What foods did your ancestors love? Aparna Pallavi

99,253 views ・ 2020-07-22

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Transcriber: Joseph Geni Reviewer: Camille Martínez
0
0
7000
Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
Last year, I was living with this indigenous family in India.
1
12423
4886
गेल्या वर्षी मी भारतातल्या एका आदिवासी कुटुंबात राहत होते.
00:18
One afternoon,
2
18547
1681
एका दुपारी
00:20
the young son was eating,
3
20252
2428
त्यांचा छोटा मुलगा जेवत होता,
00:22
and at the sight of me, he quickly hid his curry behind his back.
4
22704
5101
आणि मला पाहिल्याबरोबर त्याने लगबगीने भाजी आपल्या पाठीमागे लपवली.
00:28
It took a lot of persuasion to get him to show me what he was eating.
5
28694
4584
तो काय खात होता ते मला दाखवावं म्हणून फार आग्रह करावा लागला.
00:33
It turned out to be moth larvae,
6
33994
3351
त्या पतंगाच्या अळ्या होत्या.
00:37
a traditional delicacy with the Madia indigenous people.
7
37369
3379
माडिया आदिवासींचे हे एक पारंपारिक पक्वान्न.
00:41
I cried,
8
41364
1211
मी ओरडले,
00:42
"Oh my God, you're eating these!
9
42599
2468
"अरे देवा! या खातो आहेस तू!
00:45
I hope there's a little left for me!"
10
45091
2330
माझ्यासाठी थोड्या शिल्लक आहेत ना?"
00:48
I saw disbelief in the boy's eyes.
11
48466
2462
त्या मुलाने अविश्वासाने माझ्याकडे पाहिलं.
00:50
"You ... eat these?"
12
50952
1881
"तुम्ही.. या खाता?"
00:54
"I love these," I replied.
13
54388
2950
"मला या फार आवडतात!" मी उत्तर दिले.
00:58
I could see he did not trust me one bit.
14
58513
3333
यावर त्याचा जराही विश्वास बसला नाही हे मला स्पष्ट दिसत होते.
01:02
How could an urban, educated woman like the same food as him?
15
62678
4735
एका शहरी सुशिक्षित महिलेला त्याच्यासारखे अन्न आवडणे कसे शक्य आहे?
01:08
Later, I broached the subject with his father,
16
68562
3715
नंतर मी त्याच्या वडिलांकडे हा विषय काढला.
01:12
and it turned out to be a mighty touchy affair.
17
72301
3087
आणि ते प्रकरण फारच संवेदनशील निघाले.
01:16
He said things like,
18
76793
2038
त्याचे वडील म्हणाले,
01:18
"Oh, only this son of mine likes to eat it.
19
78855
3335
"माझ्या फक्त ह्याच एका मुलाला हे खाणे आवडते.
01:22
We tell him, 'Give it up. It's bad.'
20
82214
2870
आम्ही त्याला सांगतो, 'ते खाऊ नकोस. ते वाईट असते.'
01:25
He doesn't listen, you see.
21
85108
1870
पण तो ऐकत नाही.
01:27
We gave up eating all this ages back."
22
87002
3273
हे सर्व खाणे आम्ही बऱ्याच काळापूर्वी सोडून दिले आहे."
01:31
"Why?" I asked.
23
91763
2068
"का?" मी विचारले.
01:34
"This is your traditional food.
24
94752
2374
"हे तुमचे पारंपारिक अन्न आहे.
01:38
It is available in your environment,
25
98108
2592
हे तुमच्या परिसरात उपलब्ध आहे.
01:40
it is nutritious,
26
100724
1446
हे पौष्टिक आहे.
01:42
and -- I can vouch for it -- delicious.
27
102194
2704
आणि मी खात्रीने सांगू शकते, की हे स्वादिष्ट आहे.
01:45
Why is it wrong to eat it?"
28
105584
1970
हे खाण्यात काय चूक आहे?"
01:48
The man fell silent.
29
108768
1669
ते निःशब्द झाले.
01:51
I asked,
30
111360
1169
मी विचारले,
01:52
"Have you been told that your food is bad,
31
112998
4345
"तुम्हांला सांगितले गेले आहे का, की तुमचे अन्न वाईट आहे,
01:57
that to eat it is backward,
32
117367
3105
किंवा ते खाणे हा मागासलेपणा आहे,
02:00
not civilized?"
33
120496
1488
असंस्कृत आहे?"
02:03
He nodded silently.
34
123960
1723
त्यांनी शांतपणे मान हलवली.
02:07
This was one of the many, many times in my work with indigenous people in India
35
127069
6140
भारतातील आदिवासी लोकांबरोबर काम करताना अनेकदा घडले होते, तसे याही प्रसंगी
02:13
that I witnessed shame around food,
36
133233
2304
मला अन्नाबद्दल वाटणारी शरम दिसून आली.
02:16
shame that the food you love to eat,
37
136545
3626
शरमेमागचा समज असा, की आपल्याला अतिशय आवडणारे,
02:20
the food that has been eaten for generations,
38
140195
3177
आपल्या अनेक पिढ्यांनी खाल्लेले अन्न
02:23
is somehow inferior,
39
143396
2020
हे काही कारणामुळे निकृष्ठ असावे,
02:25
even subhuman.
40
145440
1373
मानवासाठी योग्य नसावे.
02:28
And this shame is not limited to out-of-the-way, icky foods
41
148008
5144
आणि ही शरम फक्त विचित्र, किळसवाण्या अन्नापुरती सीमित नाही,
02:33
like insects or rats, maybe,
42
153176
2821
म्हणजे कीटक किंवा उंदीर वगैरे,
02:36
but extends to regular foods:
43
156021
3182
तर ती सर्वसाधारण अन्नालाही लागू आहे.
02:39
white vegetables,
44
159227
1992
रानटी भाज्या,
02:41
mushrooms, flowers --
45
161243
2792
अळंबी, फुले --
02:44
basically, anything that is foraged rather than cultivated.
46
164059
4344
थोडक्यात, शेतात पिकवले न जाता गोळा केले जाणारे काहीही.
02:49
In indigenous India, this shame is omnipresent.
47
169172
3536
भारतातील आदिवासींमध्ये ही शरम सर्वत्र आढळते.
02:53
Anything can trigger it.
48
173946
1754
कोणत्याही कारणाने ती बळावते.
02:56
One upper-caste vegetarian schoolmaster gets appointed in a school,
49
176308
4886
एका शाळेत एका उच्चवर्णी शाकाहारी शिक्षकांची नेमणूक झाली.
03:01
within weeks, children are telling their parents it's yucky to eat crabs
50
181218
4448
काही आठवड्यांत मुले पालकांना सांगू लागली, की खेकडे खाणे हे घाणेरडे आहे.
03:05
or sinful to eat meat.
51
185690
1674
किंवा मांस खाणे हे पाप आहे.
03:08
A government nutrition program serves fluffy white rice,
52
188202
4070
एका सरकारी पौष्टिक अन्न योजनेद्वारे मऊ पांढरा भात पुरवला जातो.
03:12
now no one wants to eat red rice or millets.
53
192296
3096
आता कोणालाही लाल तांदूळ किंवा ज्वारी बाजरी खावीशी वाटत नाही.
03:15
A nonprofit reaches this village with an ideal diet chart for pregnant women.
54
195984
4814
एका गावात एक सेवाभावी संस्था गर्भवती मातांसाठी आदर्श आहाराचे तक्ते घेऊन गेली.
03:21
There you go.
55
201344
1296
त्याचा परिणाम लगेच झाला.
03:22
All the expectant mothers are feeling sad
56
202664
2351
सगळ्या गर्भवती माता दुःखी झाल्या.
03:25
that they cannot afford apples and crepes.
57
205039
2542
सफरचंद आणि द्राक्षे परवडणार नाहीत या विचाराने.
03:28
And people just kind of forget the fruits
58
208009
3210
आणि त्यांना इतर फळांचा विसर पडला,
03:31
that can be picked off the forest floor.
59
211243
2249
जी जंगलातून गोळा करून आणणे शक्य असते.
03:34
Health workers,
60
214611
1388
आरोग्य सेवक,
03:37
religious missionaries,
61
217086
2120
धर्म प्रचारक,
03:39
random government employees
62
219230
2438
कोणी सरकारी कर्मचारी,
03:41
and even their own educated children
63
221692
2972
आणि त्यांची स्वतःची सुशिक्षित मुलेसुद्धा
03:44
are literally shouting it down at the indigenous people
64
224688
4576
या आदिवासींना अक्षरशः ओरडून सांगताहेत
03:49
that their food is not good enough,
65
229288
3274
की त्यांचे अन्न पुरेसे चांगले नाही.
03:52
not civilized enough.
66
232586
1652
ते पुरेसे सुसंस्कृत नाही.
03:55
And so food keeps disappearing,
67
235480
2544
आणि त्यामुळे हळू हळू थोडे थोडे अन्न
03:58
a little bit at a time.
68
238972
1547
नाहीसे होत आहे.
04:01
I'm wondering if you all have ever considered
69
241836
4349
मला प्रश्न पडतो, तुम्ही कधी विचारात घेतले आहे का,
04:06
whether your communities would have a similar history around food.
70
246209
3545
की तुमच्याही समाजांमध्ये अन्नाचा असाच इतिहास असू शकतो.
04:11
If you were to talk to your 90-year-old grandmother,
71
251468
3203
तुम्ही तुमच्या ९० वर्षांच्या आजीशी बोललात,
04:15
would she talk about foods that you have never seen or heard of?
72
255587
3906
तर तुम्ही कधी न पाहिलेल्या वा ऐकलेल्या अन्नाविषयी ती बोलेल का?
04:20
Are you aware how much of your community's food
73
260631
2759
तुम्हांला कल्पना आहे का, तुमच्या समाजाचे किती अन्न
04:23
is no longer available to you?
74
263414
1866
तुम्हांला आज उपलब्ध नाही?
04:26
Local experts tell me
75
266652
1836
स्थानिक तज्ज्ञ मला सांगतात,
04:28
that the South African food economy is now entirely based on imported foods.
76
268512
5862
दक्षिण आफ्रिकेतली अन्नाची अर्थव्यवस्था आज पूर्णपणे आयात अन्नावर आधारित आहे.
04:35
Corn has become the staple,
77
275493
2144
मका हे मुख्य अन्न झाले आहे,
04:37
while the local sorghum, millets, bulbs and tubers are all gone.
78
277661
5974
तर स्थानिक ज्वारी, बाजरी, कंद हे सर्व नष्ट झाले आहेत.
04:44
So are the wild legumes and vegetables,
79
284384
3022
तशीच जंगलात उगवणारी कडधान्ये आणि भाज्या.
04:47
while people eat potatoes and onions, cabbages and carrots.
80
287430
3628
लोक बटाटे आणि कांदे , कोबी आणि गाजर खाताहेत.
04:51
In my country,
81
291921
1850
माझ्या देशात
04:53
this loss of food is colossal.
82
293795
2803
अन्नाचा हा ऱ्हास प्रचंड प्रमाणावर झालेला आहे.
04:57
Modern India is stuck with rice, wheat
83
297077
4067
आधुनिक भारत अडकला आहे तांदूळ, गहू
05:01
and diabetes.
84
301168
2184
आणि मधुमेह यांच्या विळख्यात.
05:04
And we have totally forgotten foods like huge varieties of tubers,
85
304220
5181
आपण काही अन्न पूर्णपणे विसरून गेलो आहोत. उदाहरणार्थ, विविध प्रकारचे कंद,
05:09
tree saps, fish, shellfish,
86
309425
3835
झाडांचे गोंद, मासे, कवचधारी मासे,
05:13
oil seeds,
87
313284
1892
तेलबिया,
05:15
mollusks, mushrooms, insects,
88
315200
4085
गोगलगायसदृश प्राणी, अळंबी, कीटक,
05:19
small, nonendangered animal meats,
89
319309
3127
नामशेष न झालेल्या छोट्या प्राण्यांचे मांस.
05:22
all of which used to be available right within our surroundings.
90
322460
4169
हे सर्व आमच्या परिसरात उपलब्ध होते.
05:27
So where has this food gone?
91
327804
1841
मग हे सर्व अन्न कुठे गेले?
05:30
Why are our modern food baskets so narrow?
92
330630
3089
अन्नधान्याच्या आपल्या आधुनिक टोपल्या इतक्या आखूड कशा झाल्या?
05:34
We could talk about the complex political economic and ecological reasons,
93
334895
6149
आपण गुंतागुंतीच्या राजकीय, अर्थशास्त्रीय आणि पर्यावरणवादी कारणांविषयी बोलू शकतो.
05:41
but I am here to talk about this more human phenomenon of shame,
94
341068
4281
पण मी शरम या मानवी भावनेविषयी बोलणार आहे.
05:46
because shame is the crucial point
95
346590
3725
कारण शरम हा निर्णायक बिंदू असतो,
05:50
at which food actually disappears off your plate.
96
350339
4099
जिथे अन्न खरोखर तुमच्या ताटातून नाहीसे होते.
05:55
What does shame do?
97
355444
1456
शरम काय करते?
05:57
Shame makes you feel small,
98
357845
2667
शरम तुम्हांला खुजे वाटायला लावते,
06:00
sad,
99
360536
1535
दुःखी,
06:02
not worthy,
100
362095
1222
नालायक,
06:03
subhuman.
101
363341
1374
अवमानवी.
06:05
Shame creates a cognitive dissonance.
102
365543
4006
शरम आकलनात विसंगती निर्माण करते.
06:10
It distorts food stories.
103
370115
1791
ती अन्नविषयक सत्याचा विपर्यास करते.
06:12
Let us take this example.
104
372963
1713
आपण हे एक उदाहरण घेऊ.
06:15
How would you like to have
105
375549
2244
तुम्हांला हे आवडेल का?
06:18
a wonderful, versatile staple
106
378742
2203
एक अद्भुत, विविधोपयोगी प्राथमिक अन्न,
06:21
that is available abundantly in your environment?
107
381817
3296
जे तुमच्या परिसरात विपुलतेने उपलब्ध आहे.
06:25
All you have to do is gather it,
108
385137
2161
तुम्हांला फक्त ते गोळा करावे लागेल,
06:27
dry it, store it,
109
387322
2373
वाळवावे लागेल, साठवावे लागेल.
06:29
and you have it for your whole year
110
389719
2374
मग ते तुम्हांला वर्षभर पुरेल.
06:32
to cook as many different kinds of dishes as you want with it.
111
392117
3916
तुम्ही त्यापासून हवे तितके विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकाल.
06:36
India had just such a food, called "mahua,"
112
396701
3815
भारतात असेच एक अन्न होते, महुआ.
06:40
this flower over there.
113
400540
1441
हे त्याचे फूल.
06:42
And I have been researching this food for the past three years now.
114
402989
3906
गेली तीन वर्षे मी या अन्नावर संशोधन करत आहे.
06:47
It is known to be highly nutritious in indigenous tradition
115
407651
4579
हे अतिशय पौष्टिक आहे, हे आदिवासी परंपरा जाणते,
06:52
and in scientific knowledge.
116
412254
2057
तसेच विज्ञानही जाणते.
06:55
For the indigenous,
117
415130
1867
आदिवासींसाठी
06:57
it used to be a staple for four to six months a year.
118
417021
4377
वर्षातले चार ते सहा महिने हे मुख्य अन्न असे.
07:02
In many ways, it is very similar to your local marula,
119
422739
3708
हे अनेक प्रकारे तुमच्या स्थानिक मरुला सारखे आहे.
07:06
except that it is a flower, not a fruit.
120
426471
2932
फरक इतकाच, की हे फूल आहे, फळ नव्हे.
07:10
Where the forests are rich,
121
430236
1933
जिथे जंगले समृद्ध असतात,
07:12
people can still get enough to eat for the whole year
122
432193
3355
तिथे लोकांना खाण्यासाठी वर्षभर भरपूर अन्न तर मिळतेच,
07:15
and enough spare to sell.
123
435572
1869
आणि विकण्यासाठीही पुरेसे शिल्लक राहते.
07:18
I found 35 different dishes with mahua
124
438292
4981
मला महुआचे ३५ प्रकारचे पदार्थ सापडले,
07:23
that no one cooks anymore.
125
443297
2674
जे आता कोणीही बनवत नाही.
07:27
This food is no longer even recognized as a food,
126
447225
4635
हे अन्न आता अन्न म्हणून ओळखलेसुद्धा जात नाही,
07:31
but as raw material for liquor.
127
451884
2152
तर दारूसाठी कच्चा माल म्हणून ओळखले जाते.
07:35
You could be arrested for having it in your house.
128
455162
2668
हे घरात बाळगण्यासाठी अटक होऊ शकते.
07:38
Reason? Shame.
129
458417
2180
कारण? शरम.
07:41
I talked to indigenous people all over India
130
461211
3435
भारतभर सर्वत्र मी आदिवासींशी बोलले,
07:44
about why mahua is no longer eaten.
131
464670
2541
महुआ खाणे बंद का झाले याविषयी.
07:47
And I got the exact same answer.
132
467701
2472
आणि मला सगळीकडे तेच एक उत्तर मिळाले.
07:51
"Oh, we used to eat it when we were dirt-poor and starving.
133
471237
3247
"आम्ही दरिद्री, भुकेकंगाल होतो, तेव्हा ते खात होतो.
07:55
Why should we eat it now?
134
475405
1819
आता आम्ही ते का खावं?
07:57
We have rice or wheat."
135
477248
2127
आमच्याजवळ तांदूळ किंवा गहू आहे."
08:00
And almost in the same breath,
136
480574
2295
आणि त्याच एका दमात,
08:02
people also tell me how nutritious mahua is.
137
482893
3218
महुआ किती पौष्टिक आहे हेही लोक मला सांगतात.
08:06
There are always stories of elders who used to eat mahua.
138
486835
3665
कोणी वृद्ध पूर्वी महुआ खात, त्यांच्या गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात.
08:11
"This grandmother of ours, she had 10 children,
139
491222
3964
"आमच्या आजीला दहा मुले होती.
08:15
and still she used to work so hard, never tired, never sick."
140
495210
4333
तरीही ती किती कष्ट करत असे. कधी दमली नाही, की आजारी पडली नाही."
08:20
The exact same dual narrative every single where.
141
500896
4688
प्रत्येक ठिकाणी अगदी हेच दुहेरी बोलणे.
08:26
How come?
142
506634
1231
हे कसे काय?
08:28
How does the same food
143
508442
2206
तेच अन्न
08:30
get to be seen as very nutritious and a poverty food,
144
510672
5092
एकाच वेळी अतिशय पौष्टिक आणि गरिबांचे अन्न कसे ठरते,
08:35
almost in the same sentence?
145
515788
1918
तेही एका वाक्यात?
08:38
Same goes for other forest foods.
146
518822
2084
जंगलातल्या इतर अन्नाचीही हीच कथा.
08:41
I have heard story after heartrending story
147
521653
2959
मी एकामागून एक हृदयद्रावक कहाण्या ऐकल्या आहेत.
08:44
of famine and starvation,
148
524636
2892
दुष्काळ आणि उपासमारीच्या कहाण्या.
08:47
of people surviving on trash foraged out of the forest,
149
527552
3824
जंगलातून गोळा केलेल्या कचऱ्यामुळे जीव वाचल्याच्या कहाण्या.
08:52
because there was no food.
150
532455
1546
अन्न नव्हते, म्हणून.
08:55
If I dig a little deeper,
151
535207
2065
थोडे जास्त खोलात शिरल्यावर मला कळले,
08:57
it turns out the lack was not of food per se
152
537296
3733
की अभाव सर्व अन्नाचा नव्हता,
09:01
but of something respectable like rice.
153
541053
2533
तर फक्त शिष्टसंमत अन्नाचा, जसे तांदूळ.
09:04
I asked them,
154
544396
1665
मी त्यांना विचारले,
09:06
"How did you learn that your so-called trash is edible?
155
546085
3753
"तुम्ही ज्याला कचरा म्हणता, तो खाण्यास योग्य आहे हे कसे कळले?
09:11
Who told you that certain bitter tubers can be sweetened
156
551141
4737
तुम्हांला कोणी सांगितले, की ते विशिष्ट कडू कंद गोड करण्यासाठी
09:15
by leaving them in a stream overnight?
157
555902
2311
रात्रभर प्रवाहात ठेवावे?
09:19
Or how to take the meat out of a snail shell?
158
559380
3015
किंवा गोगलगायीच्या कवचातले मांस कसे काढावे?
09:22
Or how to set a trap for a wild rat?"
159
562419
2450
किंवा जंगली उंदिरासाठी सापळा कसा लावावा?"
09:26
That is when they start scratching their heads,
160
566085
3242
मग ते आपली डोकी खाजवू लागतात,
09:29
and they realize that they learned it from their own elders,
161
569351
3136
आणि त्यांच्या लक्षात येते, की आपण हे वडिलधाऱ्यांकडून शिकलो आहोत.
09:33
that their ancestors had lived and thrived on these foods for centuries
162
573347
5918
कित्येक शतके आपले पूर्वज या अन्नावर जगत होते, प्रगती करत होते.
09:39
before rice came their way,
163
579289
2181
तांदूळ मिळण्यापूर्वी.
09:41
and were way healthier than their own generation.
164
581494
3035
आणि ते आपल्या या पिढीपेक्षा कितीतरी निरोगी होते.
09:46
So this is how food works,
165
586029
2289
अशी ही अन्नाची कहाणी.
09:49
how shame works:
166
589898
1569
ही आहे शरमेची करामत:
09:51
making food and food traditions disappear from people's lives and memories
167
591491
6366
लोकांच्या आयुष्यातून, आठवणीतून अन्न आणि अन्न परंपरा नाहीशा करणे.
09:57
without their even realizing it.
168
597881
2170
त्यांना जाणीवही होऊ न देता.
10:01
So how do we undo this trend?
169
601971
2943
हा कल कसा पालटावा?
10:05
How do we reclaim our beautiful and complex systems of natural food,
170
605847
6035
आपल्या नैसर्गिक अन्नवापराच्या सुंदर, व्यामिश्र पद्धती परत कशा मिळवाव्यात?
10:13
food given to us lovingly by Mother Earth according to her own rhythm,
171
613017
4801
धरणीमातेने तिच्या निसर्गचक्रानुसार आपल्याला प्रेमाने दिलेले अन्न,
10:18
food prepared by our foremothers with joy
172
618718
4146
जे आपल्या आज्यापणज्यांनी आनंदाने रांधले,
10:22
and are eaten by our forefathers with gratitude,
173
622888
2880
आणि आपल्या पितामहांनी जे कृतज्ञतेने खाल्ले
10:26
food that is healthy, local, natural,
174
626786
4701
असे पौष्टिक, स्थानिक, नैसर्गिक अन्न,
10:31
varied, delicious,
175
631511
2800
विविधतेने नटलेले, स्वादिष्ट अन्न,
10:34
not requiring cultivation,
176
634335
2977
जे पिकवावे लागत नाही,
10:37
not damaging our ecology,
177
637336
2141
जे पर्यावरणाची हानी करत नाही,
10:39
not costing a thing?
178
639501
1605
ज्यासाठी काही खर्च येत नाही?
10:42
We all need this food,
179
642360
1850
या अन्नाची आपल्या सर्वांना गरज आहे,
10:44
and I don't think I have to tell you why.
180
644234
3104
मला वाटते, त्याचे कारण मी तुम्हांला सांगायला नको.
10:48
I don't have to tell you about the global health crisis,
181
648489
3604
जागतिक आरोग्यविषयक संकटाबद्दल मी सांगण्याची गरज नाही.
10:52
climate change, water crisis,
182
652117
2542
हवामान बदल, पाणीविषयक संकट
10:54
soil fatigue,
183
654683
1340
मातीचा कस कमी होणे,
10:56
collapsing agricultural systems,
184
656047
1992
कोलमडलेल्या शेतकी व्यवस्था,
10:58
all that.
185
658063
1155
हे सर्व.
11:00
But for me, equally important reasons why we need these foods
186
660040
4293
पण माझ्यासाठी, या अन्नाच्या गरजेमागची दुसरी काही कारणे तितकीच महत्त्वाची आहेत,
11:04
are the deeply felt ones,
187
664357
1782
जी आपल्याला मनात खोलवर जाणवतात,
11:07
because food is so many things, you see.
188
667059
2593
कारण अन्न हे बरेच काही असते.
11:10
Food is nourishment, comfort,
189
670355
3717
अन्न म्हणजे पुष्टी, समाधान,
11:14
creativity, community,
190
674096
2765
सृजनशीलता, समाज,
11:16
pleasure, safety, identity
191
676885
3725
आनंद, सुरक्षितता, स्वत्व
11:20
and so much more.
192
680634
1358
आणि इतरही बरेच काही.
11:22
How we connect with our food
193
682708
2389
आपण अन्नाशी कसा संबंध जोडतो
11:25
defines so much in our lives.
194
685121
2068
यावर आयुष्यात बरेचसे काही अवलंबून असते.
11:27
It defines how we connect with our bodies,
195
687745
2535
त्यावरून आपण आपल्या शरीराशी कसा संबंध जोडतो हे ठरते,
11:31
because our bodies are ultimately food.
196
691027
2364
कारण आपले शरीर म्हणजे शेवटी अन्नच असते.
11:34
It defines our basic sense of connection
197
694192
3567
अन्न हे एक मूलभूत संबंध जोडते,
11:37
with our existence.
198
697783
1543
आपल्या अस्तित्वाशी.
11:40
We need these foods most today
199
700464
3037
या अन्नाची आज सर्वात जास्त गरज आहे.
11:43
to be able to redefine our space as humans
200
703525
3851
मानवप्राणी म्हणून आपल्या अस्तित्वाची नवी व्याख्या करण्यासाठी
11:47
within the natural scheme of things.
201
707400
2277
निसर्गरचनेचा एक भाग या नात्याने.
11:50
And are we needing such a redefinition today?
202
710507
2662
आज या नव्या व्याख्येची गरज आहे का?
11:55
For me, the only real answer is love,
203
715692
3990
माझ्यासाठी, एकमेव खरे उत्तर आहे प्रेम.
12:01
because love is the only thing that counters shame.
204
721261
4986
कारण प्रेम ही शरमेला विरोध करणारी एकमेव गोष्ट आहे.
12:07
And how do we bring more of this love into our connections with our food?
205
727571
4928
आपल्या अन्नाशी असणाऱ्या संबंधात जास्त प्रेम कसे आणावे?
12:14
For me, love is, in a big way,
206
734285
3780
माझ्यासाठी, प्रेम म्हणजे प्रामुख्याने
12:18
about the willingness to slow down,
207
738089
3768
वेग जरा कमी करण्याची इच्छा.
12:22
to take the time to feel,
208
742826
3367
आपला वेळ देऊन
12:26
sense, listen, inquire.
209
746217
4253
संवेदना जाणवू देणे, ऐकणे, माहिती विचारणे.
12:31
It could be listening to our own bodies.
210
751704
2484
स्वतःच्या शरीराचे संकेत ऐकणे हेही प्रेम म्हणता येईल.
12:34
What do they need beneath our food habits, beliefs
211
754875
6712
आपल्या शरीरांच्या काय गरजा असतात, खाण्याच्या सवयी, कल्पना,
12:42
and addictions?
212
762188
1377
आणि व्यसनांच्या मुळाशी?
12:44
It could be taking time out to examine those beliefs.
213
764488
4009
या कल्पना तपासून पाहण्यासाठी वेळ देणे, हेही प्रेम असू शकेल.
12:49
Where did they come from?
214
769159
1597
त्या कल्पना कुठून आल्या?
12:51
It could be going back into our childhood.
215
771586
2529
त्यासाठी कदाचित बालपणात मागे जावे लागेल.
12:55
What foods did we love then,
216
775012
1707
त्या वेळी कोणते अन्न आवडत होते?
12:57
and what has changed?
217
777577
1530
आता काय बदलले आहे?
12:59
It could be spending a quiet evening with an elder,
218
779940
5098
कदाचित प्रेम म्हणजे एखादी शांत संध्याकाळ वडिलधाऱ्यांबरोबर घालवणे असेल.
13:05
listening to their food memories,
219
785062
2686
त्यांच्या अन्नविषयक आठवणी ऐकणे,
13:07
maybe even helping them cook something they love
220
787772
2925
त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात त्यांना मदत करणे,
13:10
and sharing a meal.
221
790721
1441
आणि एकत्र भोजन घेणे.
13:14
Love could be about remembering
222
794035
4216
हे प्रेम म्हणजे आठवण ठेवणे, की
13:18
that humanity is vast
223
798275
2158
मानवता अथांग आहे,
13:20
and food choices differ.
224
800457
1822
आणि अन्नविषयक निवडी भिन्न असू शकतात.
13:23
It could be about showing respect and curiosity
225
803018
3764
प्रेम म्हणजे आदर आणि जिज्ञासा दाखवणे.
13:26
instead of censure
226
806806
1857
दोषारोप करणे नव्हे,
13:28
when we see somebody enjoying a really unfamiliar food.
227
808687
3688
कोणी एखादे पूर्णपणे अनोळखी अन्न खात असेल त्यावेळी.
13:34
Love could be taking the time to inquire,
228
814344
3303
प्रेम म्हणजे चौकशी करण्यासाठी वेळ देणे,
13:38
to dig up information,
229
818591
1832
माहिती काढणे,
13:40
reach out for connections.
230
820447
1879
संबंध जोडणे.
13:43
It could even be a quiet walk in the fynbos
231
823233
3365
फेनबॉस जंगलात शांतपणे फेरफटका करणे.
13:47
to see if a certain plant speaks up to you.
232
827485
4484
एखादे झाड आपल्याशी बोलते का, ते पाहणे.
13:51
That happens.
233
831993
1166
तसे घडते.
13:53
They speak to me all the time.
234
833183
1610
माझ्याशी झाडे नेहमी बोलतात.
13:56
And most of all,
235
836940
1553
सर्वात महत्त्वाचे,
13:58
love is to trust that these little exploratory steps
236
838517
4754
ही छोटी छोटी संशोधनाची पावले
14:03
have the potential to lead us to something larger,
237
843295
3517
आपल्याला मोठ्या उत्तराकडे नेऊ शकतील असा विश्वास बाळगणे.
14:07
sometimes to really surprising answers.
238
847738
2867
कधी ही उत्तरे अतिशय आश्चर्यकारक असू शकतील.
14:11
An indigenous medicine woman once told me
239
851756
3225
एकदा एका आदिवासी वैदू स्त्रीने मला सांगितले,
14:15
that love is to walk on Mother Earth
240
855005
3449
प्रेम म्हणजे, धरणीमातेवर पावले टाकताना,
14:18
as her most beloved child,
241
858478
2381
आपण तिचे सर्वात लाडके मूल आहोत अशा भावनेने चालणे.
14:22
to trust that she values an honest intention
242
862108
4758
असा विश्वास बाळगणे, की ती प्रामाणिक हेतूंचा आदर करते,
14:26
and knows how to guide our steps.
243
866890
2154
आणि आपल्या पावलांना कसे मार्गदर्शन करावे हे ती जाणते.
14:29
I hope I have inspired you
244
869808
2074
आशा आहे, की मी तुम्हांला प्रेरणा दिली असेल,
14:31
to start reconnecting with the food of your ancestors.
245
871906
3547
पूर्वजांच्या अन्नाशी संबंध जोडण्यासाठी.
14:35
Thank you for listening.
246
875477
1459
ऐकण्याबद्दल धन्यवाद.
14:36
(Applause)
247
876960
2181
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7