What really happens when you mix medications? | Russ Altman

188,719 views ・ 2016-03-23

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
So you go to the doctor and get some tests.
0
12811
3321
आपण डॉक्टरकडे जातो. चाचण्या करवून घेतो.
00:16
The doctor determines that you have high cholesterol
1
16674
2620
डॉक्टर आपलं कोलेस्टेरॉल वाढल्याचं अनुमान काढतात.
00:19
and you would benefit from medication to treat it.
2
19318
3171
त्यासाठी औषध घेतलं तर फायदा होईल, असंही म्हणतात.
00:22
So you get a pillbox.
3
22981
1556
मग आपल्याला गोळ्यांची डबी देतात.
00:25
You have some confidence,
4
25505
1199
आपल्याला आणि डॉक्टरांनाही
00:26
your physician has some confidence that this is going to work.
5
26728
2937
विश्वास वाटतो, की हा उपाय लागू पडणार आहे.
00:29
The company that invented it did a lot of studies, submitted it to the FDA.
6
29689
3553
हे औषध बनवणाऱ्या कंपनीने एफडीए ला अभ्यासपूर्ण निष्कर्ष सादर केले होते.
00:33
They studied it very carefully, skeptically, they approved it.
7
33266
3107
त्यांनी काळजीपूर्वक अभ्यास आणि चिकित्सा करून औषधाला मान्यता दिली.
00:36
They have a rough idea of how it works,
8
36397
1889
त्याचे गुणधर्म ते ढोबळमानाने जाणतात.
00:38
they have a rough idea of what the side effects are.
9
38310
2453
त्याचे दुष्परिणामही त्यांना ढोबळ मानाने माहीत आहेत.
00:40
It should be OK.
10
40787
1150
म्हणजे सगळं ठीक होईल.
00:42
You have a little more of a conversation with your physician
11
42864
2818
पण पुढच्या संभाषणाने डॉक्टर जरा काळजीत पडतात.
00:45
and the physician is a little worried because you've been blue,
12
45706
2963
कारण आपल्याला उदास वाटत असतं.
00:48
haven't felt like yourself,
13
48693
1293
काहीतरी बिनसल्यासारखं.
00:50
you haven't been able to enjoy things in life quite as much as you usually do.
14
50010
3731
नेहमीच्या आवडीच्या गोष्टींत पूर्वीसारखा आनंद वाटत नसतो.
00:53
Your physician says, "You know, I think you have some depression.
15
53765
3186
डॉक्टर म्हणतात, मला वाटतं, तुम्हांला थोडंसं नैराश्य सतावतं आहे.
00:57
I'm going to have to give you another pill."
16
57792
2315
मी तुम्हांला आणखी एक गोळी देतो.
01:00
So now we're talking about two medications.
17
60934
2483
तर आता आपण दोन औषधांविषयी बोलतो आहोत.
01:03
This pill also -- millions of people have taken it,
18
63441
3104
ही दुसरी गोळी देखील, लक्षावधी लोकांनी घेतली आहे.
01:06
the company did studies, the FDA looked at it -- all good.
19
66569
3631
कंपनीने अभ्यास केला होता, एफडीए ने निरीक्षण केलं होतं, अगदी व्यवस्थित.
01:10
Think things should go OK.
20
70823
2057
सगळं ठीक व्हायला हवं.
01:12
Think things should go OK.
21
72904
2197
सगळं ठीक व्हायला हवं.
01:15
Well, wait a minute.
22
75125
1439
पण, जरा एक मिनिट थांबा.
01:16
How much have we studied these two together?
23
76588
3517
आपण या दोन गोळ्यांचा एकत्रित अभ्यास किती केला?
01:20
Well, it's very hard to do that.
24
80630
2300
तसं करणं फार कठीण आहे.
01:22
In fact, it's not traditionally done.
25
82954
2130
खरं तर, तसं करण्याची पद्धतच नाही.
01:25
We totally depend on what we call "post-marketing surveillance,"
26
85108
5518
आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो, तो औषधविक्री झाल्यानंतर केलेल्या निरीक्षणांवर.
01:30
after the drugs hit the market.
27
90650
1880
औषध बाजारात आल्यानंतर.
01:32
How can we figure out if bad things are happening
28
92996
2848
दोन औषधांचे एकमेकांवर विपरित परिणाम होत असतील,
01:35
between two medications?
29
95868
1357
तर ते आपण कसे ओळखणार?
01:37
Three? Five? Seven?
30
97249
2030
तीन औषधं? पाच? सात?
01:39
Ask your favorite person who has several diagnoses
31
99708
2415
अनेक व्याधी असलेल्या एखाद्या व्यक्तीला विचारा,
01:42
how many medications they're on.
32
102147
1834
की ते किती औषधं घेतात.
01:44
Why do I care about this problem?
33
104530
1580
मला या प्रश्नाविषयी
01:46
I care about it deeply.
34
106134
1157
कळकळ का वाटते?
01:47
I'm an informatics and data science guy and really, in my opinion,
35
107315
4304
कारण मी डाटा आणि माहिती तंत्रज्ञ आहे.
01:51
the only hope -- only hope -- to understand these interactions
36
111643
3745
माझ्या मते, या परस्परक्रिया जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे,
01:55
is to leverage lots of different sources of data
37
115412
3056
अनेक उगमस्थानांतून मिळणाऱ्या माहितीचा फायदा घेऊन
01:58
in order to figure out when drugs can be used together safely
38
118492
3556
त्यातून निष्कर्ष काढणे, की कोणती औषधं सुरक्षितपणे एकत्र वापरता येतील
02:02
and when it's not so safe.
39
122072
1777
आणि कोणती येणार नाहीत.
02:04
So let me tell you a data science story.
40
124615
2051
माहितीशास्त्राची एक गोष्ट सांगतो.
02:06
And it begins with my student Nick.
41
126690
2154
ती सुरु होते माझा विद्यार्थी निक, याच्यापाशी.
02:08
Let's call him "Nick," because that's his name.
42
128868
2380
आपण त्याला निक म्हणू, कारण तेच त्याचं नाव आहे.
02:11
(Laughter)
43
131272
1592
(हशा)
02:12
Nick was a young student.
44
132888
1201
निक, एक तरुण विद्यार्थी.
02:14
I said, "You know, Nick, we have to understand how drugs work
45
134113
3079
मी म्हणालो,निक, आपल्याला औषधं कशी कार्य करतात, ते बघायचं आहे.
02:17
and how they work together and how they work separately,
46
137216
2626
ती एकत्रित, तसंच एकेकटी कशी कार्य करतात, ते बघायचं आहे.
02:19
and we don't have a great understanding.
47
139866
1922
आणि आपल्याजवळ काही फारशी माहिती नाही.
02:21
But the FDA has made available an amazing database.
48
141812
2405
पण एफडीए ने एक चांगला डेटाबेस उपलब्ध करून दिला आहे.
02:24
It's a database of adverse events.
49
144241
1699
औषधांच्या दुष्परिणामांचा डेटाबेस.
02:26
They literally put on the web --
50
146321
1642
त्यांनी तो इंटरनेटवर दिला आहे.
02:27
publicly available, you could all download it right now --
51
147987
3119
तो सार्वजनिक आहे. आपण सगळे तो या क्षणी डाउनलोड करू शकतो.
02:31
hundreds of thousands of adverse event reports
52
151130
3627
शेकडो हजारो दुष्परिणामकारक घटनांचे अहवाल,
02:34
from patients, doctors, companies, pharmacists.
53
154781
3760
रुग्ण, डॉक्टर्स, औषधकंपन्या आणि औषधविक्रेते यांच्याकडून आलेले.
02:38
And these reports are pretty simple:
54
158565
1749
आणि हे अहवाल अगदी साधे असतात.
02:40
it has all the diseases that the patient has,
55
160338
2658
त्यात रुग्णाच्या सर्व व्याधींची नावं असतात.
02:43
all the drugs that they're on,
56
163020
1767
त्याच्या सर्व औषधांची नावं असतात.
02:44
and all the adverse events, or side effects, that they experience.
57
164811
3818
आणि रुग्णाने अनुभवलेले सर्व दुष्परिणाम किंवा गौण परिणाम असतात.
02:48
It is not all of the adverse events that are occurring in America today,
58
168653
3436
अमेरिकेत सापडणारे एकूणएक गौण परिणाम यात आहेत, असं नव्हे.
02:52
but it's hundreds and hundreds of thousands of drugs.
59
172113
2578
पण यात शेकड्यामागून शेकडो हजार औषधं आहेत.
02:54
So I said to Nick,
60
174715
1299
मग मी निक ला म्हणालो,
02:56
"Let's think about glucose.
61
176038
1826
आपण ग्लुकोजचा विचार करू.
02:57
Glucose is very important, and we know it's involved with diabetes.
62
177888
3567
ग्लुकोज ही फार महत्त्वाची आहे. तिचा मधुमेहाशी संबंध आहे हे आपण जाणतो.
03:01
Let's see if we can understand glucose response.
63
181479
3970
ग्लुकोजवर होणारा परिणाम आपल्याला समजला आहे का, ते पाहू.
03:05
I sent Nick off. Nick came back.
64
185473
2458
असं म्हणून मी निक ला निरोप दिला. तो परत आला.
03:08
"Russ," he said,
65
188248
1786
तो म्हणाला, "रस, "
03:10
"I've created a classifier that can look at the side effects of a drug
66
190351
5112
मी एक वर्गवारी तयार केली आहे. ती या डेटाबेसच्या आधारे
03:15
based on looking at this database,
67
195487
2051
औषधाचे गौण परिणाम पाहते,
03:17
and can tell you whether that drug is likely to change glucose or not."
68
197562
4271
आणि ते औषध ग्लुकोजवर परिणाम करण्याचा संभव आहे की नाही, ते सांगते.
03:21
He did it. It was very simple, in a way.
69
201857
2016
तर त्याने हे करून दाखवलं. तसं ते साधं होतं.
03:23
He took all the drugs that were known to change glucose
70
203897
2635
ग्लुकोजवर परिणाम करणारी सर्व औषधं त्याने निवडली.
03:26
and a bunch of drugs that don't change glucose,
71
206556
2389
तशीच ग्लुकोजवर परिणाम न करणारीही काही निवडली.
03:28
and said, "What's the difference in their side effects?
72
208969
2888
त्याने विचार केला, "त्यांच्या गौण परिणामांत काय फरक आहे?"
03:31
Differences in fatigue? In appetite? In urination habits?"
73
211881
4852
थकव्यात, भुकेच्या प्रमाणात, किंवा मूत्रविसर्जनात फरक?
03:36
All those things conspired to give him a really good predictor.
74
216757
2960
या सर्व उत्तरांमुळे त्याला अटकळ बांधायला चांगली मदत झाली.
03:39
He said, "Russ, I can predict with 93 percent accuracy
75
219741
2548
तो म्हणाला, "रस, एखादं औषध ग्लुकोजवर परिणाम करेल का,
03:42
when a drug will change glucose."
76
222313
1572
हे मी ९३% अचूक सांगू शकतो."
03:43
I said, "Nick, that's great."
77
223909
1416
मी म्हणालो, "निक, उत्तम काम."
03:45
He's a young student, you have to build his confidence.
78
225349
2896
तो एक तरुण विद्यार्थी आहे. त्याचा आत्मविश्वास वाढवायला हवा.
03:48
"But Nick, there's a problem.
79
228269
1390
"पण निक, एक अडचण आहे. "
03:49
It's that every physician in the world knows all the drugs that change glucose,
80
229683
3960
जगातला प्रत्येक डॉक्टर, ग्लुकोजवर परिणाम करणारी औषधं कोणती, ते जाणतो.
03:53
because it's core to our practice.
81
233667
2038
कारण हा त्यांच्या व्यवसायाचा गाभा आहे.
03:55
So it's great, good job, but not really that interesting,
82
235729
3722
तर, हे उत्तम आहे, पण तितकंसं महत्त्वाचं नाही.
03:59
definitely not publishable."
83
239475
1531
प्रसिद्ध करण्यासारखं तर नाहीच.
04:01
(Laughter)
84
241030
1014
(हशा)
04:02
He said, "I know, Russ. I thought you might say that."
85
242068
2550
तो म्हणाला, "रस, मला वाटलंच होतं तुम्ही असं म्हणाल."
04:04
Nick is smart.
86
244642
1152
हुशार आहे निक.
04:06
"I thought you might say that, so I did one other experiment.
87
246149
2874
तुम्ही असं म्हणाल, म्हणूनच मी आणखी एक प्रयोग केला.
04:09
I looked at people in this database who were on two drugs,
88
249047
2928
या डेटाबेसमध्ये दोन औषधं घेणारे जे लोक होते, ते पाहिले.
04:11
and I looked for signals similar, glucose-changing signals,
89
251999
4422
आणि ग्लुकोज पातळीतल्या बदलाच्या खुणा पाहिल्या,
04:16
for people taking two drugs,
90
256445
1624
दोन औषधं घेणाऱ्यांमध्ये समान अशा.
04:18
where each drug alone did not change glucose,
91
258093
5569
जिथे प्रत्येक औषध एकटं ग्लुकोजवर परिणाम करीत नव्हतं,
04:23
but together I saw a strong signal."
92
263686
2460
पण एकत्रित असताना मला अगदी प्रबळ खूण दिसली.
04:26
And I said, "Oh! You're clever. Good idea. Show me the list."
93
266170
3149
मी म्हणालो, "ओह! हुशार आहेस. कल्पना चांगली आहे. तुझी यादी दाखव."
04:29
And there's a bunch of drugs, not very exciting.
94
269343
2254
यादीतली औषधं फार दखल घेण्याजोगी नव्हती.
04:31
But what caught my eye was, on the list there were two drugs:
95
271621
3932
पण त्यातल्या दोन औषधांनी माझी नजर वेधून घेतली.
04:35
paroxetine, or Paxil, an antidepressant;
96
275577
3393
पेरॉक्सेटिन किंवा पॅक्सील हे निराशारोधक,
04:39
and pravastatin, or Pravachol, a cholesterol medication.
97
279756
3570
आणि प्रावास्टॅटिन किंवा प्रावाकॉल हे कोलेस्टेरॉलसाठी.
04:43
And I said, "Huh. There are millions of Americans on those two drugs."
98
283936
4283
आणि मी म्हटलं, "हो, लक्षावधी अमेरिकन्स ही औषधं घेताहेत. "
04:48
In fact, we learned later,
99
288243
1246
खरं तर, आम्हाला नंतर कळलं,
04:49
15 million Americans on paroxetine at the time, 15 million on pravastatin,
100
289513
6032
त्यावेळी १५ दशलक्ष लोक पेरॉक्सेटिन आणि १५ दशलक्ष लोक प्रावास्टॅटिन घेत होते.
04:55
and a million, we estimated, on both.
101
295569
2817
आमच्या अंदाजाप्रमाणे एक दशलक्ष लोक दोन्ही औषधं घेत असावेत.
04:58
So that's a million people
102
298767
1254
म्हणजे, एक दशलक्ष लोकांना
05:00
who might be having some problems with their glucose
103
300045
2453
ग्लुकोजच्या पातळीची समस्या असू शकते.
05:02
if this machine-learning mumbo jumbo that he did in the FDA database
104
302522
3206
म्हणजे याने एफडीए चा डेटाबेस वापरून जो काही तांत्रिक जादूटोणा केला,
05:05
actually holds up.
105
305752
1254
तो खरा असेल तर.
05:07
But I said, "It's still not publishable,
106
307030
1927
मी म्हणालो, हे प्रकाशित करणं शक्य नाही.
05:08
because I love what you did with the mumbo jumbo,
107
308981
2296
कारण तुझा जादूटोणा मला आवडला असला,
05:11
with the machine learning,
108
311301
1246
संगणकाची हुशारी देखील,
05:12
but it's not really standard-of-proof evidence that we have."
109
312571
3864
तरी हा काही प्रमाण पुरावा नव्हे.
05:17
So we have to do something else.
110
317618
1589
काहीतरी वेगळं करावं लागेल.
05:19
Let's go into the Stanford electronic medical record.
111
319231
2876
आपण स्टॅनफर्ड मेडिकल रेकॉर्ड पाहू.
05:22
We have a copy of it that's OK for research,
112
322131
2064
त्याची ही एक प्रत संशोधनासाठी वापरता येईल.
05:24
we removed identifying information.
113
324219
2046
त्यातली ओळख पटवणारी माहिती काढून टाकली आहे.
05:26
And I said, "Let's see if people on these two drugs
114
326581
2503
मी म्हटलं, "ही दोन औषधं घेणाऱ्या लोकांना
05:29
have problems with their glucose."
115
329108
1769
ग्लुकोजची समस्या आहे का, ते पाहू."
05:31
Now there are thousands and thousands of people
116
331242
2207
स्टॅनफर्ड मेडिकल रेकॉर्डस् मध्ये
05:33
in the Stanford medical records that take paroxetine and pravastatin.
117
333473
3459
पेरॉक्सेटिन आणि प्रावास्टॅटिन घेणाऱ्या हजारो लोकांची नावं आहेत.
05:36
But we needed special patients.
118
336956
1799
पण आम्हांला काही खास रुग्ण हवे होते,
05:38
We needed patients who were on one of them and had a glucose measurement,
119
338779
4597
ज्यांनी यातलं एक औषध घेत असताना ग्लुकोजची मोजणी केली,
05:43
then got the second one and had another glucose measurement,
120
343400
3449
नंतर दुसरं औषधही घेऊ लागल्यावर पुन्हा ग्लुकोजची मोजणी केली,
05:46
all within a reasonable period of time -- something like two months.
121
346873
3615
आणि हे सगळं थोडक्या काळात, समजा दोन महिन्यांत.
05:50
And when we did that, we found 10 patients.
122
350512
3159
याप्रमाणे शोधल्यावर आम्हांला असे १० रुग्ण सापडले.
05:54
However, eight out of the 10 had a bump in their glucose
123
354592
4538
परंतु या १० पैकी ८ रुग्णांच्या ग्लुकोजची पातळी, "दुसरा प" सुरु केल्यावर--
05:59
when they got the second P -- we call this P and P --
124
359154
2645
या औषधांना आद्याक्षरांप्रमाणे आम्ही "प आणि प" म्हणतो.
06:01
when they got the second P.
125
361823
1310
---वाढली होती.
06:03
Either one could be first, the second one comes up,
126
363157
2562
यापैकी कोणतंही औषध प्रथम घेतलं असलं, तरी त्याबरोबर
06:05
glucose went up 20 milligrams per deciliter.
127
365743
2847
दुसरं औषध घेताच, ग्लुकोज २० मिलिग्रॅम/ डेसिलिटरने वाढलं.
06:08
Just as a reminder,
128
368614
1158
आपल्याला आठवण करून देतो,
06:09
you walk around normally, if you're not diabetic,
129
369796
2325
मधुमेही नसाल, तर सामान्यतः आपली ग्लुकोजची पातळी
06:12
with a glucose of around 90.
130
372145
1359
साधारण ९० मिलिग्रॅम असते.
06:13
And if it gets up to 120, 125,
131
373528
2076
ती जर १२० - १२५ पर्यंत गेली, तर
06:15
your doctor begins to think about a potential diagnosis of diabetes.
132
375628
3450
डॉक्टर तुम्हांला मधुमेही ठरवण्याची शक्यता विचारात घेऊ लागतात.
06:19
So a 20 bump -- pretty significant.
133
379102
2991
म्हणजे, २० ची वाढ बरीच महत्त्वाची आहे.
06:22
I said, "Nick, this is very cool.
134
382601
1904
मी म्हणालो, " निक, हे छान आहे,
06:25
But, I'm sorry, we still don't have a paper,
135
385616
2053
पण सॉरी, प्रसिद्ध करण्याइतकं नाही.
06:27
because this is 10 patients and -- give me a break --
136
387693
2579
कारण, यात फक्त १०च रुग्ण आहेत.
06:30
it's not enough patients."
137
390296
1245
आणि तितके पुरेसे नाहीत."
06:31
So we said, what can we do?
138
391565
1306
आता काय बरं करावं?
06:32
And we said, let's call our friends at Harvard and Vanderbilt,
139
392895
2976
आम्ही ठरवलं, हार्वर्ड आणि वॉंडरबिल्ट मधल्या मित्रांशी बोलू.
06:35
who also -- Harvard in Boston, Vanderbilt in Nashville,
140
395895
2587
बॉस्टनमध्ये हार्वर्ड आणि नॅशव्हिलमध्ये वॉंडरबिल्ट,
06:38
who also have electronic medical records similar to ours.
141
398506
2821
दोघांकडेही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या वैद्यकीय नोंदी आहेत.
06:41
Let's see if they can find similar patients
142
401351
2020
त्यात असे रुग्ण सापडतात का पाहू.
06:43
with the one P, the other P, the glucose measurements
143
403395
3276
पहिला प, दुसरा प आणि आम्हाला हवी त्या कक्षेतली
06:46
in that range that we need.
144
406695
1600
ग्लुकोजची मोजणी असणारे.
06:48
God bless them, Vanderbilt in one week found 40 such patients,
145
408787
4955
वॉंडरबिल्टला - देव त्यांचं भलं करो - एका आठवड्यात असे ४० रुग्ण सापडले.
06:53
same trend.
146
413766
1189
त्याच प्रकारचे.
06:55
Harvard found 100 patients, same trend.
147
415804
3620
हार्वर्डला १०० रुग्ण सापडले, त्याच प्रकारचे.
06:59
So at the end, we had 150 patients from three diverse medical centers
148
419448
4281
अखेरीस तीन वेगळ्या वैद्यकीय संस्थांमधून आम्हांला एकूण १५० रुग्ण सापडले होते.
07:03
that were telling us that patients getting these two drugs
149
423753
3297
ते दाखवून देत होते, की ही दोन औषधं घेणाऱ्यांचं ग्लुकोज
07:07
were having their glucose bump somewhat significantly.
150
427074
2703
जरा जास्त प्रमाणात वाढत होतं.
07:10
More interestingly, we had left out diabetics,
151
430317
2810
त्याहूनही गम्मत म्हणजे, आम्ही मधुमेही निवडलेच नव्हते.
07:13
because diabetics already have messed up glucose.
152
433151
2317
कारण त्यांच्या ग्लुकोजचा तर गोंधळच झालेला असतो.
07:15
When we looked at the glucose of diabetics,
153
435492
2238
मधुमेही रुग्णांची ग्लुकोज पाहिली असता,
07:17
it was going up 60 milligrams per deciliter, not just 20.
154
437754
3435
ती २० नव्हे, तर ६० मिलिग्रॅम/ डेसिलिटरने वर जात होती.
07:21
This was a big deal, and we said, "We've got to publish this."
155
441760
3452
हा मोठाच शोध होता. आता हा प्रसिद्ध करायलाच हवा.
07:25
We submitted the paper.
156
445236
1179
आम्ही पेपर पाठविला.
07:26
It was all data evidence,
157
446439
2111
आमच्याजवळ केवळ आकडेवारीचे पुरावे होते.
07:28
data from the FDA, data from Stanford,
158
448574
2483
एफडीएमधले, स्टॅनफर्डमधले,
07:31
data from Vanderbilt, data from Harvard.
159
451081
1946
वॉंडरबिल्टमधले, हार्वर्डमधले.
07:33
We had not done a single real experiment.
160
453051
2396
पण आम्ही प्रत्यक्षात एकही प्रयोग केला नव्हता.
07:36
But we were nervous.
161
456495
1296
आम्हांला चिंता वाटू लागली.
07:38
So Nick, while the paper was in review, went to the lab.
162
458201
3730
म्हणून मग, पेपरचं परीक्षण चालू असतानाच, निक प्रयोगशाळेत गेला.
07:41
We found somebody who knew about lab stuff.
163
461955
2462
तिथलं काम जाणणारा माणूस शोधला.
07:44
I don't do that.
164
464441
1393
मी ते काम जाणत नाही.
07:45
I take care of patients, but I don't do pipettes.
165
465858
2417
मी रुग्णांची काळजी घेतो, पण पिपेटस् वापरत नाही.
07:49
They taught us how to feed mice drugs.
166
469420
3053
उंदरांना औषध कसं द्यायचं, ते त्यांनी आम्हांला शिकवलं.
07:52
We took mice and we gave them one P, paroxetine.
167
472864
2414
आम्ही काही उंदरांना पहिला प दिला, पेरॉक्सेटिन.
07:55
We gave some other mice pravastatin.
168
475302
2508
दुसऱ्या काही उंदरांना दिलं प्रावास्टॅटिन.
07:57
And we gave a third group of mice both of them.
169
477834
3595
आणि उंदरांच्या तिसऱ्या गटाला दिली ही दोन्ही औषधं.
08:01
And lo and behold, glucose went up 20 to 60 milligrams per deciliter
170
481893
3946
आणि उंदरांच्या ग्लुकोजची पातळी २० ते ६० मिलिग्रॅम/ डेसिलिटरने वाढली.
08:05
in the mice.
171
485863
1171
अहो आश्चर्यम्!
08:07
So the paper was accepted based on the informatics evidence alone,
172
487058
3158
आमच्या पेपरला केवळ माहितीजन्य पुराव्यांमुळे मान्यता मिळाली.
08:10
but we added a little note at the end,
173
490240
1894
पण आम्ही शेवटी एक तळटीप जोडली.
08:12
saying, oh by the way, if you give these to mice, it goes up.
174
492158
2899
त्यात लिहिलं, "तसंच, उंदरांना ही औषधें दिल्यास, पातळी वाढते."
08:15
That was great, and the story could have ended there.
175
495081
2508
हे छान झालं, आणि ही गोष्ट तिथेच संपली असती.
08:17
But I still have six and a half minutes.
176
497613
1997
पण माझ्याजवळ अजून साडेसहा मिनिटं आहेत.
08:19
(Laughter)
177
499634
2807
(हशा)
08:22
So we were sitting around thinking about all of this,
178
502465
2815
तर आम्ही एकत्र जमून याविषयी विचार करीत होतो.
08:25
and I don't remember who thought of it, but somebody said,
179
505304
2735
आणि हे कोणाला सुचलं ते आठवत नाही, पण कोणीतरी म्हणालं,
08:28
"I wonder if patients who are taking these two drugs
180
508063
3201
"मला प्रश्न पडला आहे, ही दोन औषधं घेणाऱ्या रुग्णांना
08:31
are noticing side effects of hyperglycemia.
181
511288
3553
वाढलेल्या ग्लुकोजचे गौण परिणाम जाणवत असतील का?
08:34
They could and they should.
182
514865
1496
शक्य आहे, जाणवत असलेच पाहिजेत.
08:36
How would we ever determine that?"
183
516761
1877
ते कसं ठरवता येईल?"
08:39
We said, well, what do you do?
184
519551
1443
विचार करा, "आपण काय करू?"
08:41
You're taking a medication, one new medication or two,
185
521018
2580
एक औषध घेताघेताच, त्याबरोबर एकदोन नवीन औषधं सुरु झाली,
08:43
and you get a funny feeling.
186
523622
1538
आणि काहीतरी विचित्र होऊ लागलं,
08:45
What do you do?
187
525184
1151
तर आपण काय करू?
08:46
You go to Google
188
526359
1151
आपण गूगल वर जाऊ.
08:47
and type in the two drugs you're taking or the one drug you're taking,
189
527534
3349
आपण घेत असलेल्या एक किंवा दोन औषधांची नावं तिथे घालू.
08:50
and you type in "side effects."
190
530907
1603
आणि गौण परिणाम शब्दही तिथे घालू.
08:52
What are you experiencing?
191
532534
1356
आपण अनुभवलेले गौण परिणामही.
08:54
So we said OK,
192
534239
1151
मग आम्ही ठरवलं,
08:55
let's ask Google if they will share their search logs with us,
193
535414
3056
गूगलला विचारायचं, शोधप्रश्नांच्या नोंदी आम्हांला पाहू द्याल का?
08:58
so that we can look at the search logs
194
538494
1833
म्हणजे त्या नोंदी पाहून,
09:00
and see if patients are doing these kinds of searches.
195
540351
2565
रुग्ण अशा प्रकारचे शोध घेताहेत का, ते समजेल.
09:02
Google, I am sorry to say, denied our request.
196
542940
3275
सांगण्यास खेद होतो, की गूगलने आमची विनंती नाकारली.
09:06
So I was bummed.
197
546819
1151
मी निराश झालो.
09:07
I was at a dinner with a colleague who works at Microsoft Research
198
547994
3166
मायक्रोसॉफ्ट रीसर्च मधल्या सहकाऱ्याबरोबर मी डिनरला गेलो होतो.
09:11
and I said, "We wanted to do this study,
199
551184
1941
त्याला म्हणालो, "एक संशोधन करायचं होतं,
09:13
Google said no, it's kind of a bummer."
200
553149
1880
पण गूगलने नकार देऊन मला निराश केलं."
09:15
He said, "Well, we have the Bing searches."
201
555053
2086
तो म्हणाला, "आमच्याकडे बिंगचे शोध आहेत."
09:18
(Laughter)
202
558195
3483
(हशा)
09:22
Yeah.
203
562805
1267
हं.
09:24
That's great.
204
564096
1151
छान आहे.
09:25
Now I felt like I was --
205
565271
1151
आता मला वाटू लागलं,
09:26
(Laughter)
206
566446
1000
(हशा)
09:27
I felt like I was talking to Nick again.
207
567470
2412
की मी पुन्हा निक शी बोलतो आहे.
09:30
He works for one of the largest companies in the world,
208
570437
2624
तो जगातल्या एका मोठ्या कंपनीत काम करतो,
09:33
and I'm already trying to make him feel better.
209
573085
2206
आणि इथे मी त्याची समजूत घालतो आहे.
09:35
But he said, "No, Russ -- you might not understand.
210
575315
2445
पण तो म्हणाला, "तसं नव्हे रस, तुला ठाऊक नसेल,
09:37
We not only have Bing searches,
211
577784
1500
आमच्याकडे बिंग शिवाय
09:39
but if you use Internet Explorer to do searches at Google,
212
579308
3340
इतर नोंदीही आहेत. गूगल, याहू, बिंग साठी जेव्हा
09:42
Yahoo, Bing, any ...
213
582672
1891
इंटरनेट एक्सप्लोरर वापरला जातो,
09:44
Then, for 18 months, we keep that data for research purposes only."
214
584587
3643
तेव्हा केवळ संशोधनासाठी म्हणून आम्ही तो डाटा १८ महिने ठेवतो. "
09:48
I said, "Now you're talking!"
215
588254
1936
मी म्हणालो, "आता कसं बोललास!"
09:50
This was Eric Horvitz, my friend at Microsoft.
216
590214
2198
हा एरिक हॉरविट्झ, माझा मायक्रोसॉफ्टमधला मित्र.
09:52
So we did a study
217
592436
1695
मग आम्ही एक प्रयोग केला.
09:54
where we defined 50 words that a regular person might type in
218
594155
4619
एखाद्या साधारण व्यक्तीची ग्लुकोज पातळी वाढली तर ती गूगलवर शोधेल,
09:58
if they're having hyperglycemia,
219
598798
1602
असे ५० शब्द निश्चित केले.
10:00
like "fatigue," "loss of appetite," "urinating a lot," "peeing a lot" --
220
600424
4762
जसे, थकवा, भूक मंदावणे, जास्त मूत्र, लघवीत वाढ ...
10:05
forgive me, but that's one of the things you might type in.
221
605210
2767
माफ करा, पण हेही एक लक्षण शोधलं जाईल.
10:08
So we had 50 phrases that we called the "diabetes words."
222
608001
2790
तर आम्ही असे ५० "मधुमेही शब्द" गोळा केले.
10:10
And we did first a baseline.
223
610815
2063
प्रथम शोधप्रश्नांची एक मूलभूत पातळी ठरवली.
10:12
And it turns out that about .5 to one percent
224
612902
2704
त्यावेळी सिद्ध झालं, की इंटरनेटवरील एकूण शोधांपैकी
10:15
of all searches on the Internet involve one of those words.
225
615630
2982
साधारण अर्धा ते एक टक्का प्रश्नांमध्ये यापैकी एक शब्द असतो.
10:18
So that's our baseline rate.
226
618636
1742
हे झालं मूलभूत प्रमाण.
10:20
If people type in "paroxetine" or "Paxil" -- those are synonyms --
227
620402
4143
जर लोकांनी पेरॉक्सेटिन किंवा पॅक्सील - दोन्ही एकच - शोधलं, आणि
10:24
and one of those words,
228
624569
1215
त्या शब्दांपैकी एक शब्द,
10:25
the rate goes up to about two percent of diabetes-type words,
229
625808
4890
तर ते प्रमाण होतं मधुमेही शब्दांच्या २ टक्के.
10:30
if you already know that there's that "paroxetine" word.
230
630722
3044
जर "पेरॉक्सेटिन" शब्द शोधला तर.
10:34
If it's "pravastatin," the rate goes up to about three percent from the baseline.
231
634191
4547
जर "प्रावास्टॅटिन" शब्द शोधला, तर ते मूलभूत प्रमाणाच्या तीन टक्के इतकं होतं.
10:39
If both "paroxetine" and "pravastatin" are present in the query,
232
639171
4390
जर "पेरॉक्सेटिन आणि प्रावास्टॅटिन" दोन्ही शब्द शोधले,
10:43
it goes up to 10 percent,
233
643585
1669
तर ते १० टक्क्यांपर्यंत जातं.
10:45
a huge three- to four-fold increase
234
645278
3461
म्हणजे ही तीन ते चार पटीने वाढ झाली.
10:48
in those searches with the two drugs that we were interested in,
235
648763
3389
आपल्याला स्वारस्य असलेली दोन्ही औषधं
10:52
and diabetes-type words or hyperglycemia-type words.
236
652176
3566
आणि मधुमेही शब्दांचा शोध घेतल्यावर.
10:56
We published this,
237
656216
1265
आम्ही हे प्रसिद्ध केलं.
10:57
and it got some attention.
238
657505
1466
त्याकडे थोडं लक्ष वेधलं गेलं.
10:58
The reason it deserves attention
239
658995
1778
याकडे लक्ष द्यायला हवं, कारण
11:00
is that patients are telling us their side effects indirectly
240
660797
4312
लोक आपल्या शोधप्रश्नांमधून अप्रत्यक्षपणे आपण अनुभवलेले गौण परिणाम
11:05
through their searches.
241
665133
1156
सांगत आहेत.
11:06
We brought this to the attention of the FDA.
242
666313
2138
हे आम्ही एफडीएच्या लक्षात आणून दिलं.
11:08
They were interested.
243
668475
1269
त्यांना कुतूहल वाटलं.
11:09
They have set up social media surveillance programs
244
669768
3606
त्यांनी सोशल मीडिया निरीक्षण प्रोग्रॅम्स बनवले आहेत,
11:13
to collaborate with Microsoft,
245
673398
1751
मायक्रोसॉफ्टशी सहकार्य करणारे. कारण
11:15
which had a nice infrastructure for doing this, and others,
246
675173
2794
मायक्रोसॉफ्टपाशी यासाठी चांगली यंत्रणा आहे.
11:17
to look at Twitter feeds,
247
677991
1282
काही ट्विटरसाठी,
11:19
to look at Facebook feeds,
248
679297
1716
काही फेसबुक फीड्स साठी,
11:21
to look at search logs,
249
681037
1311
शोधांच्या नोंदी बघणारे.
11:22
to try to see early signs that drugs, either individually or together,
250
682372
4909
औषधं एकेकटी किंवा एकत्र घेतल्याने होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांची लक्षणं
11:27
are causing problems.
251
687305
1589
लवकर समजून घेण्याचा हा प्रयत्न.
11:28
What do I take from this? Why tell this story?
252
688918
2174
यातून काय समजलं? ही गोष्ट सांगायचा हेतू काय?
11:31
Well, first of all,
253
691116
1207
पहिलं कारण, आता आपल्याजवळ
11:32
we have now the promise of big data and medium-sized data
254
692347
4037
बिग डेटा आणि माध्यम डेटा यांची मदत आहे.
11:36
to help us understand drug interactions
255
696408
2918
त्यांच्यामुळे औषधांमधल्या परस्परक्रिया समजतील.
11:39
and really, fundamentally, drug actions.
256
699350
2420
खरं तर, औषधांचे मूलभूत परिणाम समजतील.
11:41
How do drugs work?
257
701794
1413
औषधं कशी काम करतात? ते समजेल.
11:43
This will create and has created a new ecosystem
258
703231
2836
यामुळे एक नवीन परिसंस्था तयार होईल, नव्हे, झाली आहे.
11:46
for understanding how drugs work and to optimize their use.
259
706091
3267
ज्यात औषधांची कार्यपद्धती समजते आणि तिचा सुयोग्य वापर करून घेता येतो.
11:50
Nick went on; he's a professor at Columbia now.
260
710303
2659
निक आता कोलंबिया मध्ये प्रोफेसर आहे.
11:52
He did this in his PhD for hundreds of pairs of drugs.
261
712986
4072
त्याने त्याच्या पीएचडी साठी शेकडो औषधांच्या जोड्या निवडून हेच काम केलं.
11:57
He found several very important interactions,
262
717082
2517
त्यातून काही महत्त्वाच्या परस्परक्रिया सापडल्या.
11:59
and so we replicated this
263
719623
1214
याची पुनरावृत्ती करून,
12:00
and we showed that this is a way that really works
264
720861
2574
आम्ही दाखवून दिलं, की
12:03
for finding drug-drug interactions.
265
723459
2339
अशा रीतीने औषधांच्या परस्परक्रिया शोधता येतात.
12:06
However, there's a couple of things.
266
726282
1734
परंतु हेही लक्षात घ्या:
12:08
We don't just use pairs of drugs at a time.
267
728040
3046
आम्ही एका वेळी दोनच औषधं वापरतो, असं नव्हे.
12:11
As I said before, there are patients on three, five, seven, nine drugs.
268
731110
4469
मी पूर्वी म्हणालो तसं, काही रुग्ण एका वेळी ३, ५, ७, ९ औषधं घेतात.
12:15
Have they been studied with respect to their nine-way interaction?
269
735981
3642
त्यांच्या नऊ पदरी परस्परक्रियेचा अभ्यास झाला आहे का?
12:19
Yes, we can do pair-wise, A and B, A and C, A and D,
270
739647
4208
हो, आपण जोड्यांचं संशोधन करू शकतो. अ आणि ब, अ आणि क, अ आणि ड,
12:23
but what about A, B, C, D, E, F, G all together,
271
743879
4286
पण मग अ, ब, क, ड, इ, फ,ग सगळे
12:28
being taken by the same patient,
272
748189
1762
एखादा रुग्ण एकत्र घेत असेल,
12:29
perhaps interacting with each other
273
749975
2118
आणि त्यांच्या परस्परक्रियांमुळे
12:32
in ways that either makes them more effective or less effective
274
752117
3778
त्यांचे प्रभाव वाढत किंवा कमी होत असतील,
12:35
or causes side effects that are unexpected?
275
755919
2332
किंवा अनपेक्षित गौण परिणाम होत असतील तर?
12:38
We really have no idea.
276
758275
1827
याविषयी आम्हांला काही कल्पना नाही.
12:40
It's a blue sky, open field for us to use data
277
760126
3756
आकडेवारी वापरून परस्परक्रिया समजून घेण्यासाठी मैदान खुलं आहे,
12:43
to try to understand the interaction of drugs.
278
763906
2502
आभाळ मोकळं आहे.
12:46
Two more lessons:
279
766848
1370
आणखी दोन विचार:
12:48
I want you to think about the power that we were able to generate
280
768242
4199
आम्ही ही आकडेवारी वापरून मोठाच परिणाम साधू शकलो.
12:52
with the data from people who had volunteered their adverse reactions
281
772465
4711
दुष्परिणामांची माहिती रुग्णांनी स्वेच्छेने पुरवली
12:57
through their pharmacists, through themselves, through their doctors,
282
777200
3269
स्वतः किंवा फार्मासिस्ट वा डॉक्टरद्वारे.
13:00
the people who allowed the databases at Stanford, Harvard, Vanderbilt,
283
780493
3667
हार्वर्ड, स्टॅनफर्ड, वॉंडरबिल्ट यांचे डेटाबेस तिथल्या लोकांनी
13:04
to be used for research.
284
784184
1427
संशोधनासाठी वापरू दिले.
13:05
People are worried about data.
285
785929
1445
लोक डाटा विषयी सावध असतात.
13:07
They're worried about their privacy and security -- they should be.
286
787398
3187
त्यांना तो गुप्त आणि सुरक्षित राहील का, याची काळजी असते.
13:10
We need secure systems.
287
790609
1151
यंत्रणा सुरक्षित हवी.
13:11
But we can't have a system that closes that data off,
288
791784
3406
पण डाटा पूर्णपणे बंदिस्त ठेवणारी यंत्रणा नको.
13:15
because it is too rich of a source
289
795214
2752
कारण तो एक अत्यंत संपन्न असा स्रोत आहे,
13:17
of inspiration, innovation and discovery
290
797990
3971
वैद्यकीय क्षेत्रातील नवीन शोधांसाठी स्फूर्ती, नवनिर्माण
13:21
for new things in medicine.
291
801985
1578
आणि संशोधन यांचा.
13:24
And the final thing I want to say is,
292
804494
1794
अखेरची गोष्ट सांगतो,
13:26
in this case we found two drugs and it was a little bit of a sad story.
293
806312
3357
या उदाहरणात आम्हांला दोन औषधं सापडली, ही तशी खेदाचीच गोष्ट आहे.
13:29
The two drugs actually caused problems.
294
809693
1921
दोन्ही औषधांनी समस्या निर्माण केल्या.
13:31
They increased glucose.
295
811638
1475
त्यांनी ग्लुकोज पातळी वाढविली.
13:33
They could throw somebody into diabetes
296
813137
2446
एरवी मधुमेही नसणाऱ्यांना
13:35
who would otherwise not be in diabetes,
297
815607
2294
त्यांनी मधुमेही ठरवलं असतं.
13:37
and so you would want to use the two drugs very carefully together,
298
817925
3175
तर, तुम्ही ही दोन औषधं एकत्र घेताना काळजी घ्या.
13:41
perhaps not together,
299
821124
1151
शक्यतो ती एकत्र घेऊ नका.
13:42
make different choices when you're prescribing.
300
822299
2340
तुम्ही डॉक्टर असाल, तर निराळे उपचार निवडा.
13:44
But there was another possibility.
301
824663
1846
परंतु दुसरीही एक शक्यता होती.
13:46
We could have found two drugs or three drugs
302
826533
2344
हितकारक परस्परक्रिया असणारी दोन किंवा तीन औषधं
13:48
that were interacting in a beneficial way.
303
828901
2261
आम्हांला सापडू शकली असती.
13:51
We could have found new effects of drugs
304
831616
2712
दोहोंपैकी कोणत्याच औषधाला एकट्यानं साधता न येणारा
13:54
that neither of them has alone,
305
834352
2160
असा नवीन परिणाम दोन्ही एकत्र येऊन साधू शकतील.
13:56
but together, instead of causing a side effect,
306
836536
2493
दुष्परिणामाऐवजी सापडेल,
13:59
they could be a new and novel treatment
307
839053
2425
एक नवा अकल्पित उपाय
14:01
for diseases that don't have treatments
308
841502
1882
दुर्धर आजारांवर, किंवा
14:03
or where the treatments are not effective.
309
843408
2007
उपचार लागू पडत नसतील तेथे.
14:05
If we think about drug treatment today,
310
845439
2395
आजची औषधोपचारपद्धती पाहता,
14:07
all the major breakthroughs --
311
847858
1752
सर्व महत्त्वाच्या उपचारांत -
14:09
for HIV, for tuberculosis, for depression, for diabetes --
312
849634
4297
एचआयव्ही, क्षयरोग, नैराश्य, मधुमेह यांत -
14:13
it's always a cocktail of drugs.
313
853955
2830
नेहमीच अनेक औषधं एकत्र दिली जातात.
14:16
And so the upside here,
314
856809
1730
यातल्या चांगल्या बाजूवर
14:18
and the subject for a different TED Talk on a different day,
315
858563
2849
आणखी एके दिवशी एक टेड भाषण देता येईल.
14:21
is how can we use the same data sources
316
861436
2593
ती बाजू म्हणजे, हीच माहिती वापरून
14:24
to find good effects of drugs in combination
317
864053
3563
एकत्र घेतलेल्या औषधांचे चांगले परिणाम शोधणे.
14:27
that will provide us new treatments,
318
867640
2175
त्यातून नवीन उपचार सापडतील.
14:29
new insights into how drugs work
319
869839
1852
औषधांच्या कार्याबद्दल नवं ज्ञान होईल,
14:31
and enable us to take care of our patients even better?
320
871715
3786
आणि आपण रुग्णांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकू.
14:35
Thank you very much.
321
875525
1166
आपले खूप खूप आभार.
14:36
(Applause)
322
876715
3499
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7