A life-saving invention that prevents human stampedes | Nilay Kulkarni

73,597 views ・ 2018-03-14

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
I was only nine
0
12691
1278
मी फक्त नऊ वर्षांचा होतो,
00:13
when my grandfather first described to me the horrors he witnessed six years earlier
1
13993
4923
त्यावेळी आजोबांनी मला सांगितलं, की आमच्या नाशिक शहरात सहा वर्षांपूर्वी
00:18
when human stampedes killed 39 people
2
18940
2904
चेंगराचेंगरीमुळे ३९ मृत्यू झाले होते. हा भयंकर प्रसंग
00:21
in our hometown of Nashik, India.
3
21868
2016
त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला होता.
00:24
It was during the 2003 Nashik Kumbh Mela,
4
24461
3289
ही घटना २००३ साली नाशिकच्या कुंभमेळ्यात घडली.
00:27
one of the world's largest religious gatherings.
5
27774
2972
कुंभमेळा हा जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक.
00:31
Every 12 years, over 30 million Hindu worshippers
6
31213
3730
१५ लाख लोक सामावू शकणाऱ्या आमच्या शहरात
00:34
descend upon our city --
7
34967
1579
दर बारा वर्षांनी
00:36
which is built only for 1.5 million people --
8
36570
2840
सुमारे ३० दशलक्ष हिंदू भाविक उतरतात
00:39
and stay for 45 days.
9
39434
1643
आणि ४५ दिवस मुक्काम करतात.
00:41
The main purpose is to wash away all their sins
10
41601
3071
गोदावरीत स्नान करून आपली सर्व पापं धुवून टाकणं
00:44
by bathing in the river Godavari.
11
44696
2325
हा त्यांचा उद्देश असतो.
00:47
And stampedes may easily happen
12
47807
2238
ही प्रचंड मोठी गर्दी संथ गतीने पुढे सरकत असते,
00:50
because a high-density crowd moves at a slow pace.
13
50069
3277
त्यामुळे चेंगराचेंगरी होणं सहज शक्य असतं.
00:54
Apart from Nashik, this event happens in three other places in India,
14
54002
4309
नाशिकप्रमाणेच हा मेळा भारतात आणखी तीन ठिकाणी
00:58
with varying frequency,
15
58335
1719
वेगवेगळ्या वेळी भरतो.
01:00
and between 2001 and 2014,
16
60078
2769
२००१ ते २०१४ या काळात या घटनांमध्ये
01:02
over 2,400 lives have been lost in stampedes at these events.
17
62871
5498
चेंगराचेंगरीमुळे २४०० च्या वर मृत्यू घडून आले आहेत.
01:09
What saddened me the most
18
69362
1857
मला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं झालं,
01:11
is seeing people around me resigning to the city's fate
19
71243
4515
की दर कुंभमेळ्याच्या वेळी असे डझनावारी मृत्यू घडतात
01:15
in witnessing the seemingly inevitable deaths of dozens
20
75782
3825
आणि समाज त्यांना अटळ म्हणून, शहराचं दुर्दैव मानून,
01:19
at every Kumbh Mela.
21
79631
1277
केवळ पाहत राहतो.
01:21
I sought to change this,
22
81448
1430
मला वाटलं, हे बदललं पाहिजे.
01:22
and I thought, why can't I try to find a solution to this?
23
82902
2975
आपण यावर उपाय शोधायचा प्रयत्न का करू नये?
01:25
Because I knew it is wrong.
24
85901
1488
कारण मला हे चुकीचं वाटत होतं.
01:27
Having learned coding at an early age and being a maker,
25
87701
3452
लहानपणीच कोडिंग शिकल्यामुळे आणि अंगी उत्पादकवृत्ती असल्यामुळे
01:31
I considered the wild idea --
26
91177
1668
मला एक भन्नाट कल्पना सुचली.
01:32
(Laughter)
27
92869
1188
(हशा)
01:34
[Makers always find a way]
28
94081
1385
[उत्पादक मार्ग काढतातच.]
01:35
I considered the wild idea of building a system
29
95490
3065
माझी भन्नाट कल्पना होती, गर्दीच्या लोंढ्यावर नियंत्रण ठेवणारी
01:38
that would help regulate the flow of people
30
98579
2462
एक यंत्रणा तयार करून
01:41
and use it in the next Kumbh Mela in 2015,
31
101065
2989
ती २०१५ सालच्या कुंभमेळ्यात वापरायची.
01:44
to have fewer stampedes and, hopefully, fewer deaths.
32
104078
3605
त्यामुळे चेंगराचेंगरी कमी होऊन, कमी लोक मृत्युमुखी पडतील.
01:48
It seemed like a mission impossible,
33
108177
2471
हे स्वप्न अशक्य कोटीतलं भासत होतं.
01:50
a dream too big,
34
110672
1768
एका १५ वर्षांच्या मुलासाठी
01:52
especially for a 15-year-old,
35
112464
2181
तर हे फारच मोठं स्वप्न होतं.
01:54
yet that dream came true in 2015,
36
114669
3539
पण २०१५ मध्ये ते स्वप्न साकार झालं.
01:58
when not only did we succeed
37
118232
3693
चेंगराचेंगरीचं प्रमाण आणि तीव्रता
02:01
in reducing the stampedes and their intensity,
38
121949
2952
कमी करण्यात आम्हांला यश आलं,
02:04
but we marked 2015
39
124925
2177
इतकंच नव्हे, तर २०१५
02:07
as the first Nashik Kumbh Mela to have zero stampedes.
40
127126
4007
हे नाशिकच्या कुंभमेळ्यातलं चेंगराचेंगरीशिवायचं पहिलंच वर्ष ठरलं.
02:11
(Applause)
41
131596
5338
(टाळ्या)
02:16
It was the first time in recorded history
42
136958
2486
एकही मृत्यू न घडता हा मेळा पार पडण्याची
02:19
that this event passed without any casualties.
43
139468
2746
ही इतिहासातली पहिलीच वेळ होती.
02:22
How did we do it?
44
142888
1150
आम्ही हे कसं घडवून आणलं?
02:24
It all started when I joined an innovation workshop
45
144623
3031
याची सुरुवात २०१४ मध्ये झाली. त्यावेळी एम आय टी मीडिया लॅब च्या
02:27
by MIT Media Lab in 2014
46
147678
2676
नवनिर्माण कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो.
02:30
called the Kumbhathon
47
150378
1969
कुंभमेळ्याच्या विराट स्वरूपामुळे
02:32
that aimed at solving challenges faced at the grand scale of Kumbh Mela.
48
152371
4404
उभे राहणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने निर्माण झालेली कुंभथॉन कार्यशाळा.
02:37
Now, we figured out to solve the stampede problem,
49
157784
4508
आमच्या लक्षात आलं, की चेंगराचेंगरीचा प्रश्न सोडवण्यासाठी
02:42
we wanted to know only three things:
50
162316
2164
तीन गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.
02:44
the number of people, the location,
51
164504
2739
लोकांची संख्या, ठिकाण,
02:47
and the rate of the flow of people per minute.
52
167267
3459
आणि गर्दीच्या चालण्याच्या गतीचा मिनिटागणिक दर.
02:51
So we started to look for technologies that would help us get these three things.
53
171241
4129
या तीन गोष्टींसाठी कोणतं तंत्रज्ञान वापरता येईल ते आम्ही शोधू लागलो.
02:56
Can we distribute radio-frequency tokens to identify people?
54
176091
4254
प्रत्येकाला रेडियो फ्रिक्वेन्सी टोकन देऊन त्यांचा माग ठेवता येईल का?
03:00
We figured out that it would be too expensive and impractical
55
180369
3413
पण ३० दशलक्ष टोकन्स वाटणं महागडं आणि अव्यवहारी ठरेल
03:03
to distribute 30 million tags.
56
183806
1936
हे आमच्या लक्षात आलं.
03:06
Can you use CCTV cameras with image-processing techniques?
57
186545
3381
प्रतिमा-प्रक्रिया तंत्रज्ञान असणारे सीसीटीव्ही कॅमेरे वापरता येतील का?
03:09
Again, too expensive for that scale,
58
189950
2047
पुन्हा, तेही प्रचंड संख्येमुळे खर्चिक.
03:12
along with the disadvantages of being non-portable
59
192021
2878
तसंच त्यांची ने-आण करणं कठीण.
03:14
and being completely useless in the case of rain,
60
194923
2818
शिवाय बरेचदा कुंभमेळ्याच्या दिवसांत पाऊस पडतो,
03:17
which is a common thing to happen in Kumbh Mela.
61
197765
2382
त्यावेळी ते कुचकामी ठरतील.
03:21
Can we use cell phone tower data?
62
201120
2325
सेलफोन टॉवर्स चा डेटा वापरता येईल का?
03:23
It sounds like the perfect solution,
63
203806
2467
हे उत्तर अगदी अचूक वाटलं.
03:26
but the funny part is,
64
206297
1773
पण गंमत अशी, की
03:28
most of the people do not carry cell phones
65
208094
2745
कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी
03:30
in events like Kumbh Mela.
66
210863
1484
लोक सेल फोन्स नेत नाहीत.
03:32
Also, the data wouldn't have been granular enough for us.
67
212887
3714
आणि तो डेटा फारसा तपशीलवार नसल्याने आमच्या उपयोगी पडला नसता.
03:36
So we wanted something that was real-time,
68
216625
2453
तात्काळ आणि सहजपणे
03:39
low-cost, sturdy and waterproof,
69
219102
3317
डेटा प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देणारं, स्वस्त, मजबूत, जलरोधक
03:42
and it was easy to get the data for processing.
70
222443
2411
असं काहीतरी आम्हाला हवं होतं.
03:45
So we built Ashioto,
71
225672
2356
म्हणून आम्ही अशियोटो तयार केलं.
03:48
meaning "footstep" in Japanese,
72
228052
2085
म्हणजे जपानी भाषेत "पाऊल".
03:50
as it consists of a portable mat which has pressure sensors
73
230161
4185
यात आहे ने-आण करायला सोपी अशी एक मॅट. त्या मॅटमध्ये प्रेशर सेन्सर्स असल्याने
03:54
which can count the number of people walking on it,
74
234370
2491
तिच्यावरून चालत जाणाऱ्यांची संख्या ती मोजते
03:56
and sends the data over the internet
75
236885
2432
आणि तो डेटा पृथक्करणासाठी आम्ही निर्माण केलेल्या
03:59
to the advanced data analysis software we created.
76
239341
2547
एका सॉफ्टवेअरला इंटरनेटद्वारे पाठवते.
04:02
The possible errors, like overcounting or double-stepping,
77
242483
3288
पावलं मोजण्यात होऊ शकणाऱ्या चुका टाळण्यासाठी
04:05
were overcome using design interventions.
78
245795
2650
मॅटच्या रचनेचा आधार घेतला गेला.
04:08
The optimum breadth of the mat was determined to be 18 inches,
79
248803
3526
मॅटची योग्य रुंदी १८ इंच ठरवण्यात आली. त्याआधी अनेक वेगळ्या आकारांच्या
04:12
after we tested many different versions
80
252353
2239
चाचण्या आम्ही घेतल्या होत्या
04:14
and observed the average stride length of a person.
81
254616
2587
आणि साधारण लोकांच्या चालीचं निरीक्षण केलं होतं.
04:18
Otherwise, people might step over the sensor.
82
258111
2905
नाहीतर लोक, सेन्सर्सवर पावलं न टाकता ते ओलांडून गेले असते.
04:21
We started with a proof of concept built in three days,
83
261040
2572
तीन दिवसांत आम्ही पुठ्ठा आणि अॅल्युमिनियम फॉईल वापरून
04:23
made out of cardboard and aluminum foil.
84
263636
2874
आमच्या कल्पनेतला नमुना तयार केला.
04:26
(Laughter)
85
266534
1001
(हशा)
04:27
It worked, for real.
86
267559
2374
आणि खरोखरीच तो यशस्वी ठरला.
04:29
We built another one with aluminum composite panels
87
269957
2690
अॅल्युमिनम कंपाॅझिट पॅनल्स व पिझोइलेक्ट्रिक प्लेट्सपासून
04:32
and piezoelectric plates,
88
272671
1638
आम्ही दुसरा नमुना तयार केला.
04:34
which are plates that generate a small pulse of electricity under pressure.
89
274333
3571
या प्लेट्सवर दाब पडताच त्यातून छोटासा विद्युतप्रवाह निर्माण होतो.
04:38
We tested this at 30 different pilots in public,
90
278959
3269
आम्ही रेस्टोरंटस, मॉल, देवळं अशा
04:42
in crowded restaurants, in malls, in temples, etc.,
91
282252
3722
३० निरनिराळ्या गर्दीच्या ठिकाणी याची चाचणी घेऊन
04:45
to see how people reacted.
92
285998
1634
लोकांची प्रतिक्रिया अजमावली.
04:48
And people let us run these pilots
93
288720
2023
शहरासमोरच्या प्रश्नावर स्थानिक मुलं
04:50
because they were excited to see localites work on problems for the city.
94
290767
6476
काम करताना पाहून लोकांनी उत्साहाने मदत केली.
04:57
I was 15 and my team members were in their early 20s.
95
297680
3119
माझं वय होतं १५ आणि माझ्याबरोबरची मुलं विशीत होती.
05:01
When the sensors were colored,
96
301736
4491
आम्ही रंगीत सेन्सर्स केले होते,
05:06
people would get scared and would ask us questions like,
97
306251
2841
तेव्हा लोक घाबरून विचारायचे,
05:09
"Will I get electrocuted if I step on this?"
98
309116
2207
"याच्यावर पाय ठेवला तर शॉक लागेल का?"
05:11
(Laughter)
99
311347
1001
(हशा)
05:12
Or, if it was very obvious that it was an electronic sensor on the ground,
100
312372
4372
किंवा जमिनीवर सेन्सर दिसत असेल तर
05:16
they would just jump over it.
101
316768
1493
त्याच्यावरुन उडी मारून जायचे.
05:18
(Laughter)
102
318285
1076
(हशा)
05:19
So we decided to design a cover for the sensor
103
319385
3064
जमिनीवर हे काय आहे, अशी लोकांना भीती वाटू नये म्हणून
05:22
so that people don't have to worry what it is on the ground.
104
322473
3057
सेन्सरवर आच्छादन घालायचं आम्ही ठरवलं.
05:25
So after some experimentation,
105
325554
1976
अशा काही प्रयोगांनंतर आम्ही
05:27
we decided to use an industrial sensor,
106
327554
2810
इंडस्ट्रीयल सेन्सर
05:30
used as a safety trigger in hazardous areas
107
330388
2969
आणि आच्छादन म्हणून
05:33
as the sensor,
108
333381
1151
काळं निओप्रीन रबर
05:34
and a black neoprene rubber sheet
109
334556
2081
वापरायचं ठरवलं.
05:36
as the cover.
110
336661
1242
हे सेन्सर धोक्याच्या क्षेत्रात वापरले जातात.
05:38
Now, another added benefit of using black rubber
111
338374
2817
काळं रबर वापरण्याचा
05:41
was that dust naturally accumulates over the surface,
112
341215
3627
आणखी एक फायदा म्हणजे
05:44
eventually camouflaging it with the ground.
113
344866
2650
त्यावर माती साचल्यावर ते जमिनीसारखंच दिसायचं.
05:47
We also had to make sure that the sensor is no higher than 12 millimeters.
114
347540
5112
सेन्सरची जाडी १२ मिमी पेक्षा कमी ठेवण्याची खबरदारी आम्हांला घ्यावी लागली.
05:53
Otherwise, people might trip over it,
115
353206
2229
नाहीतर लोक अडखळून पडले असते, आणि
05:55
which in itself would cause stampedes.
116
355459
1905
त्यामुळे चेंगराचेंगरी सुरु झाली असती.
05:57
(Laughter)
117
357792
3787
(हशा)
06:01
We don't want that.
118
361603
1362
तसं नक्कीच व्हायला नको होतं.
06:02
(Laughter)
119
362989
1789
(हशा)
06:04
So we were able to design a sensor which was only 10 millimeters thick.
120
364802
4079
आम्ही १० मिमी जाडीचा सेन्सर तयार केला.
06:09
Now the data is sent to the server in real time,
121
369469
2240
आता डेटा तात्काळ सर्व्हरला पाठवला जातो.
06:11
and a heat map is plotted,
122
371733
1648
आणि एक हीटमॅप काढला जातो.
06:13
taking into account all the active devices on the ground.
123
373405
3343
जमिनीवर कार्यरत असणारे सर्व सेन्सर्स विचारात घेतले जातात.
06:16
The authorities could be alerted if the crowd movement slowed down
124
376772
4285
गर्दीचा वेग कमी झाला किंवा गर्दी एका ठराविक प्रमाणाबाहेर वाढली,
06:21
or if the crowd density moved beyond a desired threshold.
125
381081
3135
की अधिकाऱ्यांना सूचना दिली जाते.
06:24
We installed five of these mats in the Nashik Kumbh Mela 2015,
126
384992
4992
२०१५ च्या कुंभमेळ्यात आम्ही अशा पाच मॅट्स बसवल्या
06:30
and counted over half a million people
127
390008
2390
आणि १८ तासांत
06:32
in 18 hours,
128
392422
1682
पाच लाख लोकांची गणना केली.
06:34
ensuring that the data was available in real time at various checkpoints,
129
394128
4377
हा डेटा आम्ही अनेक नियंत्रण कक्षांना तात्काळ उपलब्ध करून दिला
06:38
ensuring a safe flow of people.
130
398529
1876
आणि गर्दीचा प्रवाह सुरक्षित ठेवला.
06:40
Now, this system, eventually, with other innovations,
131
400429
3445
या आणि अशाच काही इतर संशोधनांमुळे या कुंभमेळ्यात
06:43
is what helped prevent stampedes altogether at that festival.
132
403898
3152
चेंगराचेंगरी रोखण्याला मदत झाली.
06:47
The code used by Ashioto during Kumbh Mela
133
407585
2873
अशियोटो साठी वापरला गेलेला कोड लवकरच सर्वांच्या वापरासाठी
06:50
will soon be made publicly available, free to use for anyone.
134
410482
3412
खुला करण्यात येणार आहे.
06:53
I would be glad if someone used this code
135
413918
1977
हा कोड वापरून कोणी असेच इतर मोठे मेळावे
06:55
to make many more gatherings safer.
136
415919
2212
सुरक्षित करू शकलं, तर मला फार आनंद होईल.
06:58
Having succeeded at Kumbh Mela
137
418878
1926
कुंभमेळ्यातल्या या यशाने
07:00
has inspired me to help others who may also suffer from stampedes.
138
420828
3912
मला इतर ठिकाणची चेंगराचेंगरी थांबवण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
07:04
The design of the system makes it adaptable
139
424764
2809
या प्रणालीची रचना अशी आहे,
07:07
to pretty much any event
140
427597
1994
की ती कोणत्याही नियोजित मेळाव्यासाठी
07:09
that involves an organized gathering of people.
141
429615
3796
अनुरूप करून वापरता येईल.
07:13
And my new dream is to improve, adapt and deploy the system
142
433435
4310
आता माझं पुढचं स्वप्न आहे, या प्रणालीत आणखी सुधारणा करून, जास्त अनुकूलन आणून
07:17
all over the world to prevent loss of life and ensure a safe flow of people,
143
437769
5469
गर्दीचा प्रवाह सुरक्षित करून मनुष्यहानी वाचवण्यासाठी ती जगात सर्वत्र वापरायची.
07:23
because every human soul is precious,
144
443262
2787
कारण, प्रत्येक मानवी जीव हा मौल्यवान आहे.
07:26
whether at concerts or sporting events,
145
446073
2378
गाण्याच्या मैफिली, खेळांचे सामने,
07:28
the Maha Kumbh Mela in Allahabad,
146
448475
1887
अलाहाबादचा महाकुंभमेळा,
07:30
the Hajj in Mecca,
147
450386
1451
मक्केची हज यात्रा,
07:31
the Shia procession to Karbala
148
451861
1897
करबालाची शिया यात्रा
07:33
or at the Vatican City.
149
453782
1484
किंवा व्हॅटिकन सिटी, कुठेही.
07:35
So what do you all think, can we do it?
150
455893
1877
तुम्हांला काय वाटतं, असं करता येईल?
07:37
(Audience) Yes!
151
457794
1151
प्रेक्षक: होय!
07:38
Thank you.
152
458969
1151
धन्यवाद.
07:40
(Cheers)
153
460144
1001
(वाहवा)
07:41
(Applause)
154
461169
3270
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7