Stop being a bystander in your own life | Tracy Edwards

108,543 views ・ 2020-07-22

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:13
Being able to navigate is an extraordinary gift,
0
13254
3725
नौकानयन करता येणे ही एक असामान्य दैवी देणगी आहे.
00:17
and there is nothing like it in the world.
1
17003
2093
जगात त्यासारखं दुसरं काही नाही.
00:19
I get no more sense of satisfaction greater than leaving a port
2
19120
6682
माझ्यासाठी सर्वोच्च समाधानाची गोष्ट म्हणजे एखाद्या बंदरातून निघाल्यानंतर,
00:25
and knowing that I can get my team and my boat
3
25826
4397
ही बोट आणि आपला चमू आपण सुरक्षितपणे दुसऱ्या बंदरापर्यंत नेऊ
00:30
safely from that port to another port,
4
30247
2465
हा विश्वास वाटणे.
00:32
maybe three, four, five, six thousand miles away.
5
32736
3600
मग ते बंदर तीन, चार, पाच, सहा हजार मैल दूर का असेना.
00:37
Being at sea, for me, is ...
6
37019
2278
मला वाटतं, समुद्रावरचा प्रवास
00:39
it's total freedom,
7
39321
1538
म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य.
00:40
and it is the ultimate opportunity to be you,
8
40883
5124
आपल्या स्वभावानुसार जगण्याची सुवर्णसंधी.
00:46
because you can't be anything else.
9
46031
1715
तिथे दुसरं काही करणं शक्यच नाही.
00:47
You are naked in front of your peers on a boat.
10
47770
2807
बोटीतल्या सहकाऱ्यांसमोर तुम्ही जणु नग्नावस्थेत असता.
00:50
It is a small area.
11
50601
1424
ती एक छोटीशी जागा असते.
00:52
Maiden is 58 feet long.
12
52049
2235
आमची 'मेडन' बोट ५८ फूट लांबीची आहे.
00:54
There's 12 women in a 58-foot boat.
13
54308
2399
५८ फुटी जहाजामध्ये १२ स्त्रिया.
00:56
I mean, you are literally up against each other,
14
56731
2744
म्हणजे तुम्ही अक्षरशः एकमेकांसमोर असता.
00:59
and so you have to be you.
15
59499
2456
म्हणून तिथे स्वतःच्या स्वभावानुसारच वागावं लागतं.
01:01
The greatest moment for me when I'm sailing
16
61979
3275
माझ्यासाठी समुद्रप्रवासातला सर्वात मोठा क्षण कोणता,
01:05
is the moment that the land disappears.
17
65278
3039
तर ज्या क्षणी जमीन दिसेनाशी होते, तो.
01:08
It's an indescribable moment of --
18
68341
2844
तो एक अवर्णनीय क्षण असतो.
01:11
(Gasps)
19
71209
1094
(दीर्घ श्वास)
01:12
adventure and no turning back,
20
72327
3507
साहसाचा. मागे न फिरण्याचा.
01:15
and just you and the boat and the elements.
21
75858
4317
फक्त आपण, आपली बोट आणि पंचमहाभूतं.
01:20
I wish everyone could experience this at least once in their lives.
22
80199
3737
प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी हे अनुभवावं अशी माझी इच्छा आहे.
01:23
The further you get away from land,
23
83960
2056
आपण जमिनीपासून जितके दूर जाऊ,
01:26
the more you kind of fit into yourself.
24
86040
2754
तितके जास्त स्वतःसारखे होत जातो.
01:28
It is you,
25
88818
1230
तिथे फक्त तुम्हीच असता.
01:30
how do we get to the next place,
26
90072
1593
पुढच्या ठिकाणावर कसं पोहोचायचं?
01:31
how do we stay alive,
27
91689
1455
आपले जीव कसे सांभाळायचे?
01:33
how do we look after each other
28
93168
2602
एकमेकांची काळजी कशी घ्यायची
01:35
and what do we do to get to the other side.
29
95794
2420
आणि सुखरूप पैलतीरी कसं पोहोचायचं?
01:38
So the question I get asked the most when I go and do talks
30
98670
3704
मी व्याख्यानं द्यायला जाते, तेव्हा हा प्रश्न मला सर्वात जास्त विचारला जातो:
01:42
is "How do you become an ocean-racing sailor?"
31
102398
3864
महासागरी शर्यतीत भाग कसा घ्यायचा?
01:46
And that's a really good question.
32
106286
1730
हा अतिशय चांगला प्रश्न आहे.
01:48
And I've always wanted to say "I had a vision,
33
108040
3413
मला सांगायला आवडलं असतं, की "आधी मला तसा आभास झाला.
01:51
which became a dream,
34
111477
1205
मग ते माझं स्वप्न बनलं,
01:52
which became an obsession,"
35
112706
2459
मग तो माझा ध्यास झाला."
01:55
but, of course, life's not like that,
36
115189
2016
पण अर्थात, आयुष्य तसं नसतं.
01:57
and one thing I'm really anxious for people to know about me
37
117229
3576
एक गोष्ट लोकांना सांगण्याची मला फार उत्कंठा आहे.
02:00
is that my life hasn't gone from A to B --
38
120829
2731
माझं आयुष्य अ बिंदूपासून ब बिंदूकडे गेलं नाही.
02:03
because how many people can say their lives just go from A to B;
39
123584
3159
कारण आपलं आयुष्य अ पासून ब पर्यंत गेलं, असं किती लोक सांगू शकतील?
02:06
they think, "I'm going to do this," and they go and do it?
40
126767
3277
किती लोक "मी हे करेन" म्हणतात, आणि तसं करतात?
02:10
So I tell the truth.
41
130953
1556
म्हणून मी सत्य तेच सांगते.
02:12
And the truth is that I was expelled from school when I was 15 years old,
42
132533
3434
ते असं, की वयाच्या १५व्या वर्षी मला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं.
02:15
and my long-suffering headmaster sent a long-suffering note
43
135991
4653
वैतागलेल्या मुख्याध्यापकांनी एक वैतागाचं लांबलचक पत्र लिहिलं.
02:20
to my long-suffering mother,
44
140668
1342
माझ्या वैतागलेल्या आईला.
02:22
basically saying that if Tracy darkens these doors of the school again,
45
142034
4658
त्याचा अर्थ इतकाच, की ट्रेसीची सावली जरी शाळेच्या दारात पडली,
02:26
then we will call the police.
46
146716
1706
तर पोलिसांना बोलवू.
02:28
And my mum took me and she said,
47
148446
3785
आईने मला जवळ घेतलं आणि ती म्हणाली,
02:32
"Darling, education is not for everyone."
48
152255
3202
"डार्लिंग, शिक्षण हे प्रत्येकाला जमतंच असं नाही."
02:35
And then she gave me the best piece of advice anyone has ever given me.
49
155481
3742
त्यानंतर तिने मला सर्वात मोलाचा सल्ला दिला.
02:39
She said, "Every single one of us is good at something,
50
159247
3318
ती म्हणाली, "आपल्यापैकी प्रत्येकाला एखाद्या विषयात गती असते.
02:42
you just have to go and find what that is."
51
162589
2814
तो विषय कोणता, ते शोधून काढायला हवं."
02:45
And at the age of 16, she let me go backpacking off to Greece.
52
165427
3728
आणि वयाच्या १६व्या वर्षी तिने मला पाठीवर बॅगपॅक बांधून ग्रीसमध्ये पाठवलं.
02:49
I ended up working on boats, which was OK --
53
169715
3001
मी बोटींवर कामं करू लागले. ठीक चाललं होतं.
02:52
17 years old, didn't really know what I wanted to do,
54
172740
3318
माझं वय सतरा वर्षांचं होतं. आपल्याला काय करायचंय ते कळत नव्हतं.
02:56
kind of going with the flow.
55
176082
1820
प्रवाहाबरोबर वाहत जात होते.
02:57
And then on my second transatlantic,
56
177926
2711
अटलांटिक महासागरावरच्या दुसऱ्या सफरीवेळी
03:00
my skipper said to me, "Can you navigate?"
57
180661
2404
कप्तानाने मला विचारलं, "तुला बोट चालवता येते?"
03:03
And I said, "Of course I can't navigate,
58
183089
1933
मी म्हटलं, "छे! मला नाही येत.
03:05
I was expelled before long division."
59
185046
1763
भागाकार शिकण्यापूर्वी शाळेने हाकललं."
03:06
And he said, "Don't you think you should be able to navigate?
60
186833
2917
तो म्हणाला, "आपल्याला ते यावं, असं नाही वाटत तुला?
03:09
What happens if I fall over the side?
61
189774
1796
मी बोटीवरून खाली समुद्रात पडलो, तर?
03:11
Stop being a bystander in your own life,
62
191594
1914
आयुष्याकडे त्रयस्थासारखं बघणं थांबव.
03:13
stop looking at what you're doing
63
193532
1893
आपण काय करतो ते नुसतं पाहू नकोस.
03:15
and start taking part."
64
195449
1722
त्यात प्रत्यक्ष भाग घे."
03:17
This day, for me, was the day that my whole life started.
65
197839
3540
आणि त्या दिवशी माझ्या संपूर्ण आयुष्याला सुरुवात झाली.
03:21
I learned to navigate in two days --
66
201403
2017
दोन दिवसांत मी बोट चालवायला शिकले.
03:23
and this is someone who hates numbers
67
203444
2079
मी, आकडे न आवडणारी व्यक्ती.
03:25
and sees them as hieroglyphics.
68
205547
1618
आकड्यांना गूढ चिन्हलिपी मानणारी.
03:27
It opened up avenues and opportunities to me that I could never have imagined.
69
207872
4244
यामुळे माझ्या कल्पनेपलीकडचे मार्ग आणि संधी मला मिळाल्या.
03:32
I actually managed to get a ride on a Whitbread Round the World Race boat.
70
212140
3725
मी व्हिटब्रेड पृथ्वीप्रदक्षिणा शर्यतीच्या बोटीवर स्थान मिळवलं.
03:35
It was with 17 South African men and me.
71
215889
3085
माझ्याबरोबर सतरा दक्षिण आफ्रिकन पुरुष होते.
03:38
I was 21 years old,
72
218998
1885
माझं वय होतं एकवीस वर्षं.
03:40
and it was the longest nine months of my life.
73
220907
2145
ते नऊ महिने मला फार मोठे वाटले.
03:43
But I went as a cook,
74
223076
1674
मी स्वयंपाकी म्हणून गेले होते.
03:44
I managed to survive until the end,
75
224774
1709
मी शेवटपर्यंत टिकून राहिले.
03:46
and when I got to end of this race,
76
226507
1731
शर्यत संपली,
03:48
I realized that there were 230 crew in this race,
77
228262
3840
तेव्हा मला कळलं, की शर्यतीत २३० लोकांनी भाग घेतला होता.
03:52
and three women,
78
232126
1166
आणि तीन महिला.
03:53
and I was one of them.
79
233316
1151
त्यापैकी मी एक होते.
03:54
And I'm a lousy cook.
80
234491
1603
मी फार वाईट स्वयंपाक करते.
03:56
I'm a really good navigator.
81
236118
1744
पण मी जहाज उत्तमरीत्या चालवू शकते.
03:58
I think the second most profound thought in my entire life was:
82
238759
4629
मला वाटतं, माझ्या आयुष्यातला दुसरा महत्त्वाचा विचार असा, की
04:03
"No man is ever going to allow me to be a navigator on their boat, ever."
83
243412
5571
"कोणताही पुरुष मला त्याची बोट कधीच चालवू देणार नाही."
04:09
And that is still the case today.
84
249393
1899
हे आजही खरं आहे.
04:11
In 35 years of the Whitbread,
85
251316
1757
व्हिटब्रेड शर्यतीच्या ३५ वर्षांत
04:13
there's only been two female navigators that haven't been on an all-female cruise,
86
253097
3919
संपूर्ण महिला चमूची जहाजं वगळता, फक्त दोन महिला खलाशांनी भाग घेतला आहे.
04:17
and that's how Maiden was born.
87
257040
1508
यातूनच मेडन बोटीचा जन्म झाला.
04:18
That was the moment I thought, "I've got something to fight for."
88
258572
3493
त्यावेळी मला वाटलं, "मला याविरुद्ध लढलं पाहिजे."
04:22
And I had no idea that I wanted to have this fight,
89
262089
3829
आपण याविरुद्ध लढणार आहोत याची पूर्वकल्पना नसूनही
04:25
and it was something that I took to like a duck to water.
90
265942
4500
एखादं बदक पाण्यात उतरावं तशी मी सहज सुरुवात केली.
04:30
I discovered things about myself that I had no idea existed.
91
270932
4558
माझ्या स्वभावातल्या काही गोष्टी मलाच नव्याने समजल्या.
04:35
I discovered I had a fighting spirit,
92
275836
2493
माझ्यातल्या लढाऊ वृत्तीचा शोध लागला.
04:38
I discovered I was competitive --
93
278353
1752
माझ्यात स्पर्धक वृत्ती आहे हे समजलं,
04:40
never knew that before --
94
280129
1613
जे यापूर्वी ठाऊक नव्हतं.
04:41
and I discovered my second passion,
95
281766
3604
माझ्या मनातला दुसरा ध्यास समजला.
04:45
which was equality.
96
285394
2231
समानतेचा आग्रह.
04:47
I couldn't let this one lie.
97
287649
2318
हा ध्यास मी सोडू शकले नसते.
04:49
And it became not just about me wanting to navigate on a boat
98
289991
3547
हा ध्यास फक्त माझ्यापुरता नव्हता. मला बोट चालवायला मिळावी,
04:53
and having to put my own crew together
99
293562
2202
माझे खलाशी निवडावे
04:55
and my own team,
100
295788
1375
आणि चमू गोळा करावा,
04:57
raise my own money, find my own boat,
101
297187
2117
स्वतः पैसे उभे करावे आणि बोट घ्यावी,
04:59
so that I could be navigator.
102
299328
1911
मी स्वतः नौकाचालक होणं हा ध्यास नव्हता.
05:01
This was about women everywhere.
103
301263
1565
तर सर्व स्त्रियांसाठी.
05:02
And this was when I realized
104
302852
2166
यावेळी माझ्या लक्षात आलं, की
05:05
that this was probably what I was going to spend the rest of my life doing.
105
305042
3852
कदाचित आपण यापुढच्या आयुष्यात हेच काम करणार आहोत.
05:08
It took ages for us to find the money
106
308918
1845
बऱ्याच काळाच्या प्रयत्नांनी पैसे जमवून
05:10
to do the 1989 Whitbread Round the World Race.
107
310787
2632
१९८९ सालच्या व्हिटब्रेड पृथ्वीप्रदक्षिणा शर्यतीला गेलो.
05:13
And as we looked at all the big,
108
313443
2009
तिथे आमच्या भोवती मोठमोठ्या
05:15
multimillion pound, all-male projects around us,
109
315476
3750
लक्षावधी पौंड्स किंमतीच्या बोटी होत्या. त्यातले सर्व खलाशी पुरुष होते.
05:19
with their brand-new shiny boats designed for the race,
110
319250
3835
खास शर्यतीकरिता बनवलेल्या त्या नव्याकोऱ्या चकचकीत बोटी
05:23
we realized this was not going to be us.
111
323109
3092
पाहून आमच्या लक्षात आलं, की आपल्याजवळ असं काही नाही.
05:26
We had to make this up as we went along.
112
326225
1929
आम्हांला सुधारणा करणं भाग होतं.
05:28
No one had enough faith in us to give us this kind of money.
113
328178
2957
इतकी प्रचंड रक्कम देण्याइतका विश्वास कोणी आमच्यावर ठेवला नसता.
05:31
So I mortgaged my house,
114
331159
1352
मग मी माझं घर गहाण ठेवलं.
05:32
and we found an old wreck with a pedigree,
115
332535
3602
आम्हांला एक नादुरुस्त बोट सापडली. तिलाही इतिहास होता.
05:36
an old Whitbread boat --
116
336161
1154
व्हिटब्रेड शर्यतीत
05:37
it had already been around the world twice --
117
337339
2116
तिने दोनदा पृथ्वीप्रदक्षिणा केली होती.
05:39
in South Africa.
118
339479
1272
ती दक्षिण आफ्रिकेत होती.
05:40
We somehow persuaded some guy to put it on a ship
119
340775
2596
कशीबशी एका माणसाला विनंती करून, त्याच्या जहाजावरून
05:43
and bring it back to the UK for us.
120
343395
2379
आम्ही तिला इंग्लंडला आणवलं.
05:45
The girls were horrified at the state of the boat.
121
345798
3457
बोटीची दुर्दशा बघून माझ्या चमूतल्या मुली घाबरल्या.
05:49
We got a free place in a yard.
122
349632
1810
एका यार्डात आम्हांला मोफत जागा मिळाली.
05:51
We got her up on the hard and we redesigned her,
123
351466
3218
तिथे नेऊन आम्ही तिची पुनर्रचना केली.
05:54
we ripped her apart,
124
354708
1443
तिचे भाग सुटे केले.
05:56
we did all the work ourselves.
125
356175
2304
हे सगळं आम्ही स्वतःच केलं.
05:58
It was the first time that anyone had ever seen women in a shipyard,
126
358503
3302
त्या यार्डात स्त्रिया आलेल्या याआधी कोणी पाहिल्या नव्हत्या.
06:01
so that was quite entertaining.
127
361829
1583
ते फार मजेशीर होतं.
06:03
Every morning when we would walk in,
128
363436
1992
रोज सकाळी आम्ही तिथे गेलो, की
06:05
everyone would just gawk at us.
129
365452
1983
लोक वेड्यासारखे आम्हांला बघत राहत.
06:07
But it also had its advantages, because everyone was so helpful.
130
367459
3747
पण त्याचे फायदेही होते. कारण ते सगळे आम्हांला मदत करत.
06:11
We were such a novelty.
131
371230
2174
आम्ही म्हणजे एक नवलाईची गोष्ट बनलो होतो.
06:13
You know, we got given a generator, an engine --
132
373428
2811
कोणीतरी आम्हांला एक जुना जनरेटर आणि एक इंजिन दिलं.
06:16
"Do you want this old rope?"
133
376263
1417
"हा जुना दोर हवा का?"
06:17
"Yep."
134
377704
1182
"होय."
06:18
"Old sails?"
135
378910
1170
"जुनी शिडं?"
06:20
"Yep, we'll have those."
136
380104
1162
"हो, चालतील. "
06:21
So we really made it up as we went along.
137
381290
2191
असं आम्ही साहित्य गोळा करत गेलो.
06:23
And I think, actually, one of the huge advantages we had was,
138
383505
4127
मला वाटतं, आम्हांला एक मोठा फायदा मिळाला.
06:27
you know, there was no preconceived idea
139
387656
2912
यापूर्वी कोणालाच कल्पना नव्हती, की
06:30
about how an all-female crew would sail around the world.
140
390592
2930
स्त्रियांचा चमू पृथ्वीप्रदक्षिणा कशा पद्धतीने करेल.
06:33
So whatever we did was OK.
141
393546
2467
त्यामुळे आम्ही जे केलं, ते योग्यच ठरलं.
06:36
And what it also did was it drew people to it.
142
396037
4019
आणि त्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं गेलं.
06:40
Not just women --
143
400080
1151
फक्त स्त्रियाच नव्हेत,
06:41
men, anyone who'd ever been told,
144
401255
2414
पुरुषही, ज्यांना याआधी सांगितलं गेलं होतं,
06:43
"You can't do something because you're not good enough" --
145
403693
2799
"अमुक गोष्ट करू नकोस, कारण तुला ती तितकीशी जमणार नाही --
06:46
the right gender or right race or right color, or whatever.
146
406516
3003
तुझं लिंग, वर्ण, जात किंवा असलंच काहीतरी योग्य नाही म्हणून."
06:49
Maiden became a passion.
147
409543
2823
मेडन बोट हा एक ध्यास बनला.
06:52
And it was hard to raise the money --
148
412390
3163
त्यासाठी पैसे जमवणं फार कठीण होतं.
06:55
hundreds of companies wouldn't sponsor us.
149
415577
2082
शेकडो संस्थांनी नकार दिला.
06:57
They told us that we couldn't do it,
150
417683
2333
त्या म्हणाल्या, "हे तुम्ही करू शकणार नाही."
07:00
people thought we were going to die ...
151
420040
2458
या प्रयत्नात आमचं मरण ओढवेल, असं लोकांना वाटत होतं.
07:02
You know, guys would literally come up to me and say,
152
422522
2550
खरोखरच लोक माझ्याजवळ येऊन म्हणत,
07:05
"You're going to die."
153
425096
1200
"यात तुमचा जीव जाईल."
07:06
I'd think, "Well, OK, that's my business, it's not yours."
154
426320
3280
मला वाटे, "तो माझा प्रश्न आहे. तुमचा नव्हे."
07:09
In the end, King Hussein of Jordan sponsored Maiden,
155
429948
2620
शेवटी, जॉर्डनचे राजे हुसेन यांनी आर्थिक साहाय्य केलं.
07:12
and that was an amazing thing --
156
432592
2439
ही नवलाईची गोष्ट होती.
07:15
way ahead of his time, all about equality.
157
435055
2531
त्यांनी काळाच्या पुढे जाऊन, समानतेला पाठिंबा दिला.
07:17
We sailed around the world with a message of peace and equality.
158
437610
3070
शांती आणि समानतेचा संदेश घेऊन आम्ही जगपर्यटन केलं.
07:20
We were the only boat in the race with a message of any kind.
159
440704
3508
एखादा संदेश घेऊन शर्यतीत उतरलेली ही आमची एकमेव बोट होती.
07:24
We won two legs of the Whitbread --
160
444236
2358
व्हिटब्रेड शर्यतीतल्या दोन टप्प्यांत आम्ही जिंकलो,
07:26
two of the most difficult legs --
161
446618
1643
सर्वात कठीण टप्प्यांमधले हे दोन.
07:28
and we came second overall.
162
448285
1635
आणि संपूर्ण शर्यतीत दुसरा क्रमांक.
07:29
And that is still the best result for a British boat since 1977.
163
449944
4475
१९७७ पासूनच्या ब्रिटिश इतिहासातला हा विक्रम अजून अबाधित आहे.
07:34
It annoyed a lot of people.
164
454443
1709
या विजयामुळे अनेकांचा जळफळाट झाला.
07:36
And I think what it did at the time --
165
456176
1852
त्या वेळी आम्ही काय केलं,
07:38
we didn't realize.
166
458052
1244
हे आम्हांला समजलं नव्हतं.
07:39
You know, we crossed the finishing line, this incredible finish --
167
459320
3189
आम्ही अंतिम रेषा ओलांडली. शर्यतीचा शेवट अविश्वसनीय झाला.
07:42
600 boats sailing up the Solent with us;
168
462533
2845
सोलेन्ट सामुद्रधुनीमधून आमच्याबरोबर सहाशे बोटी येत होत्या.
07:45
50,000 people in Ocean Village chanting "Maiden, Maiden" as we sailed in.
169
465402
6952
आम्ही बंदरात येतेवेळी ओशियन व्हिलेज मध्ये ५० हजार लोक "मेडन, मेडन" चा घोष करत होते.
07:52
And so we knew we'd done something that we wanted to do
170
472378
2801
त्यावेळी समजलं, की आम्ही आमचं ध्येय पूर्ण केलं आहे.
07:55
and we hoped we'd achieved something good,
171
475203
2763
आपली कामगिरी चांगली झाली असेल, अशी आम्हांला आशा होती,
07:57
but we had no idea at the time how many women's lives we changed.
172
477990
5300
पण आमच्यामुळे किती स्त्रियांची आयुष्यं बदलली असतील याची कल्पना नव्हती.
08:04
The Southern Ocean is my favorite ocean.
173
484018
1905
दक्षिण समुद्र हा माझा आवडता समुद्र आहे.
08:05
Each ocean has a character.
174
485947
1627
समुद्राला व्यक्तिमत्व असतं.
08:07
So the North Atlantic is a yomping ocean.
175
487598
2856
उत्तर अटलांटिक समुद्र हा उत्साही समुद्र आहे.
08:10
It's a jolly, go-for-it, heave-ho type of --
176
490478
4017
आनंदी, तत्पर आणि जोरकस,
08:14
have-fun type of ocean.
177
494519
1729
हा धमाल समुद्र आहे.
08:16
The Southern Ocean is a deadly serious ocean.
178
496272
3707
दक्षिण समुद्र हा अत्यंत गंभीर समुद्र आहे.
08:20
And you know the moment when you cross into the Southern Ocean --
179
500003
4196
तिथे पोहोचल्यावर लगेच समजतं, की आपण दक्षिण समुद्रात प्रवेश केला,
08:24
the latitude and longitude --
180
504223
1664
त्या अक्षांश रेखांशावर आलो.
08:25
you know when you're there,
181
505911
1580
तिथे पोहोचताच
08:27
the waves have been building,
182
507515
1571
लाटा येऊ लागतात,
08:29
they start getting big whitecaps on the top,
183
509110
2531
त्यांच्यावर पांढरा फेस दिसू लागतो.
08:31
it becomes really gray,
184
511665
1453
सगळीकडे धुरकट दिसू लागतं.
08:33
you start to get sensory deprivation.
185
513142
2051
काही कळेनासं होतं.
08:35
It is very focused on who you are and what you are
186
515556
4881
फक्त आपण कोण आहोत, काय करतो आहोत, इतकंच समजतं.
08:40
with this massive wilderness around you.
187
520461
3277
भोवताली निसर्गाचं प्रचंड स्वरूप दिसतं.
08:44
It is empty.
188
524118
1151
सर्वत्र रिकामं दिसतं.
08:45
It is so big and so empty.
189
525293
3421
किती प्रचंड, किती रिकामा.
08:49
You see albatrosses swirling around the boat.
190
529297
2858
बोटीभोवती समुद्रपक्षी घिरट्या घालताना दिसतात.
08:52
It takes about four days to sail through their territory,
191
532179
2953
त्यांच्या क्षेत्रातून बाहेर पडायला सुमारे चार दिवस लागतात.
08:55
so you have the same albatross for four days.
192
535156
2499
त्यामुळे तेच पक्षी चार दिवस दिसत राहतात.
08:57
And they find us quite a novelty,
193
537679
1715
त्यांनाही आपल्याला पाहून नवल वाटतं.
08:59
so they literally windsurf off the wind that comes off the mainsail
194
539418
5396
त्यामुळे शिडावरून येणाऱ्या वाऱ्यासोबत भराऱ्या मारत
09:04
and they hang behind the boat,
195
544838
2786
ते बोटीच्या मागेमागे राहतात.
09:07
and you feel this presence behind you,
196
547648
1866
त्यामुळे मागे कोणीतरी आहे असा भास होऊन
09:09
and you turn around,
197
549538
1185
आपण मागे वळतो.
09:10
and it's this albatross just looking at you.
198
550747
2084
तर काय, तो समुद्रपक्षी आपल्याला पाहत असतो.
09:12
We sold Maiden at the end of the race --
199
552855
1980
शर्यतीच्या शेवटी आम्ही मेडन विकली.
09:14
we still had no money.
200
554859
1370
आमच्याजवळ पैसे नव्हते.
09:16
And five years ago, we found her,
201
556253
2048
पाच वर्षांपूर्वी आम्हांला ती परत मिळाली.
09:18
at the same time as a film director decided
202
558325
2579
त्याचवेळी एका दिग्दर्शकाने ठरवलं, की
09:20
he wanted to make a documentary about Maiden.
203
560928
2817
मेडनबद्दल माहितीपट करायचा.
09:23
We found Maiden,
204
563769
1151
आम्हांला मेडन सापडली.
09:24
she burst back into my life
205
564944
1377
ती धडाक्याने परत आली.
09:26
and reminded me a lot of things I had forgotten, actually,
206
566345
3318
तिने आठवणी परत आणल्या,
09:29
over the years,
207
569687
1296
गेल्या काही वर्षांतल्या.
09:31
about following my heart and my gut
208
571007
2628
आपल्या इच्छेप्रमाणे जगावं
09:33
and really being part of the universe.
209
573659
2467
आणि जगाचा एक भाग व्हावं, याची आठवण.
09:36
And everything I find important in life,
210
576150
4099
आयुष्यात मला जे काही महत्त्वाचं वाटतं,
09:40
Maiden has given back to me.
211
580273
1675
ते सर्व मेडनमुळे मिळालं आहे.
09:41
Again, we rescued her --
212
581972
2087
पुन्हा एकदा आम्ही तिला जीवदान दिलं.
09:44
we did a Crowdfunder --
213
584083
1173
जनता मदतफंड उभा केला.
09:45
we rescued her from the Seychelles.
214
585280
2022
आफ्रिकेतल्या सेयशल्स मधून तिला सोडवलं.
09:47
Princess Haya, King Hussein's daughter,
215
587326
2308
राजे हुसेन यांची राजकन्या हाया हिने
09:49
funded the shipping back to the UK and then the restoration.
216
589658
3605
मेडनला इंग्लडला परत आणण्याचा आणि तिच्या डागडुजीचा खर्च उचलला.
09:53
All the original crew were involved.
217
593287
1815
मूळ चमूतील सर्व खलाशी यात सहभागी झाले.
09:55
We put the original team back together.
218
595126
1948
आम्ही जुना चमू परत उभा केला.
09:57
And then we decided, what are we going to do with Maiden?
219
597640
2798
आणि मग विचार केला, "आता पुढे मेडनचं काय करायचं?"
10:00
And this, for me, really was the moment of my life
220
600462
2754
यावेळी माझ्या मनात
10:03
where I looked back on every single thing that I'd done --
221
603240
3096
भूतकाळातली प्रत्येक गोष्ट उभी राहिली.
10:06
every project, every feeling,
222
606360
2142
प्रत्येक प्रकल्प, मनातली प्रत्येक भावना,
10:08
every passion, every battle, every fight --
223
608526
3024
प्रत्येक ध्यास, प्रत्येक लढा, झगडा.
10:11
and I decided that I wanted Maiden to continue that fight
224
611574
3112
म्हणून मी ठरवलं, की मेडनने हा लढा पुढे सुरु ठेवायला हवा.
10:14
for the next generation.
225
614710
1519
पुढच्या पिढीसाठी.
10:16
Maiden is sailing around the world on a five-year world tour.
226
616253
3292
आता मेडन पाच वर्षांची जागतिक सफर करत आहे.
10:19
We are engaging with thousands of girls all over the world.
227
619569
4144
जगभरातल्या हजारो मुलींशी आम्ही संवाद साधत आहोत.
10:23
We are supporting community programs that get girls into education.
228
623737
4571
मुलींना शिक्षणाकडे वळवणाऱ्या सामाजिक उपक्रमांना साहाय्य करत आहोत.
10:28
Education doesn't just mean sitting in a classroom.
229
628332
3121
शिक्षण म्हणजे केवळ वर्गात बसणं नव्हे.
10:31
This, for me, is about teaching girls you don't have to look a certain way,
230
631477
5133
तर त्यांना चुकीच्या कल्पना दाखवून देणं. तुम्ही असंच दिसलं पाहिजे, हे चुकीचं आहे.
10:36
you don't have to feel a certain way,
231
636634
2389
तुमच्या भावना अशाच असल्या पाहिजेत,
10:39
you don't have to behave a certain way.
232
639047
1883
तुम्ही असंच वागलं पाहिजे, हे चूक.
10:40
You can be successful,
233
640954
1199
तुम्ही यशस्वी होऊ शकता.
10:42
you can follow your dreams
234
642177
1249
स्वप्नं पूर्ण करू शकता.
10:43
and you can fight for them.
235
643450
1517
त्यासाठी लढा देऊ शकता.
10:44
Life doesn't go from A to B.
236
644991
1699
आयुष्य अ पासून ब पर्यंत जात नसतं.
10:46
It's messy.
237
646714
1158
ते गुंतागुंतीचं असतं.
10:47
My life has been a mess from beginning to end,
238
647896
2812
माझ्या आयुष्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतागुंत होती.
10:50
but somehow I've got to where we're going.
239
650732
2617
पण त्यातूनच मी इथवर पोहोचले.
10:53
The future for us and Maiden looks amazing.
240
653373
3771
आमचं आणि मेडनचं भविष्य उज्जवल आहे.
10:57
And for me,
241
657168
1628
माझ्यासाठी,
10:58
it is all about closing the circle.
242
658820
2161
हे एक वर्तुळ पूर्ण करण्यासारखं आहे.
11:01
It's about closing the circle with Maiden
243
661005
2519
मेडनबरोबरचं वर्तुळ पूर्ण करणं.
11:03
and using her to tell girls
244
663548
2663
आणि तिच्या साहाय्याने मुलींना सांगणं,
11:06
that if just one person believes in you,
245
666235
2407
फक्त एका व्यक्तीचा तुमच्यावर विश्वास असेल, तर
11:08
you can do anything.
246
668666
1175
काहीही साध्य करता येतं.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7