with some middle school students,
128
392439
2620
नुकतीच मी माध्यमिक शाळेतल्या मुलांसोबत काम करत होते.
06:35
helping them learn about magnetism,
129
395083
1976
चुंबकत्व शिकण्यात मदत करत होते.
06:37
and I gave them a Magna Doodle to take apart.
130
397083
4351
मी त्यांना मॅग्ना डूडल [चुंबकीय पाटी] देऊन ती तोडायला सांगितली.
06:41
Remember one of these things?
131
401458
2084
आठवते का ती तुम्हांला?
06:46
So at first, none of them wanted to touch it.
132
406958
3851
सुरुवातीला तिला हात लावायला कोणीच तयार नव्हतं.
06:50
They'd been told for so long not to break things
133
410833
2768
वस्तू तोडू नका, असं सतत सांगितल्यामुळे
06:53
that they're accustomed to just passive using.
134
413625
3143
त्या निष्क्रियपणे वापरण्याची सवय मुलांना लागली आहे.
06:56
But then I started asking them questions.
135
416792
2017
पण मग मी त्यांना प्रश्न विचारू लागले.
06:58
You know, how does it work? What parts are magnetic?
136
418833
2518
या पाटीचं कार्य कसं चालतं? कोणते भाग चुंबकीय आहेत?
07:01
Can you make a hypothesis and test it?
137
421375
2101
याबद्दल एक गृहीतक मांडून ते सिद्ध कराल का?
07:03
But they still didn't want to break it open.
138
423500
2309
तरीसुद्धा पाटी तोडायला मुलं तयार नव्हती.
07:05
They wanted to take it home with them, really.
139
425833
2226
खरं तर त्यांना ती घरी न्यावीशी वाटत होती.
07:08
Until, one kid finally sliced it through and found really cool stuff inside.
140
428083
5226
शेवटी एका मुलाने ती कापली, आणि त्याला तिच्यात काहीतरी अद्भुत आढळलं.
07:13
And so this is something we can do here together.
141
433333
2351
आता आपण सर्वजण हे इथे करून पाहू.
07:15
They're pretty easy to take apart.
142
435708
1667
या पाट्या तोडायला सोप्या असतात.
07:20
See, there's a magnet inside, and I can just cut this open.
143
440958
5167
हे पहा, यात एक लोहचुंबक आहे. मी हे असं कापणार आहे.
07:29
Cut it open again, you can split it.
144
449833
2018
आता ते उघडून त्याचे भाग अलग करणार आहे.
07:31
OK, so when I do that -- I don't know if you can see this,
145
451875
3518
आता तुम्हांला आतलं दिसत नसेल,
07:35
but there is sort of -- there it is, this oozy white stuff in here.
146
455417
3809
पण इथे आत एक पांढरा पातळ पदार्थ दिसतो आहे.
07:39
Now you can see it on my finger.
147
459250
1684
तो माझ्या बोटावर तुम्हांला दिसेल.
07:40
And when I drag the pen on it,
148
460958
3584
यावर हे पेन ओढताच त्याला
07:47
you can see that these filaments are attached to it.
149
467375
4018
हे तंतू चिकटलेले तुम्हांला दिसतील.
07:51
So the kids saw this,
150
471417
1559
हे बघताच मुलांना वाटलं,
07:53
and at this point they're like, this is really cool.
151
473000
2434
हे काहीतरी छान मजेदार दिसतं आहे.
07:55
They got excited.
152
475458
1268
त्यांचा उत्साह वाढला.
07:56
They all started ripping them open and taking them apart
153
476750
2934
त्यांनी पाट्या तोडायला, फाडायला सुरवात केली.
07:59
and yelling out the things that they discovered,
154
479708
2851
आणि आत काय सापडलं,
08:02
how these magnetic filaments connected to the magnetic pen
155
482583
3768
चुंबकीय तंतू लोहचुंबकाला कसे चिकटतात, त्यामुळे पाटीवर लिहिलं कसं जातं
08:06
and that's how it wrote.
156
486375
1309
हे ती ओरडून सांगू लागली.
08:07
Or, how the oozy white stuff kept things dispersed so it could write.
157
487708
3334
किंवा तो पांढरा पदार्थ कसा सगळीकडे पसरतो, त्यामुळे लिहिता येतं, असं.
08:12
And as they were leaving the room,
158
492167
1684
खोलीतून बाहेर जाताजाता
08:13
two of them turned to me and said,
159
493875
2018
त्यापैकी दोघी वळून मला म्हणाल्या,
08:15
"We loved that.
160
495917
1559
"आम्हांला हे फार आवडलं.
08:17
Me and her are going home this weekend to do more experiments."
161
497500
3476
आम्ही दोघी आठवड्याच्या शेवटी घरी आणखी प्रयोग करणार."
08:21
(Laughter)
162
501000
2583
(हशा)
08:26
Yeah, I know, the parents in there are worried about it,
163
506542
2684
मला ठाऊक आहे, हे ऐकून पालक काळजीत पडले असतील.
08:29
but it's a good thing!
164
509250
2351
पण ही एक चांगली गोष्ट आहे.
08:31
Experimenting is good, and actually I found it extremely gratifying,
165
511625
3518
प्रयोग करणं चांगलंच. मला त्यातून मोठं समाधान मिळालं.
08:35
and I think hopefully it was very life-enriching for them.
166
515167
5142
आणि त्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा फायदा झाला असेल, अशी आशा आहे.
08:40
Because, even a basic magnet
167
520333
2726
कारण, एक साधा लोहचुंबक वापरून
08:43
is something that we can experiment with at home.
168
523083
2643
आपण घरी प्रयोग करू शकतो.
08:45
They're both simple and complex at the same time.
169
525750
3809
साध्यासोप्या प्रयोगांप्रमाणेच आपण जास्त गुंतागुंतीचे प्रयोगही करू शकतो.
08:49
For example, you can ask yourself,
170
529583
1685
उदाहरणार्थ, स्वतःला प्रश्न विचारा,
08:51
how can the same material both attract and repel?
171
531292
3351
या एका पदार्थामुळे आकर्षण आणि अपकर्षण दोन्ही क्रिया कशा होतात?
08:54
If I take a magnet, is it useful if I can get one of them
172
534667
3517
एक लोहचुंबक वापरून दुसऱ्याचं परिभ्रमण घडवून आणता आलं,
08:58
to rotate the other, for example?
173
538208
3185
तर त्याचा काही उपयोग होईल का?
09:01
Or, you can take this dollar bill over here,
174
541417
3476
किंवा, ही डॉलरची नोट घ्या.
09:04
and I can take a set of magnets,
175
544917
1601
मी हे लोहचुंबक घेते.
09:06
and you can see that the dollar bill gets lifted by the magnets.
176
546542
4434
लोहचुंबकामुळे ही नोट कशी उचलली जाते, पहा.
09:11
There's magnetic ink hidden in here that prevents counterfeiting.
177
551000
4309
या नोटेत चुंबकीय शाई दडली आहे. त्यामुळे बनवटगिरीला आळा बसतो.
09:15
Or, here I have some crushed-up bran cereal. OK?
178
555333
3351
इथे ही ब्रान सिरीयल [गव्हाच्या कोंड्याचा पदार्थ] आहे.
09:18
And that's also magnetic. Right?
179
558708
2893
ही सुद्धा चुंबकीय आहे. हो ना?
09:21
That has iron in it.
180
561625
2476
कारण त्यात लोह आहे.
09:24
(Laughter)
181
564125
1351
(हशा)
09:25
And that can be good for you, right?
182
565500
2268
आणि ते आरोग्याला चांगलं. हो ना?
09:27
OK, here's something else.
183
567792
2017
आता आणखी एक.
09:29
This thing over here is not magnetic.
184
569833
1851
ही वस्तू चुंबकीय नाही.
09:31
I can't lift it up with the magnet.
185
571708
2976
लोहचुंबक वापरून ती उचलली जात नाही.
09:34
But now I'm going to make it cold.
186
574708
1768
पण मी आता ती थंड करणार आहे.
09:36
The same thing in here, cold,
187
576500
2351
हीच इथली वस्तू, पण थंड.
09:38
and when I make it cold,
188
578875
1542
ती वस्तू थंड करून
09:45
and put it on top of the magnet,
189
585000
1917
या लोहचुंबकावर ठेवल्यावर,
09:49
so --
190
589458
1393
पहा..
09:50
(Applause)
191
590875
1268
(टाळ्या)
09:52
It's amazing.
192
592167
1250
हे अद्भुत आहे.
09:57
That's not magnetic,
193
597792
2142
ती वस्तू चुंबकीय नाही,
09:59
but somehow it's interacting with a magnet.
194
599958
2810
पण तरीही लोहचुंबकाशी सुसंवाद साधते आहे.
10:02
So clearly understanding this is going to take many more experiments.
195
602792
3892
हे नीट समजून घ्यायला आणखी बरेच प्रयोग करावे लागतील.
10:06
In fact, this is something that I've spent much of my career studying.
196
606708
3310
खरं तर माझ्या व्यावसायिक आयुष्यातला बराच काळ मी हे शिकत आहे.
10:10
It's called a superconductor.
197
610042
1458
याला सुपरकंडक्टर म्हणतात.
10:12
Now, superconductors can be complex,
198
612083
3435
सुपरकंडक्टर ही कल्पना क्लिष्ट आहे.
10:15
but even simple experiments can connect us better to the world.
199
615542
4559
पण अगदी साधे प्रयोग सुद्धा आपल्याला जगाची चांगली माहिती करून देऊ शकतात.
10:20
So now if I tell you that flash memory works by rotating small magnets,
200
620125
4851
मी जर म्हटलं, की फ्लॅश मेमरीचं कार्य छोट्या लोहचुंबकांच्या परिभ्रमणामुळे चालतं,
10:25
then you can imagine it. You've seen it.
201
625000
2518
तर तुम्हांला कल्पना येईल. कारण हे तुम्ही पाहिलेलं आहे.
10:27
Or, if I say that MRI machines
202
627542
2226
किंवा मी म्हटलं, की एम आर आय यंत्रं
10:29
use magnetism to rotate magnetic particles in your body,
203
629792
4434
चुंबकत्व वापरून आपल्या शरीरातल्या चुंबकीय कणांचं परिभ्रमण घडवून आणतात,
10:34
you've seen it done.
204
634250
1851
तर ते तुम्ही पाहिलेलं आहे.
10:36
You've interacted with the technology and understood the basis of these devices.
205
636125
7125
म्हणजे तंत्रज्ञानाशी तुमचा सुसंवाद होऊन, या साधनांचं मूलतत्त्व तुम्हांला समजलं आहे.
10:45
Now, I know that it's hard to add more things to our lives,
206
645958
5810
मला ठाऊक आहे, की आपल्या रोजच्या आयुष्यात जास्तीची कामं वाढवून घेणं कठीण आहे.
10:51
especially experiments.
207
651792
2351
विशेष करून प्रयोग.
10:54
But I think that the challenge is worth it.
208
654167
2934
पण मला वाटतं, हे आव्हान घेऊन पाहण्यासारखं आहे.
10:57
Think about how something works, then take it apart to test it.
209
657125
4101
एखाद्या गोष्टीच्या कार्याबद्दल कल्पना करा. ती गोष्ट तोडा, आणि तपासून पहा.
11:01
Manipulate something and prove some physical principle to yourself.
210
661250
4125
एखादी गोष्ट हाताळून पहा, आणि एखादं भौतिक तत्त्व स्वतःशी सिद्ध करा.
11:06
Put the human back in the technology.
211
666292
3041
तंत्रज्ञानाला मानवतेची जोड द्या.
11:10
You'll be surprised at the connections that you make.
212
670250
2893
यामुळे साधला जाणारा सुसंवाद तुम्हांला थक्क करून टाकेल.
11:13
Thank you.
213
673167
1976
धन्यवाद.
11:15
(Applause)
214
675167
2166
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7