Aparna Hegde: The life-saving tech helping mothers make healthy decisions | TED Fellows

24,993 views ・ 2021-06-23

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:14
[SHAPE YOUR FUTURE]
0
14204
2167
[तुमचे भविष्य घडवा]
00:17
Anita died in my presence while giving birth to life.
1
17163
4291
प्रसूतीकाळी अनिताचा मृत्यू झाला, त्यावेळी मी तिथे उपस्थित होते.
00:21
She bled to death and lost her child.
2
21996
3125
तिचा मृत्यू रक्तस्रावामुळे झाला, आणि तिचे बाळही मरण पावले.
00:25
The irony was that she had access to care.
3
25746
3208
विरोधाभास असा, की तिला वैद्यकीय मदत उपलब्ध होती.
00:29
In the first trimester of pregnancy,
4
29454
2292
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत
00:31
she had visited the antenatal clinic of the hospital in Mumbai
5
31788
3500
तिने मुंबईच्या रुग्णालयातील प्रसूतिपूर्व क्लिनिकला भेट दिली होती.
00:35
where I was doing residency.
6
35329
1709
तिथे मी निवासी डॉक्टर होते.
00:37
But over four hours of waiting in the hot, sweaty,
7
37038
3833
पण तिला उकाडा, घाम यांचा सामना करत चार तासांपेक्षा जास्त थांबावे लागले,
00:40
dingy, overcrowded clinic
8
40913
2166
त्या कळकट क्लिनिकमधल्या गर्दीत.
00:43
just to get a minute with me,
9
43079
2292
तेही फक्त एक मिनिटभर
00:45
a harried, overworked resident doctor,
10
45371
2541
मला, एका वैतागलेल्या निवासी डॉक्टरला भेटण्यासाठी.
00:47
meant that she never came back,
11
47912
2584
मग ती कधीच परत आली नाही.
00:50
only to die in labor months later.
12
50537
2875
काही महिन्यांनी प्रसूतीदरम्यान तिचा मृत्यू झाला.
00:53
I was wracked with guilt.
13
53996
2333
मी अपराधाच्या भावनेत पोळून निघाले.
00:56
If only I had counseled her about the danger signs,
14
56871
3416
मी तिला धोक्याच्या सूचना समजावल्या असत्या,
01:00
why she needed to access regular care.
15
60329
2542
आणि नेहमी वैद्यकीय संपर्कात राहायला सांगितलं असतं,
01:03
Would she and her child have survived?
16
63537
2875
तर तिचे आणि बाळाचे प्राण वाचले असते का?
01:06
She did not die due to a terminal condition.
17
66412
2459
एखाद्या प्राणांतिक आजाराने तिचा मृत्यू झाला नव्हता,
01:08
She died because of underlying anemia,
18
68912
2375
तर तिच्या सुप्त प्रकारच्या ऍनिमियामुळे झाला होता.
01:11
an easily treatable, preventable condition.
19
71329
2750
या विकाराला प्रतिबंध करणे किंवा तो बरा करणे सहज शक्य आहे.
01:14
I saw these stories daily.
20
74496
2792
अशा कहाण्या मी रोज बघत होते.
01:17
Systemic, preventable problems resulting in mothers and children dying
21
77329
4292
टाळता येण्याजोग्या समस्यांमुळे होणारे मातांचे आणि बालकांचे मृत्यू.
01:21
in the most unjust of circumstances.
22
81663
2666
आणि त्याला कारणीभूत अत्यंत अन्यायकारक परिस्थिती.
01:24
In the next one hour,
23
84329
1542
पुढच्या एका तासामध्ये
01:25
three women will die while giving birth somewhere in India.
24
85913
3625
भारतात कुठेतरी तीन महिला प्रसूतीच्या वेळी मरण पावणार आहेत.
01:29
Two children under age five die every minute in India.
25
89579
4000
भारतात प्रत्येक मिनिटागणिक पाच वर्षांखालची दोन मुले मरण पावतात.
01:33
I am a practicing urogynecologist,
26
93913
1958
मी एक कार्यरत स्त्रीआरोग्यतज्ज्ञ आहे.
01:35
but very early in my medical training,
27
95913
2125
वैद्यकीय शिक्षणाच्या सुरुवातीलाच
01:38
I realized that hospital-based solutions were not enough.
28
98079
3542
माझ्या लक्षात आले, की रुग्णालयात होणारे उपाय पुरेसे नसतात.
01:41
And given the sheer scale of India's problems,
29
101663
2625
भारतातल्या समस्यांची प्रचंड व्याप्ती लक्षात घेता,
01:44
any solution that made a difference had to be scalable,
30
104329
4084
यशस्वी उपाय सापडला, तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर करता यायला हवा.
01:48
accessible to the last woman and child directly in their homes,
31
108454
4584
वंचित महिला आणि बालकांना अगदी त्यांच्या घरात मिळायला हवा.
01:53
and yet cost-effective and resource-light.
32
113038
2833
शिवाय तो स्वस्त, कमी सामुग्रीत होणारा हवा.
01:56
And then the mobile phone came to India
33
116246
2333
मग भारतात मोबाईल फोन्स आले.
01:58
and within a few years everyone had a mobile phone.
34
118621
3292
काही वर्षांत प्रत्येकाजवळ मोबाईल फोन आला.
02:01
There are currently more mobile phones in India than toilets.
35
121954
3250
सध्या भारतात मोबाईल फोन्सची संख्या शौचालयांपेक्षा जास्त आहे.
02:05
The idea then struck me.
36
125246
1792
मग माझ्या मनात एक कल्पना आली.
02:07
Why not use a simple technological tool like a mobile phone,
37
127496
4667
मोबाईल फोनसारखे सोपे तंत्रज्ञान वापरून,
02:12
which is available in almost every Indian household
38
132163
3750
जे जवळपास प्रत्येक भारतीय घरात उपलब्ध आहे,
02:15
to bridge the yawning systemic gaps in health care?
39
135954
3334
आरोग्य सेवेतली मोठमोठी भगदाडं बुजवता येतील का?
02:19
Maybe we could have simply called Anita weekly
40
139746
2625
कदाचित दर आठवड्याला आम्ही अनिताला एक साधा फोन करून
02:22
with critical lifesaving information.
41
142371
2708
तिचा जीव वाचवणारी महत्त्वाची माहिती देऊ शकलो असतो.
02:25
On the other hand,
42
145121
1208
दुसरीकडे,
02:26
maybe we could have provided mobile-phone-based training
43
146371
3042
मोबाईल फोनवरून आरोग्यसेविकेला शिक्षण देता आले असते,
02:29
to the health worker who could have diagnosed Anita's anemia
44
149454
3834
तर तिने अनिताच्या ऍनिमियाचे निदान केले असते.
02:33
in the community itself.
45
153329
1667
तिथेच, तिच्या राहत्या वस्तीत.
02:35
Thus was born my NGO ARMMAN.
46
155746
2792
यातून माझ्या ARMMAN या NGOचा जन्म झाला.
02:39
Our programs, mMitra and Kilkari,
47
159121
3250
mMitra आणि Kilkari या आमच्या उपक्रमांद्वारे
02:42
are free, weekly voice call services.
48
162371
2708
दर आठवड्याला मोफत फोनकॉल्स केले जातात.
02:45
They provide preventive information directly to women
49
165746
3542
त्याद्वारे प्रतिबंधात्मक उपायांची माहिती
02:49
through pregnancy and infancy
50
169288
2791
गरोदरपणा आणि बालक संगोपन या काळात महिलांना दिली जाते,
02:52
in their chosen time slot and language.
51
172121
3292
त्यांच्या सोयीच्या वेळी, त्यांच्या पसंतीच्या भाषेत.
02:55
There are multiple tries for every message,
52
175413
2666
प्रत्येक संदेश पाठवण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.
02:58
a missed-call system,
53
178121
1208
यात मिस्ड कॉल पद्धत आहे,
02:59
and mMitra also has a call center.
54
179371
2417
आणि mMitraचे कॉल सेंटर सुद्धा आहे.
03:02
If only Anita had received this service.
55
182371
3042
अनिताला ही सेवा मिळाली असती तर?
03:05
In the second month of pregnancy itself,
56
185413
2416
गरोदरपणाच्या दुसऱ्याच महिन्यात
03:07
it would have told her about the need to take an iron pill daily
57
187871
3542
तिने अनिताला सांगितले असते की, लोह पुरवणारी गोळी
03:11
from the third month of pregnancy.
58
191413
1708
तिसऱ्या महिन्यापासून रोज घ्यावी.
03:13
When the third month arrived,
59
193121
1667
तिसरा महिना लागताच
03:14
it would have sent her a reminder
60
194829
2084
तिने अनिताला आठवण करून दिली असती,
03:16
and counseled her on how to take the iron pills.
61
196954
2959
आणि ही गोळी कशी घ्यायची ते समजावले असते.
03:19
For example, the need to avoid tea, coffee to improve the absorption of iron
62
199954
4792
उदा. रक्तात लोह नीट शोषले जाण्यासाठी चहा, कॉफी न घेणे.
03:24
and stress on why it is so necessary to prevent anemia.
63
204788
3750
ऍनिमिया टाळण्याची इतकी गरज का, यावर भर दिला असता.
03:28
Two weeks later,
64
208538
1375
दोन आठवड्यांनंतर,
03:29
it would have spoken about how to tackle the adverse effects of iron pills,
65
209954
4042
लोह गोळ्यांच्या दुष्परिणामांवर उपाय सांगितले असते.
03:33
like constipation.
66
213996
1208
उदाहरणार्थ, मलावरोध.
03:35
If she had any query,
67
215954
1542
तिला काही शंका असल्या असत्या,
03:37
she could have reached out to our call center staff.
68
217538
2625
तर तिला आमच्या कॉल सेंटरशी संपर्क साधता आला असता.
03:40
These are simple voice calls.
69
220163
1958
हे साधे बोलण्याचे फोन कॉल्स आहेत.
03:42
As a typical doctor,
70
222496
1708
एक डॉक्टर म्हणून
03:44
I expected them to just inform
71
224204
2292
माझी अपेक्षा होती की या कॉल्सनी माहिती पुरवावी.
03:46
and hopefully lead to better health behaviors.
72
226538
3166
त्यातून आरोग्यदायी वर्तन घडेल अशी मला आशा होती.
03:49
However, the one unexpected transformational benefit
73
229746
4208
पण माझ्या अपेक्षेपलिकडचे एक परिवर्तन घडून आले.
03:53
that has completely blown my mind is this:
74
233996
3500
त्याने मी थक्क झाले.
03:57
Information is empowerment.
75
237496
2458
ज्ञान म्हणजे सबलीकरण.
04:00
Armed with this information,
76
240288
1541
या ज्ञानामुळे सबळ होऊन
04:01
women like Anita are upending patriarchal family dynamics,
77
241871
4125
अनितासारख्या महिला पितृसत्ताक कुटुंबपद्धती बदलताहेत.
04:06
challenging entrenched mores
78
246038
2416
पूर्वापार समजुतींना आव्हाने देताहेत
04:08
and demanding care.
79
248496
1667
आणि आरोग्यसेवांची मागणी करताहेत.
04:10
Karnam, the wife of a deeply conservative preacher,
80
250538
3416
तरन्नुम नावाच्या एका पुराणमतवादी धर्मोपदेशकाच्या पत्नीने
04:13
convinced her husband to adopt family planning
81
253954
2709
कुटुंबनियोजनाचे महत्त्व पतीला पटवले.
04:16
because mMitra told her
82
256704
1625
कारण mMitraने तिला सांगितले, की
04:18
that spacing between pregnancies is necessary.
83
258371
3167
दोन प्रसूतींमध्ये अंतर ठेवणे गरजेचे आहे.
04:21
And the change is intergenerational.
84
261538
2041
हा बदल पुढच्या पिढयांपर्यंत पोहोचत आहे.
04:24
Punita, form a deeply conservative family,
85
264121
2708
एका कट्टर पुराणमतवादी कुटुंबातील पुनिताने
04:26
sent her daughter to an English medium school.
86
266871
2708
आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे.
04:29
In addition to the big pictured messages,
87
269954
2167
अशा परिणामांचे हे मोठे चित्र दिसते.
04:32
the most underprivileged of women want to know
88
272121
2625
त्याचबरोबर वंचित महिलाही प्रश्न विचारताहेत.
04:34
when their child will understand color,
89
274788
2291
बाळ रंग कधी ओळखू लागेल?
04:37
how to ensure psychosocial stimulation of the child,
90
277079
3625
बाळाला मनोसामाजिक अनुभव कसे मिळवून द्यावेत?
04:40
when their child will develop fingers in their womb and so on.
91
280746
3667
गर्भाशयातील बाळाची बोटे कधी विकसित होतील? आणि असे अनेक प्रश्न.
04:44
Like any woman would.
92
284454
1875
इतर कोणत्याही महिलेप्रमाणे.
04:46
Our services respect that.
93
286329
2167
आमच्या सेवासंस्था याकडे आदराने पाहतात.
04:48
Over 20 million women in over 16 states in India
94
288954
3500
२०१४ पासून भारताच्या १६ हून अधिक राज्यांमधल्या
04:52
have enrolled for these services since 2014.
95
292454
3459
वीस दशलक्षांवर महिलांनी या सेवांमध्ये नाव दाखल केले आहे.
04:55
This is testament to how easily scalable and replicable these solutions are
96
295954
4375
या सेवासुविधा सहजपणे, मोठ्या प्रमाणावर, जगात अनेक ठिकाणी मिळू शकतात
05:00
anywhere in the world.
97
300371
1458
याचा हा पुरावा आहे.
05:01
Similarly, our mHealth-based refresher training program
98
301871
3625
तसाच, आमचा mHealth वर आधारित पुनः प्रशिक्षणाचा उपक्रम,
05:05
for government frontline health workers called Mobile Academy
99
305496
3917
सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी Mobile Academy द्वारे
05:09
has trained over 130,000 health workers in 13 states in India.
100
309413
5208
१३ राज्यांतील १.३ लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
05:14
Both Kilkari and Mobile Academy, in collaboration with the government,
101
314954
4084
Kilkari आणि Mobile Academy शासनाच्या सहकार्याने
05:19
will extend through the country in the next three to five years.
102
319079
3584
पुढच्या तीन ते पाच वर्षांत देशात सर्वत्र पोहोचणार आहेत.
05:22
Our goal is to be able to reach
103
322663
2166
आमचे ध्येय आहे,
05:24
over 15 million women and their children every year,
104
324871
3083
दरवर्षी दीड कोटीहून अधिक महिला आणि मुलांपर्यंत पोहोचणे.
05:27
and that would mean
105
327996
1167
आणि याचा अर्थ,
05:29
over half of the mothers and children born every year
106
329204
2834
वार्षिक जन्मदरापैकी अर्ध्या मुलांना आणि मातांना
05:32
have the information they need.
107
332038
2208
ही महत्त्वाची माहिती मिळेल.
05:34
And this massive scale is only possible
108
334288
2625
या प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे शक्य झाले,
05:36
because so many of our partners,
109
336954
2042
कारण आमच्या अनेक सहकर्मींनी,
05:38
be it NGOs, hospitals and the government,
110
338996
3208
म्हणजे NGO, रुग्णालये किंवा शासन यांनी
05:42
recognize the value of this approach
111
342246
2167
या दृष्टीकोनाचे महत्त्व ओळखले.
05:44
and provided the scaffold on which we grew.
112
344454
2917
त्यांनी आधार दिल्यामुळे आमची प्रगती झाली.
05:47
Our quest in the next five years is to adopt multimedia approaches,
113
347788
5291
पुढच्या पाच वर्षांसाठी आमचे ध्येय आहे, विविध माध्यमे वापरणे,
05:53
and given the massive amounts of data we have,
114
353121
2750
आणि उपलब्ध असलेला प्रचंड मोठा डेटा पाहता,
05:55
use the power of AI and predictive analytics
115
355913
3250
AI आणि भावी विश्लेषण वापरून,
05:59
to better serve our mothers and children.
116
359204
2500
माता आणि बालकांना अधिक चांगली सेवा पुरवणे.
06:01
And our tech platform and the networks we build are nimble.
117
361746
3792
आमचे तंत्रज्ञान आणि नेटवर्क्स अतिशय लवचिक आहेत.
06:05
When COVID-19 struck,
118
365579
1625
कोविड-१९ च्या काळात
06:07
lockdown was announced overnight.
119
367246
2417
रातोरात लॉकडाऊन लावण्यात आला.
06:09
Among the worst affected were the underprivileged women and children
120
369704
3375
त्यामुळे वंचित महिला आणि मुले यांना सर्वात जास्त झळ पोहोचली.
06:13
in the slums of Mumbai and Delhi,
121
373079
1875
कारण मुंबई आणि दिल्लीच्या झोपडपट्ट्या
06:14
which were declared as containment zones.
122
374954
2417
कंटेनमेंट विभाग ठरवण्यात आल्या.
06:17
However, pregnancy and infancy can't wait for a lockdown.
123
377413
3875
पण गर्भारपण आणि प्रसूती लॉकडाऊनसाठी थांबून राहू शकत नाही.
06:21
When there's an emergency like bleeding, care is needed immediately.
124
381288
4250
रक्तस्रावासारखी आणीबाणी आली, तर तात्काळ मदतीची गरज असते.
06:25
And we were right there and ready.
125
385579
2334
अशावेळी आम्ही तिथेच होतो, मदतीला तत्पर होतो.
06:27
We repurposed our tech platform within a matter of days.
126
387913
3666
काही दिवसांतच आमचे तंत्रज्ञान या गरजेसाठी तयार झाले.
06:31
We created a virtual clinic for antenatal pediatric care
127
391621
4000
गर्भाच्या प्रसूतीपूर्व आरोग्यासाठी आम्ही प्रतिरूप क्लिनिक तयार केले.
06:35
manned by qualified doctors.
128
395663
2041
त्यात पात्रताप्राप्त डॉक्टर्स उपलब्ध होते.
06:37
Our call-center staff arranged logistic support, like ambulances.
129
397746
4500
आमच्या कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.
06:42
We also sent COVID-specific information covering pregnancy and infancy
130
402288
4125
गर्भारपण आणि प्रसूतीकाळात महत्त्वाची कोविडविषयक माहिती
06:46
to over 300,000 pregnant women and mothers through voice calls.
131
406413
4416
आम्ही तीन लाखांहून अधिक गरोदर महिला, मातांना फोन कॉल्समधून पाठवली.
06:51
But why should you care about our mothers and children?
132
411204
3500
माता आणि बालकांची काळजी इतकी महत्त्वाची का?
06:55
The pandemic has made us confront this most implacable of truths.
133
415246
4708
या महामारीमुळे एक कठोर सत्य आपल्या समोर आले आहे.
06:59
A robust primary health care system is an absolute pillar
134
419996
4125
बळकट प्राथमिक आरोग्यसेवा हा निःसंशयपणे
07:04
of a functioning and efficient society.
135
424163
2250
प्रगत आणि कार्यक्षम समाजाचा पाया आहे.
07:06
Improvement in maternal and child health
136
426454
2167
माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा होताच
07:08
leads to horizontal development of health systems
137
428663
2708
त्याबरोबर आरोग्ययंत्रणांचा विकास होतो,
07:11
and improved primary health care.
138
431413
1875
आणि प्राथमिक आरोग्यसेवेत सुधारणा होते.
07:13
A village that can look after its mothers and children well
139
433746
3375
जे गाव माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते,
07:17
can look after all other conditions by ripple effect.
140
437121
3667
ते त्याबरोबर इतर आजारांचीही काळजी घेऊ शकते.
07:20
And pregnancy is not a disease.
141
440829
2042
गर्भारपण हा विकार नव्हे.
07:23
Childhood is not an ailment.
142
443371
2333
बालपण म्हणजे आजार नव्हे.
07:26
Dying due to natural life event is not acceptable,
143
446121
4292
आयुष्यातील नैसर्गिक घटनेमुळे मृत्यू येता कामा नये.
07:30
and we know why our mothers and children die.
144
450413
2666
माता आणि बालकांच्या मृत्यूंची कारणे आपल्याला ठाऊक आहेत.
07:33
Yet we invest so little in preventing their deaths.
145
453579
3667
तरीही ते मृत्यू टाळण्यासाठी आपण अत्यंत कमी प्रयत्न करतो.
07:37
There can be no global progress
146
457246
2375
वैश्विक प्रगती हवी असेल तर
07:39
until all our mothers and children do well.
147
459621
2875
आपल्या सर्व माता आणि बालके सुदृढ झाली पाहिजेत.
07:42
I implore you to add your voices to ours.
148
462913
4083
मी तुम्हांला आवाहन करते, की आमच्या आवाजात तुमचाही आवाज मिसळा.
07:47
To amplify this message loud and clear.
149
467038
2958
हा संदेश स्पष्ट आणि जोरात ऐकू येऊ द्या.
07:50
That maternal and child health is a human right.
150
470454
3625
माता आणि बालकांचे आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क आहे.
07:54
Thank you.
151
474079
1167
धन्यवाद.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7