Fake videos of real people -- and how to spot them | Supasorn Suwajanakorn

1,289,800 views ・ 2018-07-25

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Vibhavari Deshpande Reviewer: Arvind Patil
00:12
Look at these images.
0
12876
1151
हे फोटो पाहा.
00:14
Now, tell me which Obama here is real.
1
14051
2635
आता मला सांगा , या फोटोंमधील कोणते ओबामा खरे आहेत??
00:16
(Video) Barack Obama: To help families refinance their homes,
2
16710
2861
(व्हिडिओ) ओबामा:कुटुंबांना घरे उभी करण्यास मदत करण्यासाठी,
00:19
to invest in things like high-tech manufacturing,
3
19595
2647
हायटेक उत्पादनांसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणुकीसाठी.
00:22
clean energy
4
22266
1159
स्वच्छ ऊर्जा,
00:23
and the infrastructure that creates good new jobs.
5
23449
2779
नोकऱ्या निर्माण करणाऱ्या सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी.
00:26
Supasorn Suwajanakorn: Anyone?
6
26647
1484
सुपासोन सुवाजनकोन : सांगा ?
00:28
The answer is none of them.
7
28155
1874
उत्तर आहे - एकही खरे नाहीत.
00:30
(Laughter)
8
30053
1114
(हशा)
00:31
None of these is actually real.
9
31191
1786
खरेतर यातील कोणतेच खरे नाहीत.
00:33
So let me tell you how we got here.
10
33001
1840
याची सुरुवात कशी झाली हे सांगतो.
00:35
My inspiration for this work
11
35940
1578
या कामामागील माझी प्रेरणा म्हणजे
00:37
was a project meant to preserve our last chance for learning about the Holocaust
12
37542
5411
होलोकॉस्ट मध्ये वाचलेल्या लोकांकडून त्यासंबंधी जाणून घेण्याची शेवटची संधी
00:42
from the survivors.
13
42977
1768
जतन करण्यासाठीचा एक प्रक्ल्प.
00:44
It's called New Dimensions in Testimony,
14
44769
2627
'न्यु डायमेन्शन इन टेस्टिमोनी' हा तो प्रकल्प .
00:47
and it allows you to have interactive conversations
15
47420
3126
यात होलोकॉस्टमधे वाचलेल्या व्यक्तींच्या
00:50
with a hologram of a real Holocaust survivor.
16
50570
2556
होलोग्रामशी परस्पर संवाद साधता येतो.
00:53
(Video) Man: How did you survive the Holocaust?
17
53793
1966
(व्हिडिओ) व्यक्ती: तुम्ही कसे वाचलात?
00:55
(Video) Hologram: How did I survive?
18
55783
1668
(व्हिडिओ ):होलोग्राम :मी कसा वाचलो?
00:57
I survived,
19
57912
1807
मी वाचलो
01:00
I believe,
20
60419
1527
कारण मला वाटतं
01:01
because providence watched over me.
21
61970
3023
देवाची माझ्यावर कृपादृष्टी होती.
01:05
SS: Turns out these answers were prerecorded in a studio.
22
65573
3454
सुपासोन :ही उत्तरे स्टुडिओ मध्ये आधीच रेकॉर्ड करण्यात आली होती.
01:09
Yet the effect is astounding.
23
69051
2452
तरीही परिणाम आश्चर्यचकित करणारा आहे.
01:11
You feel so connected to his story and to him as a person.
24
71527
3619
ती व्यक्ती आणि त्यांचे अनुभव यांच्याशी आपण नकळत जोडले जातो.
01:16
I think there's something special about human interaction
25
76011
3301
मला वाटतं मानवी संवादामध्ये काहीतरी खास आहे;
01:19
that makes it much more profound
26
79336
2757
ज्यामुळे या अनुभवांना, भावनांना
01:22
and personal
27
82117
2198
अधिक तीव्रता प्राप्त होते.
01:24
than what books or lectures or movies could ever teach us.
28
84339
3485
पुस्तके, व्याख्याने, चित्रपटांच्या तुलनेत मानवी संवाद खूपकाही शिकवतो.
01:28
So I saw this and began to wonder,
29
88267
2425
मी हे पहिले आणि विचार केला कि,
01:30
can we create a model like this for anyone?
30
90716
2810
आपल्याला कोणाची अशी प्रतिकृती बनवता येईल का?
01:33
A model that looks, talks and acts just like them?
31
93550
2975
हुबेहूब त्यांच्यासारखीच दिसणारी, बोलणारी,वागणारी प्रतिकृती.
01:37
So I set out to see if this could be done
32
97573
2007
आणि मी त्यादिशेने प्रयत्न करू लागलो.
01:39
and eventually came up with a new solution
33
99604
2310
अखेरीस मला एक उपाय सापडला,
01:41
that can build a model of a person using nothing but these:
34
101938
3220
ज्यायोगे एखाद्या व्यक्तीची प्रतिकृती सहज बनवता येऊ शकेल.
01:45
existing photos and videos of a person.
35
105747
2214
यासाठी फोटो,व्हिडीओ इतकेही पुरेसे ठरतील.
01:48
If you can leverage this kind of passive information,
36
108701
2617
एखाद्याची अशी निष्क्रिय माहिती मिळवता आली
01:51
just photos and video that are out there,
37
111342
2007
जसे कि फोटो, व्हिडीओ इत्यादी.
01:53
that's the key to scaling to anyone.
38
113373
2056
तर अशी प्रतिकृती बनवणे सहज शक्य आहे.
01:56
By the way, here's Richard Feynman,
39
116119
1777
असो .. तर हे आहेत 'रिचर्ड फेनमन'
01:57
who in addition to being a Nobel Prize winner in physics
40
117920
3413
हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते तर होतेच
02:01
was also known as a legendary teacher.
41
121357
2453
शिवाय ते एक महान शिक्षक म्हणूनही ओळखले जात.
02:05
Wouldn't it be great if we could bring him back
42
125080
2198
आपण त्यांना परत आणू शकलो तर बरे होईल ना ?
02:07
to give his lectures and inspire millions of kids,
43
127302
3265
कितीतरी लहान मुलांना त्यांच्या व्याख्यानांमधून प्रेरणा मिळेल.
02:10
perhaps not just in English but in any language?
44
130591
2992
कदाचित इंग्रजी शिवाय इतरही अनेक भाषांमध्ये हे शक्य झाले तर ?
02:14
Or if you could ask our grandparents for advice and hear those comforting words
45
134441
4602
किंवा आजी आजोबांना सल्ला विचारता आला, त्यांचे मायेचे शब्द परत ऐकता आले तर..
02:19
even if they're no longer with us?
46
139067
1770
आज ते आपल्यात नसले तरीही ?
02:21
Or maybe using this tool, book authors, alive or not,
47
141683
3396
किंवा हे साधन वापरून, जिवंत असले/नसलेले प्रसिद्ध लेखक
02:25
could read aloud all of their books for anyone interested.
48
145103
2937
त्यांची पुस्तके श्रोत्यांना ऐकवू शकले तर
02:29
The creative possibilities here are endless,
49
149199
2437
अश्या कितीतरी कल्पक शक्यता वर्तवता येतील.
02:31
and to me, that's very exciting.
50
151660
1713
आणि माझ्यासाठी, हे अतिशय रोमांचक आहे.
02:34
And here's how it's working so far.
51
154595
2002
आतापर्यंत हे कसे साध्य झाले आहे ते पाहू.
02:36
First, we introduce a new technique
52
156621
1667
एका नवीन तंत्राचा परिचय करून देतो.
02:38
that can reconstruct a high-detailed 3D face model from any image
53
158312
4572
ह्या तंत्राद्वारे कोणत्याही फोटोवरून चेहऱ्याची तपशीलवार 3D प्रतिमा बनवता येते.
02:42
without ever 3D-scanning the person.
54
162908
2119
त्या व्यक्तीचे 3D- स्कॅनिंग न करता सुद्धा.
02:45
And here's the same output model from different views.
55
165890
2642
एकच आउटपुट मॉडेल वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इथे दिसेल.
02:49
This also works on videos,
56
169969
1502
व्हिडिओ मध्येही हे काम करते.
02:51
by running the same algorithm on each video frame
57
171495
2852
प्रत्येक व्हिडिओ फ्रेमसाठी सारखाच अल्गोरिदम वापरला जातो
02:54
and generating a moving 3D model.
58
174371
2222
आणि 3D मॉडेल तयार केले जाते.
02:57
And here's the same output model from different angles.
59
177538
2772
अशा प्रकारे एकच आऊपुट मॉडेल वेगवेगळ्या दिशेने दाखवता येते.
03:01
It turns out this problem is very challenging,
60
181933
2534
ही समस्या खूप आव्हानात्मक आहे,
03:04
but the key trick is that we are going to analyze
61
184491
2525
पण यासाठी आपण त्या व्यक्तीच्या संग्रीहीत फोटोंचे
03:07
a large photo collection of the person beforehand.
62
187040
2966
सविस्तर विश्लेषण करणार आहोत.
03:10
For George W. Bush, we can just search on Google,
63
190650
2539
जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे फोटो आपण गुगलवर शोधू शकतो.
03:14
and from that, we are able to build an average model,
64
194309
2499
त्यावरून आपल्याला त्यांची साधारण प्रतिमा बनवता येते.
03:16
an iterative, refined model to recover the expression
65
196832
3111
एक चांगली प्रतिकृती ज्यात त्यांचे हावभाव
03:19
in fine details, like creases and wrinkles.
66
199967
2336
चेहऱ्याच्या बारकाव्यांसह पुनर्निर्मित करता येतील.
03:23
What's fascinating about this
67
203326
1403
सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे,
03:24
is that the photo collection can come from your typical photos.
68
204753
3423
तुमच्या नेहमीच्या फोटोंवरून हे सर्व करता येते.
03:28
It doesn't really matter what expression you're making
69
208200
2603
त्या फोटोंमधील तुमचे हावभाव महत्वाचे नाहीत.
03:30
or where you took those photos.
70
210827
1885
फोटो कोठे काढले हेही महत्वाचं नाही.
03:32
What matters is that there are a lot of them.
71
212736
2400
फक्त असे भरपूर फोटो उपलब्ध असणं गरजेचं आहे.
03:35
And we are still missing color here,
72
215160
1736
अरे ...आपण यात अजून रंग भरले नाहीत.
03:36
so next, we develop a new blending technique
73
216920
2348
तर पुढे .. यासाठी आम्ही नवे तंत्र विकसित केले.
03:39
that improves upon a single averaging method
74
219292
2836
तयार केलेली सर्वसाधारण प्रतिमा सुधारण्यास याची मदत होते.
03:42
and produces sharp facial textures and colors.
75
222152
2818
यामध्ये चेहऱ्याचा पोत आणि रंग उत्तमप्रकारे तयार करता येतो.
03:45
And this can be done for any expression.
76
225779
2771
आणि हे कोणत्याही हावभावासाठी शक्य आहे.
03:49
Now we have a control of a model of a person,
77
229485
2499
आता अशी प्रतिमा आपल्या पूर्ण नियंत्रणाखाली येते.
03:52
and the way it's controlled now is by a sequence of static photos.
78
232008
3795
स्थिर फोटोंच्या क्रमवार रचनेतून हे नियंत्रण मिळवले जाते.
03:55
Notice how the wrinkles come and go, depending on the expression.
79
235827
3126
हावभावांनुसार चेहऱ्यावरच्या रेषा कश्या बदलतात ते पाहा.
04:00
We can also use a video to drive the model.
80
240109
2746
आपण व्हिडिओ मध्येही हे बदल पाहू शकतो.
04:02
(Video) Daniel Craig: Right, but somehow,
81
242879
2593
(व्हिडिओ) डॅनियल क्रेग: बरोबर, पण
04:05
we've managed to attract some more amazing people.
82
245496
3771
आम्ही काही चांगल्या लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी झालो आहोत.
04:10
SS: And here's another fun demo.
83
250021
1642
सुपासोन:काही मजेदार प्रात्यक्षिके.
04:11
So what you see here are controllable models
84
251687
2246
या नियंत्रीत करता येतील अशा काही प्रतिकृती.
04:13
of people I built from their internet photos.
85
253957
2444
इंटरनेटवरील फोटोंवरून या प्रतिकृती बनवल्या आहेत.
04:16
Now, if you transfer the motion from the input video,
86
256425
2904
आता, इनपुट व्हिडीओ द्वारे हालचालींमध्ये बदल केल्यास;
04:19
we can actually drive the entire party.
87
259353
2152
एकाचवेळी सगळे फोटो नियंत्रित होतात.
04:21
George W. Bush: It's a difficult bill to pass,
88
261529
2172
जॉर्ज बुश: या कायद्यास अनुमती मिळणे अवघड आहे.
04:23
because there's a lot of moving parts,
89
263725
2303
यासाठी खूप बदल गरजेचे आहेत
04:26
and the legislative processes can be ugly.
90
266052
5231
आणि कायदेविषयक प्रक्रिया तितकीशी सरळ सोपी नाही.
04:31
(Applause)
91
271307
1630
(टाळ्या )
04:32
SS: So coming back a little bit,
92
272961
1837
सुपासोन: तर.. थोडंसं मागे येऊ.
04:34
our ultimate goal, rather, is to capture their mannerisms
93
274822
3191
खरंतर आमचं अंतिम उद्दिष्ट त्यांची वागण्या पद्धत जाणून घेणे तसेच
04:38
or the unique way each of these people talks and smiles.
94
278037
3045
या प्रत्येकांची हसण्या, बोलण्याची लकब लक्षात घेणे हे आहे.
04:41
So to do that, can we actually teach the computer
95
281106
2313
यासाठी आपल्याला संगणकाला
04:43
to imitate the way someone talks
96
283443
2222
एखादयाच्या बोलण्याची नक्कल करण्यास शिकवता येईल?
04:45
by only showing it video footage of the person?
97
285689
2420
ते सुद्धा फक्त त्या व्यक्तीचे व्हिडिओ दाखवून?
04:48
And what I did exactly was, I let a computer watch
98
288898
2577
मी तेच केले. संगणकाला असे व्हिडिओ दाखवले.
04:51
14 hours of pure Barack Obama giving addresses.
99
291499
3277
१४ तास फक्त बराक ओबामा यांची भाषणे दाखवली.
04:55
And here's what we can produce given only his audio.
100
295443
3516
आणि केवळ त्यांचे ऑडिओ देऊन आम्ही हे निर्माण करू शकलो.
04:58
(Video) BO: The results are clear.
101
298983
1777
(व्हिडिओ) ओबामा: परिणाम स्पष्ट आहेत.
05:00
America's businesses have created 14.5 million new jobs
102
300784
4349
अमेरिकन उद्योग धंद्यामुळे १४. ५ दशलक्ष नव्या रोजगारांची निर्मिती झाली आहे.
05:05
over 75 straight months.
103
305157
2774
तेही सलग ७५ महिन्यांच्या कालावधीत.
05:07
SS: So what's being synthesized here is only the mouth region,
104
307955
2905
सुपासोन: येथे केवळ ओठांचा भाग बनवला जातो आहे.
05:10
and here's how we do it.
105
310884
1540
आणि आम्ही हे अशाप्रकारे बनवतो.
05:12
Our pipeline uses a neural network
106
312764
1826
मज्जासंस्थावर आधारित प्रणाली वापरून
05:14
to convert and input audio into these mouth points.
107
314614
2936
आवाज रूपांतरित करून ओठांच्या या बिंदूंमध्ये बसवला जातो.
05:18
(Video) BO: We get it through our job or through Medicare or Medicaid.
108
318547
4225
(व्हिडिओ) ओबामा: आपल्या कामाद्वारे, मेडिकेअर किंवा मेडिकएड द्वारे मिळते.
05:22
SS: Then we synthesize the texture, enhance details and teeth,
109
322796
3420
सुपासोन: नंतर आम्ही त्वचेचा पोत, दात आणि इतर बारकाव्यांवर काम करतो.
05:26
and blend it into the head and background from a source video.
110
326240
3074
नंतर हे सर्व, चेहरा व व्हिडिओतील पार्श्वभूमी यांना जोडले जाते.
05:29
(Video) BO: Women can get free checkups,
111
329338
1905
(व्हिडिओ)ओबामा: स्त्रियांना मोफत तपासणी,
05:31
and you can't get charged more just for being a woman.
112
331267
2968
केवळ महिला आहेत म्हणून अधिक शुल्क आकारता येणार नाही.
05:34
Young people can stay on a parent's plan until they turn 26.
113
334973
3306
तरुणांना २६ वर्षांपर्यंत पालकांचीच विमा योजना वापरता येईल.
05:39
SS: I think these results seem very realistic and intriguing,
114
339267
2952
मला वाटते की हे परिणाम खूपच वास्तववादी आणि रोचक आहेत.
05:42
but at the same time frightening, even to me.
115
342243
3173
पण त्याच बरोबर ते भीतीदायक सुद्धा आहेत. अगदी माझ्यासाठी सुद्धा.
05:45
Our goal was to build an accurate model of a person, not to misrepresent them.
116
345440
4015
आमचा उद्देश अचूक मॉडेल तयार करणे हा होता. चुकीचा अर्थ लावणे हा नाही.
05:49
But one thing that concerns me is its potential for misuse.
117
349956
3111
मात्र याचा दुरुपयोग होऊ शकतो हि गोष्ट मला काळजीत टाकते.
05:53
People have been thinking about this problem for a long time,
118
353958
2971
लोक बऱ्याच काळापासून या समस्येबद्दल विचार करत आहेत,
05:56
since the days when Photoshop first hit the market.
119
356953
2381
अगदी फोटोशॉप पहिल्यांदा बाजारात आलं त्या वेळपासून.
05:59
As a researcher, I'm also working on countermeasure technology,
120
359862
3801
एक संशोधक म्हणून,मी प्रतिबंधात्मक तंत्रज्ञानावर देखिल काम करतो आहे.
06:03
and I'm part of an ongoing effort at AI Foundation,
121
363687
2942
आणि मी एआय फाउंडेशनमध्ये चालू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे,
06:06
which uses a combination of machine learning and human moderators
122
366653
3397
यामध्ये मशीन लर्निंग आणि मानवी संयोजक यांचा एकत्रित उपयोग केला जातो.
06:10
to detect fake images and videos,
123
370074
2144
आणि नकली छायाचित्रे, व्हिडीओ शोधली जातात.
06:12
fighting against my own work.
124
372242
1514
हे माझ्याच विरोधात जाणे झाले.
06:14
And one of the tools we plan to release is called Reality Defender,
125
374675
3190
आम्ही लवकरच उपलब्ध करणाऱ्या साधनांपैकी एक म्हणजे 'रिऍलिटी डिफेंडर'.
06:17
which is a web-browser plug-in that can flag potentially fake content
126
377889
4039
हे एक वेब-ब्राउझर प्लग-इन आहे जे संभाव्य बनावट मजकूर अधोरेखित करेल.
06:21
automatically, right in the browser.
127
381952
2533
आपोआप आणि तेही ब्राउझरमध्येच
06:24
(Applause)
128
384509
4228
(टाळ्या)
06:28
Despite all this, though,
129
388761
1453
तरीही..
06:30
fake videos could do a lot of damage,
130
390238
1840
बनावट व्हिडिओ बरेच नुकसान करू शकतात,
06:32
even before anyone has a chance to verify,
131
392102
3294
अगदी कोणालाही ते पडताळून पाहण्याची संधी मिळण्या आधीच
06:35
so it's very important that we make everyone aware
132
395420
2722
म्हणूनच सध्या तंत्रज्ञानाद्वारे काय शक्य आहे
06:38
of what's currently possible
133
398166
2007
याबाबत सर्वांना जागृत करणे महत्वाचे आहे.
06:40
so we can have the right assumption and be critical about what we see.
134
400197
3369
जेणेकरून आपण हे गृहीत धरून काय पाहतो आहोत याचा सारासार विचार करू शकू.
06:44
There's still a long way to go before we can fully model individual people
135
404423
5007
व्यक्तीची संपूर्ण प्रतिकृती बनवण्यासाठी अजून बरेच प्रयत्न गरजेचे आहेत.
06:49
and before we can ensure the safety of this technology.
136
409454
2786
तसेच याचा योग्य वापर होईल हे सुनिश्चित करण्यासाठीही.
06:53
But I'm excited and hopeful,
137
413097
1587
पण मी उत्साहित आणि आशावादी आहे,
06:54
because if we use it right and carefully,
138
414708
3539
कारण याचा योग्य आणि काळजीपूर्वक केल्यास,
06:58
this tool can allow any individual's positive impact on the world
139
418271
4309
कोणत्याही व्यक्तीचा जगावरील सकारात्मक प्रभाव
07:02
to be massively scaled
140
422604
2190
वाढवण्यास मदत होऊ शकेल.
07:04
and really help shape our future the way we want it to be.
141
424818
2742
व याच्या साहाय्याने भविष्याला हवा तसा आकार देता येऊ शकेल.
07:07
Thank you.
142
427584
1151
धन्यवाद.
07:08
(Applause)
143
428759
5090
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7