Shabana Basij-Rasikh: The dream of educating Afghan girls lives on | TED

66,711 views ・ 2021-12-03

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:04
Nine years ago,
0
4793
1209
नऊ वर्षांपूर्वी
00:06
I stood on a stage a lot like this one.
1
6002
2586
मी अशाच एका व्यासपीठावर उभी होते.
00:08
It was at the TEDWomen conference in Washington, DC, back in 2012.
2
8588
4755
ती होती २०१२ मधली, वॉशिंग्टन डी. सी. येथील TEDWomen conference.
00:14
I was 22 years old, a woman with a college degree.
3
14344
3587
मी २२ वर्षांची होते. विद्यापीठातून पदवी मिळवलेली एक महिला.
00:18
That's nothing too exceptional to say here in the United States.
4
18974
3628
इथे अमेरिकेत असं बोलणं फारसं अपवादात्मक नाही.
00:23
In Afghanistan, my homeland,
5
23353
2669
अफगाणिस्तानात, माझ्या मायभूमीत,
00:26
women like me were the exception.
6
26022
2795
माझ्यासारख्या महिला अपवादानेच आढळत.
00:29
It had been a little over a decade since the fall of the Taliban regime.
7
29901
3712
तालिबान राजवटीचा पराभव होऊन एक दशक लोटलं होतं.
00:33
A time when it was quite literally illegal for girls to go to school.
8
33989
4796
त्या राजवटीत मुलींनी शाळेत जाणं बेकायदेशीर होतं.
00:39
The Afghan people had spent a decade rebuilding our nation and our lives.
9
39953
4838
आम्ही अफगाण लोकांनी आमची आयुष्यं, आमचा देश पुन्हा उभारण्यात एक दशक घालवलं.
00:45
And when I stood on the TEDWomen stage,
10
45417
3003
TEDWomen च्या व्यासपीठावरून मी
00:48
I challenged the world to dare to educate Afghan girls.
11
48461
5381
अफगाण मुलींना शिकवण्याचं आव्हान जगासमोर मांडलं.
00:54
The way I had just started doing at a place in Kabul
12
54467
2837
अशा प्रकारचं काम मी काबूलमध्ये एका ठिकाणी सुरु केलं होतं.
00:57
called the School of Leadership, Afghanistan, or SOLA.
13
57345
4546
त्याचं नाव School of Leadership, Afghanistan, SOLA.
01:02
(Video) [To] me, Afghanistan is a country of hope and boundless possibilities.
14
62517
4755
(Video)माझ्या मते अफगाणिस्तान हा आशेचा, अमर्याद संधी असलेला देश आहे.
01:11
And every single day,
15
71359
2836
आणि दर दिवशी,
01:14
the girls of SOLA remind me of that.
16
74237
2294
SOLA मधल्या मुली मला याची आठवण करून देतात.
01:17
Like me, they are dreaming big.
17
77741
2878
माझ्यासारख्याच, त्याही मोठी स्वप्नं पाहताहेत.
01:22
That was then.
18
82537
1210
ती होती पूर्वीची कहाणी.
01:24
(Applause)
19
84205
2920
(टाळ्या)
01:27
And this is now.
20
87167
1334
आणि ही आजची कहाणी.
01:29
And the Taliban are back.
21
89544
1752
तालिबान परत आले आहेत.
01:32
But I want you to know I haven't stopped dreaming.
22
92547
2336
पण मी स्वप्नं पाहणं थांबवलेलं नाही.
01:34
Neither have those girls of SOLA.
23
94924
1836
आणि SOLA मधल्या मुलींनीही.
01:38
We have taken our dreams and adapted them.
24
98053
3169
आम्ही आमची स्वप्नं परिस्थितीला अनुरूप बनवली.
01:42
Agility, adaptation, resilience.
25
102140
4796
जलदपणा, अनुरूपता, लवचिकता
01:47
These concepts are core to everything that SOLA is.
26
107520
3462
SOLA च्या कार्यात हे महत्त्वाचे घटक आहेत.
01:51
We have faced the uncertainty of what might be,
27
111983
3921
आम्ही अनिश्चितता अनुभवली आहे,
01:55
and we have turned it into the certainty of what will be.
28
115945
3170
आणि तिचं रूपांतर निश्चित अशा भविष्यकाळात केलं आहे.
01:59
I'll explain.
29
119157
1168
मी स्पष्ट करून सांगते.
02:01
Back in 2012,
30
121034
2169
पूर्वी, २०१२ मध्ये
02:03
we ran a program where girls lived at SOLA
31
123203
2836
आमच्या एका योजनेनुसार मुली SOLA मध्ये राहत
02:06
but primarily studied at high schools in Kabul.
32
126081
3169
पण प्रामुख्याने काबूलमधील माध्यमिक शाळांत शिकत.
02:09
And we secured scholarships for these girls
33
129709
2586
या मुलींसाठी आम्ही शिष्यवृत्ती मिळवून दिली.
02:12
to pursue their education overseas,
34
132295
2211
परदेशात शिक्षण घेण्यासाठी.
02:14
including here in America.
35
134547
1752
इथे अमेरिकेत सुद्धा.
02:17
It worked.
36
137133
1293
याचा उपयोग झाला.
02:18
It worked well.
37
138468
1627
अगदी चांगला उपयोग झाला.
02:20
But I realized I was contributing to something I never wanted to see:
38
140929
3879
पण माझ्या लक्षात आलं,की माझ्या नावडत्या गोष्टीला मी हातभार लावत होते.
02:25
a brain drain of Afghanistan’s educated women.
39
145475
3128
अफगाणिस्तानातील सुशिक्षित स्त्रियांचं स्थलांतर.
02:29
So I realized I had to adapt.
40
149562
1961
इथे बदल हवा, हे माझ्या लक्षात आलं.
02:31
I wanted to educate Afghan girls
41
151981
3003
मला अफगाण मुलींना शिक्षण द्यायचं होतं.
02:34
who would become educated Afghan women,
42
154984
2628
मग त्या सुशिक्षित अफगाण स्त्रिया होतील,
02:38
who would then educate other girls.
43
158571
3504
आणि आणखी मुलींना शिक्षण देतील.
02:42
And all of them together over time
44
162117
3211
कालांतराने त्या सगळ्या मिळून एकत्रितपणे
02:45
would build a new Afghanistan from the bottom up,
45
165370
3545
एक नवा अफगाणिस्तान मुळापासून उभारतील,
02:48
and they would be among its leaders.
46
168915
2169
आणि त्याचं नेतृत्व करतील.
02:52
I needed a place where these girls would learn to read English and Koran.
47
172544
5547
या मुलींना इंग्रजी आणि कुराण वाचता येईल अशी एक जागा मला हवी होती.
02:58
I needed a place where the administration and instructors would be women.
48
178758
4922
अशी जागा, की जिथे प्रशासक आणि शिक्षिका स्त्रियाच असतील.
03:04
A place where the notion of female leadership --
49
184431
4796
जिथे स्त्री नेतृत्वाचं
03:09
Afghan female leadership -- would become known for every student.
50
189269
4629
- अफगाण स्त्री नेतृत्वाचं - उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थिनी जाणत असेल.
03:15
I needed a place that quite simply did not exist in Afghanistan.
51
195191
4338
मला हवी होती तशी जागा अफगाणिस्तानात अस्तित्वात नव्हती.
03:20
So my team and I created it.
52
200780
2711
मग मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ती तयार केली.
03:25
In 2016, SOLA became a full-fledged boarding school for girls.
53
205785
5464
२०१६ मध्ये SOLA हे पूर्णपणे मुलींसाठी वसतीगृह झालं.
03:31
The first and only in Afghanistan.
54
211958
3420
अफगाणिस्तानातील प्रथम, आणि एकमेव.
03:36
(Applause)
55
216296
5672
(टाळ्या)
03:42
That year, we enrolled 24 girls in sixth grade.
56
222010
4504
त्या वर्षी आम्ही सहावीच्या वर्गात चोवीस मुलींना प्रवेश दिला.
03:47
By 2021,
57
227766
1626
२०२१ पर्यंत
03:49
we had enrolled nearly 100 girls in grades six to 11.
58
229392
3462
सहावी ते अकरावी इयत्तांमध्ये आम्ही सुमारे शंभर मुलींना प्रवेश दिला होता.
03:54
I'll tell you something I'm very proud of.
59
234314
2377
आता तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट सांगते.
03:57
In 2016,
60
237192
1793
२०१६ मध्ये
03:58
we drew girls from 14 of Afghanistan's 34 provinces.
61
238985
4254
अफगाणिस्तानच्या ३४ पैकी १४ प्रांतांतून मुली आमच्याकडे येत होत्या.
04:05
This year, we have girls from 28 provinces.
62
245325
3962
या वर्षी, २८ प्रांतांतल्या मुली येत आहेत.
04:09
(Applause)
63
249287
5506
(टाळ्या)
04:14
Imagine you are a girl from one of these provinces coming to SOLA.
64
254793
4087
कल्पना करा, तुम्ही अशा एखाद्या प्रांतातून SOLAमध्ये येणारी मुलगी आहात.
04:19
You've probably never lived away from your family.
65
259589
2711
तुम्ही कधीच आपल्या कुटुंबापासून दूर राहिले नसाल.
04:23
As you can see, we have obscured their faces for their safety.
66
263051
3962
या मुलींचे चेहरे आम्ही सुरक्षिततेसाठी दाखवलेले नाहीत.
04:28
But when you arrive on campus, an older sister will be there for you.
67
268014
4296
पण तुम्ही आमच्या प्रांगणात येताच, एक मोठी ताई तुमच्याबरोबर राहील.
04:33
She will be beside you as you pray in the campus mosque;
68
273186
4212
प्रांगणातील मशिदीत प्रार्थना करताना ती तुमच्याबरोबर असेल.
04:37
she will eat with you;
69
277440
2002
जेवण जेवताना ती तुमच्याबरोबर असेल.
04:39
she will help you with your schoolwork.
70
279484
2044
ती तुम्हाला अभ्यासात मदत करेल.
04:42
You are from different provinces, different ethnicities,
71
282320
4338
भिन्न प्रांतातील, भिन्न वंशाच्या असूनही
04:46
but you are united by sisterhood.
72
286699
3295
तुम्ही एकत्र याल सहभगिनीत्वाच्या भावनेमुळे.
04:50
By your identity as Afghan girls.
73
290995
3420
अफगाण मुली या सामायिक ओळखीमुळे.
04:56
Educating girls, breaking barriers,
74
296125
2920
मुलींना शिक्षण देणे, एकमेकांतील भिंती दूर करणे
04:59
this is what we do at SOLA.
75
299087
1918
हेच SOLAचं काम आहे.
05:02
We became known for this nationwide.
76
302090
2919
यामुळे देशभरात लोक आम्हाला ओळखू लागले.
05:05
Parents came to us from across Afghanistan
77
305593
3045
अफगाणिस्तानातील सर्व ठिकाणांहून पालक आमच्याकडे येऊ लागले.
05:08
asking us to admit their daughters.
78
308638
2211
त्यांच्या मुलींसाठी प्रवेश मागू लागले.
05:12
I remember one father in particular,
79
312225
3378
खासकरून एक वडील मला आठवतात,
05:15
from a rural province,
80
315645
1251
एका ग्रामीण प्रांतातले.
05:16
and one of his daughters was already a student with us.
81
316938
2878
त्यांची एक मुलगी आमची विद्यार्थिनी होती.
05:20
This was back in 2019,
82
320400
2127
ही गोष्ट २०१९ मधली.
05:22
and I remember him coming to campus and sitting in my office.
83
322527
3378
ते आमच्या प्रांगणात येऊन माझ्या कचेरीत बसल्याचं मला आठवतं.
05:26
He was trying to convince me
84
326906
1919
ते मला विनंती करत होते, की
05:28
to admit another one of his daughters.
85
328867
2168
त्यांच्या आणखी एका मुलीला प्रवेश द्यावा.
05:32
On his way out, he stopped in the doorway,
86
332287
4713
परत जाताना ते दारात थांबले.
05:37
turned around and looked at me, and completely calmly, he said,
87
337041
4964
मागे वळून त्यांनी माझ्याकडे पाहिलं, आणि अत्यंत शांतपणे म्हणाले,
05:43
"When the Taliban come back,
88
343631
2544
“जेव्हा तालिबान परत येतील,
05:46
please promise
89
346175
2128
तेव्हा माझ्या मुलीसंबंधीची माहिती
05:48
that you will burn my daughter's records.
90
348344
2086
तुम्ही जाळून टाकाल, असं मला वचन द्या.
05:52
If the Taliban know my daughter studies here,
91
352098
3420
माझी मुलगी इथे शिकते असं त्यांना कळलं,
05:55
they will kill my family."
92
355518
1752
तर माझ्या कुटुंबाची ते हत्या करतील.”
05:59
Remember, this was 2019.
93
359981
3170
लक्षात घ्या, हे वर्ष होतं २०१९.
06:03
Two years ago.
94
363192
1127
दोन वर्षांपूर्वी.
06:05
He didn't say "if the Taliban come back."
95
365111
2753
“तालिबान जर परत आले..” असं ते म्हणाले नाहीत.
06:09
He said "when."
96
369198
1919
ते म्हणाले, “जेव्हा.. ”
06:13
I promised him that I would do what he asked.
97
373453
3170
त्यांच्या विनंतीप्रमाणे करेन, असं वचन मी त्यांना दिलं.
06:17
And this summer ...
98
377916
1543
आणि या उन्हाळ्यात..
06:22
I did.
99
382462
1209
मी तसं केलं.
06:41
What you're seeing here are the records of my students burning.
100
401981
4129
इथे माझ्या विद्यार्थिनींबद्दलची माहिती जाळली जाताना दिसते आहे.
06:47
We set this fire
101
407904
1877
ही आग आम्ही लावली,
06:51
to protect every girl who's ever studied at SOLA.
102
411449
3462
SOLA मध्ये शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीच्या सुरक्षेकरिता.
06:56
This was mid-August.
103
416996
1794
हे ऑगस्टच्या मध्यावर घडलं.
07:00
Right as the Taliban were about to enter Kabul.
104
420041
2878
तालिबान काबूलमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर होते.
07:04
Less than two weeks later,
105
424462
1960
यानंतर दोनच आठवड्यांत
07:06
nearly 250 members of the SOLA community,
106
426464
4046
SOLA परिवारातील सुमारे २५० सदस्य,
07:10
students, staff and family members,
107
430551
3712
विद्यार्थिनी, कर्मचारी आणि कुटुंबीय
07:14
were out of Afghanistan and safe in the nation of Rwanda.
108
434305
3671
अफगाणिस्तानातून बाहेर पडून रवांडा देशात सुखरूप पोहोचले होते.
07:19
(Applause)
109
439185
6048
(टाळ्या)
07:25
I will say this again.
110
445274
1377
पुन्हा सांगते,
07:28
When you face the uncertainty of what might be,
111
448403
4379
अनिश्तिततेचा सामना केल्यानंतर,
07:32
you can turn it into the certainty of what will be.
112
452824
3170
त्याचं रूपांतर निश्चित भविष्यात करता येतं.
07:37
SOLA's departure from Afghanistan made headlines.
113
457787
2961
SOLA अफगाणिस्तानाबाहेर पडण्याला प्रसिद्धी मिळाली.
07:41
And I think it has drawn the attention
114
461916
2753
मला वाटतं, ही प्रसिद्धी मिळण्याचं एक कारण म्हणजे
07:44
partly because how swiftly the Taliban took over Afghanistan
115
464711
3712
तालिबानने इतक्या लवकर अफगाणिस्तानवर कबजा मिळवला,
07:48
and how quickly so much of what was beautiful about my country
116
468464
3796
आणि माझ्या देशात जे जे सुंदर होतं,
07:52
turned to dust.
117
472260
1209
ते लगेच धुळीला मिळालं.
07:55
But what these stories don't usually tell you
118
475471
2628
पण या गोष्टींमधून तुम्हाला समजून येणार नाही, की
07:58
is that we had been quietly planning
119
478099
2002
वर्षातला बराचसा काळ आम्ही शांतपणाने
08:00
for this day of our departure for most of the year.
120
480143
3545
देश सोडून जाण्याचे बेत आखत होतो.
08:04
I had that conversation with my student's father in December 2019.
121
484981
4421
त्या विद्यार्थिनींच्या वडिलांशी डिसेंबर २०१९ मध्ये माझं बोलणं झालं.
08:10
The United States signed an agreement with the Taliban in February 2020.
122
490486
5631
फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकेने तालिबानबरोबर करारावर सही केली.
08:17
And the US announced its unconditional withdrawal from Afghanistan
123
497368
3837
अमेरिकेने अफगाणिस्तानातून बिनशर्त माघार घेण्याची तारीख जाहीर केली,
08:21
in April 2021.
124
501247
2044
एप्रिल २०२१ मध्ये.
08:26
These dates were like signposts on a road I never wanted to be on.
125
506627
4088
मला ज्या रस्त्याने जायचं नव्हतं, त्यावर या तारखांच्या पाट्या लागल्या होत्या.
08:32
I couldn't see far enough down that road to be certain about it's end.
126
512592
4754
या रस्त्याचा शेवट माझ्या नजरेत येत नव्हता.
08:38
But what I was certain of was that I would not sit passively by
127
518806
4880
पण मला खात्री होती, की मी तटस्थ बसून राहणार नव्हते.
08:43
and let that road lead me.
128
523728
2294
रस्ता नेईल तिकडे जाणार नव्हते.
08:48
This spring, we started making plans to bring our students overseas
129
528149
4546
या वसंत ऋतूत आम्ही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी परदेशी न्यायचे
08:52
for a study abroad program.
130
532695
1835
बेत आखायला सुरुवात केली.
08:55
This takes time.
131
535948
1293
या कामाला वेळ लागतो.
08:57
We needed to identify potential host nations;
132
537742
4004
त्यांची सोय करणारे देश शोधायचे होते.
09:01
we needed parents to grant permission;
133
541788
2752
पालकांची परवानगी हवी होती.
09:05
we needed to speak with officials and gather our resources.
134
545708
4630
अधिकाऱ्यांशी बोलायचं होतं. साह्य मिळवायचं होतं.
09:11
It takes time,
135
551672
1210
या कामाला वेळ लागतो.
09:12
and all the while you're moving down that road, going faster,
136
552882
3879
आणि या वेळेत आपण त्या रस्त्याने पुढे जात असतो.
09:16
gaining momentum toward what lies at the end.
137
556803
4004
वाढत्या वेगाने, वाढत्या जोराने रस्त्याच्या शेवटाकडे जात असतो.
09:23
There is a lot about this that I still cannot talk about.
138
563226
3044
यातील काही गोष्टींबद्दल मी अजूनही बोलू शकत नाही.
09:28
Some of it is for security reasons.
139
568397
2420
काही सुरक्षिततेच्या कारणांसाठी,
09:32
And some of it is for personal reasons.
140
572026
2628
काही वैयक्तिक कारणांसाठी.
09:35
This is still very raw for me.
141
575613
1793
हे अजूनही माझ्या पचनी पडलेलं नाही.
09:46
I never imagined
142
586249
3336
मी कल्पनाही केली नव्हती,
09:49
Afghanistan would fall as fast as it did.
143
589585
3754
इतक्या लवकर अफगाणिस्तानचा पराभव होईल.
09:58
No one imagined it.
144
598010
1377
हे कल्पनातीत होतं.
10:01
But I will tell you this.
145
601472
1710
पण तुम्हाला सांगते,
10:04
On August 1,
146
604183
2336
एक ऑगस्टला
10:06
we were bringing our students back to Kabul
147
606561
2627
आम्ही आमच्या विद्यार्थिनींना काबूलमध्ये परत आणलं,
10:09
after their semester break.
148
609188
1835
एका सेमिस्टरमधल्या सुट्टीनंतर.
10:11
On August 15,
149
611816
2502
पंधरा ऑगस्टला
10:14
the Taliban were in Kabul and in control.
150
614318
3087
तालिबान काबूलमध्ये आले आणि त्यांनी ताबा घेतला.
10:18
And on August 30,
151
618865
2794
आणि तीस ऑगस्टला
10:21
we were holding our second day of classes at our new campus in Rwanda
152
621701
5088
रवांडामधल्या नवीन प्रांगणात भरलेल्या आमच्या शाळेचा दुसरा दिवस होता.
10:26
with our entire community together and safe.
153
626831
3045
आमचा पूर्ण परिवार एकत्र आणि सुखरूप होता.
10:30
(Applause)
154
630877
6923
(टाळ्या)
10:39
That is how fast things can move.
155
639510
2795
अशा वेगाने गोष्टी घडू शकतात.
10:43
And that's what anyone, not just me,
156
643014
2502
आणि कोणीही, फक्त मीच नव्हे,
10:45
but anyone can accomplish when you accept the uncertainty of what might be,
157
645516
6423
तर कोणीही, अनिश्चिततेचा स्वीकार करून,
10:51
and through careful contingency planning,
158
651939
3295
आकस्मिक परिस्थितीसाठी काळजीपूर्वक बेत आखून
10:55
turn it into the certainty of what will be.
159
655276
2461
तिचं रूपांतर निश्चित अशा भविष्यकाळात करू शकतं.
10:59
You will find yourself somewhere new.
160
659071
2419
यातून तुम्ही एका नवीन जागी पोहोचाल.
11:01
And different.
161
661991
1335
तुमचं आयुष्य बदलून जाईल.
11:03
Adapting and succeeding.
162
663743
3545
परिस्थितीशी जुळवून घेत, यशस्वी होत.
11:09
And sometimes,
163
669081
1919
आणि कधीतरी
11:11
you will know you have left a light on to help you find your way home.
164
671000
4004
तुमच्या लक्षात येईल, की आपण लावलेला दिवा वाट दाखवतो आहे.
11:15
What you're seeing here is something that I very rarely show publicly.
165
675630
5088
ही चित्रं मी इतरत्र फारशी जाहीरपणे दाखवलेली नाहीत.
11:21
Earlier, I talked about SOLA's campus in Kabul.
166
681761
3336
मघाशी मी SOLAच्या काबूलमधील प्रांगणाबद्दल बोलले.
11:25
That campus is a series of rented buildings that we have converted
167
685765
3545
तिथे रांगेने भाड्याच्या इमारती आहेत. शाळेचे वर्ग आणि राहत्या खोल्यांमध्ये
11:29
into classroom and residential space.
168
689352
2752
आम्ही त्यांचं रूपांतर केलं आहे.
11:32
But what you're seeing here is something very different.
169
692980
2836
पण इथे तुम्ही जे पाहता आहात ते पूर्णपणे निराळं आहे.
11:37
This is a perimeter wall
170
697443
2920
काबूलच्या मध्यवर्ती भागातील
11:40
that rings a parcel of land in the heart of Kabul city,
171
700404
3879
जमिनीच्या एका तुकड्याभोवतालची ही भिंत आहे.
11:44
land that SOLA holds legal rights to.
172
704825
2878
या जागेचा कायदेशीर ताबा SOLAकडे आहे.
11:48
This is the land where we're going to build a permanent campus,
173
708412
4338
या ठिकाणी आम्ही एक कायमस्वरूपी प्रांगण बांधणार आहोत.
11:52
where Afghan girls will come to live and study in safety.
174
712792
4379
तिथे अफगाण मुली सुरक्षित वातावरणात राहतील आणि शिकतील.
11:57
We cleared this land ourselves,
175
717588
2878
ही जागा आम्ही स्वतः साफ केली आहे.
12:00
all 18,000 cubic meters of landfill.
176
720800
4045
ही १८,००० क्युबिक मीटर्सची भरावाची जागा.
12:06
We raised this wall ourselves.
177
726430
3003
ही भिंत आम्हीच बांधली.
12:10
We knew we would face opposition, and we planned for it.
178
730309
3045
विरोध होणार हे जाणून आम्ही तसा बेत आखला होता.
12:14
We spoke with our neighbors,
179
734605
1794
आम्ही तिथल्या शेजाऱ्यांशी बोललो.
12:16
explaining how valuable an educated girl is to her family,
180
736440
5047
सुशिक्षित मुलीचं तिच्या कुटुंबासाठी किती महत्त्व असतं ते त्यांना समजावलं.
12:22
explaining how one day their daughters could apply to study at SOLA.
181
742613
4296
एके दिवशी त्यांच्या मुली SOLAमध्ये शिकण्यासाठी अर्ज करू शकतील, हेही सांगितलं.
12:27
And our neighbors became some of our strongest allies.
182
747994
3211
आणि आमचे शेजारी हे आमचे जोरदार समर्थक बनले.
12:32
We spoke with high-level government officials
183
752623
2961
आम्ही उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांशी बोललो.
12:35
who complained that this land was too valuable
184
755626
2753
ही मोलाची जागा, मुलींच्या शिक्षणासाठी वाया जाईल
12:38
to be wasted on educating girls.
185
758421
2294
असं त्यांना वाटत होतं.
12:41
And we convinced them otherwise.
186
761257
2044
आम्ही त्यांचं मतपरिवर्तन केलं.
12:51
Those officials,
187
771892
2128
ते अधिकारी
12:54
of course, aren't in government anymore.
188
774061
2127
अर्थातच आता सरकारी अधिकारी नाहीत.
12:56
Afghanistan has new leaders.
189
776897
2378
अफगाणिस्तानचं नेतृत्व बदललं आहे.
13:01
And while this is a sensitive topic,
190
781110
2628
हा अतिशय संवेदनशील विषय असला,
13:03
I can say that it's quite possible
191
783779
3128
तरी मी म्हणेन, या नव्या जागेतलं बांधकाम
13:06
that construction on this new campus might resume relatively soon.
192
786949
5756
लवकरच पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
13:13
Time will tell.
193
793289
1209
ते येत्या काळात समजेल.
13:16
Nine years ago,
194
796584
1668
नऊ वर्षांपूर्वी
13:18
I stood on a TEDWomen stage,
195
798252
2711
TEDWomenच्या व्यासपीठावरून मी म्हणाले होते,
13:21
and I said Afghanistan is a country of hope and boundless possibilities.
196
801005
6548
अफगाणिस्तान हा आशेचा, अमर्याद संधी असलेला देश आहे.
13:27
And every single day,
197
807595
1376
आणि दररोज
13:29
the girls of SOLA remind me of that.
198
809013
2210
SOLAच्या मुली मला याची आठवण करून देतात.
13:31
Like me, they are dreaming big.
199
811640
2294
माझ्यासारख्याच, त्याही मोठी स्वप्नं पाहताहेत.
13:35
Earlier this year,
200
815144
2628
या वर्षाच्या सुरुवातीला
13:37
I was on SOLA's campus in Kabul
201
817813
2211
काबूलच्या SOLA मध्ये
13:40
interviewing a girl who was applying for sixth grade.
202
820066
3670
मी एका मुलीची मुलाखत घेत होते. तिने सहाव्या इयत्तेसाठी अर्ज केला होता.
13:44
I asked her why she wanted to come to SOLA,
203
824820
2962
तिला मी विचारलं, की तुला SOLAमध्ये कशासाठी यायचं आहे.
13:47
which is a question I ask all our applicants.
204
827823
3170
हा प्रश्न मी अर्ज करणाऱ्या प्रत्येकीला विचारते.
13:52
She said,
205
832036
1543
ती म्हणाली,
13:54
"I have dreamed of this.
206
834372
2377
“हे माझं स्वप्न आहे.
13:57
I've dreamed of coming to SOLA ever since I was a little girl."
207
837792
3837
SOLAत यायचं स्वप्न मी लहानपणापासून पाहिलं आहे.
14:04
In all these years that I have interviewed girls from across Afghanistan,
208
844715
5714
इतकी वर्षं मी संपूर्ण अफगाणिस्तानातल्या मुलींच्या मुलाखती घेते आहे.
14:10
this was the first time that a young girl said that to me.
209
850471
3712
पण एका छोट्या मुलीने असं सांगण्याची ही पहिलीच वेळ.
14:17
Why do I keep doing what I do,
210
857645
2794
हे सगळं मी कशासाठी करते,
14:20
despite the risk that comes with it and all the uncertainty?
211
860481
3253
त्यात इतका धोका, अनिश्चितता आहे हे ठाऊक असूनही?
14:26
Because Afghanistan is a country of hope and dreams.
212
866737
4004
कारण अफगाणिस्तान हा आशा आणि स्वप्नांचा देश आहे.
14:32
It's my home.
213
872410
1418
हे माझं घर आहे.
14:36
And it always will be.
214
876872
2169
आणि कायम राहील.
14:41
And now, out there in the most remote corners of Afghanistan, are young girls,
215
881585
6507
आणि आता, अफगाणिस्तानच्या अत्यंत दुर्गम कोपऱ्यातल्या मुली
14:48
dreaming to attend SOLA.
216
888134
1876
SOLA मध्ये येण्याची स्वप्नं पाहताहेत.
14:50
My community,
217
890636
1668
माझा परिवार,
14:52
my students are settling and thriving in Rwanda.
218
892346
5172
माझ्या विद्यार्थिनी रवांडामध्ये स्थायिक होताहेत, बहरताहेत.
14:57
And I'm so grateful we're there.
219
897893
2086
तिथे जाता आलं याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
15:02
I see Afghanistan now through TV news reports
220
902022
4130
आता मला टी. व्ही.वर बातम्यांमधून अफगाणिस्तान दिसतो.
15:06
or on my phone, when friends, still in Afghanistan, call me.
221
906193
4213
किंवा अजून अफगाणिस्तानात राहणारे स्नेही फोन करतात, तेव्हा दिसतो.
15:12
But SOLA is there too.
222
912116
1835
पण SOLA तिथेही आहे.
15:15
We have planted roots that can never be destroyed.
223
915202
3712
आम्ही रोवलेली बीजं कधीच नष्ट होणार नाहीत.
15:20
Nine years ago,
224
920833
1793
नऊ वर्षांपूर्वी
15:22
I challenged the world to dare to educate Afghan girls.
225
922668
3462
अफगाण मुलींना शिकवण्याचं आव्हान मी जगासमोर मांडलं.
15:27
Those girls are young women now.
226
927548
2044
त्या मुली आता तरुण महिला आहेत.
15:30
And they will do what Afghan women have always done.
227
930426
3170
अफगाण महिलांनी आजवर जे केलं, तेच त्याही करतील.
15:34
Meet uncertainty head on and rise above it.
228
934430
3086
अनिश्चिततेचा सामना करून, तिच्यावर मात करतील.
15:40
I know they will do their part.
229
940644
2086
त्यांचा सहभाग त्या देतील, हे मला ठाऊक आहे.
15:43
But they,
230
943564
1710
पण त्यांना,
15:45
we need something from you,
231
945316
3670
आम्हाला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे.
15:49
all of you here and watching this.
232
949028
2377
इथे आलेल्या आणि व्याख्यान पाहणाऱ्या सर्वांकडून.
15:52
So today I issue another challenge to the world.
233
952448
3545
आज मी जगाला आणखी एक आवाहन करते आहे.
15:57
Do not look away.
234
957119
1627
आमच्याकडे पाठ फिरवू नका.
16:00
As the noise dies down,
235
960456
1918
जेव्हा सर्व गदारोळ थांबेल,
16:02
and Afghanistan slips from the front pages,
236
962416
3253
अफगाणिस्तानच्या बातम्या मुख्य पानावरुन नाहीशा होतील, तेव्हा
16:05
do not look away.
237
965669
1418
आमच्याकडे पाठ फिरवू नका.
16:08
In nine years, it will be the year 2030.
238
968881
2919
आणखी नऊ वर्षांनी २०३० साल उजाडेल.
16:13
It's the year I will celebrate my 40th birthday.
239
973302
5005
त्या वर्षी मी चाळिसावा वाढदिवस साजरा करेन.
16:20
So here is my dream,
240
980392
2378
आता माझं स्वप्न सांगते.
16:22
my birthday wish.
241
982770
1376
वाढदिवसानिमित्त माझी इच्छा.
16:25
In nine years,
242
985689
2169
नऊ वर्षांनी,
16:27
I hope to be speaking with you again
243
987858
2628
काबूलच्या SOLA मधून
16:32
from SOLA’s campus in Kabul,
244
992821
3337
तिथल्या माझ्या सर्व विद्यार्थिनींसह
16:36
with all of my students there.
245
996158
2586
मी तुमच्याशी पुन्हा एकदा बोलेन अशी मला आशा वाटते.
16:40
I will see you then,
246
1000454
2336
तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली नाहीत,
16:42
if you do not look away.
247
1002831
1502
तर आपण पुन्हा भेटू.
16:44
Thank you.
248
1004333
1168
धन्यवाद.
16:45
(Applause)
249
1005501
6506
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7